मायबोलीची ओळख व अनुभव

Submitted by दीप्स on 26 March, 2009 - 03:39

नमस्कार मित्रांनो ,

इथे तुम्ही तुमची मायबोली ह्या साइटशी ओळख कशी झाली , तिथे आलेले अनुभव हरकत नसेल तर शेअर करु शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे औरंगाबाद बीबी वरचे पोस्ट Happy

deepurza | 26 मार्च, 2009 - 13:05 नवीन
मी एक गाण शोधत होतो गुगल वर 'भले बुरे जे घडुन गेले....' अन मला त्या गुगल च्या लिंक मधे
मायबोलीची लिंक सापडली , मग काय इथे नवीन असताना मी फक्त सिंहगड रोड बीबी वरच जायचो मला वाटायच मायबोली म्हणजे त्याच गप्पा फक्त , नंतर सगळं कळत गेलं , भरपूर लोकांचे बरे वाईट अनुभव आले ! अजूनही येतच आहेत , मी लिंबूटिंबू च्या पोस्ट वाचायचो तेंव्हा मला काही कळायचेच नाही ... पण नंतर नंतर काही लोकांना भेटलो अन सगळे उलगडत गेले , नवीन असताना कोणालाही जाउन विपू करायचो , मला वाटायचे अरेच्चा ! हे सगळे आपलेच,आपल्यातलेच आहेत ! पण लोक वेगळच रियॅक्ट झाले .... हा अनुभव खूप शिकवून गेला मग हळुहळु सगळे कळत गेले. गडावर मी नियमीत पोस्टायचो , सगळ्यात पहिले रमणीनी मला बोलायला सुरुवात केली, मला काही लोकांनी ड्यु,आयडी आहे असे म्हणून दुर्लक्ष केले , मग एका माबो वरच्या मित्राने मेल करुन सांगितले की प्रत्यक्ष भेटल्याशिवाय,ओळख झाल्याशिवाय काही बीबी वरचे लोक नाहीत बोलत म्हणून , मग भेटलो सर्वांना ( पण अजूनही बरेच लोक दुर्लक्षच करतात असो , त्याला जाबाबदार मीच आहे ! बहूतेक मी छान लिहू शकत नाही म्हणून ) . छान अनुभव पण खूप आले लोकांचे अन मी तेच लक्षात ठेवलेत. लिंबू ओरडायचा अनुल्लेख अनुल्लेख म्हणून पण तो काय असतो त्याचा चांगलाच अनुभव घेतला

मग हळूहळू विचार असा होत गेला की , अरे, आपण इथे टीपी करायला येतो जस्ट अन काय म्हणून आपण ह्या लोकांकडून अपेक्षा ठेवाव्या , मग बिनधास्त सगळीकडे वावर सुरु झाला माझा , एक एक गोष्ट कळत गेली

बरच काही लिहिलं की मी , मायबोली ची ओळख व अनुभव असा बीबी काढावासा वाटतोय आता !

आणि हो , २० तारखेला मी इथ एक वर्ष पूर्ण केलं Proud

**********************************************
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा Happy

दिप्या लेका कितीदा एडिटतोयस...?
_______
रिंद पोश माल गिंदने द्रायि लो लो...!!!
WELCOME SPRING...!!!

