योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे

Submitted by admin on 7 July, 2008 - 22:26

योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे याबद्दलचे हितगुज.

या अगोदरची चर्चा इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नूतन इथे लोकांना वजन कमी करायला किती कष्ट पडतात ते वाचलेस ना? मग ते कमी असताना वाढवायचे अवलक्षण तुला का सुचावे?

तरीही उत्तर हवेच असेल तर --- दोन महीने व्यायामशाळेत (मराठीत gym) जा आणि मग ३-४ महीने कसलाही व्यायाम करू नकोस. बघ वजन आणि आकार कसा जोमाने वाढीस लागतो. मग तुला कळेल की आमचे दु:ख काय आहे ते.

र.च्या.बा. मंडळी अनितचा उपाय खरच उपयोगी पडतो. पण सकाळचे आणि रात्रीचे जेवण वगळता तो मानेचा प्रकार करायला जमला पाहिजे. सोपा नाहीये तो महाराजा!

मीपण योगा करते आठवड्यातुन तीन वेळा, पण माझे पोट काही केल्या कमीच होत नाहिए. अश्विनी तु सांगितलेला व्यायाम करुन बघेन.

दोन्ही पाय जमिनीवर सरळ ठेवायचे आणि हाताची बोटे एकमेकात गुंफवुन जात चालवतात तसे करायचे. हि चक्की केल्यानेही पोट कमी होते, मी हे करते तरी काहि उपयोग झाला नाही, तुम्ही करुन बघा, काही उपयोग होतो का ते. Happy

वर्षा, हाताची बोटे एकमेकात गुंफवुन तोंडावर ठेवण्याचा प्रयत्नही करायला पाहिजे गं.... Happy

पोट कमी करणे खुप कठीण आहे. व्यायाम करताना पाठीचा कणा सरळ राहिला पाहिजे. श्वासावर निट नियंत्रण पाहिजे (जसे आपण योगात करतो तसे). पोटावर ताण आल्यासारखे वाटायला पाहिजे. तिथल्या स्नायुंवर ताण पडला तरच तिथली चरबी जळेल. आणि कमी झाले नाही तरी निराश होऊ नकोस. कधी कधी वेळ लागतो. माझे वजन गेल्या दोन वर्षात हळुहळू १० किलोने घटलेय. सुरवातीचे सहा महिने 'आज एक किलो कमी झालं आणि लगेच चार दिवसांनी परत दिड किलो वाढलंय' असेच होत राहायचे. कधी वाटायचे उगाच साला हा शरीराला त्रास द्यायचा. कमी होत तर काही नाही.....:(

वयाचाही परिणाम होतोच. चाळीशीनंतर व्यायामाचा परिणाम दिसायला जरा वेळ लागतोच. मी बाळंतपणानंतर लगेच जीम सुरू केलेले. तेव्हा वजन तिन महिन्यात दहा किलोने कमी झालेले. शिवाय इंचांमध्येही भरपुर फरक पडला होता. आणि व्यायामही काही खास करायचे नाही. फक्त स्ट्रेचींगच. तेच आता १३ वर्षांनी तोच इफेक्ट दिसायला वर्ष लागले. आणि एकदा इफेक्ट दिसायला लागला की मग भरभर दिसतो. आता मी १०-१२ गुलाबजामुन जरी एकदम खाल्ले तरी वजनाचा काटा काहीच कुरकूर करत नाही. अर्थात मी अशा वेळी इतर गोष्टी खायचे टाळते. (पण इतके गुलाबजामुन मी खाल्लेत. घरी केले की हा शेवटचाच म्हणुन एकेक खात राहणे इतकेच सुचते. व्यसनाधिन माणसेही बहुतेक 'हा प्याला शेवटचा' म्हणुन रोज पित असतील......)

'हा प्याला शेवटचा' म्हणुन रोज पित असतील......)>> अगदी Proud

पण खरच कुणाला वजन कमी करण्याचे अजून काही उपाय असतील तर सांगा की इथे (माझ्यासाठी नाही) डायट करणे सोडून. व्यायामाचे प्रकार. अजून एक म्हणजे जेवल्यानंतर किती वेळाने प्राणायाम्,आसने केलेले चालते ? जाणकार ह्यावर लिहा कृपया.

जेवल्यानंतर तिन तास तरी काही करु नये असे म्हणतात. आपल्याकडच्या हुशार लोकांनी 'काही करु नये म्हणजे झोपावे बहुतेक' असा अर्थ काढुन दुपारच्या झोपेची सोय केली. Happy पण वजनावर लक्ष ठेऊन असाल तर दुपारची झोप टाळा असे सांगतात.

दिप्या, किती वर्षे असे शेवटचे प्याले पितोयस रे???

दोन महीने व्यायामशाळेत (मराठीत gym) जा

व्यायामशाळा म्हटले की तेलाने माखलेल्या अंगाने उभे राहुन दंड बैठका काढणारे पैलवान नजरेसमोर येतात..

