हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्विजिबल क्लोक भरपूर असतात.. पण कालपरत्वे ते खराब होणारे असतात.त्यांची पारदर्शकता कमी होणारी असते. . हॅरीकडचा एक्मेव मात्र मौत का तोहफा असल्याने कायम टिकणारा असतो.

नंदिनी, जरुर कर अनुवाद.. आधी परवानगी वगैरे घेवुन केलास तर अतिउत्तम Happy

इन्व्हिजिबिलिटी क्लोक्स किती असतात?>>>>>>> कितीही असु शकतात... पण ओरिजिनल (बीडलच्या कथेतला) एकच जो हॅरीकडे असतो तो.. बाकीच्यांच मॅजिक काही दिवसांनी कमी होतं...

पूनम, राहूदे. जीटीजीमधे सर्वाना मी गोष्ट सांगेन. Happy मग प्रश्नच नाही येणार.

त्या कथा काही फार खास मोठ्या नाहीत. छोट्याशा आपण लहान मुलाना सांगतो तशाच आहेत फक्त विझार्ड कम्युनिटीच्या असल्याने मॅजिक म्हणजे फार गंमत असं नाही आहे. त्याउलट कॉमस सेन्स, दया, मगल्सना मदत करा असे संदेश दिलेले आहेत.
डेथली हॅलोजची गोष्ट सातव्या पुस्तकात जशीच्या तशी दिलेली आहे.

ओह बर, धन्यवाद Happy

डेथली हॅलोजच्या कथेचे शेवटच्या सिनेमातले अ‍ॅनिमेशन अप्रतिम आहे!

भरत, मॅड आयच्या त्या जादुई डोळ्याला दिसायचं. तो डोळा नकली असतो. तोच डोळा त्याचा तोतया वापरत होता.

>>अंब्रीजला त्रास होत नसतो का लॉकेटमुळे?>>
अंब्रीजला बदलणारे लाकेट अजून तयार झाले नाय. उलट तिच्यामुळे ते लाकेट बदलेल एखादवेळी. Proud

आज पाहीला हा धागा!! चिमुरी धन्यवाद!!!
मी पण हॅपॉ ची एसी कूलर आहे!!

Happy चर्चा वाचताना मजा येतेय!! कित्येक गोष्टी नव्याने कळत आहेत!! आता घरी जाऊन परत सुरुवात करावी (च) लागणार असं दिसतंय!! Happy

पाचव्या भागात (पुस्तकात) सुरूवातीला डडली आणि हॅरीवर डिमेन्टर हल्ला करतात. नंतर पुढे उंब्रिज सांगते की हा हल्ला तिने करवला होता. पण कशासाठी? ती काही व्होल्डेमॉर्ट सपोर्टर नसते, उलट मिनिस्ट्रीमध्ये काम करणारी असते.

अम्ब्रिजला हॅरी आणि डम्बलडोर हे मिनिस्टरच्या विरोधात (वोल्डेमॉर्ट परत आलाय हे सांगुन) आहेत हेच पटत नसतं... म्हणुन हॅरीची इमेज खराब करण्यासाठी ती तस करते...

माझे संपले ७ ही भाग वाचून. त्यामुळे मागचे २-३ महिने फार मजेत गेले. पुस्तकं फ्लिपकार्टवरुन विकत घेतली आणि पीडीएफ्स पण डाऊनलोड केल्या. त्यामुळे अक्षरश: वेळ असेल तेव्हा (प्रवासात, घरी, ऑफिसात, हॉटेलात Wink ) वाचता आलं Happy
चिमुरीला स्पेशल धन्यवाद.

मी आजच हाफ ब्लड प्रिन्स वाचायला घेतलंय Wink

हॅरी पॉटरची पुस्तकं जिन्क्स्ड असतात बहुतेक. पुस्तक संपूर्ण वाचून होईपर्यंत त्याचा इफेक्ट राहतो.
तर सांगा कुठला चार्म असेल ज्यामुळे पुस्तक पूर्ण वाचेपर्यंत हातालाच चिकटून राहतं ?? Proud चाल्वा डोकं.

चिमुरी, खूप थॅन्क्स हा धागा सुरु केल्याबद्दल. नाहितर अजुन किति वेळ लागला असता देव जाणे, हॅ.पॉ. हातात घ्यायला. माझ्या हॅ,पॉ. फॅन बहिणआणि नणंदेकडून तुला आणि इथल्या जनतेला स्पेशल थॅन्क्स सान्गण्यात आलेले आहेत. Happy
एकदा झाला सगळा सेट वाचून. आता दुसरा राउंड सुरु झालाय, आणि १ न २ झलय वाचून. मस्त मजा येतेय!

