"रानवाटा" प्रस्तुत ठाण्यातील नवोदित छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ठाणे कलाभवन, कापुरबावडी येथे ७ व ८ जानेवारी २०१२ रोजी भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनात नवोदित छायाचित्रकारांची जवळपास २०० छायाचित्रे पाहायला मिळतील; त्यात निसर्गसौंदर्य, वन्य प्राणी- पक्षी, जनजीवन, समुद्रकिनारे यांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन शनिवार व रविवार सकाळी ११ ते ८ पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहिल. यात अस्मादिकांनी काढलेली काही छायाचित्रेही आहेत. 
थोडंस रानवाटाविषयी:
"स्वप्निल पवार" यांच्या संकल्पनेतुन "रानवाटाची" निर्मिती झाली आहे. सह्याद्री आणि त्यावर वसलेल्या गडकिल्ल्यांवर मनसोक्त प्रेम करणार्या या अवलियाने आत्तापर्यंत १५० हुन अधिक गडकिल्ल्यांना गवसणी घातली आहे आणि उर्वरीत किल्लेही लवकरच सर करण्याचा त्याचा मानस आहे. रानवाटाचे कार्यक्षेत्र फक्त फोटोग्राफी आणि गड किल्ल्याची भटकंती इतकेच मर्यादित नसून गडकिल्ल्यांची साफसफाई यावरही विशेष भर दिला जातो. सलग ४-५ वर्ष पावसाळ्याच्या आधी हरीश्चंद्रगडावर रानवाटा टिमबरोबर स्वतः स्वप्निल जाऊन प्लास्टिक, कचरा गोळा करून त्याची रीतसर विल्हेवाट लावतात, पाण्याच्या टाक्या साफ करतात. सन २०११ च्या पावसाळ्याआधी जवळ जवळ वर्षभरापासुन साठलेला १५ गोणी प्लास्टिक कचरा रानवाटा टिम व स्वतः स्वप्निलने अथक परीश्रम करून केदारेश्वराच्या गुहेजवळ असलेल्या मळगंगा नदिच्या उगमा पासुन गोळा केला. अन्यथा हा सगळा कचरा वाहत्या पाण्याबरोबर खाली गावात आणि पर्यायाने शेतात पसरला असता. नुसतं गडकोटांवर जाऊन भटकंती करण्यातच समाधान न मानता, आपणही या निसर्गाचे/गडकिल्ल्यांचे काहितरी देणं लागतो याची जाणीव ठेवून केलेले हे कार्य निश्चितच उल्लेखनिय आहे.
रानवाटाच्या संकेतस्थळावर विविध किल्यांची रीतसर माहिती आणि फोटो उपलब्ध आहेतच. लवकरच इतर अधिक किल्ल्यांची माहितीही अपडेट करणार आहेत. भन्नाट रानवार्यात, स्वत:च्याच मस्तीत शिळ घालणार्या या रानवाटाच्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. 
मितभाषी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या स्वप्निलला फोटोग्राफीची प्रचंड आवड असुन त्याने आत्तापर्यंत सलग ४ ते ५ वेळा हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्यात दिसणारे इंद्रवज्र आपल्या कॅमेर्यात बंदिस्त केले आहे. याच फोटोग्राफी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी सदर प्रदर्शनानंतर हौशी छायाचित्रकारांसाठी अतिशय सोप्या भाषेत छायाचित्रण शिबीराचे आयोजन २२ जानेवारी पासुन करण्यात आले आहे. इच्छुक अधिक माहितीसाठी स्वप्निल पवार यांना 9821367894 या मोबाईलवर संपर्क करू शकतात.
मागील प्रदर्शनाची हि झलकः












(फोटो: रूपेश बांदकर आणि योगेश जगताप)
आम्हा नवोदित छायाचित्रकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या प्रदर्शनाला नक्की भेट द्या. 
दिनांकः
शनिवार ७ जानेवारी आणि रविवार ८ जानेवारी, २०१२.
वेळः
सकाळी ११ ते रात्रौ ८ पर्यंत
स्थळः
ठाणे कलाभवन केंद्र
बिग बझार शेजारी,
कापूरबावडी,
ठाणे (पश्चिम).
=======================================================================
=======================================================================



