योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे

Submitted by admin on 7 July, 2008 - 22:26

योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे याबद्दलचे हितगुज.

या अगोदरची चर्चा इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माज़े हात फ़ार जाड आहेत.... जरा बारिक करण्यावर Yoga मधे काहि आसन आहे का?

डायेट करण्या साठी काय खावे आणि काय खाऊ नये ?

कुठलंही crash diet करू नका. त्याने metabolism अजून खालावतो आणि तात्पुरते वजन कमी झाले तरी ते दामदुपटीने वाढते. जे उतरवायला जास्त कष्ट पडतात.

संपूर्ण lifestyle change आणि त्यात नियमित व्यायाम व संयमित आहार ह्याने हळूहळू जे वजन उतरते ते खरे.

मुळात बाहेरचं अबरचबर आणि तळलेल्या गोष्टी रोजच्या आहारातून कमी केल्या नी फळं, सॅलडस याचं प्रमाण वाढवलं तर शरीर लगेच रिस्पॉण्ड करू लागते.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मी GM diet केले आहे आणि मला काहि त्रास नाहि झाला. तरी तुमच्या कडे काहि diet चार्ट आहे का ? which can tell what to eat and what to not?

मी केलंय GM Diet आणि माझा हा अनुभव होता.
Diet Charts भरपूर उपलब्ध आहेत नेटवर पण ते तसे वापरण्यात अर्थ नाही. आपली प्रकृती बघून आपल्याला योग्य सल्ला देईल असा आहारतज्ञ शोधणे ही पहिली पायरी.
उपाशी रहाण्याची diets देणारेही अनेक जण बाजारात आहेत त्यांच्यापासून जपून.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

रोज फक्त ६ सुर्यनमस्कार घातलेत की जाड्/लठ्ठ हात लवचिक आणि पातळ होतात हा माझा स्वानुभव आहे. सुर्यनमस्कार केल्यानी काही प्रमाणात उंची देखील वाढते. हात बारीक करण्यासाठी चक्रासन, गोमुखासन, उष्ट्रासन ही आसनं उपयुक्त ठरतील.

दिपा
मी जीएम डाएट ४ महिन्यापूर्वी २-३ आठवडे केले होते(सलग नाही, १-२ आठवड्याचे अंतर ठेवुन). त्यात माझे ९ किलो वजन कमी झाले. मी ७० वरुन ६१ किलो वर आलेय्.आता वजन उंचीच्या प्रमाणात योग्य आहे. आणी गेले ४ महिने माझे वजन ६१ किलो च रहिलेय.
आहारात चांगला बदल झाला आहे.फळे, सलाड खाण्याची तसेच रोज चालण्याची सवय झाली आहे. पण विशेष म्हणजे डाएट करताना किंवा केल्यानंतर कसलाही त्रास झाला नाही.डाएट संपल्यानंतर मी लगेच रेग्युलर जेवण घ्यायला सुरवात केली.तरी वजन तेवढेच आहे. त्यामुळे मला तरी या डाएटचा खूप फायदा झाला आहे.

thyroid मुळे वाढलेल वजन कमी कस करता येईल.
coz Thyroid मुळे माझ वजन ५५ वरून सध्या ६९ झाल आहे.
दिवसेंदिवस वजन वाढ्तच जातेय...
आधी इतक काही वाटलं नाही , पण आता खूप त्रास होतोय.
औषध चालू आहे, पण तरीही diet vagaire control करुनही फारसा फरक दिसत नाहिये...
कुणाला याबद्दल माहित असल्यास सांगेल का?

शाकाहारी लोकांसाठी जीएम डाएट मधे काय फरक करायचा?
बीफ ऐवजी काय खायचे???
कोणी सांगेल का?

धन्यवाद.

हा बीबी फक्त वजन कमी करण्यासाठी नसून.. योगासनांच्या माध्यमातून वजन कमी करण्याबद्दल आहे.

माझ्या अनुभवावरुन खालील आसने उपयुक्त:
उष्ट्रासन
उत्तानपादासन
हलासन
पवन्मुक्तासन
मत्स्यासन

मला १५ फेब्रुवारी प्रयन्त ५ k.g. वजन कमी करायचे आहे. मी रोज ४ कि मी चालते. अजुन कय करु? म्हणजे वजन कमी होइल

योगासनांना सुरूवात करण्या आधी वमन , नेती आणि धौती केल्यास अधिक फायदा मिळतो.. शरीरातील त्रीदोष प्रमाणात येऊन शरीर योगासनांचा उपयोग करुन घेण्यास अधिक सक्षम ठरते. फक्त ह्या क्रिया तज्ञांच्या सल्ल्याने कराव्यात Happy

mase weight delivery nantar khup wadhle ahe .mhnaje phakt pot khup disate .tyasathi mala suchwa..

