क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

PPT वरची अक्षरं... decipher वापरुन सरळ करुन घे.. कोणता Decipher ते code मधे आहे. आणि मग ती सरळ झालेली अक्षरं + १.१०.३२ वापरून सर्च कर..

लेव्हल ८ वर.. कित्ती वेळ.. काहीच कळत नाहीये.. Sad

७ मधील दोन माणसांचं आणि सोकोमधील हिंटचं कनेक्शन आहे बघा!

आणि ती दोन माणसं व तिसरं चित्र एकत्र करून आपल्या 'बेष्ट फ्रेंड'चं दार ठोठाऊन पाहा. उत्तर मिळेल. Happy

५व्या करीता सर्व नावं टाकून गुगल इमेज सर्च केलं पण अनेक इमेजेस येतायत नी त्यात काहीच common नाही दिसत आहे Sad

रायगड सर्वात ऑब्व्हिअस उत्तर शोधा, मी पण फार क्लिष्ट उत्तर शोधत होते काल खुप वेळ. पण अगदी पटकन मनात येणारे उत्तर लिहा Happy

मामी, बदला लो : भारी :
आठवर अडकलेय एल चा सात करायचा हे कळलं पण कोणत्या शब्दात ? मी ट्रॅकवर आहे का ?

नंदू आणि गिरीकंद,
लोक एखादा संदेश गुप्त पद्धतीने पाठवायला तो सायफर वापरून एन्क्रिप्ट करतात. आता तुम्हांला जनरल कोणकोणते सायफर असतात ते गूगल वापरून समजेल. त्यातलं एक वापरायचंय. (कुठलं वापरायचंय हेदेखील दिलंय.) ऑनलाईन डिकोडर आहेत त्यासाठी. एकदा इमेजमधला मेसेज उलगडला की सोर्स क्लू वापरून गुगला.

बरं, एक मोठ्ठा क्लू. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वर्ड असतं, एक्सेल असतं, पण यांनी पॉवरपॉइंटच का वापरलं? कदाचित त्यांना खात्री असेल की उत्तर त्यातच मिळेल. Wink

Pages