योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे

Submitted by admin on 7 July, 2008 - 22:26

योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे याबद्दलचे हितगुज.

या अगोदरची चर्चा इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सखी, गोरक्षासन आणि पादपश्चिमोत्तसन मदत करू शकतील.
बी ला विचार, त्याला अजून माहीत असेल.

त्याचबरोबर आहाराची पथ्ये पण पाळावी लागतील, अंगातील ऊष्ण्ता कमी करणे, तेलकट्/तिखट पदार्थ वर्ज्य करणे इ.इ.

मनकवड्या आहाराची पथ्य चालु आहेतच. एक दिवस आड पालेभाजी - फक्त कांदा आणि मीठ घालुन केलेली, तिखट / तेलकट बंद आहे. उष्णता कमी करण्यासाठि धण्या-जिर्‍याचे + सब्जाचे पाणी, गुलकंद+तुप, रात्री दुध+तुप वैगरे चालु आहे. परवापासुन अनुलोम-विलोम, कपालभाती आणि पश्चिमेत्तानासन चालु केले आहे.
=======================
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शीळ वाजवतो.....

रोज शास्त्रोक्त पध्द्तीने १२ सूर्यनमस्कार घातले तर लवचीकपणा तर येतोच पण इंचेसही बर्‍यापैकी कमी होतात. स्वानुभव आहे.

मस्तानी,( मी काही न्युट्रिशन तज्ञ वगैरे नाही तरी सल्ला देत आहे, काही वर्षांपूर्वी आजमावलेला) Happy

रात्री किती वाजता जेवतेस ?
संध्याकाळी ७:३० ला डिनर घेउन बघ, लवकर जेवल्यानी खूप फरक पडतो.
साडे सात नंतर काही खायचं नाही, फलाहर सुध्द्दा नाही, ताक पिउ शकतेस जर भुक लागली तर.
संध्याकाळच्या जेवणात भात पण वर्ज्य कर, शक्य झालं तर आठवड्यातून २-३ वेळा डिनर मधे फक्त मोड आलेल्या कडधान्यांची उसळ घेऊन बघ (कमी तेलात केलेली), फक्त पोट्भर उसळ खायची सॅलेड , ताक किंवा दह्या बरोबर पण बरोबर भात -पोळी काहीच नाही खायचं.
सॅलेड पण हेवी ड्रेसिंग वालं नाही, साध् लिंबु, मिरपुड, चाट मसाला टाकून.

याची खरच गरज आहे. मी तर काल वेगान व्ह्यायचा विचार करत होते. १० पाउंड वजन कमी केल्यास मधुमेहाची रिस्क ६०% नी कमी होते.

मी तर काल वेगान व्ह्यायचा विचार करत होते.

मग विचार पक्का व्हायच्या आत जमेल तेवढी हैद्राबादी बिर्याणी खाऊन घ्या. Proud नंतर मग खायचा विचार जरी मनात आला तरी पाप केल्यासारखे वाटेल......

एसी मधे व्यायाम करायचा नाही.

सगळ्या जीममध्ये एसी असतोच असतो.. Sad आणि मी एसी मध्येच इतकी घामाघुम होते की एसी नसेल तर दहा मिनिटांच्या वरती काहीच व्यायाम होणार नाही...

आणि मी एसी मध्येच इतकी घामाघुम होते की एसी नसेल तर दहा मिनिटांच्या वरती काहीच व्यायाम होणार नाही...>>>> मी पण गं. टी-शर्ट एवढा चिंब ओला होतो की तिथल्या मावशींना मी कधी कधी पंखापण लावायला सांगते.

गुढघे वाकवून झोप. एक पायाचं पाऊल दुसर्‍या पायाच्या ढोपरावर ठेव. दोन्ही हातांचे पंजे एकमेकांत गुंतवून डोक्याखाली घे. मग जो पाय फोल्ड करुन दुसर्‍या पायावर ठेवलाय त्याच्या विरुद्ध दिशेचे कोपर त्या पायाच्या ढोपराला टेकवायचा प्रयत्न कर. जितकं जमेल तितकंच कर. पाय हलवायचा नाही.

असंच दुसर्‍या बाजूचं ही कर.

काही कळ्ळं का?

जरासंच?? कमाल आहे हा...

पाठीवर झोपुन पाय सरळ जमिनीवर ठेवायचे व हात डोक्याच्या दिशेने ठेवायचे. एक दीर्ध श्वास घ्यायचा व श्वास सोडत कमरेत उठुन हातांनी पायाची बोटे पकडायचा प्रयत्न करायचा. जाड्या माणसांना उठायला झेपणार नाही पण तुला जमेल.

