हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Then, behind them, they heard a wild howling.

तेच तर आहे.... बिहाइंड देम... म्हणजे ते तीघे बकबीक कदे पहात नसतात.. आणि त्याना फट्ट असा आवाज येतो.. आणि ते तिथून निघून जातात.. त्याना आणि आपल्यालाही वाटतं की बकबीक मेला..

जेंव्हा टाइम टर्नरचा शोट कंटीन्यु होतो, तेंव्हा कळतं की तो भोपळ्याचा आवाज होता.. कोयत्याखालचा बकबीक गायब झालेला असतो. तिथे भोपळा असतो.

जर हॅरी एट अ‍ॅल भूतकाळात जाऊन बकबीकला वाचवण्यात यशस्वी झाले नसते तर बकबीक मेला असता. मग तो भोपळा नसून बकबीक असता. पण ते यशस्वी झाले म्हणून तो भोपळा झाला.

भूतकाळात जाऊन काही बदलले तर त्याचे परिणाम अर्थातच भविष्यकाळात दिसायला हवेत. आणि तेच इथे झाले आहे. पण आपण पहिल्यांदा बघतो तेव्हा आपल्याला नक्की काय मेले स्पष्ट दिसत नाही. हे रोलिंगबाईंचे चातुर्य आहे. त्यांनी हे संदिग्ध ठेवले आहे. Happy

***************** इशारा : रहस्यभेद *****************

भूतकाळात जाऊन काही बदलले तर त्याचे परिणाम अर्थातच भविष्यकाळात दिसायला हवेत. आणि तेच इथे झाले आहे. <<< पहिले वाक्य पटले. दुसरे नाही (कारण माझा गोंधळ आहे). कारण 'बकबीनच्या मानेवर कुर्‍हाडीचा घाव बसणे' ही घटना टर्नर सुरू होण्यापूर्वी घडून गेलेली आहे. It is not paused at all. म्हणजे तो ठळकपणे घडून गेलेला भूतकाळ आहे.

माझा प्रश्न असा आहे - टर्नर माणसांच्या स्मृती पुसतो का? पुसत असेल तर हॅरी आणि हर्मायनीच्या स्मृती का पुसल्या जात नाहीत. माझा असा अनुभव आहे की रॉलींगबाई त्यांच्या वाचकांना मधल्यामध्ये कधीच लटकावून ठेवत नाहीत. सगळ्या बारीकातल्या बारीक तिढ्यांचे स्पष्टीकरण त्या शेवटी पद्धतशीरपणे आणि तर्काधिष्ठीत पद्धतीने देतात. मी पुन्हा वाचून ते स्पष्टीकरण/खुलासा शोधायचा प्रयत्न केला, पण माझा गोंधळ दूर होत नाही. कारण कदाचित मला टर्नर कसा काम करतो हे अजून स्पष्ट झालेले नाही.

Though I am not statisfied yet>>>>>> समाधानी होण्याकरता पुस्तकं वाचावी लागतील... Happy

उदय, सहीच... Happy

'बकबीनच्या मानेवर कुर्‍हाडीचा घाव बसणे' ही घटना टर्नर सुरू होण्यापूर्वी घडून गेलेली आहे.>> अहो लोक तेच सांगत आहेत, की ही घटना घडलीच नाही. तसा आभास निर्माण केला आहे. कुर्‍हाड चालली एकदाच आणि तीही भोपळ्यावर. बकबीकला मारायचे असे ठरले आणि त्याला प्रत्यक्ष मारण्यासाठी कुर्‍हाड चालवली गेली- ह्या मधल्या काळात टाईम टर्नर वापरून हॅरी आणि हर्मॉयनी ह्यांनी बकबीकला सोडवले. पुस्तकात आणि सिनेमात व्यवस्थित आभास निर्माण केला आहे, आणि त्याचे उत्तरही दिले आहे. सर्व कन्फ्यूजन लांब ठेवून स्वच्छ कोर्‍या मनाने सगळे वाचा पाहू.

कारण 'बकबीनच्या मानेवर कुर्‍हाडीचा घाव बसणे' ही घटना टर्नर सुरू होण्यापूर्वी घडून गेलेली आहे>>> ही घटना घडलेलीच नाही. तसा उल्लेख कुठेही नाही.

