काजुकतली / मँगो कतली (फोटोसह)

Submitted by डॅफोडिल्स on 23 November, 2011 - 01:15
mango kaju katali
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिठी साखर १ वाटी
काजू पावडर २ वाट्या
दुधाची घट्ट साय २ चमचे
पाणी पाव वाटी
तुप १ चमचाभर

क्रमवार पाककृती: 

कढई किंवा जाड बुडाचे पातेले तापायला ठेवावे.
काजूची पुड केली नसेल तर करुन घ्यावी. तयार पुड दोन वाट्या भरायला हवी.
कढईमध्ये एक वाटी साखर, दोन चमचे साय व पाव वाटी पाणी घालून साखरेत साय एकत्र होईल असे मिसळावे. गॅस मिडीयम हाय वर ठेउन सतत ढवळत रहावे.
साखर वितळेल व बाजुने बुडबुडे यायला सुर्वात होईल मग लगेच त्यात काजु पावडर घालून मिश्रण ढवळावे. मिश्रण गोळा व्हायला लागले की लगेच गॅस बंद करुन कढई खाली उतरवावी.
ताटाला किंवा पोळपाटाला तुप लाउन भरभर गोळ्याची पोळी लाटावी. हवा असल्यास चांदीचा वर्ख लावावा. मग लगेच धारदार सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या Happy

शंकरपाळ्याच्या आकारत कापताना कडेचे तुकडे उगाच अर्धवट पडतात. म्हणून ह्या साध्या सोप्या चौकोनी Happy

वेरिएशन म्हणून आंबा कतली करता येईल बच्चा पार्टी ला आंबे आणि काजूकतली दोन्ही खूप आवडीचे. एकत्र करुन फार सुन्दर कॉम्बिनेशन आंबाकतली होते.

मी वरिल दिलेल्या प्रमाणात एक वाटी साखरे ऐवजी एक वाटी आंब्याच्या फोडींचा गर वापरला. बाकी क्रूती सेम. एक आंबा काजू चा गोळा आणि एक फक्त काजू कतलीचा गोळा असे दोन्ही एकावर एक ठेउन भरभर लाटायचे. नेहमी प्रमाणे कापायचे. छान दोन रंगाची काजूकतली बनते.
फ्रेश आम्बा नसेल तर फ्रोझन पल्प वापरता येईल.

mangokajukatali_small.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा: 

कोणतीही बर्फी किंवा वड्या बनवताना मिश्रणाचा गोळा होत आला की चमचाभर पिठीसाखर भुरभुरवायची आणि पटकन मिक्स करुन मग वड्या थापायच्या/लाटायच्या. असे केल्याने वड्या/ बर्फी चिकट न होता एकदम खुटखुटीट होते.

काजू सादळलेले(मउ) असतील तर काजु पावडर निट होत नाही.
काजु पावडर बनवताना मिक्सर फर्स्ट स्पीड वर किंवा ईंच वर चालवावा एक एक मिनिटाच्या गॅप ने. दोन ते तिन मिनिटात चांगली सपीट पावडर बनते.

माहितीचा स्रोत: 
बहीण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केली ग डॅफो Happy
अगदी गोळाहोईपर्यंत नाही ठेवले. घट्ट्पणा आल्यवर लगेच ताटलीत थापले. छान झाली आहे.
साय नव्हती म्हणुन, पाण्याच्या ऐवजी दुध वापरले. रंग पांढरा स्वच्छ नाही आला. पण बाकी अगदी चितळे हो Happy

KajuKatali.jpg

करा करा चकीत करा. मी पहिल्यांदा केलेली तव्हाचे लेकाच्या चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स आठवले. त्याला इतकी आवडली की. मिठाईच्या डब्यात भरुन घरच्यांना दिली. चितळेंची आहे सांगुन. आणी घरी केले हे कळल्यावर मला घरच्यांनी दम दिला की आता दुसरी काक ची रेसीपी ट्राय करु नकोच Wink

धन्यवाद मैत्रिणींनो ! Happy
अरे वा आरती एक्दम फटाफट Happy
पण अजुन थोडीशी व्ह्यायला हवी होती. कच्ची दिसतेय. अस वाटतंय.

छान ! अमृता चांगली जमलीये. लेक खुश होईल.
पुढच्या वेळी एक पॉईंट किंचीत लवकर बंद कर. थोडीशी घाई करावी लागते लाटायला आणि वड्या पाडायला Happy
काजूकतलीची साथ आलीय >> केश्वी Lol
लवकरच दुसरी साथ आणायला पाहिजे. Proud

फिनिशिंग नाहिये पण >> माझ्या टीपात राहिलेच की लिहायचे.
लाटताना बटर पेपर ठेवुन लाटावे. अगदी मस्त तुळतुळीत होतात.

Mrs.Jayashri Kuber gave this tip on etv.keep the cashonuts for half an hour in the freeze to get smooth powder to make kajukatali&kajuche modak.

कच्ची दिसतेय. अस वाटतंय. >> नाही अजिबातच.
अजुन थोडी ठेवली असती तर कडक झाली असती. नेहमी वड्या करत असल्याने अंदाज आला आणि गॅस बंद केला Happy
तु गोळा म्हणजे नक्की काय केले त्या 'स्टेप' चा फोटो टाक बरे Happy

आरती, अमृता एकदम उरक आहे बरका तुम्हाला.
अमृता काजूकतली तर मस्तच पण खालची सिरॅमिकची प्लेट पण मस्तच.
माझे अगदी सोपे पदार्थ बिघडवण्याचे रेकॉर्ड बघता काजूकतली करेन की नाही माहित नाही पण तशी एक प्लेट नक्की करणार मी. Proud
डॅफो ती बटरपेपर टाकून मग लाटायची युक्ती वर कृतीत टाक ना.

थँक्स रुने, प्लेट बनवुन टाक तू.. हाडाची पॉटर तू Wink
आरती, अमृता वाचुन गंमत वाटली कारण आरती माझ्या बहीणीच नाव आहे. Happy

कुठल्याही वड्या वर बटरपेपर टाकुन लाटाव्यात. काल नव्हता घरी म्हणुन चालवलं. एखादा जाड प्लास्टीक कागद पण चालला असता पण तो ही नव्हता.

धन्स आरती Happy
अमृता मी ही प्लास्टीक पेपर वर लाटते. किंवा ताटात थापल्या तर वरुन जाड पेपर धरुन वड्या थापते.

मार्केटमधल्या काजुकतली बद्दल निगेटिव्ह कमेंट्स ऐकून होतो, पण जिभलीबाईंचे चोचले पुरवण्यासाठी आता घरीच बनवण्याचा विचार आहे. सुरी ऐवजी पिझ्झाकटर कट करायला वापरला तर फिनीशींग चांगली येईल ना?... Happy

इथे (अमेरिकेत) चांदीचा वर्ख मिळतो का? लेकीला काजुकतली दाखवल्यावर वरती चकचकीत लाउन करुन दे म्ह्णुन लागली आहे.
मस्त कृती आहे. वर्ख नाही मिळाला तरी करुन बघण्यात येईल.

Pages