हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमुरी, ते दोन फिनिक्स पंखांचं आहे ठाऊक. मला लिलीच्या त्यागाचा काय संबंध हे नीट समजले नाही. पण नंदिनीचे लॉजिक -<त्या मालकाच्या जीवावर उठलेला पण तिला समजत असे-> हे जरा पटू शकते. तुम्हा दोघींना धन्यवाद. अजून कोणाचे काही अंदाज असतील तर तेही लिहा कृपया.

लिलिच्या रक्ताचा आणि छडीचा संबंध नाही.... लिलिने मरण्यापूर्वी हॅरीच्या रक्तात संरक्षण तयार केलेले असते.. त्यामुळे वॉल्डी हॅरीला स्पर्श करु शकत नसतो... म्हणूनच क्विरिल मरतो.

पण गॉब्लेट मध्ये हॅरीचे रक्त वापरुन वॉल्डी जिवंत होतो... त्यालाही तेच संरक्षण मिळते, मग तो हॅरीला स्पर्श करु शकतो.. तो हॅरीच्या कपाळाला हात लावुन दाखवतो, पण मरत नाही..

छडीच्या कोअरमध्ये एकच पदार्थ असेल तर त्या दोन छड्याना जुडवा छड्या म्हणतात.. अशा छड्या एक्मेकाच्या मालकाना ठार मारु शकत नाहीत. म्हणुनच वॉल्डीला दुसरी छडी हवी अस्ते.

जुडवा छडी फक्त गॉब्लेट मध्ये वापरली आहे.... त्यानंतरच वॉल्डीला समजते आणि सातव्या भागाच्या सुरुवातीला तो मिटिंगमध्ये सांगून छडी बदल्तो. त्या मिटिंगमध्ये वॉल्डे सांगतो.. आमच्या छड्या जुडवा आहेत.. आम्ही एक्मेकाना मारु शकत नाही...

चौथ्या भागात जो काही चमत्कार होतो तोही जुडवा छडीमुळेच होतो.

पूनम, त्या लिलीच्या त्यागाबद्दल जवळ जवळ प्रत्येक भागात आहे. सारांश इतकाच की लिली हॅरीसाठी मरते. त्यामुळे मरताना ती हॅरीला स्वतःच्या प्रेमाचे एक कवच देऊन जाते. जोवर हे कवच हॅरीभोवती आहे तोपर्यंत वोल्डी हॅरीला मारू शकत नाही. हे कवच फक्त हॅरी स्वतःच भेदू शकतो (कर्ण आणि कुंतीसारखे वाटतय ना? अगदी शब्दशः नाही तरीपण)

पौर्णिमा आता कळला तुझा प्रश्न.. प्रश्न वॅलिड आहे.. कदाचीत हॅरी ड्म्बीला ते विचारतोही पण त्यावर ड्म्बी त्याला काय सांगतो तेच आठवत नाहिये....

नंदिनी, हो लिलीच्या त्यागाबद्दल आहे बरेचदा, तरी एकदा सातव्या पुस्तकातला 'किंग्ज क्रॉस' वाच. त्यात परत डम्बलडोअर त्याबद्दल सांगतो- ट्विन वॉन्ड्जच्या कनेक्शनचे सांगताना.

जामोप्या, चौथ्या भागातच व्होल्डी आणि हॅरीचे ड्युअल होते, ज्यात हॅरीला व्होल्डी काही करू शकत नाही, कारण व्होल्डीने मारलेले लोक हॅरीला अ‍ॅपॅरेट होण्यासाठी संरक्षण आणि वेळ देतात. म्हणून तो वॉन्ड बदलतो. < अशा छड्या एक्मेकाच्या मालकाना ठार मारु शकत नाही> हे तुमचे लॉजिकही पटते पण.

चिमुरी Happy

अशा छड्या एक्मेकाच्या मालकाना ठार मारु शकत नाही> हे तुमचे लॉजिकही पटते पण. >>>>>>> हे बरोबर आहे पण पौर्णिमाने जे विचारलं त्यावेळेस वॉल्डीने मॅल्फॉय ची छडी आणलेली असते...

तरी एकदा सातव्या पुस्तकातला 'किंग्ज क्रॉस' वाच>>>>>>> इथेच उत्तर सापडेल असं वाटतय....

