Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स पीहू नंदिनी. तो
धन्स पीहू नंदिनी. तो अॅनोडाइस्ड कुकर चांगला चालतो का?
पण नॉनस्टीक म्हणुन इतकी
पण नॉनस्टीक म्हणुन इतकी चांगली नाहीत. तेल जास्त नाही टाकले तर पदार्थ चिकटतात.>>>
फ्युच्युरामध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे हार्ड अॅनोडाइज्ड आणि दुसरा नॉनस्टीक(ही जरा महाग असतात १ल्या पेक्षा) नुसती हार्ड अॅनोडाइअज्ड असतील तर तेल लागतेच. नॉनस्टीकवर कमी तेलात काम भागते.
इकडे बघा.
अॅनोडाइस्ड कुकर चांगला चालतो
अॅनोडाइस्ड कुकर चांगला चालतो का?<<< माझा साडेतीन लिटरचा प्रेशर पॅन आहे. वाटलं तर वरणभाताचा नेहमीसारखा कूकर लावता येतो. नाहीतर मसालेभात, बिशीबेळेभात वा तत्सम पदार्थ करता येतात.
कुठल्याही रेसिपीत जाड बुडाचे भांडे असे असले की मी हा प्रेशर पॅन वापरते. बासुंदी, गाजरहलवा, बेसन भाजणे अशा कामाना पण चान्गला पडतो (प्रेशर न लावता
)
नी, इथल्या कपकेक्स, केक्स
नी, इथल्या कपकेक्स, केक्स वगैरे ना ३५० फॅ लागतं. पिझ्झा, चिकन, रेड मीट वगैरे पदार्थांना ४२० - ४२५ डि फॅ लागतं टेम्परेचर. ३५० डि सेल्सियस मला वाटत कुठलेही घरगुती ओव्हन करत नसावेत. पॉटर मंडळींचे स्पेशल ओव्हन्स लागतील त्याला
अल्पना, ब्राउन चे हॅंडब्लेंडर अगदी मस्त. माझ्याकडे गेली १६ वर्षे आहे.
मिल्कशेक, श्रीखंड, वाटली डाळ, कांदा बारीक चिरणे, टॉमेटोची प्युरे, साल्सा या सगळ्यांकरता अगदी बेस्ट आहे तो.
माझ्याकडे छोटा , फ्युचुराचा
माझ्याकडे छोटा , फ्युचुराचा हार्ड अॅनोडाईझ्ड कुकर आहे. चार वर्ष झाली घेवून. मस्त चालतो एकदम. मुग डाळीची खिचडी वगैरे करायला तर एकदम पर्फेक्ट आहे.
येस्स मेधा माझाच काहीतरी घोळ
येस्स मेधा माझाच काहीतरी घोळ झालाय.
प्राची थॅन्क्स सो मच. माझा
प्राची थॅन्क्स सो मच.
माझा गोंधळ होऊनही मी वेब्साईट उघडली नव्हती.
प्राची बरं झालं सांगितलस ते.
प्राची बरं झालं सांगितलस ते. नेक्स्ट टाईम नॉनस्टीक घेउन बघते.
इथे अमेरिकेत oil pourer कोणते
इथे अमेरिकेत oil pourer कोणते वापरता तुम्ही सगळे?त्या डिशवॉशर सेफ नसलेल्या काचेच्या बाटल्या सोडून अजून एखादे ऑप्शन आहे का?
माझ्याकडे असे आहे, चित्रातला
माझ्याकडे असे आहे, चित्रातला सगळ्यात छोटा..
http://www.amazon.com/Tupperware-Modular-Mates-Dripless-Fuchsia/dp/75045...
मी इंडीयातून आणलाय..
छान आहे की..असा एकच कुठे
छान आहे की..असा एकच कुठे मिळतो ते बघायला पाहिजे.धन्यवाद !
मी उसगावात ब्रेड्मेकर मधेखुप
मी उसगावात ब्रेड्मेकर मधेखुप वेळा ब्रेड केली आहे..रात्री झोपताना टायमर सेट करुन लावली कि सकाळी ब्रेड तयार ..रात्री ब्रेड चा मस्त वास दरवळतो..बनाना ब्रेड्,जिरा ब्रेड्, अगदी थोडी चिली फ्लेसघालुन्.पुदिना,मॉडेर्न च्या फ्रुटी सद्रुश रेझिन्स्-काजु-ब्राउन शुगर थोडीशी घालुन ची ब्रेड वगेरे प्रकार केले..घरी केल्याचा व ताजी,गरम ब्रेड खाण्याचा आनंद अवर्णनीय.
मध्यंतरी एका एक्झीबिशनमध्ये
मध्यंतरी एका एक्झीबिशनमध्ये रोटी मेकरचं प्रात्यक्षिक बघून भुल पडलीये. काय सटासट रोट्या बनत होत्या (रोट्याच त्या, यांना चपात्या म्हणणं जीवावर येतं कारण काहीशा जाड वाटल्या. पण मस्त फुलत होत्या आणि कच्च्याही वाटत नव्हत्या.) शिवाय त्याच रोटीमेकरनं बिनतेलाचा खाकराही करता येतो.
खरंतर रोटीमेकर रोज घरी येऊन मऊसुत चपात्या करून देते. पण त्या खाकर्यावर जीव जडलाय. कोणाचा काही अनुभव?
सुलेखा, मस्तच गं.
मावेसाठी उत्तम दर्जाची भांडी
मावेसाठी उत्तम दर्जाची भांडी हवी आहेत. ऑनलाईन पर्चेस करू शकेन. कल्याणात एखादे दुकान माहिताय का कुणाला?