मघाशी औ'बाद बाफवर दिप्याने विचारले तु माबोवर कशी आलीस... त्यावेळी त्याला दिलेले उत्तर, अजुन वाढवुन लिहितेय.. Happy
साधारणतः ४-५ वर्षापुर्वी एकदा एका मित्रानी एक लिंक दिली होती, माझे आवडते लेखक / कवी ची.. त्यावेळी वाचुन सोडुन दिले...
मग मुंबईला जेंव्हा एकटी रहायला लागले त्यावेळी घरी आले की काय करावे सुचायचे नाही..कामाच्या स्वरुपामुळे युएनडीपीनी मला मुंबई महानगरपालिकेशी अ‍ॅटॅच केलं होतं. पण ठाणे भिवंडी असही फिरायचे. ऑफिसात माझ्या वयाचे कोणी नसायचे.. बर युएनडीपीची मुंबईत अजुन २-३ माणसं होती फक्त.. कोणीच मित्र-मैत्रिण नव्हते... फोनचं बिल चिक्कार यायचे त्यावेळी...
मग लॅपटॉप अन नेट घेतल्याबरोबर माबो शोधली.. आवडते लेखक्/कवी..मी वाचलेले पुस्तक.. सुरवातीला तिथेच जायचे फक्त.. पहिली पोस्टपण तिथेच केली असेल बहुतेक..
तिथे त्यावेळी हॅरी पॉटर / दा विन्ची यावर चर्चा सुरु झाली होती... माझ्याकडे होती ती इ-बुक्स.. गिरीराजला (हल्ली दिसला नाही तो) अन शंतनुला (टण्याला) मेल केली होती. अजुनही काही जणांना केलं असेल मेल्..पण ह्या दोघांनी मला दुसरी काही पुस्तकं पाठवली..म्हणुन लक्षात आहे. टण्याने जॉर्ज ऑर्वेलची पुस्तकं पाठवली.. मी तोपर्यंत इंग्रजी काही वाचलच नव्हतं जास्त..ऑर्वेल खुप आवडला.. मग त्याच्याशी मेला-मेली करताना व्ही न सी बाफबद्दल कळाले बहुतेक... मग तिथे जायला लागले.. तिथे काही पोस्ट नसेल केलं जास्त, पण राजकिय सामाजिक चर्चा नेहेमी वाचायचे.
तसं अजुनही माबोवरच्या जास्त कुणाला वैयक्तिक ओळखत नाही... फक्त टण्याला एकदा भेटले होते.. तो मुंबईला आला होता.... आम्ही फोर्टमध्ये भटकलो होतो...पुस्तकं घेतली होती काही...
जुने गुलमोहोर वाचायचे नेहेमी..अजुनही वाचते... मग लग्नानंतर दिल्लीला आल्यानंतर स्वैपाकाच्या बाफवर, माझे अनुभववर वैगरे जायला लागले.. कधीतरी काही पोस्टायचे..
जुन्या माबोवर आंब्याच्या, औ'बादच्या बाफवर पण जायचे..पण कोणीच नसायचे तिथे..रुनीची ओळख झाली तिथेच आंब्याच्या बाफवर.. मग कळाले आमचे आई-बाबा ओळखतात एकमेकांना हे. श्यामली पण अशीच औ'बाद बाफवर भेटली.. मग कधितरी तिच्याकडुन कळाले माझी जाऊ अन ती वर्गमैत्रिणी होत्या म्हणुन.. आत्ता काल-परवा दीपशी पण अशीच जुनी ओळख निघाली..
मी नेहेमी रोमात असायचे पुर्वी..सगळीकडे जात असले तरी.. त्यामुळे संदर्भ सगळे लागतात बहुतेक मला..
अजुनही मी जास्त पोस्टत नाही, क्वचित कधी एखादी प्रतिक्रिया..बाकी रोमातच असते..
मला घरात मराठी बोलायला मिळत नाही.. फोनवर आईशी वैगरे अन माझ्या छोट्या बाळाशी जेवढे बोलते तेवढेच.. आजुबाजुला पंजाबी / हिंदी, घरीपण तेच.. वाचायला तर क्वचितच, घरुन आणली पुस्तकं की ५-७ दिवसात संपतात पण :(. .. खरंतर इथे आहे एक छान मराठी वाचनालय, पण लांब पडतं म्हणुन अजुन गेले नाही...अन नवर्‍याला वाचयला आवडत नाही..मराठी तर येतच नाही पण तो दुसरंही वाचत नाही...
मग माबोवर आले की अगदी माहेरी आईकडे असल्यासारखं वाटतं

छान Happy

चान्गला बीबी, चान्गले अनुभव! Happy
गुड, मी पण जमेल तेव्हा पोस्टावे म्हणतो! Happy
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

छान उपक्रम आहे आहे दिपु Happy
गुगलवर मराठी साइट शोधताना ' मायबोली' सापडली !
तेंव्हापासुन इकडे आलो....आणि इकडचा झालो.
यावर मी आधीही काही लिहीले होते ते इथे देत आहे !
-------------------------------------------

आंतरजालात शोधत होतो एकदा
सापडते का काही हरवलेले

ते बोल बोबडे आईजवळ बोललेले
ते खेळ बालसवंगड्यासोबत खेळलेले

तो स्वप्नातला गाव कायमचा सुटलेला
तारा अंतरीचा माझ्या कधिचा तुटलेला

ओळख माझी सांगतील असे काही चेहरे
विचारपुस माझी करतील असे सगेसोयरे

भिकार्‍याला रत्नांनी भरलेला घडा सापडला
न जाणे एक दिवस कसा धागा हा गवसला

तु नाळ जोडली माझी पुन्हा त्या आईशी
'मायबोली' तुझी परतफेड करु कशी ??
---------------------------------

बाकी अनुभव अजुन घेतोय.....! Happy Happy

सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! Happy

वा! प्रकाश छान पोस्ट Happy मी पण माझा अनुभव लिहावा असा विचार करत होते पण शब्द सुचत नव्हते तुझ्यामुळे प्रेरणा मिळाली.

माझी मोठी बहीण (सई) मायबोलीची मेंबर होती, आणि पहील्यांदा (म्हणजे २००२ साली) मला अंताक्षरीवरच्या गमती जमती सांगायची. एक दिवस उत्सुकतेपोटी मी ही इथे रजिस्टर केलं. पण पहील्यांदा एकदम बीबी, हितगुज म्हणजे मायबोली फेम शब्द झेपायचे नाहीत. एके दिवशी एखादा बीबी सापडायचा परत कधी सापडायचाच नाही असा गोंधळ व्हायचा... सईचा ग्रुप होता त्यामुळे त्यांच्याबरोबर आपसूकच ओळख झाली होती. मी इथे रजिस्टर केल्यावर लगेच काही दिवसात सिंहगडावर वर्षा विहार झाला होता. त्याला मी गेले होते तेव्हा हाताच्या बोटावर मोजता येतील इतके लोक आले होते, खूप मजा आली. दिनेश, धूमकेतू, आज्जुका, बॉम्बेवायाकिंग, सोनचाफा, वर्षाऋतू, आणि बरेच मेंबर्स होते, (सगळी नावं नाही आठवत आता) Sad त्यावेळी अज्जुका विशेष लक्षात राहीली कारण तिने खूप लोकगीतं गायली होती आणि मी चकित झाले होते कारण तिला ती इतकी सगळी पाठ कशी काय म्हणून? Happy

नंतर नंतर हळू हळू माझा मायबोली विहार वाढला, तरी मी फक्त इथे वाचायची लिखाण किंवा प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि इथे चालणारे इश्श्यूजही तेव्हा मला इतके काही माहीत नव्हते. सिंहगडाचं ववि हे माझं पहीलं आणि (आजूनपर्यंत) शेवटचं. त्यानंतर नाही गेले कधी.