वॉल्डीने मॅल्फॉय ची छडी आणलेली असते... >> एक्झॅक्टली! हेच मला म्हणायचेय. ट्विन छ्ड्या (हा शब्द चपखल आहे हां! :)) समोरासमोर असताना एकमेकींना ओळखतात हे ठीक (जे चौथ्या भागात झालं). पण सातव्या भागाच्या सुरूवातीची जादू कशामुळे झाली? ह्याचं निराकारण डम्बी करतात किंग्ज क्रॉसवर. पण मला फारसे समजले नाही ते नीट Sad
असो. फार कीस पाडायला नको. काहीही असलं तरी बाई महान आहेत! Proud

तेच तर ना.. जर वॉन्ड बदलला तर हॅरीच्या वॉन्डला कसं कळलं की हा तोच शत्रु आहे... कदाचीत दोघांच्या शरीरात असलेल्या रक्तामुळे, आणि हॅरीचा वॉन्ड त्याला अटॅच असल्याने असं काहितरी घडत असावं...

हॅरीचा वॉन्ड तुटतो तेव्हा मला ड्म्बी मेल्यावरही वाइट वाटलं नसेल तितकं वाईट वाटलं होतं Sad

काहीही असलं तरी बाई महान आहेत!>>>>>> काहीही झालं तरी पौर्णिमेच्या शेवटच्या वाक्या नेहमीच अनुमोदन Wink

वोल्डीची वाँड बदलते. हॅरीची नव्हे. Happy सेव्हन पॉटर्स सीनमधे हॅरीची वाँड वोल्डीला डिटेक्ट करते. "मेल्या, तूच माझ्या धन्याला गेली सात वर्षं सतावतो आहेस थांब दाखवते तुला इंगा" असं म्हणत स्वतःच जादू करते. Happy

जुडवा छडी फक्त गॉब्लेट मध्ये वापरली आहे.... त्यानंतरच वॉल्डीला समजते आणि सातव्या भागाच्या सुरुवातीला तो मिटिंगमध्ये सांगून छडी बदल्तो. त्या मिटिंगमध्ये वॉल्डे सांगतो.. आमच्या छड्या जुडवा आहेत.. आम्ही एक्मेकाना मारु शकत नाही...

हा संवाद षिणेमात आहे.. पुस्तकात नाही... पुस्तकात फक्त आय शाल नीड फॉर इन्सट्नस टु बॉरो अ वान्ड फ्रॉम वन ऑफ यु बिफोर आय गो टु किल पॉटर.. एवढाच उल्लेख आहे.. षिणेमात मात्र जुडवा चे पूर्ण स्पष्टीकरण आहे.

सेव्हन पॉटर्स सीनमधे हॅरीची वाँड वोल्डीला डिटेक्ट करते. "मेल्या, तूच माझ्या धन्याला गेली सात वर्षं सतावतो आहेस थांब दाखवते तुला इंगा" असं म्हणत स्वतःच जादू करते>>>>>> हेच कसं घडतं ते कळत नाहिये.. इथेच काहितरी लिलीच्या प्रोतेक्शनचा पण संबंध आहे का? वॉन्ड वॉन्डला ओळक्खेल, वोल्डीला कसं?? मला वाटतं हॉर्क्रक्स सारखं काहितरी छडीच्या बाबतीत पण होतं असा काहितरी उल्लेख आहे

हा संवाद षिणेमात आहे.. पुस्तकात नाही... पुस्तकात फक्त आय शाल नीड फॉर इन्सट्नस टु बॉरो अ वान्ड फ्रॉम वन ऑफ यु बिफोर आय गो टु किल पॉटर.. एवढाच उल्लेख आहे.. षिणेमात मात्र जुडवा चे पूर्ण स्पष्टीकरण आहे.>>>>>>> सिनेमात बर्‍याच गोष्टी बदलाव्या लागतात...

पुस्तकात देखील हे कुठेतरी लिहिलेलं आहेच...

आणि कशी ओळखते- कारण रक्ताचा अंश! बऽऽऽर!>>>>>>>>>>>> ह्म्म्म्म्म

चिमुरी. वाँडला स्वतःचे मन आहे. तिलादेखील भाव भावना आहेत. त्यामुळे "ये सिर्फ तुम्हारा नही, मेरी भी दुश्मन है" असं ती म्हणते. वोल्डीच्या अंगात हॅरीचे रक्त असल्याने ती वोल्डीला टार्गेट करू शकते. (एम आयमधे नाही का ते स्टिकर लावून व्हिलन टार्गेट करतात. तसं थोडंसं)

आज मी लई फिल्मीमूडमधे हाये.

नंदिनी Lol

ओक्के, ते पटलं पण वॉन्ड संदर्भात पण हॉर्क्रक्स सारखा उल्लेख वाचल्याच आठवत आहे.. अजुन कोणाला आठवतय का?

>>आणि कशी ओळखते- कारण रक्ताचा अंश!

नाही.. इथे रक्ताचा संबंध नाही..
I believe that your wand imbibed some of the power and qualities of Voldemort's wand that
night, which is to say that it contained a little of Voldemort himself. So your wand
recognized him when he pursued you [Part 7 Dumbledore's explanation]

चौथ्या भागात व्होल्डी आणि हॅरीचे ड्युअल होते तेव्हा हे होते
He concentrated every last particle of his mind upon forcing the bead back toward
Voldemort
, his ears full of phoenix song, his eyes furious, fixed
. . . and slowly, very slowly, the beads quivered to a halt, and
then, just as slowly, they began to move the other way . . . and
it was Voldemort's wand that was vibrating extra-hard now . . [Part 4]

I believe that your wand imbibed some of the power and qualities of Voldemort's wand that
night, which is to say that it contained a little of Voldemort himself. So your wand
recognized him when he pursued you>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> येस्स्स्स्स्स हेच हवे होते मला....

'हॅरीचा वॉन्ड' हे एकदम विचित्र वाटतंय ऐकायला. Proud हॅरीची छडी/वॉन्ड म्हणायची सवय झाल्यामुळे.

Voldemort: "...I must be the one to kill Harry Potter. But, I face an unfortunate complication--that my wand and Potter's share the same core. They are, in some ways, twins. We can wound, but not fatally harm one another. If I am to kill him, I must do it with another's wand. Come...surely one of you would like the honour? What about you, Lucius?"
Lucius: "My Lord?"
Voldemort: " [...] I require your wand."

इथेही हा संवाद आहे... http://harrypotter.wikia.com/wiki/Tom_Riddle's_wand ... हाच संवाद षिणेमात आहे. http://harrypotter.wikia.com/wiki/Tom_Riddle's_wand

वॉल्डे च्या छडीला हॅरीची छडी एकाच वेळी जुडवा आणि जानी दुश्मन अशा दोन्ही नजरेने बघत अस्ते. Happy

>> "मेल्या, तूच माझ्या धन्याला गेली सात वर्षं सतावतो आहेस थांब दाखवते तुला इंगा"
Biggrin

मला तर वाटले की उलट झाले - म्हणजे हॅरीच्या शरीरात वोल्डीच्या आत्म्याचा अंश आणि त्याच्या छडीतही वोल्डीच्या जादूचा अंश असल्याने - स्वतःच्याच पायावर काय कुर्‍हाड मारतोयस मूर्खा असे म्हणून हॅरीच्या छडीने वोल्डीचा शाप परतवून इशारा दिला.

बापरे........................... इतकी चर्चा लोकपालावर सुध्दा झाली नसणार Lol

स्नेपच्या लॉयल्टीबद्दल शेवटपर्यंत वॉल्डमॉर्टला समजत नाही.

पण... पहिल्याच भागामधे, जेव्हा क्विरल हॅरीला ब्रूमस्टिकवरून पाडण्यासाठी एन्काण्टेशन करतो, तेव्हा स्नेप काऊंटर कर्स/एन्काण्टेशन म्हणत असतो ( ब्लिंक न करता Happy ) ते! किंवा हॅरी रिस्ट्रीक्टेड सेक्शन मधे निकोलस फ्लामेल ला शोधायला जातो तेव्हा स्नेप आणि क्विरलचा सुखसंवाद होतो "क्विरल, यु मस्ट डिसाईड अबाऊट युअर लॉयल्टीज... यू डोण्ट वॉण्ट मी अ‍ॅज युअर एनिमी..." तेव्हा वॉल्डीला समजायला हवं होतं ना?? Sad

