योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे

Submitted by admin on 7 July, 2008 - 22:26

योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे याबद्दलचे हितगुज.

या अगोदरची चर्चा इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया येथेही आपली व्ह्याल्युएबल मते नोन्दवा

लिम्बूजी तिथे ते सुप्रसिद्ध 'थोबाड फोड ' की थुत्तरफोड की काय तसले उत्तर मिळतेय....

बरं आमच्या मताची 'व्हॅल्यू' कोण अदा करणार आहे?

वय - २४ वजन ४२ हाईत - ५ फूट ७ इंच ...
आत्महत्येच्या मार्गावर ......

माझ्या मते एवढा कमी वजन कोणाचाही नसेल...
४ वर्षांपूर्वी मला कावीळ झाली होती.. ती व्यवस्थित बरी सुद्धा झाली ..
पण माझं वजन ५४ कग वरून दिरेच्त ४२ कग वर आला.. गेली ४ वर्ष मला भूकच लागत नाही .. सगळ्या प्रकारचे उपाय, डॉक्टर , करून थकलो.. हजारो रुपये खर्च केले .. मध्ये एक वजन वाढवायची powder सुद्धा घेऊन झाली .. पण त्याने पोट अजून बिघडलं
डॉक्टर म्हणतात tension मुले असा होतंय...
पण मी काय करू आता .... खूप depression मध्ये गेलोय ...
सगळ्या टेस्ट , reports नॉर्मल आहेत ....

जॉब ची पण खूप दगदग होते.. दिवसभर २ पोळ्या खाऊन राहतो .. पण त्याने पण अपचन होता .. सगळे खूप चिडवतात .. जगणं नकोस करून ठेवलं आहे ..... पोट अजिबात साग होत नाही .. माझ्ह्याबरोबरच का असा होतंय

प्रसन्न, रोज १ बदाम, १ खारीक आणि ५-६ मनुका न विसरता खा. हळूहळू फरक पडेल. झेपत असेल तर हळद, मध, सुंठपावडर आणि लसूण ठेचून त्याची रोज छोट्या बोराएवढी गोळी सकाळी काहीतरी खाल्ल्यावर खा.

हताश होऊ नका. दिवस नक्की पालटतील Happy

प्रसन्ना हताश होऊ नका. भूक लागली नाही तरी प्रत्येक तासाला तुम्हाला जे काही आवडेल त्याचे दोन घास खात जा. त्याने तुमची पचनक्रिया सुधारेल न मग हळू हळू भूक लागायला मदत होईल.

प्रसन्न, माझ्या मते योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करा. तुमची शारीरिक आणि मानसिक दुखणी नक्की बरी होतील.

मयुरी, ते मी mukta_m यांना सांगितलय! (पण तुमच्या दोघाच्या प्रोफाईलमधे नाव सारखचं दिसतय Uhoh )

मी आसनांच्या आणि आहारच्या मद्तीने गेल्या ३ आठवड्यात १.५ किलो वजन कमी केलं..... आधी तर माझाच विश्वास बसत नव्ह्ता वजन काट्यावर......... Happy

रोज १२ सूर्यनमस्कार घालूनही वजन कमी होतं. शिवाय लवचिकपणा वाढतो शरिराचा. चयापचय सुधारणे वगैरे अनेक फायदे आहेत.
सूर्यनमस्कार शक्यतो सकाळीच घालावेत. (सूर्यास्तानंतर घालू नयेत असं म्हणतात, कारण तो फक्त एक व्यायामप्रकार नसून सूर्योपासनेतून मिळणारी मनःशांती आणि ऊर्जा महत्त्वाची असते)

पोट कमी करण्यासाठी कपालभातीचा खूप उपयोग होतो. एक दीर्घ श्वास घेऊन त्यातून ६० वेळा (किमान) उच्छ्वास सोडता यायला हवा. सुरुवात करताना अगदी २० पसून करावी, पण हळूहळू ते वाढवत न्यावं. ७५, १०० वगैरेची ३ आवर्तनं केली तर पोट खूप कमी होतं हा स्वानुभव.

शिवाय पवनमुक्तासन आणि काही प्रमाणात मत्स्यासन, धनुरासन, पश्चिमोत्तनासन, ज्यामुळे पोटावर ताण येतो, तो येऊन पोट कमी होतं.

