हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेलाट्रिक्सला व्होल्डेमॉर्टचे ऑब्सेशन होते असे वाटले मला. एकतर्फी. त्याच्याकडून काहीच नव्हते. >>> अनुमोदन. सातव्या भागामधे जेव्हा सुरूवातीला वोल्डी माल्फॉयच्या घरात असतो तिथे हे काही वर्णन आलय ते वाचून बेला लाईन मारते असं वाटतं. Bellaatrix leaned towards Voldemort, for mere words could not demonstrate her longin for closeness
या अशा वाक्यातून ते जाणवतं. ते एकदम सटली घेतलय म्हणून कदाचित जाणवले नसेल.

रैना, डम्बी आणि ग्रिंडेलवाल्डच्या नात्याबद्दल जेकेआरने स्वत:च सांगितले होते. मात्र, याचा उल्लेख पुस्तकात कुठे झालाय ते अजून लक्षात आले नाही.

Bellaatrix leaned towards Voldemort, for mere words could not demonstrate her longin for closeness
या अशा वाक्यातून ते जाणवतं. ते एकदम सटली घेतलय म्हणून कदाचित जाणवले नसेल.>>>>>>>> अनुमोदन...

डडलीला पिशाच्च दिसत नाहीत. नाहीतर तो बोलला असता मला अमुक अमुक दिसले म्हणून.. हवामानातला बदल मात्र त्याला जाणवतो आणि त्याला वाटते हॅरीने जादु केली.

डडलीला पिशाच्च दिसत नाहीत. नाहीतर तो बोलला असता मला अमुक अमुक दिसले म्हणून.. हवामानातला बदल मात्र त्याला जाणवतो आणि त्याला वाटते हॅरीने जादु केली.>>>>>>>>> जामोप्या, गुड जॉब.. Happy

डिमेंटर हे निसर्गतः वाईट असतात - म्हणजे माणसांच्या भावनांवर, मानसिक शक्तीवर ते पोसतात, आणि त्यासाठी ते काहीही करतात. फक्त मिनिस्ट्रीच्या control मधे असल्यामुळे, ते अ‍ॅझकबान च्या कैद्यांवर समाधान मानतात आणि इतरत्र जात नाहीत. ४थ्या भागात डंबलडोर फज ला सांगतात की वॉल्डेमॉर्ट डिमेंटरांना लालूच दाखवून (म्हणजे अर्थात जास्त मोकळं रान देण्याची) स्वतःच्या बाजूने करुन घेईल, आणि तसंच होतं.

माझी एक शंका (वर कोणी बोललय का ते माहित नाही) सातव्या भागात, वॉल्डेमॉर्टचे नाव जिंक्स्ड आहे , ते उच्चारल, तर तुमचा ठावठिकाणा डेथ इटर्स ला कळतो, मग हॅरी, रॉन, हरमायनी जेव्हा सिरीयस ब्लॅक च्या घरात असताना लुपिन त्यांना भेटायला येतो तेव्हा ते अनेक वेळा वॉल्डेमॉर्ट चे नाव उच्चारतात, मग डेथ इटर्स ना कस कळत नाही त्यांच्याबद्दल? की ते घर सिक्रेट जागा असल्याने कळत नाही?

बरोबर धनश्री.
पण ते नाव घेतल्यानंतरच डेथईटर्स बाहेर गस्त घालू लागतात. फक्त त्यांच्यापैकी कोणी सिक्रेटकीपर नसल्याने त्यांना घर दिसत नसावे असा अंदाज.

माझी एक शंका. ती ग्रिफिंडोरची तलवार तर तो गॉब्लिन पळवून नेतो ना? मग शेवटी नेविल कसाकाय काढतो ती त्या हॅट मधून?

सगळ्यांना ______/\_______

प्रत्येकी एक तरी पीचडी करून टाका बरं सगळे. किती तो व्यासंग! आता यामुळे मला पुन्हा एकदा ती पुस्तकं वाचायची इच्छा होत आहे. शुभस्य शीघ्रम!