जीम म्हटले की कसे बरे वाटते.. एकदम मस्त चकचकीत, एसी, व्यायामाची अत्याधुनिक साधने, रंगिबेरंगी हेअरबँड आणि टॉप्स घातलेल्या बायका आणि कानाला आयपॉड लावलेले पुरूष वगैरे वगैरे.... नजरेसमोर येते Happy

खरच ग साधना. पोट कमी करणे खरच खुप काठिण आहे.

दिवसभर ऑफिसमध्ये बसुन काम करते, चालायचा जरा कंटाळा केला. आता परत चालणे चालु केले आहे बघु किती दिवसात फरक पडतो ते.

माझ्या मते व्यायाम हा सगळ्यांनीच करायला हवा. मग भले वजन वाढलेले असो वा नसो. साधे रोज चालण्यापासुन ते थेट जीम - जो आवडतो आणि जमतो तो प्रकार निवडा. पण करा...

माझ पण बाळंनपणा नंतरच पोट सुटल आहे ग तु सांगितलेला व्यायाम नक्की करेन मी. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.

मी असं कुठेतरी वाचलं आहे कि सकाळी सकाळी उठलं कि अनोषा पोटी सूर्यनमस्कार घालावेत.
माझा सकाळी चहा घेतल्या खेरीज दिवस सुरु होत नाही.
कुणाला माहित आहे कि चहा घेऊन सूर्यनमस्कार घातले तर चालतं का?

श्वासावर नियंत्रण ठेवून सकाळी नियमीतपणे घातलेले शास्त्रशुध्द सूर्यनमस्कार वजन जरी नेहेमीच कमी करत नसले तरी इंचेस नक्की कमी करतात. शिवाय हा व्यायाम घरच्या घरी करता येतो. स्वानुभव आहे.

आपला Diet व्यव्स्थित ठेवला ,रोजचा एरोबीक किंवा योगा केला की वजन एकदम maintian रहाते. मला वजनाचा प्रॉबलेम (लकीली ) नसला तरी किती वर्षे तेच वजन आहे. Happy योगा व रोजचा light aerobic केला तर वजन सहसा वाढतच नाही unless you have some specific problem like thyroids,metabolic disorders,anorexic etc issues.(स्वानुभव)

योगा मध्ये second chakra खूप सांगितलेय. ते जर ठिक असेल तर कुठले म्हणजे कुठलेच आजार नसतात.

व़जन कमी करण्यासाठी AyurCare चा कोणाला अनुभव आहे का.. किंवा काही माहिती आहे का... त्यांची treatment कशी आणि काय असते?

बिक्रम योगा कोणी करतं का?
९० मिनिटं मस्तं वर्क आउट असतो ( ११० डिग्री टेंपरेचर मधे )आणि indirectly helps weight loss.
बरीच लोकेशसन आहेत त्यांची, मला तरी अत्ता पर्यंत अटेंड केलेल्या योगा पैकी सर्वात जास्त आवडत इथे जायला.
पहा:
http://www.yogatohealth.com/Frequently_Asked_Questions_About_Bikram_Yoga...

मुळात वजन कमी करणे किंवा वाढवणे हा योगाभ्यासाचा उद्देश होऊ शकतो का? योगभ्यास हा तुम्हाला निरोगी जीवन जगण्यास मदत करतो. योगाभ्यासाचे अंतिम ध्येय हे मनःशांती आहे.

पॉवर "योगा" किंवा बिक्रम "योगा" हे सर्व प्रकार "मार्केटींग गिमिक्स" आहेत असं मला वाटतं. पॉवर योग मधे शिकवतात ती फक्त आसनं, पण ती फक्त वेगाने करायची असतात. नेहमीचा योगाभ्यास करताना घाम येत नाही पण वर दिलेले प्रकार करताना मात्र प्रचंड घाम येतो. त्यामुळे करणार्‍याला आपण "काहीतरी" केल्याचा आनंद मिळतो.
बिक्रम योगा मधे असं दिसतय की तुम्हाला १०५ डिग्री तापमानाची सोय करावी लागेल. म्हणजेच त्याकरता विशिष्ट ठिकाणीच, जिथे अशी सोय आहे तिथेच जावं लागेल. योगाभ्यासाला अशी बंधनं नाहीत.

नेहमीचा योगाभ्यास नियमित आणि दीर्घकाळ केलात तर त्याचं फळ निश्चित मिळेल!!

भ्रमरा, योग म्हणा किंवा मार्शल आर्टस् दोन्ही निरामय संतुलीत मनशक्ती वाढवण्यासाठी असलेले मार्ग. पण सुदृढ शरीरात सुदृढ मन या म्हणीप्रमाणे लोकांनी त्याचा वेगळ्या कारणासाठी वापर केला.

ह्या विद्यांचा फायदाच घेतायत ना लोक. मग तो कोणत्याही स्वरुपात का असेना.

me eethe naveen aahe plz mala sangal ka maze chest jast aahet. te kamee karanya sathi kahee upay aahe ka? plz aasel tar sanga plz

Pages