"रानवाटा" प्रदर्शनाला भेट देणार्‍या माबोकरांचे गटग

Submitted by आनंदयात्री on 6 January, 2012 - 04:32
ठिकाण/पत्ता: 
ठाणे कलाभवन केंद्र बिग बझार शेजारी, कापूरबावडी, ठाणे (पश्चिम).

जिप्सी उर्फ योगेश जगताप (;)) याच्यासह अनेक गुणवान छायाचित्रकारांच्या छायाचित्र-प्रदर्शनाबद्दल आपण
http://www.maayboli.com/node/31707 इथे वाचले आहेच.

त्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवरून बरेच माबोकर हजेरी लावणार असल्याचे दिसले.
प्रदर्शनाची वेळ खालीलप्रमाणे असली तरी आपण सर्वांनी प्रतिसादांत लिहिल्यानुसार - रविवार, ८ जाने, संध्याकाळी ६ वाजता भेटूया.

दिनांकः
शनिवार ७ जानेवारी आणि रविवार ८ जानेवारी, २०१२.
वेळः
सकाळी ११ ते रात्रौ ८ पर्यंत

१. अजून कुणाला यात काही भर घालायची असल्यास नक्की लिहा.
२. नोंदणी केल्यास आकडा बघून (जिप्सीला) आनंद होईल हे आपल्याला माहित आहेच. Proud

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, January 8, 2012 - 07:30 to 09:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती वाजेपर्यंत असाल तिथे ? मी त्याच दिवशी भारतात येतोय. यायला ८ वाजतील.
प्रदर्शनाची वेळ संपत असेल तरी मायबोलीकरांना भेटता येईल मला.

गटग आयडिया मस्त, नचिकेत Happy
तू स्नॅक्स+ चहा पण स्पॉन्सर करणार आहेस का रे? Proud
अवांतर,
६.३० ते ७ च्या दरम्यान अवतरले (टपकले) तर (योगेश व्यतिरीक्त Proud तो कुठे जाणार म्हणा :)) कुणी भेटणार आहात का?

प्रदर्शन बघून भेटायचं की भेटून प्रदर्शन बघायचं?


तू स्नॅक्स+ चहा पण स्पॉन्सर करणार आहेस का रे?

६ वाजता येतील त्यांना माझ्याकडून! Proud
येणार असलीस तर नोंदणी कर आधी.

मोनाली, या की! असं 'चालेल ना' वगैरे (डुआय असल्यासारखं) का विचारताय? मला असंच वाटतं हल्ली..
Light 1

नोंदणी केली आहे रे.. Happy मी ६ पर्यंत पोचायचा प्रयत्न करतो..:)

दिनेशदा.. प्रदर्शन संपले तरी आपण भेटू शकतोच... चिंता नसावी.. Happy

मोनाली, चालेल ना काय विचारतेस? ये की... तू मला आणि मंजूला भेटलेली आहेस की एकदा Happy

मी तर उद्या सकाळी पण जाऊन येईन.. Happy रविवारी बाकीच्यांना भेटायला.. Happy
प्रदर्शन पहायला किमान ३०-४० मिनिटे हवीत. शिवाय संध्याकाळी माजिवडा जंक्शन येथे प्रचंड ट्राफिक असते. तेंव्हा गटग आणि प्रदर्शन असा पुरेसा वेळ हातात ठेवूनच यावे.. Happy
थोडे लवकर आलात तरी हरकत नाही.. Happy

मंजूडी..

तुझ्या घरावरून डावीकडे वळून हायवे गाठायचा आणि जंक्शनवरून उजवीकडे वळून थेट घोडंबंदरच्या दिशेने. तिथे माजिवडा वरून जरा पुढे गेले की उजव्या हाताला जाणारा पहिला रस्ता (जुना ठाणे - भिवंडी रस्ता) पकडायचा. ते नवीन बिगबझार आणि सिनेमास्टार सुरू झालंय ना त्याच्या बाजूलाच आहे कलादालन.

सेनापती, ट्राफिक रिपोर्टबद्दल धन्यवाद! Wink

मंजूडी - +१
मलाही ठाणे ईस्ट आणि वेस्ट एवढंच ओळखता येतं...
वाट शोधायचे प्रयोग डोंगरांत बरे... इथे तूच सांग कसं पोचायचं ते!
Proud

सविस्तर लिहितो... थांबा..

ठाणे कला दालन हे ठाण्यात माजिवडा येथे आहे. सर्वात जवळची खुण 'लेक सिटी', 'सिनेमास्टार' किंवा बिग बझार. ठाणे स्टेशन वरून येणार असलात तर बस, रिक्षा सहज मिळतील. रस्त्याने मुंबईमार्गे, भिवंडी मार्गे किंवा बोरीवली मार्गे येणार असलात तर शहरात न शिरता हायवेने गोल्डन डाईज नाका / माजिवडा नाका येथे पोचा. हे इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि घोडबंदर रोडच्या जंक्शनला आहे.

ठाणे कला दालन हे ठाण्यात माजिवडा येथे आहे >> कापुरबावडी सिग्नलला उतरुन जुन्या आग्रा रोड (भिवंडीकडे) जाणार्‍या रस्त्याला वळायचे. बिग बाझारच्या बाजुला ..

मी पण असेलच तिथे ... Happy

मी पण नक्की येणार.... दिनेशदा तुम्हाला भेटन्याचि फार इच्छा आहे!!!

मी पण नोंद केली रे Happy Happy

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद (नचि तुला खास धन्यवाद रे ह्या धाग्यासाठी Happy )

ए जिप्स्या, खास धन्यवाद काय त्यात? Happy

अरे लोक्सांनो, मला उद्या दुपारनंतर ऑफिस आहे... Sad
बघू... कसं काय जमतंय ते...

आज संध्याकाळी कुणी भेटू शकेल काय?
आणि एक सांगा..बोरिवलीहून बेस्ट बसने आले तर कोणत्या ठिकाणी उतरावे लागेल?

देवा.. आज संध्याकाळी शक्य नाही.. Sad बोरीवालीहून बसने आलात तर कापुरबावडी येथे उतरा.

कापुरबावडी येथे उतरुन जुन्या आग्रा रोड (भिवंडीकडे) जाणार्‍या रस्त्याला वळायचे. बिग बाझारच्या बाजुला ..

Pages