श्वेतांबरी

Submitted by लोला on 14 October, 2011 - 13:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या किसलेला मुळा. (मोठ्या किसणीने किसावा किंवा फूड प्रोसेसरमधून काढावा. बारीक चिरला तरी चालेल.)
अर्धी वाटी खोवलेले ओले खोबरे
अर्धी वाटी बारीक चिरलेला पांढरा पातीचा कांदा. (पात नको, साधा पांढरा कांदा चालेल.)
१ चमचा लिंबाचा रस
मीठ
साखर

फोडणीसाठी-
१ चमचा पांढरे तीळ
अर्धा चमचा जिरे-मोहरी
अर्धा चमचा ओवा
अर्धा चमचा लाल मिरचीचे बी
तेल

-ऐच्छिक
हिरवी मिरची, मुळ्याची पाने, कोथिंबीर
१ लसूण पाकळी, बारीक चिरलेली
दही

क्रमवार पाककृती: 

-मुळा, खोबरे, कांदा एकत्र करुन घ्यावे.
- तीळ, मोहरी-जिरे, ओवा, मिरचीचे बी यांची फोडणी करुन मिश्रणावर घालावी. (हिरवी मिरची वापरायची असेल तर फोडणीत घालावी.)
- वाढण्यापूर्वी लिंबाचा रस, मीठ, साखर घालून नीट मिसळून घ्यावे.

यात मुळ्याचा पाला आणि हिरवी मिरची आहे-

koshimbir.jpg

अजून एक फोटो-

koshi1.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ मुळाप्रेमी
अधिक टिपा: 

ही कोशिंबीरच आहे. Happy मुळ्याचे पाणी काढू नये. ज्यांना आवडतो त्यांना आवडेलच पण खोबर्‍यामुळे उग्र चव कमी होते त्यामुळे बाकीच्यांनीही करुन पहा.
शुभ्र हवी असेल तर मुळ्याचा पाला, कोथिंबीर इ. घालू नये.

माहितीचा स्रोत: 
मी, मुळाप्रेमी.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुस्ता फोटो बघितला तर दहीपोहे वाटले. मग वाचायला घेतल्यावर, गूळ-खोबरं म्हंटल्यावर काहीतरी गोडाचा पदार्थ वाटला. त्यानंतर पातीचा कांदा वाचल्यावर पुढे वाचू की नको असं झालं. Proud पण नेट लावून अख्खी कृती वाचल्यावर आवडली. करून बघेन.

मुळा पाहून मी नाक मुरडले Proud मुळ्याची पीठ पेरलेली भाजी त्यातल्यात्यात बरी लागते.
'श्वेतांबरी' म्हणजे एखादा देखणा, नाजूक-साजूक गोड पदार्थ असेल असं वाटलं होतं Happy

काल केली होती ही श्वेतांबरी Happy
ओवा, तीळ आणि मिरचीचं बी ह्याची अफलातून चव आली होती. मी हि.मि च्या ऐवजी, मिरचीचं बी आणि थोडे फ्लेक्स टाकले.
धन्यवाद अन्कॅनी, मस्त रेसिपीसाठी.

मी पण मुळाप्रेमी!! मुळ्याची पीठ पेरून भाजी, मुळ्याची दही घालून / चणाडाळ भिजवून, वाटून व लिम्बू पिळून केलेली कोशींबीर मस्त लागते. आता अजून ह्या नव्या रेसिपीची भर! व्वा!!

मला आवडेल ही.

रच्याकने, श्वेतांबरी हे दूरदर्शनवरच्या पहिल्या मराठी सिरियलचे नाव होते, त्यात विनया जोगळेकर, विक्रम गोखले, मोहन गोखले, वृषाली गोखले होते... चक्क १३ भागात संपली होती ती.

हे तर माझं नाव आहे, मस्तच रेसिपी करुन पहायला हवी.... दिनेशदा त्याच सिरियल वरुन माझ नाव श्वेतांबरी ठेवलं काकाने.....

वा छानच की. नक्की करून पहाणार. मी ओल्या खोब-यावैवजी दाण्याचे कुट घालायची आता ओ.खो. घालून पहाते. Happy

आम्ही मुळ्याची फक्त हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबु किंवा ईडलिंबु (गलगल /खट्टा /किम्ब) पिळतो. आता अशीही करुन बघणार. सिझन येतोच आहे मुळ्यांचा.

<<< रच्याकने, श्वेतांबरी हे दूरदर्शनवरच्या पहिल्या मराठी सिरियलचे नाव होते, त्यात विनया जोगळेकर, विक्रम गोखले, मोहन गोखले, वृषाली गोखले होते... चक्क १३ भागात संपली होती ती.

त्या मालिकेचं नांव श्वेतांबरा होतं .

त्या निमित्ताने मुळा आणला जाईल. नाहीतर ये किस खेत की मूली है असेच आमचे मुळ्याच्या बाबतीत धोरण आहे. फोटो बाकी मस्त आले आहेत. प्लेट च्या बाजूने सजावट म्हणून एक मोगर्‍याचा गजरा ठेवावा. बारक्या पोरी डोक्यावर घालतात तसा. अर्ध गोलाकार.

मी भगिनीला ही रेसिपी फोनवरून सांगितली! Proud आता करून बघणार. तीळ, ओवा, जिरं-मोहरीची फोडणी व मिरचीचं बी यांचा स्वाद वेगळा लागत असणार!

Pages