निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा, त्या पिवळ्या फुलांना तिकोमाच म्हणतात.
पिंडाबिंडाच वाचल्यावर पुलंच्या पाळीव पक्षी मध लं " एक चिनीमातीची बरणी अन दोन जर्मन ची मोठी पातेली आल्याशिवाय तुमची पैठणी मी बोहारणीला देणार नाही हो सासूबाई........ अन पिंडाला कावळा शिवला!! " Lol Rofl

शांकली, आपण नळस्टॉपकडुन , पाडळे पॅलेसकडे जायला जिथे वळतो ना, तिथे वळल्यानंतर डाव्या बाजूला पाढरी आणि राणी कलरची बोगन वेल मस्त फुललेय. त्या बाजूला गेलात तर जरूर पहा. तसेच सकाळच्या वेळी नदीच्या काठावर बगळे ऊन खात बसलेले इअतके छान दिसतात. मस्तच. Happy

टॅबेबुया ???? दिनेशदा, हा बेळगावातच काढलेला. फोटो पाहताना सापडला. Happy

पानफुटीची फुले ???

गवतावरुन आठवले, मी दापोलीला राजाकाकाकडे सुगंधी गवत पाहीले होते, त्याने आंबेमोहोराचे गवत आहे असे सांगितले, भात शिजतना टाकतात, भाताला छान सुगंध येतो म्हणे..
तसेच त्याच्याकडे १८ प्रकारच्या बोगनवेल, आणि खुप प्रकारच्या जास्वंदी पण आहेत..

सारीका - त्या गवताचे फोटो व इतर माहिती ही दे ना इथे, मला त्या गवताविषयी खूप उत्सुकता निर्माण झालीये........

नक्की, मी विचारुन सांगेन फोटो पण मागवते, इथे इतक्या गोष्टी वाचनात येतात मग आपलेही अनुभव शेअर करायला मज्जा येते.. Happy

त्याने आंबेमोहोराचे गवत आहे असे सांगितले, भात शिजतना टाकतात, भाताला छान सुगंध येतो म्हणे..>>>>जागूकडे आहे ना हे?????? मागे जागूने मला आणि साधनाला याचे रोपटे दिले होते. माझ्याकडे नाही वाढले Sad

शशांक त्याबद्दल मी मागे एक धागा टाकला होता. पण माहीती जास्त नाही. ते गवत माझ्याकडे आहे. उद्या धागा शोधते किंवा परत फोटो टाकते.

जिप्स्या, तो टिकोमा.
शशांक, पुर्वी देवरुखला सप्तलिंगी फलोद्यान होते. तिथे एक खास प्रकारचे गवत लावले होते. पण ते गवती चहासारखे नव्हते. हिरवीगार मऊ पाने होती. त्याचे तेल बाकिच्या सुगंधी पदार्थाचा बेस म्हणून वापरले जात असे.
मी ते उद्यान बघून बरीच वर्षे झाली. आता ते तिथे आहे का ते पण माहित नाही. पण तसे गवत मात्र मी नंतर कधी बघितल्याचे आठवत नाही.
जागूकडची वनस्पति, केवड्याच्या कूळातली. त्याला मलेशिया / थायलंड मधे पानदान असा शब्द आहे.

आजच्या लोकसत्तात पण एका सुगंधी तांदळाचा उल्लेख आहे. (न्याहारी सदरात)

ऑफिसमधून घरी आल्यावर नि ग उघडल्या की कित्ती गप्पा झालेल्या असतात!!
शांकली,
अगदी ! (आमच्याकडे घरुन ऑफीसमध्ये आल्यावर ...)

काल पासुन इतक्या वाढलेल्या पोष्टी बघुन कधी वाचुन संपवतोय अस झाल होतं....
घरी जाऊन आता गवती चहा पिण्याची इच्छा तर झाली आहेच ...