अहो लोक तेच सांगत आहेत, की ही घटना घडलीच नाही. तसा आभास निर्माण केला आहे. कुर्‍हाड चालली एकदाच आणि तीही भोपळ्यावर.

एक्झॅक्टली..

>>कारण 'बकबीनच्या मानेवर कुर्‍हाडीचा घाव बसणे' ही घटना टर्नर सुरू होण्यापूर्वी घडून गेलेली आहे>>> ही घटना घडलेलीच नाही. तसा उल्लेख कुठेही नाही.>>>
तसा स्पष्ट उल्लेख केलेला नाही, हाच चातुर्याचा भाग आहे.

उलटा विचार करून पहावा. - जर हॅरी आणि हर्मॉयनी अयशस्वी ठरले असते तर काय झाले असते?
उत्तर - बकबीक मेला असता.

टर्नर माणसांच्या स्मृती पुसतो का?

टर्नर माणसाच्या स्मूती पुसत नसतो... हर्मायनी तर टर्नरचा वापर करुन दोन क्लास एकदम अटेंड करत असते.. जेंव्हा भविष्यातील हॅरी भूतकाळात जातो, तेंव्हा तिथल्या मूळच्या हॅरीच्या समोर तो कधीच येत नसतो.... तो त्याच्या अपरोक्ष वावरत असतो... त्यामुळे भूतकाळातल्या हॅरीला या नव्या हॅरीबाबत काही स्मूती असणे शक्य नाही... पण जो भविष्यातून मागे आलेला आहे, त्याला मात्र मागचा सगळा ट्रॅक माहीत असतो.

सिरियस ब्लॅकच्या जवळ बसलेल्या हॅरीला नदीच्या पलीकडे हॅरी आहे, हे माहीत नसते... पण त्या हॅरीला मात्र या हॅरीबाबत काय घडत आहे, हे ठाऊक असते.

कारण 'बकबीनच्या मानेवर कुर्‍हाडीचा घाव बसणे' ही घटना टर्नर सुरू होण्यापूर्वी घडून गेलेली आहे. It is not paused at all. म्हणजे तो ठळकपणे घडून गेलेला भूतकाळ आहे. >>>>>>>>>> कुर्‍हाडीचा घाव बसला ही घडुन गेलेली घटना आहे.. त्यावेळेस हॅरी-हर्मीला माहित नसतं की नक्की कोणावर घाव बसला आहे.. ते असं समजतात की बकबीकच मारला गेलाय.. कारण ते त्यांना अपेक्षीत असतं... ते जेव्हा भुतकाळात जावुन बकबीकला पळवतात तेव्हा त्यांना समजतं की तो घाव भोपळ्यावर होता म्हणुन..

टर्नर माणसांच्या स्मृती पुसतो का?>>>>>>>>>>> नाही पुसत...

टर्नर कसा काम करतो>>>>>>>> टर्नर जेव्हा फिरवला जातो तेव्हा तो माणुस भुतकाळात जातो... आणि जितक्या वेळा फिरवाल तितक्या तास मागे जाता येतं... टर्नर वापरताना एक काळजी घ्यायची असते ती म्हणजे जो माणुस भुतकाळात जातो त्याला इतरांनी बघता कामा नये.. जो माणुन भुतकाळात गेला आहे त्याच्या शिवाय बाकीच्यांचा वेळ आहे तसाच चालु राहतो.. आणि जेव्हा भुतकाळात गेलेला माणुस तितके तास संपवुन परत वर्तमानात येतो तेव्हा बाकीच्यांचा वेळ गेलेलाच नसतो.. म्हणजे वर्तमान पॉज झालेला असतो असं नव्हे, तर फक्त भुतकाळात गेलेल्या माणसाला जास्त वेळ मिळालेला असतो

गोगो, LOTR मी वाचायला चालु केलं होतं पण ते हॅरीच्या प्रेमात पडल्यानंतर त्यामुळे ६-७ पानातंच ते पुस्तक वाचणं संपवलय... तुला आवडत असेल तर नवीन धागा चालु कर.. म्हणजे कदाचीत तो धागा वाचुन मी ते पुस्तक वाचायला चालु करेन Wink

नार्नियाची पुस्तकं ज्यांची वाचुन झाली असतील त्यांनीदेखील एक धागा चालु करा... Happy

लोकहो, एवढ्या पोस्टींबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

सर्व कन्फ्यूजन लांब ठेवून स्वच्छ कोर्‍या मनाने सगळे वाचा पाहू.<<< पौर्णिमा हो, नक्की वाचतो पुन्हा. तुम्ही म्हणताय तो आभास मला समजलाय पण घटनाक्रमांचा गोंधळ आहे. पुन्हा वाचतो.