मला योगासनाची योग्य क्रमवारी हवी आहे. पहिल्यांदा कुठ्ल्या प्रकारची आसने करावित? , सुर्य नमस्कार, उभी,बसलेली, पाठीचे , पोटाचे इत्यादी..प्राणायाम आसनाच्या आधी की नन्तर करावा..त्यातही, प्राणायामाची क्रमवारी काय असावी? मी कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी. ओम्कार प्राणायाम करते.
खुप पुर्वि योगासने शिकले आहे त्यामुळे क्रमवारी लक्शात नाही.

...

मी पलाटी (pilates) करते(शिकवते सुद्धा शिकले असल्याने) रोज. हा प्रकार आपल्या योगाच्या जवळ जातो. उलट योगातून inspired आहे असे मला वाटते. रोज मोजून २० मिनीटे सकाळी केला तरी बराच फरक पडतो तुमच्या लवचिकपणात. वजन कमी करायला त्या सोबत आहार पण बघितला पाहीजे.
कोणाला पलाटी शिकायचे असल्यास जवळच्या जिम मध्ये जावून एखादा instructor पहावा. आधी त्याचे सर्टीफिकेशन चेक करून तसेच डॉकटरच्या सल्ल्याने मग सुरुवात करावी.

वरती बर्‍याच जणांनी म्हटले आहेच, वजन कमी करायचे आहे ना तर get rid of toxins. पाणी खूप प्यायला लागायचे.मग योगा नाहीतर पलाटीस करायचा अर्ध्या तासाने.

मनु, मी विचारणारच होते की मी dvd वगैरे आणून पिलाटे केला तर चालेल का?

सायो, तू योगा वगैरे शी आधी परिचीत असशील नी जर तुला ब्रीदींग अन आसनं करायची सवय बर्‍यापैकी असेल तर एकटीने करु शकतेस. खरे तर गाइडन्स खाली केलेले बरे ह्याच कारणाने की कुठलेही ब्रीदींग चुकीचे झाले वा पोज तर काय इजा होवू नये म्हणून. बाकी तू जवळ असतीस तर मी फुकटात शिकवले असते. Happy सर्टिफाइड आहे मी ह्यात. (मोठेपणा नाही सांगत).
एक बॉल सुद्धा घे. बॉल जरा मदत करतो आणि खरेच सुरू कर. खूप फरक पडेल. ह्याने वजन काही फटकन नाही खाली येइल पण inches खूप मस्त कमी होतात एक महीना नेटाने केलेस तर आहार योग्य ठेवून तू एकदम मस्त होशील.:)

BTW स्पेलींग जरी pilates असले तरी उच्चार पलाटी असाअ करतात. असो. Happy

बरं पिलाटी तर पिलाटी. Wink (वजन कमी झाल्याशी मतलब)
नाही, मला योगाचंही काही ज्ञान नाहीये म्हणजे कधी क्लासेसमध्ये शिकलेले नाहीये. पिलाटी करायचं खूप मनात आहे पण जिममध्ये जाणं सध्या शक्य होईल असं वाटत नाहीये. बघुया, डीव्हीडी ने काही जमतंय का.

बरं पिलाटी तर पिलाटी. >>> लोल.. परत चुक...

मनु, पलाटी चे एखादे चान्गले पुस्तक सुचवु शकशील का? डिलिव्हरीनन्तर साधारण किती दिवसान्नी हे प्रकार करता येतात?

प्लीज सांगा..
मला योगासनाची योग्य क्रमवारी हवी आहे. पहिल्यांदा कुठ्ल्या प्रकारची आसने करावित? , सुर्य नमस्कार, उभी,बसलेली, पाठीचे , पोटाचे इत्यादी..प्राणायाम आसनाच्या आधी की नन्तर करावा..त्यातही, प्राणायामाची क्रमवारी काय असावी? मी कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी. ओम्कार प्राणायाम करते.
खुप पुर्वि योगासने शिकले आहे त्यामुळे क्रमवारी लक्शात नाही.

प्राणायामाची क्रमवारी [मला माहित असलेली]
१. भस्त्रिका
२. कपालभाती
३. बाह्य
४. अनुलोम्-विलोम
५. भ्रामरी
६. ॐ कार

मनकवडा, खुप धन्यवाद!! योगासनं कोणत्या क्रमवारीत करायाची?? कोणाला माहिती असेल तर सांगा मला खुप मदत होईल त्याची.

मनकवडा मुळव्याधीसाठि काहि आसन आहेत का? किंव अशी आसन जी मुळव्याध control करायला मदत करतील.

Pages