दिनेशदा,
मी कॉलेजला असताना आमच्या एका केमेस्ट्रीच्या सरांनी मला 'सिट्रोनेला' या उपयुक्त अशा गवताच्या लागवडीबद्दल सल्ला दिला होता, (याच्या तेलाला बाजारात तसा चांगला दर मिळत असेल म्हणुन दुसरं मला बीएसस्सी जमणार नाही हे ओळखलंही असेल ! :हाहा:) त्यांनी त्यावेळी मलकापुर भागात,कोकणात याच्या लागवडीचा संदर्भ दिला होता.हे देखील गवती चहाच्या इतर प्रकारातील एक प्रकार असेल अस वाटतं.
Happy

जिप्स्य्या वरचा टिकोमा आहे. ट्य. ची पाने अगदी निमुळती असतात, आपल्या बिट्टीच्या पानांसारखी. फुले सारखीच दिसतात त्यामुळे गोंधळ होतो. ट्य. चा मोठा वृक्ष असतो आणि टिकोमा ८-१० फुट वाढतो.

चला मी दिवसभर फोटो काढला नाही, पण गिरीने माझं काम केलं. त्याने जे गुगगलवरचे फोटोज टाकले आहेत तेच माझं डंब केन. मी त्याचं नाव दुष्ट केन ठेवलं आहे. त्याला पाणी घालताना एखादा थेंब जरी अंगावर उडाला तरी मला भीतीचे शहारे येतात. आईने कापलं होतं, पण आता परत वाढतंय ते.

साधना - हो गं माझी स्कीन अतिशय सेन्सिटीव आहे. साधं उनात गेलं तरी मला अ‍ॅलर्जी येते, डास चावला तरी चांगलाच त्रास होतो.

ते साळुंक्याचं गाणं माझ्या शाळेत असं होतं - 1 for sorrow, 2 for joy, 3 for letter & 4 for boy. शाळेत काही boyfriend नव्हता, त्यामुळे ४ कधी एकत्र दिसल्याच नाहीत, Wink पण अजुनही मी २ पेक्षा जास्त एकत्र पाहिल्या नाहीत. Happy

शांकली, येस्स बरोबर ती dwarf कर्दळ आहे. मस्त फुलं येतात. रंग किती सुरेख आहेत.

ते आंबेमोहराचं गवत माझ्या आई-बाबांकडे पण आहे, येतो जरा वेगळा छान वास राइसला.

जिप्सी - हा फोटो तुझ्यासाठी. एका टबसारख्या मोठ्या सिमेंटच्या कुंडीत लावली आहेत कमळं. लवकरच काढावी लागणार आहेत कारण डास आणि कुंडीचं आयुष्य भरत आलं आहे त्यामुळे पाणी लिक होतं आहे.

lotus.JPG

शोभा, म्हणजे शारदा आर्केडकडच्या बाजूच्या रस्त्यावर का?
त्याचप्रमाणे पाडळे पॅलेसच्याच इथे वेगळ्याप्रकारची पाने असलेला पांढरा चाफा आहे. ह्या चाफ्याची पाने नेहेमीच्या चाफ्याच्या पानांपेक्षा खूपच निराळी आहेत. आत्ता तो फुलावर असल्याने तुला तो बघायला मिळेल. आणि राजा मंत्री बागेत सातवीण/ सप्तपर्णी फुलली आहे. ती पण बघता येईल. (फक्त मास्क लावावा लागेल!!)

मनीमाऊ, ह्या dwarf कर्दळीत आजकाल खूप रंग उपलब्ध आहेत. कँप एरियातून एक रस्ता हॉटेल ब्लू डायमंडकडे जातो (हा सगळा मिलिटरी एरिया आहे) तिथे एका भागात रस्त्याच्या कडेला ही वेगवेगळ्या रंगातली कर्दळ लावली आहे. मी पुण्यात इतकी सौंदर्य दृष्टी ठेवून आणि स्वच्छता/ निगराणी ठेवलेला भाग क्वचितच बघितला. म्हणजे इथे आलं की आपण नक्की पुण्यात आहोत की आणिक कुठे असा संभ्रम पडावा इतकी परिस्थिती आहे.