जो खरा ग्रिफिंडोर आहे त्याला ती तलवार कुठेही मिळेल असं 'सिक्रेट ऑफ चेंबर्स' मधे डंबलडोर हॅरीला सांगतो. नेविलपण खरा ग्रिफिंडोर असेल त्यामुळॅ त्यालाही ती तलवार गरज असते तेव्हा मिळते.
बाकी डंबलडोर आणि ग्रिंडेलवाल्ड बद्दल मलाही आत्ताच कळलं. पुस्तकात असं कुठेही जाणवत नाही.

त्यावेळेला ती तलवार चोरीला गेली नसते अमृता, वरदा.
आणि मग रॉन,हर्मायनी येवढे जाऊन बेसिलिस्कफॅंगस शोधून काढतात हॉरक्रु मारायला वगैरे, त्यामुळे मला त्या गोष्टीची थोडी गडबड वाटत होती.

शेवटी अ‍ॅबरफोर्थचेही काय होते तेही कळत नाही.

हॉगवर्ट च्या शाळेत जाण्याआधी हॅरीला लेटर येते.. त्यात असते एक मांजर किंवा घुबड किंवा बेडूक आणा... a cat, an owl, or a toad,

मग रॉन उंदीर का नेतो? Proud

रॉनला नवीन पेट विकत घेणे त्याच्या आईवडिलांना परवडत नसतं. त्यामुळे त्याच्या थोरल्या भावाचे, पर्सीचं पेट त्याला मिळतं.

पण ते नाव घेतल्यानंतरच डेथईटर्स बाहेर गस्त घालू लागतात. फक्त त्यांच्यापैकी कोणी सिक्रेटकीपर नसल्याने त्यांना घर दिसत नसावे असा अंदाज.<<< ह्म्म मला पण असच वाटत होत.

शेवटी अ‍ॅबरफोर्थचेही काय होते तेही कळत नाही.<<<< तो पण शेवटच्या बॅटल मध्ये येतो ना लढायला, तो मरत नसावा नाहीतर तसा उल्लेख आला असता.

Happy

जामोप्या,
रॉलिंग ला नो-बेल.
तुम्हाला रॉल अन रॉलिंग दोघं भेटोत ही सदिच्छा

मयेकर, स्कॅबर्स बद्दल बरोबर आहे त्याच बरोबर अजून एक गोष्ट म्हणजे परवडत नसल्यामुळे विसलींचे "फॅमिली" आऊल असते. थोडक्यात सगळ्या भावंडाना एकच. नंतर सिरियस त्याला आऊल देतो. नाव आठवत नाही पण "पिगी" की काहीतरी ठेवतात ना नवीन आऊलच नाव, पिगहेडेड ह्या अर्थानी? Happy

lupin.JPG

७ पॉटर प्रसंग पौर्णिमेला घडतो.. त्या दिवशी ल्युपिन माणुसच कसा रहातो? त्याचा प्राणी का होत नाही? Happy

त्याच्याकडे औषध असते, ते पिल्यावर तो प्राणी जरी झाला तरी मेंदू माणसाचा राहून तो शांत रहात असतो.. पण प्राणी होणे हे तर अटळच असते. Happy

मेडिकल शंका... किलिंग कर्स्ने कुणाला मारले तर शिक्षा होत नसते का? असे कुणी मेले तर त्याचे डेथ सर्टिफिकेट कसे मिळणार? आणि डी सी नाही म्हटल्यावर वारसाना प्रॉपर्टी कशी मिळणार? Proud

बेलेट्रिक्सचे एकतर्फी ऑबसेशन ह्या पेक्षा वॉल्डमॉर्टची कट्टर लॉयलिस्ट असं वर्णन करावेसे वाटते. बार्टी क्राऊच जुनियर पण त्यातलाच. जसा बार्टी किंवा इतर काही डेथ ईटर्स तशीच ती असं मला तरी वाचताना वाटलं.

