दाल तडका

Submitted by योकु on 20 December, 2011 - 05:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी तूर + अर्धी वाटी मूग डाळ
एखादी हीरवी मिरची
कोथिंबीर
कडिपत्ता
२ सुक्या लाल मिरच्या
हळद
लाल तिखट
४ पाकळ्या लसूण
२ मध्यम टोमॅटो
हवा असल्यास १ कांदा
जीरं
तेल
मीठ

क्रमवार पाककृती: 

तूर + मूग जरा कमी पाण्यात शिजवून घ्यावी. हळद घालावी वा राहू द्यावी. शिजलेली डाळ घोटू नये.
हीरवी मिरची, कोथिंबीर, टमाटो, घेतला असेल तर कांदा; बारीक चिरून घ्यावा.
सुक्या लाल मिरचीचे तुकडे करावेत.
लसूण सोलून ठेचावा. जरासं आलं सुद्धा किसावं चव आवडत असल्यास...

आता अगदी १ चमचा तेल तापवावं.
त्यात, फक्त २ जिर्‍याचे दाणे घालावेत.
आता क्रमानी हिरवी मीरची, लसूण, आलं घालावं. जरा परतून घ्यावं.
घेतला असेल तर आता कांदा घालून परतावं (जरा ब्राउन होवू द्यावा). शिजतांना हळद घातली नसेल तर ती आता घालावी.
टोमॅटो घालावेत. परतावं. हे सगळं नीट शिजलं की शिजलेली डाळ घालावी. पाणी घालावं. पळीवाढं असू द्यावं. मीठ घालून चांगली उकळी येऊ द्यावी. ही डाळ तयार आहे. ही हवी असल्यास सर्विग बाउलमध्ये काढावी. नाहीतर लगेच वाढायची असेल तर अगदी सिमर वर ठेवावी.

आता तडका करावा-
छोट्या कढईमध्ये ७/८ चमचे तेल तापत ठेवावं. गरम तेलात आता भरपूर जिरं घालावं. जिरं तडतडल्या बरोब्बर लाल मिरच्या घालाव्यात. तिखटपणा जसा हवा असेल तसं लाल तिखट घालावं. फोडणी जरासुद्धा जळता कामा नये!!! हा तडका तयार डाळीवर ओतावा.
दाल तडका तयार आहे. कोथीबीर घालून सजवावं.

वाढणी/प्रमाण: 
हवं तस!
अधिक टिपा: 

अगदी हॉटेल च्या चवीचा होतो पण घरच्या तेलामुळे त्रास होत नाही.
गरम फुलका, जिरा राईस बरोबर छान लागतो. भाताबरोबर खायचा असेल तर जरा पाणी जास्त असू द्यावं.
आज केला होता पण ऑफिस मध्ये आल्याबरोबर लोकांनी फडशा पाडलाय; त्यामुळे फोटो नाही काढता आला... Sad

माहितीचा स्रोत: 
एका ढाब्यावरचा आचारी!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अशीच दाल तडका करते,पण मी नंतर थोड्या तेलानी flambe करते.म्हणजे थोडा धुरकट वास येतो..डाएटवाल्यांनी वर जी फोडणी आहे ती थोडी कमी तेलात करावी.परत पळीत दोन छोटे चमचे तेल चांगले गरम करणे.थोडे जीरे,थोडीच हळद घालावी.थोडी आवडत असल्यास कसुरी मेथी चुरडुन घालावी.तेल मात्र पळीच्या कडेला घेऊन चांगले गरम होऊ द्यावे.व गॅस बारीक करून १टे.स्पू.पाणी पळीत घालवे.लगेच भडका उडतो, पळी लगेच बाजूला करावी. गॅस लगेच बंद करावा.पहिल्यांदा खूप भिती वाटते,पण नंतर सवय होते.पण ढाब्यासारखा धुरकट वास येतो.बाकी योगेश, तडका दाल मस्तच.पळीतले तेल चांगले गरम करावे.तेल गरम नसेल तर पाणी घातल्यावर पेट घेत नाही.

तिन जणांना पुरेल हे प्रमाण असं वाटतंय.

मी हल्ली तुर आणि मुग डाळीचा दाल तडका बनवणं बंदच केलंय. याऐवजी चना दाल तडका बनवते, जवळपास अश्याच प्रकारे. नेहेमी घरी बनणारी मुंगी-मसर कीदाल बर्‍याचदा अश्या पद्धतीने नंतर तडका देवून पण बनवते.

मस्त पाकृ आहे. मी वरण कुकरला लावतानाच त्यात टोमॅटो चिरुन घालते व एका छोट्या कांद्याच्या फोडी. बाकी सगळे सेम.

सणसणीत झाला होता दाल-तडका! दाल शिजताना अर्धा चमचा रजवाडी गरम मसाला घातला. बाकी सगळे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच!

रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद! Happy

मस्त सोप्पी शिवाय आवडती रेसिपी आणि सगळे जिन्नस घरात असल्यामुळे आज लगेचच बनवायचा मोह आवरता आला नाही. फोडणीत थोडे हिंग आणि शेवटी अर्धा चमचा गरम मसाला घालून उकळी आणली. खुपच चवदार झाला होता दाल तडका Happy फोटो -

मी काल केला हा दाल तडका. फारच छान झाला होत. पाहुण्यांनाही फार आवडला. तुमची रेसिपी एकदम परफेक्ट आहे. मस्तच!!

योगेश हा "ढाबा स्पेशल पंजाबी दाल तडका" आहे.खायला देताना वरुन मख्खनकी टीकीया टाकली अन बरोबर तवा रोटी किंवा तन्दूरी रोटी ,प्लेटभर सलाद असले कि पंजाब्बी ढ्ढाब्बा खान्ना तय्यार है जी!!!!!! असे म्हणता येईल्..मस्त !!अगदी तीच कृति अन तीच चव..

Pages