हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती बेलाट्रिक्स म्हणजे अगदि दुष्ट चेटकीण दिसते.... मला वोल्डेमार्ट नंतर कोणाचा राग येत असेल तर तिचा ... पहिले सिरिअस नंतर हरमायानीचा तो छळ... वाईट्ट बाई... रागः

http://en.wikipedia.org/wiki/Nicolas_Flamel निकोलस फ्लॅमेल या नावाचा खरोखरच शास्त्रज्ञ होता.. धन्य त्या रोलिंग बाई.. कुठून कुठून संदर्भ जमवून कथानक तयार केले.. Happy

चिमुरी, धाग्या बद्द्ल आभार !
खूप दिवसां नंतर हा धागा वर आला. बर वाटल ! मी देखिल पुर्ण हॅ. पॉ सिरिज फोलो केली. पहिला पिक्चर आधि, नंतर पुस्तक अस झाल. त्यानंतर मात्र आधि पुस्तक मग रिलिज होतिल तसे मुवी ! अस झाल. वरिल पोसटितुन एवढा बराकाईने आभ्यास करणारे पहुन थक्कच ! झालो Happy .बकि, JKR तर जिनियस आहेतच ! बाईन बद्द्लचा आदर प्रत्येक पुस्तका बरोबर वाढतच गेला !

सगळीच कथा एका अत्याऊतकृष्ट विणकाम केल्या सारखी आहे. कुठेच काही फॉल्ट/डिफेक्ट सापडत नाही.

बेलाट्रिक्स वोल्डीवर लाईन मारत असते ते एकदम सही सटली घेतलय.>>>> हे मला नाही जाणवलं कुठेच. कोणत्या भागात आहे?

वैद्यबुवा..ते "सटल" आहे त्यामुळे प्रत्यक्ष उल्लेख कुठेच नाही. पण समजतं. (मुलींनाच समजलं की काय? Wink )

जामोप्या, सुतावरुन स्वर्ग गाठण्यासारखं आहे हे. असल्याच विचारांना मुली/बायका वैतागतात! नुसता पहायचा अवकाश की "आग दोनो दिलों मे लगी है..." असा निष्कर्ष काढून बसतो आणि मग..... Proud

होऊ शकतो म्हणा. पण मुलींना याबाबतीत सिक्स्थ सेन्स अस्तो म्हणतात ना.. कधी कधी तो इतका पॉवरफुल अस्तो की , गोष्टीतल्या चेटकिणीचं न लिहिलेलं प्रेमप्रकरण ही कळतं. Lol
जाऊदे हो. मला नक्की असा प्रसंग आठवत नाहीये पण मलाही ते तसं वाटलं म्हणून उगाच टीपी करतेय. Happy
शिवाय वर जामोप्यानी प्रथमच प्रश्न विचारण्याऐवजी उत्तर दिलंय Proud

दोनो दिल मे नाही हो.. फक्त बेलाच्याच बाजूने आग लागल्यासारखे वाटते... षिणेमात हे व्य्वस्थीत जाणवते... म्हणजे जाणवेल इतपत अ‍ॅक्टिंग दोघानीही केली आहे, असे वाटते.

हे घ्या.. बेला वॉल्डी ची अधुरी लव स्टोरी... Proud http://www.youtube.com/watch?v=hl9wrSkuutY

मी म्हणतो तो हा सीन... http://www.youtube.com/watch?v=ZaGImPWfgB0&feature=related याला उठवू का कवटाळू या कन्फ्युजनमध्ये बेला आहे असे वाटते ! वॉल्डी तिला झिडकारतो, कारण त्यालाही ते फील होते बहुतेक. Proud षिणेमा म्हणजे पुस्तकाचे चौथे डायमेन्शन आहे आणि वाइस वर्सा... Happy

गोगो, डोलोरस अमब्रिज पाठवते डेथ इटर्स लिटिल व्हिंगिंगला (डडली आणि हॅरी राहतात ते शहर), जेणेकरुन हॅरीला मॅजिक वापराव लागेल आणि त्यामुळे तो मिनिस्ट्रीच्या कचाट्यात सापडेल. अमब्रिज हे नंतर सांगते (तिला फॉर्बिडन फॉरेस्ट मध्ये सोडतात त्याआधी बहुतेक).

नयनिश- सेम पिंच.
ती sycophancy करत असते फारतर. लाईन बिईन मारत असते असे नाही वाटले.

वैद्यबुवा,
हो अंब्रिज पाठवते ते माहित आहे, पण पुस्तकांमध्ये इतर ठिकाणि मगल्स्ना डिमेण्टर्स दिसत नाहित फक्त फील होतात असे उल्लेख आहेत नं! मग डडली ला कसे दिस्तात? काय होतं एक्झॅक्ट्ली?

रैना Happy

डिमेंटर्स मगल्सना दिसत नाहीत असा उल्लेख मला नाही आठवत. हॅरी आणि सगळे त्याचे सोबती, हॅरी वर विश्वास ठेवून वॉल्डमॉर्ट परत आला ह्याला पुष्टी देत असतात. कॉर्निलियस फज आणि टीमला ह्याच्यावर विश्वास नसतो (किंवा विश्वास ठेवायचा नसतो असही म्हणता येइल). हॅरी आणि कंपनी बिनबोभाटपणे लोकांना वॉल्डमॉर्ट आला हे सांगत फिरतायत आणि मिनिस्ट्री मधून कोणीच काही करत कसं नाही असा विचार करुन वैतागून अमब्रिज डिमेंटर्स पाठवते. ते खरं तर डडली करता पाठवलेले नसतात, हॅरी त्यांच लक्ष्य असतो. हॅरी ला डिमेंटर्स दिसल्यामुळे त्याला मॅजिक वापरावे लागेल आणि मगलांसमोर मॅजिक वापरल्यामुळे त्याला मिनिस्ट्रीच्या कचाट्यात सापडवता येइल ह्या उद्देशानी डिमेंटर्स पाठवलेले असतात. डिमेंटर्स येतात तेव्हा नेमका डडली हॅरी सोबत असतो त्यामुळे त्याच्यावर हल्ला होतो.
पुढे हॅरीवर पिलान के मुताबिक मुकदमा शुरु होतो पण डंबलडोअर येतो आणि याडा याडा याडा.... आपल्याला माहितच आहे. Happy

