"रानवाटा" प्रदर्शनाला भेट देणार्‍या माबोकरांचे गटग

Submitted by आनंदयात्री on 6 January, 2012 - 04:32
ठिकाण/पत्ता: 
ठाणे कलाभवन केंद्र बिग बझार शेजारी, कापूरबावडी, ठाणे (पश्चिम).

जिप्सी उर्फ योगेश जगताप (;)) याच्यासह अनेक गुणवान छायाचित्रकारांच्या छायाचित्र-प्रदर्शनाबद्दल आपण
http://www.maayboli.com/node/31707 इथे वाचले आहेच.

त्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवरून बरेच माबोकर हजेरी लावणार असल्याचे दिसले.
प्रदर्शनाची वेळ खालीलप्रमाणे असली तरी आपण सर्वांनी प्रतिसादांत लिहिल्यानुसार - रविवार, ८ जाने, संध्याकाळी ६ वाजता भेटूया.

दिनांकः
शनिवार ७ जानेवारी आणि रविवार ८ जानेवारी, २०१२.
वेळः
सकाळी ११ ते रात्रौ ८ पर्यंत

१. अजून कुणाला यात काही भर घालायची असल्यास नक्की लिहा.
२. नोंदणी केल्यास आकडा बघून (जिप्सीला) आनंद होईल हे आपल्याला माहित आहेच. Proud

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, January 8, 2012 - 07:30 to 09:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रोहन!
मला आजच मोकळा वेळ आहे...त्यामुळे आजच चक्कर टाकतो...तुही भेटला असतास तर आनंदच झाला असता...हरकत नाही..पुन्हा कधीतरी भेटूच.

.

अरे टांग नाय रे बाबा... Happy

निल्या, मला आठवतंय, मी ८ जाने १८.०० ते २०.०० असं टाकलं होतं.. ते आपोआप झालं. असो. मी पुन्हा दुरूस्त केलं आहे.

भरघोस प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद Happy

जमलं तर तासभर जरा लवकर येण्याचा प्रयत्न करा सध्या उड्डाणपूलाचे काम चालु असल्याने ट्राफिक होते. Sad

काल बर्‍याच मायबोलीकरांना एकगठ्ठा भेटता आलं. मजा आली. प्रदर्शनही छान होतं.

सगळ्यात मोठं सरप्राईज दिनेशदांनी दिलं. कालच भारतात येऊन लगेच आठ वाजता प्रदर्शनाला ते हजर राहणार म्हणाले होते. पण मी पावणेसहाला दालनात प्रवेश केला तर समोर दिनेशदा!! हे कसं काय जमवलन बुवा त्यांनी, देव जाणे!!! Happy

जिप्सीला नंतर आमच्यामुळे आयोजकांकडून काही ऐकायला लागलं नसलं म्हणजे मिळवली. लैच गोंगाट करत होतं पब्लीक! (त्यामुळे त्याने 'वरच्या मजल्यावर बसायला जागा आहे, तिथे जाऊन गप्पा मारा' असं सांगून आम्हाला यशस्वीरित्या दालनाबाहेर काढलं आणि मग वर कॉन्फरन्स चालली आहे असं सांगून खालीच पाठवलं.) आम्ही चिवटपणे दालनाबाहेरही अर्धातास चकाट्या पिटत होतोच. तिथेच अश्विनीने बरीचशी चॉकलेटं खाल्ली आणि वर त्याचं स्पष्टिकरणही देत होती. Proud

प्रदर्शन मस्त होतं. सगळेच फोटो एक से एक होते. आपल्या जिप्सीचं पॅनल सर्वात मोठं होतं - १० फोटोंचं. शिवाय प्रदर्शनाची सुरूवातच त्याच्या फोटोंनी झालेली होती.

पूर्णवेळ जिप्सीच्या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणेच नेमस्त भाव होते, तरीही त्याचं तुडुंब खूष असणं काही लपत नव्हतं. Happy

प्रदर्शन मस्त होतं. सगळेच फोटो एक से एक होते.>>> + १
मस्त वाटले सगळ्यांना भेटुन. मला काम असल्याने लवकर जावे लागले Sad पण जेवढा वेळ होते तो मजेत गेला Happy
योगेश तुझ्यामुळे हे मिनी गटग झाले रे. धन्स.

प्रदर्शनाची वेळ रात्री ८ पर्यंतच होती पण माबोकर ९ पर्यंत तिथेच होते... Lol

मामी आणि ललेला पूर्ण अनुमोदक... Lol

वर त्याचं स्पष्टिकरणही देत होती. >> Lol मॅग ! हातातलं एक चॉकलेट खाऊन दुसरं ठेवून देणं मला जमतच नाही. दुसरंही पोटात गेलंच पाहिजे.

पूर्णवेळ जिप्सीच्या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणेच नेमस्त भाव होते, तरीही त्याचं तुडुंब खूष असणं काही लपत नव्हतं. >>> अगदी अगदी Happy

अख्खं प्रदर्शनच छान होतं.

