स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, त्या फोटोतल्या तेलाच्या कावळ्याचं मधलं नोझलवालं झाकण कसलं आहे. माझ्याकडे होता त्याचं रबराचं झाकण होतं. धुवायला काढताना एकतर सहज निघत नाही, निघालं तर मग परत बसत नाही. बसलंच चुकून तर फाटायला सुरूवात होते. तेलाचा कावळा उशीर उशीर केला तरी निदान २ महिन्यांनी एकदा तरी धुवायला काढतो ना आपण... माझ्या नव्या कोर्‍या कावळ्याचं ते लाल झाकण तिसर्‍या धुण्यात गेलं. दुकानातून स्पेअर आणलं तर ते प्रचंड झटापटीने बसलं आणि मग चीर पडायला सुरूवात झाली. Happy

माझ्याकडलं प्लास्टिकचं आहे झाकण, निघायला जरा त्रास होतो खर, पण १०-१२ वर्षे तरी टिकलंय,
अर्थात माझा तेलाचा वापर फार कमी आहे. ५ गॅलन तेल ७-८ महिन्याच्यावर पुरतं नॉर्मली.

पुर्‍या करण्यासाठी पूरी प्रेस मशीन ३० ते ३५ डॉलर आहे माझ्या इथल्या ईन्डीयन स्टोरमध्ये. मला ते जरा जास्त वाटतेय. हे manual machine आहे. ईलेक्ट्रीक रोटीमेकर नाही. त्याएवजी हे खालील दुव्यावरले टोर्टीया प्रेस चालेल का? जाणकार मदत करा - मला ५० माणसान्साठी पुर्‍या करायच्या आहेत - एकट्या हाती.

http://www.bedbathandbeyond.com/search/search.aspx/tortilla-press/?sstr=...

मुख्य म्हणजे मला माहिती हवी आहे मी पुरी प्रेस आणि या मशीनमध्ये गल्लत तर करीत नाहीये ना? धन्यवाद!

अमी

तोषवी, तुम्ही वापरले आहे हे मशीन? प्लास्टीक वा बटर पेपर वापरावे लागते का पुर्‍या करताना? तेल लावावे लागते का आतल्या बाजूला पुर्‍या सुटून येण्यासाठी? त्वरेने उत्तर दिल्याबद्द्ल धन्यवाद!

अमी

माझा पुरी प्रेस असाच आहे दिसायला. म्हणजे पु-यासाठी टोर्टिला प्रेस चालु शकतो.

प्लास्टीक वा बटर पेपर वापरावे लागते का पुर्‍या करताना

कडक प्लॅस्टिकला (इथल्या दुधाच्या पिशवीइतपत कडक) तेल लावुन वापरले किंवा सरळ त्या मशिनच्या पुरी करायच्या सपाट भागालाच आतुन वरखाली तेलाचे बोट लावुन पु-या केल्या तरी चालते. येतात सुटून.

साधना, उत्तराबद्दल धन्यवाद! आजच सन्ध्याकाळीसाठी करायच्या आहेत पुर्‍या तेव्हा अगदी वेळेवर मदत झाली. अमी

प्रितीभुषण, लगेचच्या लगेच, प्रत्येक स्वैपाकानंतर साबणाच्या पाण्याने/ किचन क्लिनर ने गॅसची शेगडी पुसुन घेणे हाच उपाय आहे यावर. तुमच्या गॅसशेगडी जवळ एक्झॉस्ट नाहीये का? त्यानेसुद्धा फरक पडतो.

अल्पना अनुमोदन. माझी कामवाली बाई सरळ निरमा अथवा तत्सम डिटर्जंट पावडरने घासून घेते शेगडी आणि ओटा. नंतर स्पंजने पुसून कोरडं करते म्हणजे शेगडीवर किंवा ओट्यावर पाण्याचे डाग दिसत नाहीत. सिफ वापर म्हटलं तर त्याच्यापेक्षा हे चांगलं म्हणून मलाच सांगते.

मला भांडी घासायला कुणीतरे चांगला साबण जेल वगैरे सांगा. व्हिम/पितांबरी वगैरे चार दिवसापेक्षा जास्त टिकत नाहीत. चिकट गोळा होऊन जातो. प्रत्येक वापरानंतर मी खीडकीमधे सुकायला ठेवून देते तरीपण हे साबण गळूनच जातात.

मी तरी व्हीम बारच वापरते. कामवालीसाठी व्हीम बार आणि माझ्यासाठी व्हीम लिक्विड. साबण निथळू शकेल अशा सोपकेस मध्ये ठेवते व्हीमबार.