पाठीवर झोपुन पाय सरळ ठेवायचे आणि श्वास घेत पाय ९० डिग्रीत उचलायचे (गुढग्यात न वाकवता) आणि श्वास सोडत परत खाली ठेवायचे.

यु टुबवर पहा. भरपुर सापडतील..

गुढघे वाकवून झोप. एक पायाचं पाऊल दुसर्‍या पायाच्या ढोपरावर ठेव. दोन्ही हातांचे पंजे एकमेकांत गुंतवून डोक्याखाली घे. मग जो पाय फोल्ड करुन दुसर्‍या पायावर ठेवलाय त्याच्या विरुद्ध दिशेचे कोपर त्या पायाच्या ढोपराला टेकवायचा प्रयत्न कर. जितकं जमेल तितकंच कर. पाय हलवायचा नाही.

आणि मग मध्येच अडकलीस की त्याच अवस्थेत लगेच माबोवर लॉगॉन कर आणि 'अश्विनीSSSSSSSSSSSSS ये ना' अशी आरोळी ठोक.....

ढोपर नाही तर काय?
डिप्या, तू तस्सच्या तस्स करुन बघ. तुझं पोट कॉन्केव्ह होऊन जाईल Biggrin
साधना Rofl अगं काही अडकायला होत नाही. फक्त पोटात प्रचंड चेपून टाकल्यासारखं झाल्याने ३-४ दा केल्यावरच दमायला होतं Proud

डिप्या, तू तस्सच्या तस्स करुन बघ. तुझं पोट कॉन्केव्ह होऊन जाईल

फक्त पोटच कॉन्केव्ह????????!!!!!!! मला तर भिती वाटतेय अख्खा दिप्याच कॉन्केव्ह होईल... नको रे बाबा पडुस ह्या भानगडीत...........

Rofl
डिप्या, एक एक वाक्य मधुराला वाचायला सांग आणि तस्सच्या तस्सं कर. पण तुला कशाला करायचंय हे? तू तर मुळातच खपाटीला गेलेल्या पोटाचा आहेस.

अगं मी करते हा प्रकार पण दोन्ही पाय सरळ ठेऊन. फक्त क्रॉस पाय दुमडुन चटाचट सायकलसारखे मारते. पण माझं पोट पण काय कमी नाहीय.. ढिम्म आहे अगदी.... माझा अंत पाहणारं.... Sad

पण तुला कशाला करायचंय हे? तू तर मुळातच खपाटीला गेलेल्या पोटाचा आहेस.

म्हणुनच म्हटले की असले काय केले तर पुर्ण कॉन्केव्ह होईल.....

एक सोप्पा उपाय सांगू ? हळूहळू मान पूर्णपणे डावीकडे फिरवायची, ह्या पोझिशनमध्ये एक सेकंद थांबायचं, परत हळूहळू मान पूर्णपणे उजवीकडे फिरवायची. परत एक सेकंद थांबून मूळ स्थितीला आणायची

फक्त एक लक्षात ठेवायचं. हा प्रकार, कोणी काही खाणार का ? अस विचारल्यावर करायचा. Light 1

हा मनावर आणि शरिरावर प्रचंड ताण आणणारा व्यायामाचा प्रकार जर करायला जमला असता तर मग मग.....................................

तळवलकर्सना ७५ वर्षे झाली हे अभिमानाने सांगताच आले नसते.....

पोट सुटले असेल तर सोपा घरगुती ऊपाय म्हणजे लादी पुसणे. मांडीवर वाकल्यावर पोटावर इतका दाब येतो. (आणि आपल्याच घरची लादी पुसायला लाज वाटायला नको.) Happy
जीम जॉईन करण्यापेक्षा खुप बरे ..

अहो लादी काय १५ मिनिटांत पुसून होईल. ती सुद्धा मधे मधे पोतेरं पिळण्यासाठी थांबून थांबून. त्याने काही होत नाही हो !

फक्त एक लक्षात ठेवायचं. हा प्रकार, कोणी काही खाणार का ? अस विचारल्यावर करायचा.>>>>
Rofl
मी बहुतेक हवा खाउन जगलो तरी माझ वजन वाढतच जाणार आहे. Sad
ग्राफ अगदी मस्त स्टेडीली वरच चढतोय.

Pages