इंद्रा, तो लटकणार्‍या लाल पिवळ्या चकत्यांचा फोटो म्हणजे नेकलेस वाटतोय फॅशन ज्वेलरीच्या दुकानात डिस्प्ले केलेला Happy

प्रदर्शनात शिरल्या शिरल्या पहिलाच फोटो बघून मी, लली आणि केश्विने 'हा जिप्सीचाच फोटो' हे क्षणार्धात ओळखलं. त्यानंतर त्या फोटोवर लावलेलं 'योगेश जगताप' नावाचं लेबल दिसलं.
'आधी मी फक्त फोटो काढायचो, तसे सगळेच काढतात. पण मायबोलीवर आल्यावर मला फोटोंची दृष्टी मिळाली. मी काढलेले फोटो अश्या प्रदर्शनात लागण्यामागे मायबोलीचेच श्रेय आहे हे मी मान्य करायलाच हवे' असे अत्यंत निरागसतेने जिप्सीने बोलून दाखवले. Happy संपूर्ण प्रदर्शनात जिप्सीचेच सर्वात जास्त म्हणजे एकूण दहा फोटो निवडलेले होते.
प्रदर्शनातील सगळेच फोटो खूप छान होते, ते टिपणारे सगळेच हौशी छायाचित्रकार आहेत असे वाटतच नव्हते.
एकूण मजा आली. नेहमीप्रमाणेच हलकल्लोळ, गप्पाटप्पा, आणि दिनेशदांनी आणलेली चॉकलेटं आणि हेझलनट खात गटग पार पडलं.
(म्हणजे मी, केश्वि, ललीचं... बाकी पब्लिक नंतर कुठे गेलं कोणास ठाऊक! मी आणि केश्विने तिच्या घराजवळ बागुलबुवा भेटल्यावर 'काय तुझे मित्र! गटगचं तुला कळवलंही नाही' असं सांगत काडी लावण्याचं काम चोखपणे पार पडलं. Biggrin )

तिथे पोचलेला सर्वात शेवटचा माबोकर बहुधा मी होतो. साडेआठ वाजले होते.
ठाणे स्टेशनहून थेट रिक्षा केली. कलादालन बरंच लांब आहे. तो रिक्षावाला इतका वेळ रिक्षा चालवत होता, की आता आपण पुन्हा ठाणे स्टेशनला पोचत नाही, असं वाटायला लागलं होतं मला. (आणि झालंही तसंच, कारण येताना इंद्रदेवांनी डायरेक्ट घरापर्यंत लिफ्ट दिली! :P)

जिप्सीचे फोटोंसोबत फोटो काढले. जेमतेम अर्धातासच तिथे होतो. सेनापती, प्रणव कवळे, निल्या, भुंगा, पंत, घारूअण्णा, इंद्रा, रोमा, श्री व सौ बागेश्री आणि अजून एक माबोकर (टी शर्टच्या वेळी पार्कात भेटलोय पण नाव आठवत नाही) भेटले.

आपल्या जिप्सीचं पॅनल सर्वात मोठं होतं - १० फोटोंचं.>> हो आणि उठून दिसत होत Happy
मी गटग मिसला.. Sad दिनेशदांशी थोडक्यात भेट राहिली.. तरीपण विन्या, निल, रोहीत नि अर्थात जिप्सी हे मायबोलीकर भेटलेच.. Happy

मस्त प्रदर्शन...मस्त फोटु ..... ,मस्त मायबोलीकर .. मस्तच झाल छोट गटग .. Happy
सर्व फोटुंना छान छान कॅप्शन्स देण्याच काम पण जिप्स्यानेच केल होत.
जिप्स्या ... मस्तच ...तुझी घोडदौड अशीच चालु राहु दे ... Happy

आवर्जुन प्रदर्शनाला भेट दिल्याबद्दल मनापासुन आभार!!!!! Happy

समारोपाच्या वेळीही स्वप्निलने प्रदर्शनाला भेट दिल्याबद्दल मायबोलीकरांचा आवर्जुन उल्लेख केला (गोंगाट केल्याबद्दल नाही :फिदी:)

या निमित्ताने सगळ्यांना भेटुन खरंच छान वाटलं, पण पूर्ण वेळ काहि सगळ्यांसोबत राहता आले नाही. Sad

मामी Proud Happy
(त्यामुळे त्याने 'वरच्या मजल्यावर बसायला जागा आहे, तिथे जाऊन गप्पा मारा' असं सांगून आम्हाला यशस्वीरित्या दालनाबाहेर काढलं आणि मग वर कॉन्फरन्स चालली आहे असं सांगून खालीच पाठवलं.) >>>मामे, तिथं बसुन मस्त गप्पा मारता आल्या असत्या पण खरंच तेथे कॉन्फरन्स चालू होती म्हणुन परत खाली आलो. Wink Happy

पूर्णवेळ जिप्सीच्या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणेच नेमस्त भाव होते, तरीही त्याचं तुडुंब खूष असणं काही लपत नव्हतं. स्मित>>>>:-) Happy

केवळ या बीबीमूळे माझा जूना मायबोलीकर मित्र बॉम्बे व्हायकिंग पण तिथे आला होता.
भारतात आल्याआल्या सगळ्या मित्रमंडळींना भेटता आले, हे छानच झाले. पूण्याला पण बरेच जण भेटले. मजा आली.

Pages