२ वाट्या किसलेला मुळा. (मोठ्या किसणीने किसावा किंवा फूड प्रोसेसरमधून काढावा. बारीक चिरला तरी चालेल.)
अर्धी वाटी खोवलेले ओले खोबरे
अर्धी वाटी बारीक चिरलेला पांढरा पातीचा कांदा. (पात नको, साधा पांढरा कांदा चालेल.)
१ चमचा लिंबाचा रस
मीठ
साखर
फोडणीसाठी-
१ चमचा पांढरे तीळ
अर्धा चमचा जिरे-मोहरी
अर्धा चमचा ओवा
अर्धा चमचा लाल मिरचीचे बी
तेल
-ऐच्छिक
हिरवी मिरची, मुळ्याची पाने, कोथिंबीर
१ लसूण पाकळी, बारीक चिरलेली
दही
-मुळा, खोबरे, कांदा एकत्र करुन घ्यावे.
- तीळ, मोहरी-जिरे, ओवा, मिरचीचे बी यांची फोडणी करुन मिश्रणावर घालावी. (हिरवी मिरची वापरायची असेल तर फोडणीत घालावी.)
- वाढण्यापूर्वी लिंबाचा रस, मीठ, साखर घालून नीट मिसळून घ्यावे.
यात मुळ्याचा पाला आणि हिरवी मिरची आहे-
अजून एक फोटो-
ही कोशिंबीरच आहे. मुळ्याचे पाणी काढू नये. ज्यांना आवडतो त्यांना आवडेलच पण खोबर्यामुळे उग्र चव कमी होते त्यामुळे बाकीच्यांनीही करुन पहा.
शुभ्र हवी असेल तर मुळ्याचा पाला, कोथिंबीर इ. घालू नये.
ही कोशिंबीरच आहे.>> मग
ही कोशिंबीरच आहे.>> मग श्वेतांबीर म्हणायचे का?
चांगली वाटतेय
नाव छान आहे..
नाव छान आहे..
रंगसंगती छान दिसते आहे. मला
रंगसंगती छान दिसते आहे.
मला श्वेतांबीर, लालांबीर दही घालून आवडतात. आता अशी करून बघेन.
रंगसंगती? अहो शुभ्रच ठेवायची
रंगसंगती?
अहो शुभ्रच ठेवायची आहे.
लसूण घातलात तर फोडणीत घाला.
लांबून पाहिलं तर मोगर्याच्या
लांबून पाहिलं तर मोगर्याच्या फुलांचा साचा वाटतोय :).
मस्त! आजच करून बघणेत येईल
मस्त!
आजच करून बघणेत येईल
आँ? मग पाला कशाला घातला!
आँ? मग पाला कशाला घातला!
लांबून पाहून मला पातळ पोहे
लांबून पाहून मला पातळ पोहे वाटलो
फोटो चांगलाय पण त्याला भुलून मी करणार नाहीय. धन्यवाद
नुस्ता फोटो बघितला तर दहीपोहे
नुस्ता फोटो बघितला तर दहीपोहे वाटले. मग वाचायला घेतल्यावर, गूळ-खोबरं म्हंटल्यावर काहीतरी गोडाचा पदार्थ वाटला. त्यानंतर पातीचा कांदा वाचल्यावर पुढे वाचू की नको असं झालं. पण नेट लावून अख्खी कृती वाचल्यावर आवडली. करून बघेन.
मलाही आधी मुळा च्या ऐवजी गुळ
मलाही आधी मुळा च्या ऐवजी गुळ च दिसला ..
पण रेसिपी मस्त आहे .. नाविन्य आहे .. मी करून बघेन ..
नक्की करून बघेन, मला मुळा खूप
नक्की करून बघेन, मला मुळा खूप आवडतो कच्चा खायला.
मुळा पाहून मी नाक मुरडले
मुळा पाहून मी नाक मुरडले मुळ्याची पीठ पेरलेली भाजी त्यातल्यात्यात बरी लागते.
'श्वेतांबरी' म्हणजे एखादा देखणा, नाजूक-साजूक गोड पदार्थ असेल असं वाटलं होतं
छानच आहे पाककृती ! पार्टीत
छानच आहे पाककृती ! पार्टीत मस्त दिसेल. नावही खासच दिलेस !
फोटो चांगलाय पण त्याला भुलून
फोटो चांगलाय पण त्याला भुलून मी करणार नाहीय. धन्यवाद >>>> मी पण!
<< फोटो चांगलाय पण त्याला
<< फोटो चांगलाय पण त्याला भुलून मी करणार नाहीय. >>
मुळ्यापासून धन्यवाद
काल केली होती ही श्वेतांबरी
काल केली होती ही श्वेतांबरी
ओवा, तीळ आणि मिरचीचं बी ह्याची अफलातून चव आली होती. मी हि.मि च्या ऐवजी, मिरचीचं बी आणि थोडे फ्लेक्स टाकले.
धन्यवाद अन्कॅनी, मस्त रेसिपीसाठी.
धन्यवाद. नवीन फोटो टाकलाय.
धन्यवाद.
नवीन फोटो टाकलाय.
मी पण मुळाप्रेमी!! मुळ्याची
मी पण मुळाप्रेमी!! मुळ्याची पीठ पेरून भाजी, मुळ्याची दही घालून / चणाडाळ भिजवून, वाटून व लिम्बू पिळून केलेली कोशींबीर मस्त लागते. आता अजून ह्या नव्या रेसिपीची भर! व्वा!!
मुळ्यापासून धन्यवाद >> मुळा
मुळ्यापासून धन्यवाद >>
मुळा सोडून बाकीचे सगळे पदार्थ आणि फोटो तोंपासु.
नाव तर खासच.
मला आवडेल ही. रच्याकने,
मला आवडेल ही.
रच्याकने, श्वेतांबरी हे दूरदर्शनवरच्या पहिल्या मराठी सिरियलचे नाव होते, त्यात विनया जोगळेकर, विक्रम गोखले, मोहन गोखले, वृषाली गोखले होते... चक्क १३ भागात संपली होती ती.
हे तर माझं नाव आहे, मस्तच
हे तर माझं नाव आहे, मस्तच रेसिपी करुन पहायला हवी.... दिनेशदा त्याच सिरियल वरुन माझ नाव श्वेतांबरी ठेवलं काकाने.....
वा छानच की. नक्की करून
वा छानच की. नक्की करून पहाणार. मी ओल्या खोब-यावैवजी दाण्याचे कुट घालायची आता ओ.खो. घालून पहाते.
मला पोह्यांसारखे वाटत आहे.
मला पोह्यांसारखे वाटत आहे. छान वेगळा पदार्थ आहे.
मुळ्याची कोशिंबीर ! माझी
मुळ्याची कोशिंबीर ! माझी अत्यंत आवडती मी जोडीला दाण्याचं कूटही घालते.
आम्ही मुळ्याची फक्त हिरवी
आम्ही मुळ्याची फक्त हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबु किंवा ईडलिंबु (गलगल /खट्टा /किम्ब) पिळतो. आता अशीही करुन बघणार. सिझन येतोच आहे मुळ्यांचा.
मुळ्याची कोशिंबीर माझा आवडता
मुळ्याची कोशिंबीर माझा आवडता पदार्थ. मी ओ.खो स्वैपाकात क्वचित वापरते. आता या पद्धतीने एकदा करून बघणार.
<<< रच्याकने, श्वेतांबरी हे
<<< रच्याकने, श्वेतांबरी हे दूरदर्शनवरच्या पहिल्या मराठी सिरियलचे नाव होते, त्यात विनया जोगळेकर, विक्रम गोखले, मोहन गोखले, वृषाली गोखले होते... चक्क १३ भागात संपली होती ती.
त्या मालिकेचं नांव श्वेतांबरा होतं .
त्या निमित्ताने मुळा आणला
त्या निमित्ताने मुळा आणला जाईल. नाहीतर ये किस खेत की मूली है असेच आमचे मुळ्याच्या बाबतीत धोरण आहे. फोटो बाकी मस्त आले आहेत. प्लेट च्या बाजूने सजावट म्हणून एक मोगर्याचा गजरा ठेवावा. बारक्या पोरी डोक्यावर घालतात तसा. अर्ध गोलाकार.
मामी, मुलीके पराठे पण मस्त
मामी, मुलीके पराठे पण मस्त लागतात हो. आणत चला मुळा.:)
मी भगिनीला ही रेसिपी फोनवरून
मी भगिनीला ही रेसिपी फोनवरून सांगितली! आता करून बघणार. तीळ, ओवा, जिरं-मोहरीची फोडणी व मिरचीचं बी यांचा स्वाद वेगळा लागत असणार!
Pages