डंबलडोर आणि ग्रिंडेलवाल्डचे मात्र अफेअर असते असे दर वेळेस वाचताना वाटते.
काल डेथली हॅलोज वाचत होते. हर्मायनी रॉनला बुकलून काढते तो प्रसंग.. फनी आहे..
कितव्यांदातरी वाचल्यानंतर आताआता डोक्यात प्रकाश पडतोय की बरेचसे pithy आहे. तो त्या यंग अ‍ॅडल्टसच्या genre चा दोष असावा.
किती टककन डायलॉग येतात ना...
he would 've known I would leave you...
No. he knew you wanted to come back...

बेलाट्रिक्स वोल्डीवर लाईन मारत असते ते एकदम सही सटली घेतलय.>>>>>> अगदी.. वाचताना बर्‍याच ठिकाणी जाणवतं ते..

निकोलस फ्लॅमेल या नावाचा खरोखरच शास्त्रज्ञ होता.. धन्य त्या रोलिंग बाई.. कुठून कुठून संदर्भ जमवून कथानक तयार केले..>>>>> पुस्तकातल्या जवळपास सगळ्याच संज्ञांना संदर्भ आहेत.. अगदी पोशन्स ची नावं वगैरेला देखील..

दोनो दिल मे नाही हो.. फक्त बेलाच्याच बाजूने आग लागल्यासारखे वाटते... षिणेमात हे व्य्वस्थीत जाणवते... म्हणजे जाणवेल इतपत अ‍ॅक्टिंग दोघानीही केली आहे, असे वाटते.>>>>> सिनेमाचं माहित नाही, पण पुस्तकातही अगदी व्यवस्थित जाणवतं Happy

डडली ला डिमेंटर्स कसे दिस्तात? की नाहिच दिसत? मी कंफ्युजड!>>>>>> दिसत नाहीत.. पण त्याला ते जाणवतात.. वातावरणातील बदल वगैरे..

डंबलडोर आणि ग्रिंडेलवाल्डचे मात्र अफेअर असते असे दर वेळेस वाचताना वाटते.>>>>>>> मला हे कधीच जाणवलं नव्हतं.. जोपर्यंत जेकेआरने गौप्यस्फोट केला नाही तोवर.. नंतर जाणवायला लागलं Wink

डंबलडोर आणि ग्रिंडेलवाल्डचे मात्र अफेअर असते असे दर वेळेस वाचताना वाटते.>>>>>>> टोटली स्टम्प्ड!!! कधी? कुठे? केव्हा? का?

बेलाट्रिक्सला व्होल्डेमॉर्टचे ऑब्सेशन होते असे वाटले मला. एकतर्फी. त्याच्याकडून काहीच नव्हते. ती काय हिंदी टिनपाट मालिका आहे का व्हिलनांची प्रेमकहाणी दाखवायला?? बाई असं करूच शकत नाहीत Proud

बेलाट्रिक्सला व्होल्डेमॉर्टचे ऑब्सेशन होते असे वाटले मला. एकतर्फी. त्याच्याकडून काहीच नव्हते. ती काय हिंदी टिनपाट मालिका आहे का व्हिलनांची प्रेमकहाणी दाखवायला?? बाई असं करूच शकत नाहीत>>>>>>>>>>>>>> Lol अगदी.. पौर्णिमा तुझी सगळी शेवटी वाक्यं अनुमोदन देण्यासारखी असतात...... Happy

Lol बाईंची कृपा राहिली, तर अख्खे पॅरेही अनुमोदनीय होतील (अशी आशा ठेवते!) Proud

डम्बलडोअर आणि ग्रिंडलवाल्डचा प्रकाश टाका की प्लीज.

बाईंची कृपा राहिली, तर अख्खे पॅरेही अनुमोदनीय होतील (अशी आशा ठेवते!)>>>>>>>>>> अगं आधीच दिलय अख्ख्या पॅराला अनुमोदन Happy

डम्बलडोअर आणि ग्रिंडलवाल्डचा प्रकाश टाका की प्लीज.>>>>>> पुस्तकात त्या दोघांच्या संबंधांचा कुठेही डायरेक्ट उल्लेख नाहिये.. हॅपॉ सिरिज संपल्यानंतर बाईंनी अधिकृतपणे ते नातं डिक्लेअर केलं.. पण पुस्तकातल्या काही उल्लेखांमुळे मलातरी त्या दोघांचा तसा संबंध असेल असं वाटलं नाही.. शाळा संपायच्या वेळेस ड्म्बीला ग्रिन्डेलवाल्ड भेटतो.. तेव्हा दोघेही महत्वाकांक्षी असल्याने दिवसभर एकत्र बसुन चर्चा करायचे.. आणि इतकं असुनही रात्री जर काही सुचलं तर एकमेकांना घुबडं पाठवायचे.. जेव्हा ग्रिन्डेलवाल्डचा टेरर खूप वाढला तेव्हा सगळ्यांनी डम्बीला गळ घातली की त्याचा बंदोबस्त करा म्हणुन पण त्यांनी ते जमेल तेव्हडं पुढे ढकललं.. इतकंच..

Pages