पिठी साखर १ वाटी
काजू पावडर २ वाट्या
दुधाची घट्ट साय २ चमचे
पाणी पाव वाटी
तुप १ चमचाभर
कढई किंवा जाड बुडाचे पातेले तापायला ठेवावे.
काजूची पुड केली नसेल तर करुन घ्यावी. तयार पुड दोन वाट्या भरायला हवी.
कढईमध्ये एक वाटी साखर, दोन चमचे साय व पाव वाटी पाणी घालून साखरेत साय एकत्र होईल असे मिसळावे. गॅस मिडीयम हाय वर ठेउन सतत ढवळत रहावे.
साखर वितळेल व बाजुने बुडबुडे यायला सुर्वात होईल मग लगेच त्यात काजु पावडर घालून मिश्रण ढवळावे. मिश्रण गोळा व्हायला लागले की लगेच गॅस बंद करुन कढई खाली उतरवावी.
ताटाला किंवा पोळपाटाला तुप लाउन भरभर गोळ्याची पोळी लाटावी. हवा असल्यास चांदीचा वर्ख लावावा. मग लगेच धारदार सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या
शंकरपाळ्याच्या आकारत कापताना कडेचे तुकडे उगाच अर्धवट पडतात. म्हणून ह्या साध्या सोप्या चौकोनी
वेरिएशन म्हणून आंबा कतली करता येईल बच्चा पार्टी ला आंबे आणि काजूकतली दोन्ही खूप आवडीचे. एकत्र करुन फार सुन्दर कॉम्बिनेशन आंबाकतली होते.
मी वरिल दिलेल्या प्रमाणात एक वाटी साखरे ऐवजी एक वाटी आंब्याच्या फोडींचा गर वापरला. बाकी क्रूती सेम. एक आंबा काजू चा गोळा आणि एक फक्त काजू कतलीचा गोळा असे दोन्ही एकावर एक ठेउन भरभर लाटायचे. नेहमी प्रमाणे कापायचे. छान दोन रंगाची काजूकतली बनते.
फ्रेश आम्बा नसेल तर फ्रोझन पल्प वापरता येईल.
कोणतीही बर्फी किंवा वड्या बनवताना मिश्रणाचा गोळा होत आला की चमचाभर पिठीसाखर भुरभुरवायची आणि पटकन मिक्स करुन मग वड्या थापायच्या/लाटायच्या. असे केल्याने वड्या/ बर्फी चिकट न होता एकदम खुटखुटीट होते.
काजू सादळलेले(मउ) असतील तर काजु पावडर निट होत नाही.
काजु पावडर बनवताना मिक्सर फर्स्ट स्पीड वर किंवा ईंच वर चालवावा एक एक मिनिटाच्या गॅप ने. दोन ते तिन मिनिटात चांगली सपीट पावडर बनते.
आज सगळ प्रमाण निम्म घेऊन १
आज सगळ प्रमाण निम्म घेऊन १ वाटीच्या करुन बघितल्या,
साय घातली न्हवती. तरी वड्या छान झाल्या :).
डॅफो, अगदी डोळे मिटून झाल्या
डॅफो, अगदी डोळे मिटून झाल्या काजूकतल्या... चव एकदम छान!
कातील!!!
कातील!!!
मंजूडी, काय मस्त घोटीव झाल्या
मंजूडी, काय मस्त घोटीव झाल्या आहेत गं
मस्त मंजू, जरा १ दिवस आधी
मस्त मंजू, जरा १ दिवस आधी केल्या असत्यास तर आणता नसता का आल्या.
त्या चार दिवसांपुर्वीच्या
त्या चार दिवसांपुर्वीच्या आहेत
मंजू, कुफेहेपा.
मंजू, कुफेहेपा.
खलास आहेत सगळ्या काजुकतल्या!
खलास आहेत सगळ्या काजुकतल्या!
डॅफो, आरती, अमृता, मंजूडी
डॅफो, आरती, अमृता, मंजूडी आता पुलंच्या भाषेत "ही घरची आणि ही बाहेरची" दाखवा पाहू.
