कैरीचं चुट्चुटं

Submitted by saakshi on 7 December, 2011 - 05:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कैरी - १ मध्यम आकाराची
फोडणीसाठी :
तेल - १ मोठा चमचा
मोहरी - अर्धा चमचा
जीरे - अर्धा चमचा
हळद - दोन चिमूट Happy
मीठ - चवीनुसार
तिखट - १/४ चमचा
गूळ - १ चमचा बारीक चिरून

क्रमवार पाककृती: 

१. कैरीच्या बारीक पातळ फोडी करून घ्याव्यात. फोडी करताना साल काढू नये.
२. तव्यात तेल गरम करून घेऊन त्यात जीरे, मोहरी चांगले तडतडवून घ्यावेत.
३. मग कैरीच्या फोडी घालून परतावे.
४. मीठ, तिखट घालून परतावे.
५.शेवटी गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत परतावे.

मस्त चुट्चुटं तय्यार!!!!!!!!!!
लगेच तव्यावरून ताटात घेऊन गट्टम करावे.... Happy

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी........ अर्थात कैरी किती आवडते त्यावर अवलंबून....... :स्मित:
अधिक टिपा: 

एकदा फोडणी झाली की , मंद आचेवर परतावे अन्यथा फोडी पातळ असल्याने जळण्याची शक्यता...
कैरी पाडाची असली तर आणखीनच बहार!!!!!!!!!!

माहितीचा स्रोत: 
आज्जी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा प्रकार माझ्या आवडीचा. >>> माझ्याही जागूतै.......
शेवटी ते तळाशी राहणारं फोडणीचं तेल पण चपातीच्या एका घासाने पुसून खाते मी........ Happy

मला मिळाल्या होत्या कैर्‍या मागच्या आठवड्यात. आज-उद्यात बघते मिळताहेत का. कैरी माझी अतिशय आवडती. कितीही प्रकार समजले तरी कमीच पडतात. मस्त पाकृ Happy

हा प्रकार छान आहेच.
पण कैर्‍या मिळत नाहीत त्यावेळी कच्ची पपई वापरुन पण हा प्रकार करता येईल, आंबटपणाला लिंबू पिळायचा.
एकदा जामनगरला अश्याच बिनमोसमी दिवसात कैरीचे ताजे लोणचे पानात वाढले होते. चौकशी केल्यावर ते पपईचे होते, असे समजले.

धन्स लोक्स!!!!!!!!! Happy
लाळेरं आणलंच पाहिजे>>>>>> मामी........ Happy
पण मुली, कैर्‍या कुठून आणायच्या ग आत्ता?>>>> मला कोण जाणे कशा, पण परवा मिळाल्या होत्या...

तों पा सु!! Happy

अल्पनाचा सखुबत्ता आठवला.

अनघा, इकडे कैर्‍या मिळायला लागल्या. पाठवू का? घेण्यासाठी अ'बाद स्टेशनला जावे लागेल फक्त, पहाटे साडेचार वाजता Wink

धन्यवाद मंजूडी, आरती, सायो, मोहन कि मीरा... Happy
आम्हि त्याला कोयाडं पण म्हणतो>>> माझ्यासाठी नवीन नाव......
मेथांबा म्हणजे काय???

सायो म्हणतेय ते बरोबर आहे. फोडणीत मेथ्या घालून वरील चुटचुटं केलं की मेथांबा, आणि अख्खी कैरी घातली की कोयाडं. Happy

फोडणीत मेथ्या घालून वरील चुटचुटं केलं की मेथांबा, आणि अख्खी कैरी घातली की कोयाडं.>>> अरे व्वा!!!!!! मस्तच!!!!! ३ कैर्या चिरुन एका वेळी ३ पदार्थ....... Happy

मस्त रेसिपी .:)
मी यात ओले खोबरे, थोडे तांदुळ, व थोडी उडदाची डाळ तेलावर परतुन वाटुन घालते. आंबट गोड मस्त
लागतो. त्याला कायरस म्हणतात. Happy

प्रिति १> ओले खोबरे, थोडे तांदुळ, व थोडी उडदाची डाळ तेलावर परतुन वाटुन > यालाच `उडदामिथी' म्हणतात न?