चिमुरी, जामोप्या, टर्नरच्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

>बाय द वे, इकडे कोणि LOTR चे चाहते नाहित का?>
LOTR पुस्तकं मस्त आहेत, चित्रपट बघताना कधीकधी फार ताणलय असं वाटल. Happy

एक महत्वाचा मुद्दा. घटना पहिल्यांदा घडते तेव्हाच भविष्यातील हॅरी/हर्मायनी तिथे आलेले असतात. म्हणूनच खिडकीतून दगड येऊन भांडे फुटते.

टाइमटर्नर - बकबीकबद्दलची शंका मलाही रास्त वाटते.
हर्मायनीने टाइमटर्नर वापरला केव्हा? वेळ मागे फिरवली केव्हा? तर बकबीकला मारायला आलेले लोक बकबीक असलेल्या जागेशी येऊन गेल्यावर. तिथे नक्की काय घडले हे दृष्टीआडच ठेवले आहे. लॉजिकली बकबीक मारला जायला हवा होता.
बकबीकच्या भोवती असलेल्यांना तसे दिसायला हवे होते.
आता टाइमटर्नर वापरून हर्मायनी-हॅरी यांनी भूतकाळात जाऊन मारेकरी बकबीकपाशी पोचण्याआधीच त्याची सुटका केली.
आधी नक्की काय घडलं हे हर्मायनी व हॅरीने प्रत्यक्ष पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी घटना बदलली नाही. पण हॅग्रिड, मारेकरी, डंबलडोर यांच्यासाठी बदललेली असायला हवी....तशाच त्यांच्या स्मृतीही.

बकबीकचे मारेकरी त्याच्याजवळ पोचण्याआधीच टाइमटर्नर वापरला असता, तर हा प्रश्न पडला नसता.

<< टर्नर वापरताना एक काळजी घ्यायची असते ती म्हणजे जो माणुस भुतकाळात जातो त्याला इतरांनी बघता कामा नये>>
इतरांनी नव्हे तर जो भूतकाळात गेलाय त्याच्या वर्तमानकाळातल्या अस्तित्वाने पहायला नको. हर्मायनीने म्हटलेय असे, की जर एका हॅरीला दुसरा हॅरी दिसला तर गोंधळ होईल, म्हणून आपण लपायला हवं.
सीरियस ब्लॅक भूतकाळात गेलेल्या दोघांना बघतोच की.
हर्मायनी टाइमटर्नरचा उपयोग एका वेळी दोन वर्गांत बसण्यासाठी करायचे, म्हणजे दोन्ही वर्गांतले शिक्षक आणि विद्यार्थी तिला बघायचे.

दोन्ही हॅरीना फक्त एकच व्यक्ती पहाते.. ( हर्मायनी सोडून.. ) .. कोण?

( प्रोफेसर ल्युपिन.... तो दोन्ही हॅरींवर हल्ला करतो.. पण मघाशी तिथे होता, तर आपल्याच वेगाने हा हॅरी इथेही कसा आला हा प्रश्न त्या प्राण्याला बहुदा पडत नाही... Proud )

घटना पहिल्यांदा घडते तेव्हाच भविष्यातील हॅरी/हर्मायनी तिथे आलेले असतात. म्हणूनच खिडकीतून दगड येऊन भांडे फुटते.

त्यामुळेच तर डंबल्डोरची आणि हायग्रीडची स्मूती बदलण्याची गरज नाही.. कारण बकबीक पळाला हीच घटना घडलेली असते.. तो मेलेलाच नसतो.

सीरियस ब्लॅकही दोन्ही हॅरीना बघतोच, पण ते अगदी वेगळ्यावेगळ्या वेळी .. पण ल्युपिन मात्र अगदी कमी वेळात दोन्ही हॅरीना पहातो.

Pages