लेकीने आत्ताच सांगुन ठेवलंय. वाचता यायला ( वाचुन समजताही) लागल्यावर घरातली हॅरी पॉटरची सगळी पुस्तके तीला द्यायची आहेत. Lol

अरे बापरे... मला इतके थॅन्क्स Blush

हॅरी पॉटरची पुस्तकं जिन्क्स्ड असतात बहुतेक. पुस्तक संपूर्ण वाचून होईपर्यंत त्याचा इफेक्ट राहतो.
तर सांगा कुठला चार्म असेल ज्यामुळे पुस्तक पूर्ण वाचेपर्यंत हातालाच चिकटून राहतं ?? फिदीफिदी चाल्वा डोकं.>>>>>>> ते एक पुस्तक असतं ना जे वाचायला चालु केलं की माणुस तेच वाचत राहतो, अगदी दुसरं काहिही करत असला तरी...

सावली कित्ती गोड Happy

सगळे Animagae आहेत

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळे हॅरी पॉटरच्या भल्यासाठी स्वतः मरतात.

पॉटर ... घरात
सिरियस... मिनिस्ट्री रहस्यमय विभाग
पेटेग्र्यु... मॅलफॉय मॅनॉर
ल्युपिन...हॉगवर्ट लढाई

मॅराडर मॅपचे रहस्य कुणालाही माहीत नसतं. अगदी फिल्चला, स्नेपलाही माहीत नसतं. मग फ्रेड आणि जॉर्जला नकाशा उघडायचा मंत्र कुठून मिळतो?

हॅरी पॉटर चा Boxed set... शेवटी घेतलाच मी विकत. आधी सगळी पुस्तकं वाचनालयातून किंवा मित्रांकडून उधार घेऊन वाचली. पण आता नाही.. हा हा हा हा.

गॉब्लेट ऑफ फायर..

बार्टी क्राउच ज्यु. चा खटला सुरु असतो. त्यावेळी स्नेपचा डेथ इटर म्हणून उल्लेख होतो. तेंव्हा डंबल्डोर तो मुद्दा खोडून काढतो की स्नेप हा तर गुप्तहेराचे काम करत आहे.

नंतर कालांतराने तुरुंगातून पळून बाहेर येऊन बार्टी वॉल्डीला भेटतो... तेंव्हा बार्टी वॉल्डीला का सांगत नाही की स्नेप हा तुझा विश्वासू नाही म्हणूण.. तो विसरतो काय सांगायला? बार्टीला हे रहस्य माहीत असुनही वॉल्डी अखेरपर्यंत स्नेप आपलाच माणूस समजत रहातो... कम्युनिकेशन गॅप ! Proud

डंबलडोअरचा स्नेपला जोरदार पाठिंबा असतो हे सगळ्यांना माहीत असतं, अर्थातच वॉल्डमॉर्टला सुद्दा आणि त्या करताच स्नेप हा आपल्या सगळ्यात उपयोगाचा हेर आहे असं वॉल्डमॉर्टचा समज असतो. वॉल्डमॉर्टला बार्टीनी सांगून त्याला असं काय वेगळं कळणार होतं?
जेव्हा वॉल्डमॉर्ट परत येतो तेव्हा तो सगळेच डेथ इटर ज्यांनी त्याच्या माहितीनुसार त्याला परत आणायचे इतके प्रयत्न केले नाही त्यांची खबर घेतोच (मारुन ही टाकतो). स्नेपची आणि त्याचे संभाषण असं थेट लिहीलेलं नाहीये गॉबलेट ऑफ फायर पुस्तकात पण पुढे नार्सिसा आणि बेलॅट्रिक्स स्नेपला भेटायला येतात आणि बेलेट्रिक्स त्याच्यावर संशय घेते तेव्हा स्नेप हे सगळं सांगतो, डार्क लॉर्डनी त्याच्यावर विश्वास का ठेवला ते.

हॅरी पॉटरच्या ७ व्या भागाची आणखी एक edition आहे - 'Adult edition' म्हणून. सध्या ती वाचतो आहे, ७०% झालीये. Genuine वाटतेय. अ‍ॅडल्ट एडिशन का म्हटलंय कोण जाणे, मला तरी ती 'Teen Age Edition' वाटली. ह्यातला बरचसा भाग हॅरी आणि जिनीच्या प्रेमाबद्दल आहे; पण कुठेही अश्लील उल्लेख नाहियेत [अजून तरी]. वॉल्डमॉर्टचे हॉरक्रुक्स शोधण्याचे वेगळे प्रसंग आहेत 'Standard Edition' पेक्षा; त्यामुळे परत एकदा ती जादू अनुभवतोय. फक्त 'Deathly Hallows' चा काहीच उल्लेख अजून तरी आलेला नाहीये.

Pages