विविध विषयांवरची माहीती आणि चर्चा वाचून बर्‍याच गोष्टी कळल्या, बुद्धिवान लोकांची ओळख झाली. काही मित्र-मैत्रिणी मिळाले. विशेष म्हणजे कधीही न भेटता सुद्धा अजूनही ती मैत्री काही लोकांबरोबर टिकून आहे. Happy

जसा जसा मायबोली विहार वाढला तशा काही गोष्टी कळायला लागल्या, मी इथे जुनी होते पण काही लिहीत नसल्याने बहुतेक मी नविन असं वाटून असेल किंवा अजून काही कारणामुळे २/३ माबोकरांनी मला दुखावले पण त्याव्यतिरिक्त मला इथे उल्लेख करण्याजोगे वाईट असे अनुभव नाही आले. उलट अलिकडे खरडवहीची सोय उपलब्ध झाल्यापासून खूप नविन मित्र_मैत्रिणी मिळाल्या...

माबोचे वातावरण बिघडलेय, इथे कोणीही येऊन कविता पाडून जातात, असंबद्ध लिहीतात अशा एक ना अनेक प्रतिक्रिया मी ऐकल्या, वाचल्या पण म्हणून कुणी इथे यायचे सोडलेय असं क्वचितच झालंय. मी ही बर्‍याच वेळेला ठरवूनही मायबोलीचं व्यसन सोडवू शकले नाही... Happy रोज सकाळी ऑफिसात आलं की आऊटलूक च्या बरोबरीने मायबोली उघडायची आणि ऑफिशियल मेल्सच्याही अगोदर.... इथले बाफ आधी फिरून यायचे. जवळजवळ ६ वर्षापासून मी इथली मेंबर आहे, माबोच्या संगतीत इतकी वर्ष कशी गेली कळलंच नाही.. Happy

****************************
दक्षिणा
****************************

@डॅक्स .... सिंहगडाचे गटग म्हणजे तेच ना ... अ‍ॅडमिन पण आले होते ? २००३ सालचे ? मग त्याला हाताच्या बोटावर मोजता येतील इतके कमी लोक नव्हते. जवळ जवळ २४ जण होते. ३ ट्रॅक्स गाड्या भरल्या होत्या की ग.
@लिंबू .. तुझी आणि मायबोलीची ओळख वाचायला आवडेल.
=== I m not miles away ... but just a mail away ===

>>>> तेव्हा हाताच्या बोटावर मोजता येतील इतके लोक आले होते,
अरे मिहीर, तिला "हातापायाच्या" अस लिहायच असेल, चूकुन राहून गेल असेल Proud
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

माझी मायबोलीशी ओळख माझ्या भावामुळे झाली. मी ११वी-१२वीत असताना तो इथल्या काही लिंक्स वगैरे पाठवायचा.. त्यामुळे खूप लक्षात राहीली होती ही साईट..
मराठी वाचायला भयंकर आवडत असल्याने व नेट फुकट मिळाल्याने इंजिनिअरींगला आल्यावर(२००१) माझं नियमित येणं सुरू झालं इथे..सुरवातीला मी दबूनच असायचे.. तेव्हा अशा मराठी साईट्स नव्हत्याच काही.. आणि तसाही इंटरनेटशी संबंध नवीनच.. सुरवातीला अगदी रोमन मराठीमधे सगळीकडे संवाद होता. हळूहळू नंतर देवनागरी आले.. मी खूप उशीरा(२००३) रजिस्टर केले.. प्रतिसाद वगैरे तर फार नंतर द्यायला लागले.. कारण नेहेमीच वाचायला इतकं असायचं ना!
तेव्हा व्ही एन सी विशेष आवडीचा होता माझा.. विशेषकरून रिलेशनशिपवरच्या चर्चा काय रंगल्यात महाराजा!! लोकं असली जीव तोडून भांडायची! दुसर्‍या बीबीवर तेच लोकं एकमेकांची आरामात खेचायचे.. सो एकंदरीत मजा वाटायची! Happy
कथा अप्रतिम यायच्या.. कविताही वाचायचे वेड मायबोलीनेच लावले होते.. प्रचंड कविता वाचल्या त्या काळात! नावं घेत नाही कारण सगळीच आठवत नाहीत.. पण अनेक आवडीचे कवी/कवयित्री होत्या तेव्हा!
फोटोग्राफी, चित्रकला यांच्यावर भरपूर चर्चासत्र व्हायचे.. हस्तकला हा सेक्शनही भरून व्हायचा!
एकंदरीतच हितगुज,गुलमोहोर मनापासून आवडायचे ! गुलमोहोर बखर वाचायला अजुनही मजा येते!
किती वेळ घालवलाय मी मायबोलीवर !! Happy