कंटळा करून घेतलेल्या बर्‍याच गॅपनंतर मी परत व्यायम चालू केलाय. आता मी ८ सूर्यनमस्कार घालतेय रोज. ४-५ दिवसांत १२ होतील. Happy वजन वगैरे बरोबर आहे माझं Happy पण कधीकळी ते खूपखूपच वाढलं होतं!

@प्रज्ञा९,
कपालभातीत दिर्घ श्वासाने सुरवात करतात का? रामदेव बाबांच्या डिव्हिडी त छोटे उच्छ्वास सांगितले आहेत. जरा समजावून सांगशील का?

मी कपालभाती असा करते (माझ्या टीचरने शिकवल्याप्रमाणे)
१. दीर्घ श्वास घेणे.
२. छोटे छोटे उच्छ्वास त्या एका घेतलेल्या श्वासातून सोडणे. हे उच्छ्वास नाकातून सोडताना पोटाची हालचाल व्हायला हवी.
मी वर जो साधारण ६० हा आकडा लिहिलाय तो एका श्वासातून येणार्‍या ६० लहान उच्छ्वासांचा आहे. सुरुवात करताना आपण जेमतेम २० चं एक आवर्तन करू शकतो. मग ते वाढवत न्यायचं.

आपण यात स्वत:ला मॉनिटर करू शकतो. कपालभातीमधे आवर्तन सुरु झालं की श्वास घेता उपयोगी नाही, कारण मग हवा तो परिणाम दिसत नाही. मधे जर असा श्वास घेतला गेला तर तो प्राणायाम पूर्णच होणार नाही.
म्हणून, सुरुवात करतानाच उच्छ्वास सुरु झाले की आपला एक हात नाकाजवळ न्यायचा. मधेच जर श्वास घेतला गेला तर ते हाताला जाणवतं. मग पुन्हा थोडं थांबून नव्याने श्वास घेऊन आवर्तन सुरु करावं.

मी जेव्हा रोज न चुकता हे करत होते तेव्हा १०० ची ३ आवर्तनं करू शकत होते. ही सांगायचा उद्देश हा, की आपलं सामर्थ्य वाढवता येतं. मला स्वतःला हे खरं वाटत नव्ह्तं. मीच केलं तेव्हा विश्वास बसला.

पोटासाठी अजून एक प्राणायाम- अग्निसार. (याने शरिरातली उष्णता वाढते. त्यामुळे ज्यांना उष्णता कमी असायचा त्रास आहे त्यांना जास्त लाभदायक. पोटाने करायचा म्हणून पोटही कमी होतं)

१. दीर्घ श्वास घेणे.
२. दीर्घ उच्छ्वास सोडणे.
३. पुन्हा श्वास न घेत, श्वासरहित अवस्थेत, पोट झेपेल एवढ्या वेगने आत-बाहेर करणे. हे करताना प्रत्येक आत-बाहेर हालचालीची लय एक असणे अतिशय आवश्यक आहे.
४. सुरुवातीला जेमतेम ५-६ वेळा पोटाची अशी लयबद्ध हालचाल होते. हळूहळू वाढवल्यावर ३० पर्यंत करावेत. १ आवर्तन त्याहून जास्त नाही. अशी एकूण जास्तीत जास्त ३ आवर्तनं करायची. सवयीने येतात.

या प्राणायामात थांबायची खूण म्हणजे श्वासरहित अवस्थेत असल्यामुळे आपल्याला थोड्याच वेळात अस्वस्थ वाटतं, थोडंसं घाबरल्यासारखं होतं. असं झालं तरी घाबरायचं नाही, कारण ही प्राणायाम जमत असल्याची खूण आहे. पण तिथेच थांबायचं हे नक्की.

दोन्ही प्राणायामांत, दोन आवर्तनांच्या मधे काही क्षणांचा पुरेसा अवधी द्यावा. अगदी घाई करू नये.

