श्वेतांबरी

Submitted by लोला on 14 October, 2011 - 13:03
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या किसलेला मुळा. (मोठ्या किसणीने किसावा किंवा फूड प्रोसेसरमधून काढावा. बारीक चिरला तरी चालेल.)
अर्धी वाटी खोवलेले ओले खोबरे
अर्धी वाटी बारीक चिरलेला पांढरा पातीचा कांदा. (पात नको, साधा पांढरा कांदा चालेल.)
१ चमचा लिंबाचा रस
मीठ
साखर

फोडणीसाठी-
१ चमचा पांढरे तीळ
अर्धा चमचा जिरे-मोहरी
अर्धा चमचा ओवा
अर्धा चमचा लाल मिरचीचे बी
तेल

-ऐच्छिक
हिरवी मिरची, मुळ्याची पाने, कोथिंबीर
१ लसूण पाकळी, बारीक चिरलेली
दही

क्रमवार पाककृती: 

-मुळा, खोबरे, कांदा एकत्र करुन घ्यावे.
- तीळ, मोहरी-जिरे, ओवा, मिरचीचे बी यांची फोडणी करुन मिश्रणावर घालावी. (हिरवी मिरची वापरायची असेल तर फोडणीत घालावी.)
- वाढण्यापूर्वी लिंबाचा रस, मीठ, साखर घालून नीट मिसळून घ्यावे.

यात मुळ्याचा पाला आणि हिरवी मिरची आहे-

koshimbir.jpg

अजून एक फोटो-

koshi1.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ मुळाप्रेमी
अधिक टिपा: 

ही कोशिंबीरच आहे. Happy मुळ्याचे पाणी काढू नये. ज्यांना आवडतो त्यांना आवडेलच पण खोबर्‍यामुळे उग्र चव कमी होते त्यामुळे बाकीच्यांनीही करुन पहा.
शुभ्र हवी असेल तर मुळ्याचा पाला, कोथिंबीर इ. घालू नये.

माहितीचा स्रोत: 
मी, मुळाप्रेमी.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल ही रेसिपी वाचल्यावर मुद्दाम मुळा आणुन आज सकाळी करुन खाल्ली. अगदी सेम हीच रेसिपी वापरली नाही पण साधारण जवळपास जाणारी (लेकीला कांदा नी खोबरे अजिबत चालत नाही त्यामुळे कटाप केले, तिला दही हवे होते म्हणुन दही घातले) केली. अतिशय सुंदर लागली. सगळे घटक वापरुन केली तर अजुन छान लागेल. Happy

मुळ्यापासून धन्यवाद>>> Lol
मुळ्याची कोशिंबीर फार आवडते मला आणि पराठेही..
नक्की करून बघणार. Happy

Pages