मनात असूनही मी कधीच जीटीजीला/वर्षाविहाराला जाऊ शकले नाही.. (आता तर एलए चे जीटीजी पण मिस झाले!) कधी जाईन माहीत नाही.. पण जेव्हा जाईन तेव्हा अजिबात अनोळखी वाटणार नाही याची गॅरंटी.. !
सग्गळे लोकं अगदी ओळखीचे वाटतात.. निदान जुने.. जुने दिवस आपण कधी विसरत नाही, त्यामुळे ते सगळंच लक्षात आहे... जास्त सुंदर वाटतं! चालायचंच, नॉस्टॅल्जिया हा माझा आवडता प्रकार आहे... Happy

नंतरही खूप संस्थळं आली... मनोगत,उपक्रम,मिसळपाव वगैरे... पण पहीलं आणि मनापासून प्रेम मायबोलीवर !! हे मी केवळ इथे लिहायचं म्हणून नाही लिहीते.. वर नोंदवलेली प्रत्येक साईट मला वेगवेगळ्या कारणासाठी आवडते.. पण मायबोलीची जागा कुणी पटकावू नाही शकत!

हा बीबी काढल्याबद्दल खूप धन्यवाद! कधी मायबोलीवर लिहीले नव्हते.. ते लिहीता आले ! Happy

@ bsk बस बस ... अब रुलायेगी क्या ? Wink
एनिवे ... पण खरच बहुतेकांची सारखीच हकीकत असेल. ते आल्पेनलिबे ची जाहीरात आहे ना ... जी ललचाए, रहा ना जाए !! अगदी तस्सच होतं काहीतरी.
सगळ्यांचे अनुभाव वाचुन मलाही लिहावेसे वाटतय. बघू ... लवकरच लिहीन.
=== I m not miles away ... but just a mail away ===

मिहीर, होय होय तेच ते... Happy आता डिटेल्स नाही आठवत... पण अ‍ॅडमिन आले होते तेच ववि... Happy
तुला गाणं आठवतं म्हणे अजूनही मी म्हटलेलं.... सांग बघू कुठलं ते... Proud

हे हे हे हे ... yes थोडं थोडं आठवतं ना. त्या गाण्यामुळेच तु लक्षात राहीलीस.
काहीतरी '... क्या बनाया खाना ... तुम चुपचाप काहीतरी करोना .. मेर दिल ठिकाने नहीना' right ?
=== I m not miles away ... but just a mail away ===

हो हो Lol
मेरी मुर्गी खो गयी है ना, मेरा दिल ठिकाने नै ना... Lol

>>नंतरही खूप संस्थळं आली... मनोगत,उपक्रम,मिसळपाव वगैरे... पण पहीलं आणि मनापासून प्रेम मायबोलीवर << भाग्या, व्हेरी मच अ‍ॅग्री ऑन धिस पार्ट. Happy

माझी मोठी बहीण, ललिता-प्रीति ही मला दक्षी च्या सई सारखीच माबोच्या लिंक्स पाठवायची, कधी कधी काहीच्या काही कविता, कधी कट्ट्याला खूप टाईमपास झाला असेल तर तो, शिवाय तिचे लेख..... असं काही ना काही! तेवढे वाचून मी शांत बसायचे. नंतर एक दिवस मी आणि ती याहू वर चॅटिंग करत असताना कै च्या कै च बडबडत होतो, त्यावेळी लली म्हणाली, की असंच आम्ही कट्ट्यावर बोलत असतो, तू का येत नाहीस तिथे? त्यावेळी मी प्रथम माबो साईट उघडून बघितली......... पण सुरुवातीला काहीच म्हणजे काहीच झेपेना, कुठे पोस्टायचं, कट्ट्यावर कसं जायच वगैरे वगैरे..........
कट्ट्यावर तर काय, मी धडपडत एखादी पोस्ट लिहीपर्यंत कितीतरी पुढे गेलेला असायचा विषय........ म्हटलं, ईथे काही आपली डाळ शिजायची नाही, पण आपले कट्टेकरी इतके आपुलकीने नवीन आलेल्याला सांभाळून घेतात की कसलाच प्रॉब्लेम च उरत नाही...... अशी मी आता पक्की माबोकरीण आणि कट्टेकरीण झालेली आहे.
जे जे काही नवीन येतं लिहून ते सगळं मी वेळ मिळेल तसं वाचत असते...... मायबोली म्हणजे जवळची मैत्रिण झालेली आहे...... आता तिला भेट दिल्याशिवाय चैन पडत नाही..........
मायबोली झिंदाबाद!!