मामी, रोटीमेकर (यंत्र)
मामी, रोटीमेकर (यंत्र) रोजच्या पोळ्यांसाठी उपयोगी नाही फारसे. पोळ्या कडक होतात.
पण पुर्या (भराभर होतात), खाकरे (पातळ होतो एकदम) वगैरे पदार्थांसाठी उपयुक्त आहे.
सुलेखा, तुम्ही ब्रेड मेकर
सुलेखा, तुम्ही ब्रेड मेकर वापरावर एक धागा काढाल का? आम्ही शिकू तुमच्याकडून. तो भाजल्या ब्रेडचा वास तर ग्रेटच असतो.
अश्विनीमामी,सध्या मी इथे अन
अश्विनीमामी,सध्या मी इथे अन ब्रेडमेकर तिथे त्यामुळे बारीकसारीक माहितीसकट नुसतेच लिहीणे अशक्य्..त्यातुन मी नेटवरुन ब्रेडरेसिपी घेतलेली [ सध्या ती रेसिपी पण तिथेच आहे]तिथला ब्रेड मेकर ही लहानसा आहे..त्याचे व माझे तंत्र ही छान जमले. त्यामुळे आटोपशीर काम होते..
मामी,पौर्णिमा, रोटी मेकरच्या पोळ्या ताज्या खाल्ल्या तरच छान एरवी चिवट होतात.पण मी त्याचा वापर पोळ्या ,दुपोडी पोळ्या,पराठे लाटण्यासाठी केला पोळी लाटली गेली कि ती तव्यावर टाकायची..कमी श्रमात बर्याच पोळ्या करता येतात..
अल्पना,तुम्हि ब्राउन (?)चा
अल्पना,तुम्हि ब्राउन (?)चा हँडमिक्सी घेतलाय तो कसा आहे,म्हणजे चटण्या वगैरे होतात का त्या बारिक ?आणी किती वॅटचा आहे?
मला ईथे ÀEG कंपनीचा मिळतोय सेलमध्ये.कोणी वापरलाय का त्या कंपनीचा?
हँडमिक्सीमधे कांदा बारीक कसा
हँडमिक्सीमधे कांदा बारीक कसा चिरतात? मला खरंच सांगा. माझ्याकडे फिलिप्सचा हँड मिक्सी आहे.
भान, माझा ब्राउनचा हँडमिक्सी
भान, माझा ब्राउनचा हँडमिक्सी ६०० वॅटचा आहे. मी अजून चटण्या नाही करुन बघितल्या पण पंजाबी ग्रेव्हीसाठी कांदा _अद्रक-लसूण आणि टॉमॅटो बारिक चिरणं, मराठी पद्ध्तीच्या ग्रेव्हीसाठी भाजलेला कांदा-खोबर्याचं वाटण इ. केलं आहे. दरवेळी मराठी वाटणासाठी मिक्सर आणि पंजाबी मसाल्यासाठी फुप्रो वापरत बसण्यापेक्षा हे मला सोयीचं वाटतंय.
धन्यवाद अल्पना,ईथे खरतर ३ ईन
धन्यवाद अल्पना,ईथे खरतर ३ ईन १ मिक्सी आहे,कदाचित ४०० वॅटचा असेल्.बघते घेऊन्. पण ÁEG चा अनुभव नाहिये अजिबात.
.
.
रोटीमेकरबद्दलच्या सुचनांकरता
रोटीमेकरबद्दलच्या सुचनांकरता धन्यवाद.
एकूणात, जर घरी रोज बाई येऊन चपात्या करून देत असेल आणि ती नसेल त्या दिवशी आजूबाजूला अनेक रेस्टॉरंटस सेवेला हजर असतील तर रोटीमेकर विकत घेण्यात काहीच हशील नाही असा निष्कर्ष मी काढत आहे.
मामी, योग्य निष्कर्ष
मामी, योग्य निष्कर्ष
मामी, फारच हौस असेल तर रोटी
मामी, फारच हौस असेल तर रोटी प्रेस घे. पुर्यांसाठी तर अतिचशय उपयोगी आहे.
मामी, त्यातही हौस असलीच तर
मामी, त्यातही हौस असलीच तर माझ्या आईकडे माळ्यावर पडून आहे तो देइन तुला. तुझी हौस फिटली की अजून कुण्या उत्साही व्यक्तीला दे.
ते मिक्सीमधे कांदा चिरायचा कसा ते सांगा की.
हँडमिक्सी म्हणजे ब्लेंडर आहे
हँडमिक्सी म्हणजे ब्लेंडर आहे का नंदिनी?
अग, मोनालीनंही विपु करून
अग, मोनालीनंही विपु करून तिच्या आईच्याकडचा रोमे माळ्यावर पडल्याचं सांगितलय. नंदिनी, तु मोनालीची बहिण की काय?
आणि तसंही राहूचदेत. माझा जेवणाबद्दलचा उत्साह तसाही करण्यापेक्षा खाण्यापुरताच जोरदार असतो.
रोमेचं भवितव्य काय हे समजलं
रोमेचं भवितव्य काय हे समजलं ना तुला? बास झालं.
मंजुडी, ब्लेंडरआहे पण त्याला चॉपर अटॅचमेंट आहे. पण मी कधी वापरलं नाही. कांद्याचा पार पेस्ट झाली होती एकदा केलं होतं तेव्हा.
नंदिनी माझ्याकडच्या त्या चॉपर
नंदिनी माझ्याकडच्या त्या चॉपर अॅटॅचमेंटमध्येच चिरला जातो कांदा. एकदा फिरवलं की झालं.
Pages