शर्मिला, ती चंद्रकला हिरवीण कटकट करत नाही का ऑक्झिऑनपायी? नसेल तर आता तेच आणते. हे एवढं पाणी घालून ठेवते विम मधे आणि सत्यानाश करते. वर सांगितलं की शहाणपणा कसा असतो ते तुला माहितीच आहे Happy

डिशवॉशरमधून पाणी गळण्याची कारणे आणि उपाय:
१. साबण डिशवॉशरचा आहे का हँडवॉशचा? डिशवॉशरसाठी असलेलाच साबण वापरावा.
२. बाजूने गळते असल्यास गास्केट सैल असू शकते, पण ते आपले आपल्याला बदलणे कठीण असते.
३. डिशवॉशरच्या खालच्या बाजूस असल्यास, इन्लेट किंवा ड्रेन पाइप गळत असेल, तर तो बदलू शकता.
४. खालच्या बाजूस, क्लिनिंग मोटरच्या बाजूला गळते असल्यास, डिशवॉशर बदलणे हा सगळ्यात उत्तम उपाय आहे.
२, ३, ४ पैकी एक असल्यास शक्यतो टेक्निशिअनला बोलवूनच हे काम करावे. तोपर्यंत डिशवॉशरला सुट्टी देऊन हाताने भांडी घासावी, नाहीतर सबफ्लोअरमधेही पाणी जाऊ शकते.

आमच्या कडे बोरींग आहे व आंघोळीसाठी पाणी तापवण्याच्या पातेल्याला आतुन पांढरा लेयर आला आहे. तो कशाने बर जाइल ? बराच प्रयत्न करुन झाला पण निघत नाहिये. कुणी उपाय सांगु शकेल का ?

पातेले हिंडालियमचे आहे की स्टीलचे?
हिंडालियमचे असेल तर त्यात थोडे पाणी + संत्राची सालं नाही तर वापरलेली ३-४ लिंबं टाकून उकळी काढा. ताट (असेल तर हे पण हिंडालियमचे) ठेवून गार होऊ द्या. तो क्षारांचा थर निघून गेला असेल.
स्टीलचे असेल तर नक्की काय करावे माहिती नाही.

मागल्या आठवड्यातच, लिम्बीने दारावरील विक्रेत्याकडून कोणत्यातरी भारी कम्पनीचे (फिलिप्स?) स्वयम्पाकाच्या चूली सदृष एलेक्ट्रीकचे साडेचारहजार रुपयान्चे यन्त्र घेतले आहे. अल्युमिनियम ची भान्डी चालत नाहीत. जाळ /कॉईल वगैरे दिसत नाही, भान्डे वर ठेवले तरच भान्ड्यातील पदार्थ गरम होतो, भान्डे तापतच नाही, कैतरी म्याग्नेटिक होते म्हणे. वीजेचा खर्चही खूप कमी असते म्हणे. मशिनवर पानी पडले तरी शॉकची भिती नाही. टाईमर/टेम्प सेट करण्याची व्यवस्था वगैरे आहे.
घेतल्यावर ते लगेच पुन्हा बॉक्स मधे घालून त्याची रवानगी कुणाच्या नजरेस येणार नाही अशा जागी केल्यामुळे मला बाकी बघता/वाचता आले नाही. तर कुणाला या यन्त्राबद्दल माहिती आहे का?

हो, माझ्याकडे आहे. इंडक्शन कु़किंग म्हणतात त्या तंत्राला. वापरायला सोपं असतं. मध्यंतरी गॅसचा प्रॉब्लेम झालेला तेव्हा जवळजवळ १५ दिवस दोन्हीवेळचा स्वैपाक करत होते. पण आमच्याकडे दर ३ महिन्यांनी विजेचं बिल येतं तेव्हा त्यात किति फरक पडला माहित नाहीये. कळलं की सांगेन. Happy

ओक्के वरदा, माझ्याकडेही ग्यासच्या नियमित प्रॉब्लेम मुळेच ते घेऊन ठेवलय Happy पण इंडक्शन म्हणजे नेमके काय तंत्रज्ञान आहे? मायक्रोवेव्ह सारखेच काही नाही ना?
तसा तर वीजेचा देखिल प्रश्नच असतो, रॉकेल मिळत नाही ब्लॅकमधेही सबब हा एक उपाय केला आहे.
वीजेचे रिडीन्ग घेऊन जरुर अनुभव सान्गा.

त्याला इंडक्शन कुकर म्हणतात.. विजेचा खर्च अगदी नगण्य असतो.... आम्ही स्वयपाक, चहा सगळे इंडक्शनवर करायचो... लाइट बिल १०० रु जास्त येत होते.. गॅस पेक्षा नक्की परवडते... सध्या त्याचा वापर फक्त शेंगदाणे भाजायला सुरु आहे.... यात नवीन एक प्रकार आला आहे... त्याच्यावर कोणतीही भांडी चालतात... रोजच्या रोज वापरा.. म्हणजे वापरात राहील. पण साडेचार म्हंजे जरा जास्त वाटतात.. मी प्रेस्टीजचे २८०० ला घेतले. कदाचित तुम्चे जास्त कपासिटीचे असेल.. भांडी फुकट मिळाली का? . मला तीन भांडी फुकट मिळाली.. मला हे उपकरण फार आवडते... मायबोली वाचून परवा कॅरॅमल पुडिंग त्याच्यावरच केले होते.

एक महिना गॅसाऐवजी वापरुन बघा.. लगेच फरक कळेल.

Pages