मंजे, म्हंजे.. वाघाचे पंजे... आपण दोघी सारख्याच.... Proud

मिहीर, विस्ताराने सान्गायच तर फारच लाम्बण होईल! सान्गण्यासारख बरच आहे, पण थोडक्यात.....
इसवी सन १९९६ च्या एप्रिलमधे माझ्या हाती पूर्णवेळ कॉम्प्युटर आला
१९९७ मधे आमच्यात लॅन बसवले गेले, जोडीनेच इंटरनेट आले
अर्थात सुरवातीस, एओएल, याहू अशा मेसेन्जर थ्रू चॅट करु लागलो
याहू रूम्स मधे मराठि रुमवर सकाळि सकाळि तेव्हा एक चान्गला ग्रुप जमायचा Happy
त्यातिल बरेच जण गाणि वगैरे म्हणायचे, मी व अजुन दोघ तिघ, त्या याहु रुमच्या पेज वर वादविवाद घालायचे
१९९८ चा सुमार
अशीच एक लहान कॉलेजगोईन्ग मुलिची आयडी, ती मायबोलीवर अन्ताक्षरी खेळत असायची, याहू मेसेजवरुन मधेच दोनतीनदा तिने मला अमुक अक्षरावरुन गाणि वगैरे विचारली, तेव्हा तिला कारण विचारले, तिने मायबोलीचा पत्ता दिला
मी इकडे येऊन धडकलो, याहुवरच्या सवईप्रमाणे एका पोस्टला खरमरीत उत्तर लिहुन काढले, पोस्ट करायला गेलो तर इमेल आयडी वगैरे विचारताना दिसले, मला शन्का आली, पोस्ट न करताच परत फिरलो. याहू रुम्स वर तत्काळ प्रतिसादाची सवय लागलेली असताना, त्यावेळचे येथिल रुपडे मनास भावले नव्हते.
नन्तर अधुनमधुन चक्कर मारायचो, पण जवळपास २००२ पर्यन्त इकडे मेम्बर म्हणुन आलोच नाही.
मधल्या काळात याहूवरुन बरेच पाणि वाहिले होते.
सकाळचा आमचा ग्रुप बर्‍यापैकी फुटला होता. कम्पनीत मेसेन्जर वापरणार्‍यान्वर कडक लक्ष ठेवले जात होते. ज्या मुलिने मला येथिल पत्ता दिला होता, ति अन तिच्या काही मैत्रिणिन्शी माझे वाजले होते, व तिने मला इग्नोरही केले होते. ती व तिचा कम्पु, मराठी रुमवर देखिल माझा "अनुल्लेख" करीत! Proud
अर्थातच, तेव्हा, याहु चॅट रुम्स वर देखिल बौद्धिक खाद्य पुरविणार्‍या बर्‍याच आयडी होत्या जसे की फ्रोगितो, पी अजय पी, पीटूफोर या जेण्ट्सच्या इतर काही हुषार लेडीज पण होत्या, आता नावे आठवत नाहीत!
तर एकदा सहज, माझ्या तेव्हान्च्या त्या "शत्रुपक्ष" बनलेल्या अमृता नावाच्या आयडीचे (आयडी पूर्णपणे लिहिली नाहीये) प्रोफाईल सहज बघताना लक्षात आले की तिच्या फेव्हरिटमधे मायबोलीचाच पत्ता आहे! Happy
मी इकडे आलो! याहुच्या पब्लिक रुमला साजेशा माझ्या तेव्हान्च्या त्याच आयडीने इथेही मेम्बर झालो
याहू रुमवरील त्वरित प्रतिसादापेक्षा, विचार करुन लिहून मग प्रतिसादाची वाट बघण्याची इथली प्रथा मानवू लागली, त्याचे महत्वाचे कारण असे की याहु रुम्स वरचे आमचे वादविवाद त्या एका पेजवर चालायचे, जिथे ढिगभर आयडी यायच्या, मधेच नेट कनेक्शन तुटले तर आख्खे पान व आधी लिहिलेला मजकुर गायब व्हायचा, आधीच्या लिखाणाचा काहीच सन्दर्भ उरायचा नाही, सगळे काही मेमरी वर अवलम्बुन रहायचे!
इथे आल्यावर मराठीत लिहिता येते हे देखिल बघितले, ते आवडले! Happy
सुरवातीस इथे जीटीपी नावाचा एक बीबी होता. आत्ताचा कसा "कट्टा" आहे? तसाच
पण त्यावेळच्या त्या GTP वर सहजासहजी सुस्वागत होणे, व ते देखिल माझ्यासारख्याचे, तसे अवघडच होते. सुरवातीच्या एक महिन्यातच जवळपास रोजच्या रोज, इथल्या जानेमाने आयडीन्बरोबर पन्गा घेऊन झाला! कारणे क्षुल्लकच!
मग मी काय केले? याच कम्पुचा एक मिन्ग्लिशचा बीबी होता, तिथे जाऊन देवनागरीचा आग्रह धरू लागलो, त्याचा प्रभाव व त्यास येवढा पाठीम्बा मिळाला की तो मिन्ग्लिश बीबी बन्द झाला!
आधिच्या याहुवरच्या अन आताच्या अनुभवावरुन एक नक्की होते, की या कोणत्याही तळ्यात मी वेगळाच (बगळा नव्हे बर का Proud ) असणार होतो
सुरवातीचे काही आठवडे अशा झगड्यात गेल्यावर, एक दिवशी मला एका आयडीकडून बोलावणे आले की तू काय त्यान्च्या तिकडे नादी लागतोस? इकडे सिन्ह्गडरोड बीबी वर ये! मी तिथे गेलो, रमलो! तो आजवर तिथे जातोच जातो
२००२ की २००३ मधे पुण्यातील पहिले अधिकृत (बहुतेक) जीटीजी झाले होते, त्यास हजर होतो, तेव्हाच पहिल्यान्दा झक्कीन्ना पाहिले
या झक्कीन्चि आयडी बघितल्यावर मी पहिल्याना चिडलो होतो, ही काय आयडी झाली??? बघितलच पाहिजे याच्याकडे! पण मग आठवले, माझा एक कॉलेजमधिल नागपुरी मित्र, त्याचे तोन्डातून (शिवीवजा) झक्की हा शब्द बरेचदा ऐकला होता! तेव्हा म्हणले, जाऊद्याना, आपली आयडी तरी कुठे तेवढी सोज्वळ आहे? आपल्या आयडीला बघुन नाही का कितीजण धू धू धुवायला आलेले? Proud