मुख्य टीपः मी हे सगळं प्रत्यक्ष योगाध्यापकांसमोर बसून शिकले. त्यामुळे जास्त योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळालं. मी अजून रामदेवबाबांचा एकही योगप्रकार टीव्हीवरसुद्धा पाहिला नाहिये. माझ्या शिकलेल्या पद्धतीत आणि रामदेवबाबांच्या पद्धतीत फरक आहे खूप. पण मी शिकलेल्यातलं मला जेवढं सांगता येईल तेवढं नक्की सांगेन मी. Happy

स्नेहा....
स्वताला फार न थकवता:
१. १२ सूर्यनमस्कार
२ थोडं पॉवरयोगा... जर शक्य असेल तर प्रशिक्शक घेऊन
३ प्राणायाम
-- हे सर्व मिळून किमान १ तास... म्हणजे कोणता व्यायाम किती करायाचा ते आपल्यावर पण किमान एक तास करावा

आहारातः
१.. दोन जेवणांच्यामधे शक्यतो सॅलड, किंवा फळ खावी
२.. रात्री भाकरी एखदि पालेभाजी- नॉमिनल परतवून, फुल्के, ताक असं काहीतरी... मी शक्यतो एकाच जेवणात भात खाते..
३ गरम पाणी पिणे
४ सकाळी मस्त व्यवस्थित नाश्ता करणे.. अर्थात तेल्कट नको..
५ तेलात व्हेरायटी थेवायची... म्हन्जे कधी दाण्याचं कधी सोयाबीन कधी सनफ्लॉवर... अर्थात तेल खाण पूर्ण बंद न करता मर्यादित करायच
६ रात्रीचं जेवण आणि झोप यात किमान २ तास अंतर हवं.

बास्स्स्स्स्स्स.......... Happy

मि पुण्याम्ध्ये मंत्रि नावाच्या एका डाएटिशियन कडे गेले होते. त्यांच्या डाएट्मुळे १किलो पर विक फरक पड्तो..कोणाला त्यांचा नं हवा असल्यास सांगा..

पर्वतासन केल्यानि हात बारिक होतात. पन कमीत कमी ३० सेकन्द होल्ड करुन थेवा.
व्यायाम प्राकारात काहि महिन्यानि बदल करित रहिलो तर वजन लव्कर उतरत. कारन त्याच त्याच वर्क आउटची शरिराला सवय होते आनि वजन कमि होन बन्द होत जात.. व्यायाम प्राकार बदलल्यावर घाम जास्त येतो हे अनुभव्ल असेल.
अरोबिक मुले खुप फायदा होतो असा माझा अनुभव आहे.

३ - ४ सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग, प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोम अस सगळ मिळुन फक्त १५ मी. करुन एका आठवड्यात माझ २ किलो वजन कमी झालेल आहे.

मला 6 महिन्यात 20 किलो वजन वाढवायचं आहे.
कुठली योगासनं फायदेशीर ठरू शकतात ?

भूक आणि पचन प्रचंड प्रमाणात वाढण्यासाठी काय करावे?

एक विनंती... कुठलेही आसन अथवा प्राणायाम तज्ञांच्या देखरेखीखालीच करावेत >>> १०० % अनुमोदन. इथे फक्त माहिती म्हणून लिहा/वाचा. नुसतं वाचून कृपया काहीही करायला जाऊ नका.

ओटी पोट आणि मांड्या कमी करण्यासाठि काय करावे लागेल. सध्या मी जे काहि करतेय ते वरती लिहिले आहे. त्यानेच फरक पडेल कि अजुन एखादे आसन करावे लागेल?

साक्षी, नावातच अर्थ स्पष्ट आहे "ताणणे". स्ट्रेचिंग exercises गुगल केलत तर लगेच भरमसाठ माहिती मिळेल अगदी फोटोंसकट.

वैद्यबुवा, स्ट्रेचिंग exercises गुगल केलत तर लगेच भरमसाठ माहिती मिळेल अगदी फोटोंसकट.>>>
यातच सर्व स्पष्ट आहे. मला भरमसाठ माहीती नकोय, योग्य ती नी योग्य त्या (अनुभवी) व्यक्तीकडुन माहीती हवी आहे. मी_सखी स्वतः करतात म्हणाल्या म्हणुन मी सविस्तर माहीती मिळेल का विचारले. तेव्हा तुम्ही अर्थ काढण्याची तसदी घेऊ नका...

Pages