मागील पानावरच काकपुराण वाचून मजा आला. त्या कावळ्यांची कावकाव म्हणजे लग्नाची बोलणी असावीत अस दिनेशदांना वाटलं हे वाचल्यावर लातूर भागात लग्न ठरवण्याच्या बोलण्यांना "बोलाचाली " असा शब्द वापरतात अशी मजेदार आठवण आली. अन पिंडाबिंडाच वाचल्यावर पुलंच्या पाळीव पक्षी मध लं " एक चिनीमातीची बरणी अन दोन जर्मन ची मोठी पातेली आल्याशिवाय तुमची पैठणी मी बोहारणीला देणार नाही हो सासूबाई........ अन पिंडाला कावळा शिवला!! " >>> श्रीकांतजी, अगदि ह्याच शब्दात पोस्ट द्यायची असे माझ्या मनात होते, तोपर्यंत तुमची पोस्ट वाचलि.
सध्या नि.ग.वर फारच गप्पा चाललेल्या आहेत. एखादा दिवस मधे गेला तरी बरंच वाचावे लागते. Wink

शांकली, मीही कॅम्पजवळच रहाते. माझं घर ही बर्‍यापैकी डिफेन्स एरियातच आहे. खरंच हे लोक, आपले एरियाज इतके छान मेंटेन करतात नं. सध्या CME workshop (गंगा सॅटेलाइटजवळ) पण छान कर्दळी लावल्यात. सगळ्या मस्त फुलल्यात आहेत आणि इतके सुंदर रंग आहेत त्यात. मस्त वाटतं तिथुन जाताना.

हाय फोक्स............ आय्याम ब्याक!
सारिका हे आंबेमोहोराचं झाड ...की झुडुप......माझ्या माहेरी होतं. रोज बागेत जाऊन आईला भातात घालण्यासाठी एक आंबेमोहोराचं पान आणून देणे हे काम माझं होतं.

४/५ दिवसात पुलाखालून बरंच पाणी गेलेलं दिसतंय!
मुद्दाम मागे जाऊन "काकपुराण" वाचून आले.
मृण्मयी....तुझ्या घरासमोरचं दृश्य डोळ्यासमोर आलं........तुला क्वॅक क्वॅक करून त्रास देणारी बदकं!
साधना ऐशूच्या घसा बसलेल्या कावळ्याचे नातेवाईक आमच्या कडुलिंबावर आहेत.
दिनेशदा!!!!!!!!!!!!!!!!!!

"फुल गळे, फळ गोड जाहले....." अशा प्रकारे स्वतः गळुन, फळांना गोड करणार्‍या फुलांचा, "काही वेगळी फुले" अशी थीम घेऊन प्रकाशाचित्र प्रदर्शित करण्याचा विचार आहे. नेहमीच्या फुलांपेक्षा वेगळी (म्हणजे, फळांची, मसाल्यांची इ.), म्हणजेच आपल्या रोजच्या वापरातील पण त्याची फुले जास्त पाहण्यात आलेली नसतील अशी थीम सादर करायची आहे.
आपण सगळ्यांनी मिळुन सादर करूया का?
माझ्याकडे सध्या करवंद, डाळिंब, पपनस, पडवळ, कापूस, कारली, तेजपत्ता, भोपळा, कांदा अशा काही फुलांची प्रचि आहेत.
कुणाकडे अशा काही वेगळ्या फुलांच्या प्रचि असतील आणि जर कुणी इच्छुक Proud असेल तर त्यांनी प्रचि मला ईमेल करा. सगळे प्रचि एकत्रित करून प्रचि विभागात एक धागा उघडुया. Happy

दिनेशदा, तुमच्याकडे कढिपत्त्याचे फुल बघितल्याचे आठवतंय. Happy

जिप्स्या माझी थिम चोरतोयस. Lol एक वर्ष झाल मी हा विचार करून आणि आज टाकेन उद्या टाकेन करत राहून जात आहे. तुला कापुस, करवंद चे फोटो मी नि.ग. च्या गप्पांवर टाकलेले आहेत ते शोधून घेता येईतील तुला. अजुन बघते काय मिळतय ते. कारल्या, दुधी साठी मी रानी माझ्या मळ्यामंदी हा धागा काढला होता त्यात आहे.

Pages