या झक्कीन्ना नन्तरही दोन तिनदा भेटायची वेळ आली. एक कॉमन गोष्ट अशी की सद्ध्याच्या एक मॉडरेटरीण बाई या सर्व भेटीन्ना कॉमनली उपस्थित होत्या! Happy योगायोग, दुसरे काय!
दरम्यान बरेच मित्र झाले होते! प्रत्यक्ष भेटी झाल्या होत्या, येवढेच नव्हे तर याहूवरच्या माझ्या जुन्या मित्रान्ना मी इकडे बोलावले होते, त्यातील मोजके काही आले
२००२ च्या सुमारास कडक साडेसाती सुरू झालीच होती, चटके असह्य होत होते, मन अस्थिर असायचे, कम्पनीतले काम अधीक घरगुती गम्भिर प्रश्न अधिक आर्थिक टन्चाई यान्चा ताण असह्य होत होता
अशा वेळेस, या सर्व कालखन्डात, मन स्थिर राखण्यास मायबोलीच्या असण्याचा मला खुपच आधार होता, किम्बहुना मी तर असे म्हणेन, की परमेश्वरी कृपेबरोबरच, व त्यामुळेच, मला मायबोलीचा शोध योग्य वेळेस लागला, आयुष्यातील अतिशय खडतर कालखन्डात मन रमविण्यास साधन मिळाले! ते तसे नसते तर मानसिकदृष्ट्या मी किती खचलो असतो याची कल्पना करवत नाही.
दरम्यानच्या काळात, एक चित्रपट पहायला सगळेजण गेलो होतो, त्या चित्रपटगृहाच्या दारात उभे असतानाच मला आधिची आयडी टाकुन नवी कोणती घ्यावी ते सुचत गेले, लगेच तो बेत अम्मलात आणला!
मला दुसर्‍या आयडिने उघड वावरायचे नव्हते, कारणे अनेक. पण ते जमले नाही.
१९७७ सालच्या "दुहेरी सदस्यत्वासारखा" वाद्/आक्रमणे/तक्रारी वगैरे बरेच झाले! मी पण हट्टाला पेटलो, प्रश्न तत्वाचा होता. बराच काळ लावुन धरले, ते आजवरची वाटचाल सगळ्यान्समोर आहे! Happy
मायबोली वर बरेच विषय हाताळता आले! एकेकाळि वर्डस्टार मधे मराठि फॉण्ट मधे टाईप करता आल्यावर हुरळुन गेलेल्या मला, इथे इतक्या वेगात मराठीत लिहिता येऊ शकते ही कल्पनाच आकाशाला हात पोचल्यागत वाटवुन देणारी होति.
येथल्या अनेक प्रसन्गान्ना साक्षी रहाताना, येथल्या अनेक उपक्रम जसे की गणेशोत्सव स्पर्धा वगैरे, भाग घेता आला, बुन्दी पाडल्याप्रमाणे नक्कीच नसेल, पण कुवतीप्रमाणे, येथे लिहित गेलो! येथिलच एका स्पर्धे मुळे माऊसने चित्रे काढू लागलो!
एकत्र कुटुम्बात जशी भान्ड्याला भान्डी लागतात, तसे येथे न होणे का बरे अपेक्शावे? ते ही होत होते, पण ते तेवढ्याच हलके पणे घेत घेत, कुणाचाही दुस्वास्/द्वेष न करता वावरलो
तसे वावरताना पाळलेल्या भानाचे न बोलुन कौतुकही येथेच झाले
इथे आलो तेव्हा वयाने तसा बराच मोठा, किम्बहुना माझ्या वयाचे अगदी मोजकेच लोक हजर, तेव्हा जनरेशन गॅप बुजवत सन्वाद साधण्याची तारेवरची कसरत सुरवातीस अवघड वाटली तरी "दुसर्‍याच्या मताचा व त्याचा आदर राखणे" या एका सोप्या सुत्राने त्यावर मात केली
इथे अनेक मित्र भेटले, तात्विक विरोधक भेटले, मौनातून पाठिम्बादेणारे भेटले तसेच अनुल्लेख करणारेही भेटले, बर्‍याचजणान्च्या मागे डिवचायला हात धुवुन लागलो, दोन शाब्दिक फटके दिले, चार घेतलेही! पण हे सगळे एक भान पाळून, ही साईट, येथिल वातावरण, दुषित न होता जे काय करायचे ते करायचे!
इथे मी कोण (वेगळा) आहे हे दाखवित बसण्यापेक्षा माझ्यातला मी जास्तीतजास्त व्यक्त कसा होईल ते बघितले!
दोन ओळिन्चे पत्र धड न लिहू शकणारा मी, मायबोलिमुळे व येथिल सुविधान्मुळे हात हात भर पोस्ट्स लिहू लागलो. त्यावरही टीका झाली, अन का होऊ नये? ज्यान्ना नाहि आवडत ते बोलणारच! पण त्याचबरोबर पोस्ट्स वाचनीय अस्तात हे सान्गणारे देखिल थोडे नव्हते!
गेल्या काही वर्शात मायबोली हे एक "जीवनावश्यक" अन्ग ठरले
उद्या नोकरी गेली तर? नेट कनेक्शन कुठून आणु नी मायबोलीवर कसा काय जाऊ या विचाराने धडकी भरली! माझ्या विपु मधे हा प्रश्णही मान्डला! अपेक्षेप्रमाणे त्यास दोन्ही बाजुन्नी प्रतिसाद मिळाला! त्याने धीर आला. गेल्या नोव्हेम्बर पासून आज मार्चएण्ड पर्यन्त अजुनतरी मी इथे येऊ शकतो आहे! पुढचे पुढे.
सान्गण्यासारखे अफाट आहे! पण सगळेच सान्गावे असा नियम आहे का? काही शब्दाविना उमजुनही घेऊयात, नाही का? Happy
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***.

>>इथे मी कोण (वेगळा) आहे हे दाखवित बसण्यापेक्षा माझ्यातला मी जास्तीतजास्त व्यक्त कसा होईल ते बघितले!
दोन ओळिन्चे पत्र धड न लिहू शकणारा मी, मायबोलिमुळे व येथिल सुविधान्मुळे हात हात भर पोस्ट्स लिहू लागलो. << हा बदल मला माझ्यातही जाणवला लिमटिम.... मी ही मुखदुर्बळ होते, म्हणजे अशा पब्लिक साईटवर (प्रत्यक्षात नाही :फिदी:) पण आता मी ही आपली मतं व्यक्त करायला माबो मुळेच शिकले... Happy

लिंबू .... छान लिहीले आहे. पण या एका वाक्याचे प्रयोजन नाही समजले. हे वाक्य बाकी पोस्टाशी संबधित नसल्यासारखे वाटते.
<<एक कॉमन गोष्ट अशी की सद्ध्याच्या एक मॉडरेटरीण बाई या सर्व भेटीन्ना कॉमनली उपस्थित होत्या! योगायोग, दुसरे काय!>>

मी ही थोडे 'काळ्यावर पांढर' करावे म्हणतो.
अर्थात माझी गोष्टही काही इतरांपेक्षा वेगळी नाही. असच एका मित्राने उसगावमधुन 'My City' हितगुजमधे आमच्या भागात राहणार्‍या सगळ्यांसाठी एक पोस्ट टाकले आणि आम्हाला सगळ्यांना तिथे जाऊन ते पोस्ट बघण्याची विनंतीवजा मेल केली. २००२ सालची गोष्ट ही. पोस्ट बघितले, लगेचच मेंबर होऊन त्याला उत्तर टाईपले. मग My City मधेच अजुन कुठले कुठले भाग आहेत ते बघुन सगळीकडे प्रतिसाद देऊन ठेवला. सिंहगड रोडचा अविभाज्य घटक बनलो. त्यातल्या त्यात 'बुधवार गँग'. जुनमधे मायबोलीकर झाल्यावर लगेचच ववि आले. अंबर सोडला तर कुणीच ओळखीचे नव्हते. जावे की नाही या पेचात असताना कसे कोण जाणे, पण त्या दिवशी सकाळी आयोजकांना फोन करुन मी येऊ का विचारले आणि होकार मिळताच तातडीने भेटायच्या ठिकाणी येऊन दाखल झालो. no doubt त्या वविला खूप धिंगाणा केला, मजा आली. इतकी की त्या नंतर पुढच्या वर्षीच्या वविच्या आयोजनामधेसुद्धा मी पुढाकार घेतला. मुळशीचे ववि सुद्धा छान झाले, पण सिंहगडाएवढी मजा नाही आली.

मधे काही दिवस कंपनीमधे काही साईट्स बंद केल्या होत्या, त्यात मायबोलीपण असल्याने जवळ जवळ २-३ वर्ष संपर्क तुटला होता. त्यानंतर तो पुनःप्रस्थापित केल्यावर एकदम बदललेले रुप पाहुन जरा बावरुनच गेलो होतो. कुठे काय करावे ते समजतच नव्हते, त्यामुळे सक्तीने 'रोम'मधे रहावे लागले.

आणि जेव्हा जरा अंदाज आला, त्यानंतर परत इथला वावर पुर्ववत सुरु झाला. अर्थात पुर्ववत नाही म्हणता येणार ... कारण अजुनही 'पुपु' किंवा 'सिंहगड रोड'च्या बाफवर जाताच येत नाही. तिथला लिहीण्याचा (आणि पुसण्याचा) वेग अतिप्रचंड आहे. भाषाही बदलली. अगदी म्हणजे 'आमच्या वेळी असे नव्हते' हे वाक्य कित्येक वेळा ओठांवर आले. पण जरा लिहायची खुमखुमी येऊ लागली आणि उगाचच कुठेतरी पांढर्‍यावर काळे ही करुन झाले. कुणी वाचले, कुणी सुचना दिल्या ..... पण कुणी 'अनुल्लेख' केला नाही. काही ओळखी खरच दृष्ट लागाव्या अश्या आहेत. पण कुणी मुद्दाम अव्हेरलेही नाही. जरी माबो माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग नसले तरी, माबोशिवाय आंतरजालात मराठीमधे काही वाचनीय आहे असे अजिबात वाटत नाही.

