नक्षीदार पौष्टीक पराठे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 October, 2011 - 02:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक पेस्ट १ वाटी (थोड्याश्या पाण्यात वाफवून पेस्ट करावी)
अर्धा चमचा आले-लसुण पेस्ट
१ किसलेला गाजर
थोडी कोथिंबीर चिरुन
हिंग, हळद
गोडा मसाला १ चमचा
मिठ
साजूक तुप
गव्हाचे पिठ अंदाजे ३ वाट्या

क्रमवार पाककृती: 

तूप सोडून वरील सगळ जिन्नस हळू हळू पाणी टाकत चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या. पाणी आधीच जास्त घालू नका कारण पालकाच्या पेस्टचा आधीच ओलसरपणा असतो. मळून झाले की चमचाभर तेल टाकुन त्यातून गोळा मळा म्हणजे पिठ चिकटणार नाही (आता रोज चपात्या करणार्‍या मला म्हणतील ही काय सांगते आम्हाला ? :हाहा:)

आता गोळे करुन पराठे लाटा बघा कशी नक्षी तयार झाली (पुर्वी बांगडीच्या तुकड्यांची अशी नक्षी केलीच असेल तुम्ही)

चला आता तव्यावर टाका आणि भाजताना मस्त साजुक तुपाची धार पसरवा. कसा खमंग वास पसरतो.

सॉस, चटणी कशाही बरोबर खा.

वाढणी/प्रमाण: 
कमीत कमी प्रत्येकी दोन.
अधिक टिपा: 

ह्यात अजुन मटारची पेस्ट करुन टाकु शकता, मेथी चिरुन टाकू शकता.
असेच बिट वाफवून त्याची पेस्ट करुनही टाकू शकता पण ते पराठे पुर्ण लाल होतात.
आले-लसूण पालकातच टाकुन पेस्ट केली तर वेळ वाचतो.

माहितीचा स्रोत: 
माझेच उपद्व्याप
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक प्रश्न पडलाय इथे...
हिंग आणि गोडा मसाला घातला का पीठ मळताना..
आणि नाही घातला तरी चालू शकेल ना???

शोभू, दुर्गा धन्स.

दुर्गा नाही घातल तरी चालेल. गोडा मसाला ऐवजी धणे-जिरे पुड किंवा नुसत जिर भाजून पुड करुन घातली तरी चालेल. आणि दोन्ही नाही घातलस तरी चालेल फक्त त्याच्या रुचकरपणात थोडा फरक पडेल.

हाय जागु,

मला सांग कि हे पराठे हिरवे कसे नाहि दिसत? मि केले कि पाल्का चा हिरवा रंग येतो.हे तर पांढरे आहेत..

मस्त आहेत जागू....
मला नीट रेसिपी लिहिता येत नाही म्हणुन इथेच टाकते तु जे पालक आनि गाजर १त्र कणीक मळलीस त्यच्या एवजी वेगवेगळी कणीक भिजवायची आणि प्रत्येकी १ १ गोळा घ्यायचा आणि १त्र पोळी लाटायची २रंगी मस्त पराठा तयार होतो. त्यच्यात लाल रंग यायला बीट वापरता येते.

डिजे, पालक कमी प्रमाणात घ्यायचा कारण गाजर, इतर साहित्यही असतच.

पियापेटी, अश्विनीमामी धन्स.

जागू, आम्ही तूमच्याकडे खाल्ली तशी तांदळाची भाकरी पण करता येईल. ती भाजल्यावर पण शुभ्र रहात असल्याने रंग उठून दिसतील.

दिनेशदा चांगली आहे ट्राय करुन बघेन. पण हे सगळे जिन्नस टाकल्यावर त्या थापायला कठीण पडतील. कारण ते जिन्नस परातीला चिकटेल.

मस्त गम जागु Happy

मी करते त्यात गाजर किसुन आणि पालक बारीक चिरुन टाकते आणो पाभा मसाला किंवा धणे जिरे पावडर घालते Happy

बीट किसुन घातले तर मस्त गुलाबी रंग येतो पराठे किंवा धिरड्यांना Happy

भाकरीत गाजर अगदी बारिक किसून घालायचे, मग नाही चिकटत.
कोकणात अश्या भाकर्‍या गाजर, फणस वगैरे उकडून त्याच्या गरात पिठ भिजवून करतात.

सुमे, स्मितू धन्स.

हो लाजो मी पण बिट घालायचे आधी. पण हल्ली श्रावणी बिट बघुन खात नाही म्हणून टाकत नाही.

दिनेशदा आता नक्कीच ट्राय करेन.

बिफिकीर Lol

मी उरणला राहते. डॉ. कैलास आले होते माझ्या घरी. फक्त पन्हे पिऊन गेले. आता त्यांना घेऊन या पराठे खायला Lol

राहते. डॉ. कैलास आले होते माझ्या घरी. फक्त पन्हे पिऊन >>> तेव्हा तु रेसिपी टाकत नसशील Happy

आता सगळे जण तुझ्याकडे यायचा प्लॅन करतायेत ना. बाकी मी आता गावाला जाणार तेव्हा गाडी उरण फाट्याला वळवणार. All da Best

मामी, मैना, अवनी, नलिनी, अन्कॅनी, आरती, शांकली धन्स.

मोना उरण फाट्यावरून अर्धा तास लागतो Happy

Pages