प्रकाशचित्र संबधित माहिती असल्याने या विभागात प्रदर्शित करत आहे.
अभिनंदन मित्रा...आणि खुप खुप शुभेच्छा... काश मी आत्ता भारतात असतो... नक्कीच भेट दिली असती या प्रदर्शनाला.
अभिनंदन!!!
अभिनंदन योगेश
शाब्बास जिप्सी. अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा!!!
अभिनंदन योगेश
अभिनंदन योगेश आणि सर्व सहभागी टीम.
अभिनंदन..
प्रदर्शनाला यायला जमनार नाहिये
पण तुला शक्य असल्यास प्रदर्शन संपल्यानंतर त्यातले प्रचि इथे टाकलेस तर चांगलं होइल..
अरे वा ! अभिनंदन योगेश
अभिनंदन रे. येणार आहे बघायला - तुला नाही, फोटुंना
मी येईन. बहुतेक शनीवारी संध्याकाळी..... तिकडे असाल तर भेटुच.
अरे वा. नक्कीच यायचा प्रयत्न करेन. तुला फोनते आधी. तेवढे तारखेत २०११ चे २०१२ कर.
खूप खूप अभिनंदन...
अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा!!!
ये ब्बात!!! मस्त संधी... सोने करशीलच..

अभिनंदन जिप्स्या!!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
भरघोस शुभेच्छांबद्दल धन्यवाद!!!!!
जिप्स्या अभिनंदन.
वा, जमले तर नक्कीच भेट देईन.
(आधीचे एक प्रदर्शन बघितले होते.)
mast.. Will be there for sure !
अभिनंदन मित्रा...
अभिनंदन मित्रा
वा मस्तच प्रदर्शन. अभिनंदर आणि स्वप्निल पवारांचे कौतुकही की ते साफसफाईच काम इतक्या आत्मियतेने करतात.
आपण प्रदर्शनाच्या ठिकाणी केव्हा पासून, केव्हा पर्यंत असाल..... तेव्हा येण्याचा प्रयत्न करेन.
काय काय अभिनव उपक्रम चालू असतात तुम्हा मंडळींचे !!!!
हे सगळं वाचूनच थक्क झालो.....
कुठुन मिळते एवढी उर्जा तुम्हाला - नक्कीच गड - किल्ल्यांकडून, भटकंतीतून, निसर्गातून..........
असेच चालत रहा........ चरैवेति चरैवेति.......
मनापासून अभिनंदन व अनेक हार्दिक शुभेच्छा..... सर्वांनाच.......
त्या "स्वप्नील पवारांना" सलाम (विशेष) सांगणे...
अभिनंदन जिप्सी! तुला खूप खूप शुभेच्छा!!
शनिवारी यायला जमणार नाही, पण रविवारी मात्र येण्याचा नक्कीच प्रयत्न करते.
भटके व भटक्यांना भेटायला उत्सुक असणारे - भेटायचं का रविवारी संध्याकाळी?
मनोज, रोहन, रोमा, जिप्स्या, इंद्रा व सर्वलोक्स (अणुल्लेख करत नाहीये) - काय म्हणता?
(दगडा, तुझा मात्र अणुल्लेख! तुला कामं असतील!
)
भेटायचं का रविवारी संध्याकाळी? >> अनुमोदन
Let's meet on Sat. eve.
Fix the timing
धन्यवाद लोक्स

भेटायचं का रविवारी संध्याकाळी? >> ++१
मी तय्यार आहेच. 
आपण प्रदर्शनाच्या ठिकाणी केव्हा पासून, केव्हा पर्यंत असाल..... तेव्हा येण्याचा प्रयत्न करेन.>>>>सुरश, मी दोन्ही दिवस तेथे पूर्णवेळ असेन.
माबोकर, कधि भेटणार आहात? मी पण जायचा प्लॅन करत आहे. तुमच्या वेळेत जमले तर तेव्हाच येईन. मंजुडी तु पण सांग जाणार असशील तर.