=== I m not miles away ... but just a mail away ===

अरे त्यास तसा स्पेसिफिक अर्थ काही नाही, दर वेळेस योगायोगाने ती हजर होती हे माझ्या लक्षात आले, अन मधल्या काळात ती मॉडरेटर देखिल झाली, येवढाच अर्थ अपेक्षित आहे मला Happy मी जितके वेळेस हजर असेन जीटीजीन्ना तर एखाद दुसरे सोडून बाकी वेळेस ती भेटली, इतरान्चे तसे नाही, इतर एखाद दोन वेळेसच भेटले, काही जण तर एकेकदाच! Happy उदाहरणार्थ तूच! Proud
बाकी गैरसमज नसावा! चुकले असेल तर माझे वाक्य लिहीणेच चुकले असेल Happy

>>>> माबोशिवाय आंतरजालात मायबोलीमधे काही वाचनीय आहे असे अजिबात वाटत नाही.
अरे हे वाक्य काहीतरी गन्डलय का? बघ बर जरा!
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

अहो लिंबूटींबू, त्या वाक्याचा अर्थ असा असावा..
की मायबोली(या साईट) शिवाय, मायबोली(म्हणजे मराठी) मधे वाचनीय काही नाही आहे! Happy

येस येस, बीएस्के! तसाच अर्थ लावला की लागतोय नीटपणे! Happy धन्यवाद
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

हो, तोच अर्थ अपेक्षित होता. चुकून अनुल्लेख झाला.
चूक सांगितल्याबद्दल व दुरुस्ती सुचवल्याबद्दल धन्यवाद.
=== I m not miles away ... but just a mail away ===

दक्षिणे,
तुला लोकगीतं लक्षात आहेत की काय तेव्हाची? आता मलाच आठवतील की नाही माहीत नाही.
आता मला गायलाही आठवेल की नाही माहीत नाही म्हणा..

बाकी माझा मायबोलीचा प्रवास फारसा काही वेगळा नाही. १९९९ च्या मे मधे यूजीए च्या लायब्ररीमधे बसून मराठीला सुकलेली मी काही मराठी मिळतंय का शोधत होते. त्यात सापडली ही साईट. तेव्हा इथे पासवर्ड-लॉगिन अशी काही भानगड नव्हती. पण सगळे एकजात कॉम्प्युटर/ सॉफ्टवेअरसंदर्भातच केवळ बोलताना दिसले त्यामुळे मी पळ काढला. मग मधे २-३ महिने मला नेट अ‍ॅक्सेसच नव्हता त्यामुळे आलेच नाही. मग शेवटी सप्टेंबरमधे परत आले आणि तेव्हा लॉगिन चा ऑप्शन दिसू लागला होता तरी गेस्ट म्हणूनही मेसेज टाकता येत होता. तेव्हा माझा याहूवर अज्जुकावतार सुरू झाला होताच आणि मी इथेही अज्जुका म्हणूनच प्रगटले.
मुळात मराठी बोलणं, मराठी वातावरण हे मिळत नसल्याने त्यातून मायबोली शोधली गेली आणि मायबोलीने तो आधार भरपूर दिला त्या काळात. तसंच खूप सारे जवळचे मित्रमैत्रिणी, अनुभव, चर्चा आणि वादंगातून स्वतःच्याच विचारांना आलेली क्लॅरिटी, बंद केलेलं लिखाण पुन्हा सुरू करावसं वाटणं, ते सुरू करणं हे सगळं मायबोलीचं श्रेय.
बघू कधी जमलं तर मायबोलीचं हे कर्ज फेडता आलं तर.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

वा वा चांगला विषय. छान लिहिलय सर्वांनी. मी माझे चांगले पानभर अनुभव इथे आधीच लिहिलेत Happy

अज्जुका,
मला एकही गाणं आठवत नाही, पण तु खंडोबाचं कोणतं तरी गाणं म्हटलं होतंस त्याला तुला एका मुलाने साथ ही दिली होती, ते आठवतंय... नाट्या होता बहुतेक कि अंतुबर्वा (आठवत नाही :() देवटाकीच्या बाहेरच आपला कार्यक्रम सुरू होता.... मी आवाक झाले होते तुझी प्रतिभा पाहून.... Happy

सिंडे, चांगलं लिहीलं आहेस हो. मी आजच वाचलं Happy
(माझी) गुड मॉर्निंग पीपल Happy

व्वा ! सगळ्यांचेच मनःपुर्वक आभार Happy
छान वाटले सगळे अनुभव वाचुन Happy
**********************************************
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा Happy
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

इतक्या लवकर आभार कसले मानतोयेस? अरे अजुन खुप जणांना लिहायचय..
छान लिहिलय आत्तापर्यंत सगळ्यांनी..

Pages