आक्कीओ फिलॉसॉफर्स स्टोन म्हणून स्टोन आला नसता का क्विरल कडे? Sad

बाई, माफ करा. तरीही तुम्ही महानच आहात... Happy

आक्कीओ फिलॉसॉफर्स स्टोन म्हणून स्टोन आला नसता का क्विरल कडे?>>>>>>>> नसता आला... त्या मिररच लॉजिक वेगळंच होतं.. ज्याला तो स्टोन फक्त हवा होता, वापरायचा नव्ह्ता त्याच्याकडेच तो येइल असं..

तेव्हा वॉल्डीला समजायला हवं होतं ना??>>>>>>> स्नेप जेव्हा वोल्डीकडे परत जातो त्यावेळेस स्नेप त्याला सांगतो कि क्विरल त्याला सांगत नाही की त्याला वोल्डीने पझेस केलेलं आहे म्हणुन.. तो स्नेपवर विश्वास टाकत नाही.. त्यामुळे स्नेप त्याला मदत करत नाही... आणि इतर बर्‍याच कारणांमुळे वोल्डी स्नेपवर विश्वास ठेवतो

ऋयाम, बाईनीच उत्तर दिलय तुझ्या शंकांचं. Happy

स्नेपला क्विरेल = वोल्डी हेच माहित नसतं (असं तो नंतर वोल्डीला पटवून देतो). स्टोन पळवणारा एक लालची जादूगार म्हणून तो क्विरेलला समजत नसतो. बेलाट्रिक्स जेव्हा स्नेपला याबद्दल विचारते तेव्हा त्याने दिलेले उत्तर बघ.

आणि काही काही वस्तूवर काही मंत्राचा प्रभाव होऊ नये म्हणून जादू करता येतेच की. त्या गुहेमधे हॅरी लॉकेट आणण्यासाठी असाच प्रयत्न करतो तेव्हा ते सक्सेस होत नाही. Happy

लॉयल्टी बदलू शकतात... स्नेप डंबीला मारतो, बेलाट्रिक्सला डृएकोला मदत करेन अशी न मोडणारी शपथ देतो.. त्यामुळे वॉल्डीला तो आपल्याला लॉयल वाटतो.

पण सर्वात महत्वाचे कारण आहे.. स्नेप चेतना कवच विद्या ( ऑक्ल्युमसी का काय इंग्रजीत) जाणून असतो.. त्यामुळे आपल्या मनात शिरुन आपले अंतरंग कुणाला कळणार नाही, हे तो करतो ( दुसर्‍याच्या मेंदूत घुसणं हे वॉल्डीला अगदी सहज जमत असते.. पण स्नेप त्याला पुरुन उरतो. त्याच्या अगदी नजरेत राहूनही तो अखेरपर्यंत डंबीसाठी काम करत आ हे हे त्याला कळतच नाही.. बाई महान.. स्नेपही तितकाच महान Proud हॅरी पॉटर्च्या सगळ्या पुस्तकाना फक्त हॅरीचे नाव आहे, प्रिझनर ऑफ अझकबान आहे, पण त्यात ब्लॅकचे नाव नाही.. पण स्नेप हा एक्मेव पात्र ज्याच्या नावाने एक अख्खे पुस्तक आहे.. हॅरी आणि हाफ ब्लड प्रिन्स.. हॅरी पॉटर पूर्ण सिरीजमध्ये स्नेपचे नाव शीर्षकात असलेली प्रकरणेही सर्वात जास्त आहेत आणि ती सगळी प्रकरणं टर्निंग प्वाइंट आहेत. . प्रिन्सेस टेल.. Happy हा सन्मान बाईन्नी दुसर्‍या कुठल्याच पात्राला दिलेला नाही.. )

चिमुरी यायच्या आत म्हणून घेते, तुझ्या शेवटच्या वाक्याला अनुमोदन]>>>>>>>> चला म्हणजे मी फक्त पौर्णिमेच्या शेवटच्या वाक्याला अनुमोदन दिलं तरी चालेल Wink रच्याकने मी त्या वाक्याला अनुमोदन द्यायलाच परत आले होते Wink

Pages