हॅरी आणि व्होल्डेमॉर्टच्या वाँड्जचे ट्विन कनेक्शन नक्की कसे असते?
सातव्या भागात हॅरीचा वॉन्ड व्होल्डेमॉर्टच्या हातात असलेल्या मालफॉयच्या वॉन्डला अतिशय चमत्कारिक टक्कर देतो. खुद्द हॅरीलाही कळत नाही, की अशी जादू कशी निर्माण झाली. व्होल्डेमॉर्ट त्या जादूला घाबरून पळून जातो. पुस्तकात अगदी शेवटी डम्बलडोअर सांगतो की व्होल्डेमॉर्टने शारीर रूप धारण करताना हॅरीचे रक्त वापरलेले असते, म्हणून लिलीच्या त्यागाचा काही अंश त्याच्याही रक्तात मिसळतो. ट्विन कोअर असलेला वॉन्ड आपला मालक आणि प्रतिस्पर्धी ओळखतो आणि म्हणूनच त्या वॉन्डमधून अशी जादू निर्माण होते.
पण वॉन्ड कसा ओळखेल प्रतिस्पर्धी? आणि लिलीच्या रक्ताचा इथे काय संबंध? Uhoh जरा ट्विन कोअर वॉन्डचा फन्डा समजावणार का कोणी?

पूनम, डम्बलडोअर स्वत:च म्हणतो की हॅरी आणि वोल्डमोर्टने जादूच्या सध्या ज्ञात असलेल्या कित्येक पातळ्या पुढची पायरी गाठली होती. त्यामुळे याचे नक्की स्पष्टीकरण देता येत नाही पण तो तिथे गेस करण्याचा प्रयत्न करतो.

वाँडलोअर हे फार वेगळे शास्त्र असल्याने आपल्या जादूचे नियम तिथे लावता येत नाहीत असे पण तो सांगतो. हे ज्याना समजत नाही अशापैकी एक वोल्डमोर्ट. वाँड हे जादू करण्याचे एक अस्त्र नाही, तर त्याच्या मालकाचा जवळजवळ उजवा हात आहे. जेव्हा दुसर्‍याची वॉन्ड घेऊन जादू करतात तेव्हा ती नीट जमत नाही. पहिल्याच भागात आहे की वाँड आपला मालक स्वत: ठरवते. तसंच त्या मालकाच्या जीवावर उठलेला पण तिला समजत असेल. (असे मला वाटते) वाँडचा मालक आणि वाँड यांचे एक प्रकारे तादात्म्य असते.

जरा ट्विन कोअर वॉन्डचा फन्डा समजावणार का कोणी?>>>>>> हॅरीच्या वॉन्डमधे ज्या फिनिक्सचा पंख असतो त्या फिनिक्स ने अजुन एक पंख दिलेला असतो आणि तो वॉल्डीच्या वॉन्ड मधे असतो.. त्यामुळे दोघांचे वॉन्ड हे ट्विन होतात... वॉन्ड नक्की कश्या प्रकारे काम करतात हे अजुनही गुढंच आहे...

बेलेट्रिक्सचे एकतर्फी ऑबसेशन ह्या पेक्षा वॉल्डमॉर्टची कट्टर लॉयलिस्ट असं वर्णन करावेसे वाटते. >>>>>>>> ह्म्म्म्म्म्म.. हे पण बरोबर वाटतय Happy

त्याच्याकडे औषध असते, ते पिल्यावर तो प्राणी जरी झाला तरी मेंदू माणसाचा राहून तो शांत रहात असतो.. पण प्राणी होणे हे तर अटळच असते>>>>>>>> मला नाही वाटत ७व्या भागात वॉल्डीकडे असलेला स्नेप ल्युपिनला ते पोशन बनवुन देत असेल म्हणुन... Happy ती चित्रीकरणातील चुक वाटते...

त्या घुबडाच नाव पिगविडन असं रॉनने ठेवलेलं असतं पण जिनी त्याला पिग म्हणायला लागते आणि त्या घुबडालाही त्याची सवय होते म्हणुन तो पिगविडन या नावाला प्रतिसाद देत नाही, म्हणुन तो पिग Happy

पण ते नाव घेतल्यानंतरच डेथईटर्स बाहेर गस्त घालू लागतात. फक्त त्यांच्यापैकी कोणी सिक्रेटकीपर नसल्याने त्यांना घर दिसत नसावे असा अंदाज.<<< ह्म्म मला पण असच वाटत होत.>>>>>>>>>> हे बरोबर आहे

Pages