मिरच्यांचा खुडा

Submitted by योकु on 5 December, 2011 - 07:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. ७/८ (किंवा तिखटाप्रमाणे जास्त वा कमी) हिरव्या मिरच्या
२. एक ते दीड वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३. कच्चं तेल
४. मीठ

क्रमवार पाककृती: 

१. मिरच्या धूवून घ्याव्यात.
२. गॅस वर किंवा असल्यास निखार्‍यांवर मिरच्या भाजून घ्याव्यात, तेल लावू नये.
३. आता या मिरच्यांचं मिक्सरमधे जाड कूट करा.
४. हे एका बाऊल मधे घ्या
५. त्यात कोथिंबीर घाला, मीठ घाला
६. आता कच्च्या तेलाची त्यात धार धरा आणि चांगलं एकत्र करा.
७. खुडा तयार आहे. गरम ज्वारीच्या भाकरी + भरताबरोबर मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
लागेल तसं, तिखट झेपतं तेव्हढं :)
अधिक टिपा: 

१. खरंतर यात मिरच्या भाजल्यानंतर खुडायच्या असतात, अगदी बारीक अश्या. पण तसं केलं तर हाताची बोटं चांगलीच झोंबतात. त्यातही, मिरच्या थंड झाल्या तर त्या खुडता येत नाही. मिक्सरला लावणे अगदी सोपं... त्यातही कुणाला प्रयोग करायचाच असेल तर करावा Happy नंतर ओरडू नये!
२. तिखटपणानुसार कोथिंबीर, मिरची चे प्रमाण ठरवावे. तेलासाठी कंजूसी अजिबात करू नये!
३. वर दिलेल्या भरताची रेसीपी देइन लवकरच Happy (विदर्भातलं कच्चं भरीत)
४. हिवाळ्यात जरूर खावा, कोथिंबीर भरपूर असते आणि त्यातून लोह पण मिळतं!

माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फटु?