खरोखर चितळे बंद पाडायचे उद्योग सुरु झालेत इथे... मस्त मस्त!
मंजूडी, मस्त दिसतायत वड्या पण
मंजूडी, मस्त दिसतायत वड्या पण फोटो अगदी चंद्रप्रकाशात काढल्यासारखा का दिसतोय?
सेम प्रमाण की काही व्हेरिएशन्स?
छानच. करून पाहिल्या पाहिजेत.
छानच. करून पाहिल्या पाहिजेत.
मंजूडी, मस्त दिसतायत वड्या पण
मंजूडी, मस्त दिसतायत वड्या पण फोटो अगदी चंद्रप्रकाशात काढल्यासारखा का दिसतोय? >>> मोबाईलच्या मूनलाईटमध्ये काढला असेल
मस्तच मंजुडी
मस्तच मंजुडी
सायो, डॅफोचंच सेम टू सेम
सायो, डॅफोचंच सेम टू सेम प्रमाण आणि पावडर करायच्या आधी काजू फ्रिजमध्ये ठेवण्याची युक्ती वापरली. आणि मोबाईल कॅमेर्याने फोटो काढला आहे, चालवून घ्या
स्क्रीनमध्ये हात घालून २-४
स्क्रीनमध्ये हात घालून २-४ तुकडे उचलायची सोय हवी होती ना... आज खावीच लागेल..
सेनापती अॅडमिन ला सांगुन
सेनापती अॅडमिन ला सांगुन बघा. ते सोय करतीलही.
मंजूडी, मला वाटल. पण फोटो पण
मंजूडी, मला वाटल. पण फोटो पण डोळे मिटूनच काढलास म्हणून.
हि मी केलेली काक...बहुदा..थोड
हि मी केलेली काक...बहुदा..थोड लवकर गॅस बंद करायला हवा होता...
पण चव अप्रतिम छान झालिय..
आज काजूकतली केली. काही सेकंद
आज काजूकतली केली. काही सेकंद जास्त राहिलं मिश्रण गॅसवर त्यामुळे वड्या पाडताना कोरडी झाली, पण चव मस्त!
फोटो काढला नाहिये. परत करीन एकदा आणि पर्फेक्ट झाल्यावर फोटो टाकेन.
डॅफोडिल्स... अॅडमिनला सांगुन
डॅफोडिल्स...
अॅडमिनला सांगुन बघायला हरकत नाही खरच करतीत काहीतरी सोय. भरवसा नाही..
काल काजूकतली खाल्ली बाय द वे..
डॅफो, आत्ता केली काजूकतली.
डॅफो, आत्ता केली काजूकतली. मस्त झाली आहे. साय नसल्याने २ चमचे क्रीम घातले. बाकी प्रमाण सेम
मस्त च... फोटो पण सुरेख आलेत.
मस्त च... फोटो पण सुरेख आलेत. लगेच तोंडात घालावी असे वाटते.
नक्की करुन बघीन .
दिवाळी आली.... नविन काही
दिवाळी आली....
नविन काही ट्राय करायचे असेल तर मँगो कतली वेरिएशन ट्राय करता येईल. रेसिपी आणि फोटो अप्डेट केलाय.
दिवाळीच्या खूप खूप गोड शुभेच्छा !
मँगो कतली कातिल दिसतेय !
मँगो कतली कातिल दिसतेय !
मॅन्गोकतली काय कातिल आहे.
मॅन्गोकतली काय कातिल आहे. पुर्वाच्या मॅन्गोपिस्ता बर्फीनंतर एवढी तोंपासु हीच
मँगो कतली, कतली मत्त दित्तेय
मँगो कतली, कतली मत्त दित्तेय
आंबाकाजू कतली कातिल आहे.
आंबाकाजू कतली कातिल आहे.
आंबा कतली बेस्ट. मॅन्गो पल्प
आंबा कतली बेस्ट. मॅन्गो पल्प ने बनवता येइल का?
मँगोकतली एकदम कातिल दिसतेय..
मँगोकतली एकदम कातिल दिसतेय..
मस्त दिसतेय आंबा-काजूकतली!
मस्त दिसतेय आंबा-काजूकतली!
Pages