नक्षीदार पौष्टीक पराठे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 October, 2011 - 02:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक पेस्ट १ वाटी (थोड्याश्या पाण्यात वाफवून पेस्ट करावी)
अर्धा चमचा आले-लसुण पेस्ट
१ किसलेला गाजर
थोडी कोथिंबीर चिरुन
हिंग, हळद
गोडा मसाला १ चमचा
मिठ
साजूक तुप
गव्हाचे पिठ अंदाजे ३ वाट्या

क्रमवार पाककृती: 

तूप सोडून वरील सगळ जिन्नस हळू हळू पाणी टाकत चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या. पाणी आधीच जास्त घालू नका कारण पालकाच्या पेस्टचा आधीच ओलसरपणा असतो. मळून झाले की चमचाभर तेल टाकुन त्यातून गोळा मळा म्हणजे पिठ चिकटणार नाही (आता रोज चपात्या करणार्‍या मला म्हणतील ही काय सांगते आम्हाला ? :हाहा:)

आता गोळे करुन पराठे लाटा बघा कशी नक्षी तयार झाली (पुर्वी बांगडीच्या तुकड्यांची अशी नक्षी केलीच असेल तुम्ही)

चला आता तव्यावर टाका आणि भाजताना मस्त साजुक तुपाची धार पसरवा. कसा खमंग वास पसरतो.

सॉस, चटणी कशाही बरोबर खा.

वाढणी/प्रमाण: 
कमीत कमी प्रत्येकी दोन.
अधिक टिपा: 

ह्यात अजुन मटारची पेस्ट करुन टाकु शकता, मेथी चिरुन टाकू शकता.
असेच बिट वाफवून त्याची पेस्ट करुनही टाकू शकता पण ते पराठे पुर्ण लाल होतात.
आले-लसूण पालकातच टाकुन पेस्ट केली तर वेळ वाचतो.

माहितीचा स्रोत: 
माझेच उपद्व्याप
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages