हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटवरची पुस्तके खरी असतात का? मागे (की इथेच) ती पुस्तके डमी/नकली असतात असे वाचल्यासारखे वाटतेय. डमी/नकली म्हणजे काय?

आणि हो, पहिल्यांदा पार्वती पाटील हे नाव वाचलं तेव्हा मी उडालोच!

नेटवरची पुस्तके नावे व रोलिंग बाईचे नाव वाचून घ्या.. ओरिजिनल पुस्तकेही पी डी एफ मध्ये उपलब्ध आहेत.

डमी पुस्तके म्हणजे तीच पात्रे, वेगळी कथा, जी रोलिंग बाईने लिहिलेली नाहीत. पुस्तकाची नावे बघितल्यावर अशी पुस्तके समजतात.. उदा.. हॅरी पॉटर अँड चायनीज डॉल वगैरे ...

जामोप्या,
मी तुमच्या मानगुटीवर बसणार!
इंग्रजी मधून वाचा आधी.

>>
वाल्या कोळी | 9 October, 2011 - 20:36

मोनिंग मर्टल म्हणजे मायुस मीनाला नेमके कोण मारते? कालदृष्टी म्हणजे बेसिलिक साप की टॉम रिडल... बहुतेक टॉम तिला हॉरक्रक्स करण्यासाठी मारतो ना?

>>
बॅसिलिस्क.
हा साप सगळ्यात आधी मी मँड्रेक च्या पुस्तकात वाचलेला. (इंद्रजाल कॉमिक्स)
तोच त्या पोरीचा जीव घेतो. या नंतर कोणताही होरक्रक्स बनत नाही.

वॉल्डेमॉर्टने ७ हॉरक्रक्स करताना प्रत्येकी एक असे खून केलेले असतात.. ते कोण आणि कधी त्यांचा उल्लेख पुस्तकात नाही.... रोलिंग बाईनी तिच्या वेबसाइट्वर , पॉटरमोरवर अशा गोष्टींबाबत नंतर खुलासा केलेला आहे.... इथे त्याची लिस्ट आहे... http://harrypotter.wikia.com/wiki/Horcrux रोलिंगबाईनी तर प्रोफेसर क्विरेललादेखील टेंपरारी हॉरक्रक्स म्हतले आहे.

हॅरीच्या आईला मारताना हॅरी हा अ‍ॅक्सिडेंटली हॉरक्रक्स होतो.... मग शेवटच्या बॅटलच्या वेळेला इतक्या लोकाना मारताना तितकीच जिवंत माणसे समोर असताना ती जिवंत माणसे त्या मेलेल्या माणसांमुळे वॉल्डेमॉर्टची का हॉरक्रक्स होत नाहीत? Proud

माझ्याकडे काही भाग हिंदीत आहेत, काही इंग्रजीत आहेत.. आता उरलेले मराठी मिळाले तर बरे होईल.

Proud

ऋयाम Lol तुला खरंतर धन्यवादच म्हणणार होते पण आता नाही म्हणणार Happy

मग शेवटच्या बॅटलच्या वेळेला इतक्या लोकाना मारताना तितकीच जिवंत माणसे समोर असताना ती जिवंत माणसे त्या मेलेल्या माणसांमुळे वॉल्डेमॉर्टची का हॉरक्रक्स होत नाहीत?>>>>>>>>>> जामोप्या, रोज घरी जावुन हॅपॉ बघता किंवा वाचता का हो??? Happy
accidents dont happen always हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर... खरं तर हॅरीला मारताना वोल्डीचा हॉरक्रक्स बनवण्याचा काहीच प्लॅन नव्हता.. पण तो चुकुन झाला... कदाचीत it was most evil act by voldemort म्हणुन.... शेवटच्या लढाईत जरी त्याने कितीही लोकांना मारले तरी हॉर्क्रक्स बनले नाहीत कारण वोल्डीला हॉरक्रक्स बनवायचेच नसतात, accidents dont happen always आणि कदाचीत ते मर्डर म्हणावे तितके evil नसावेत... आणि केला खून की बनला हॉर्क्रक्स असं नाहिये ना, त्यामुळे प्रत्येक खूनागणीस हॉरक्रक्स बनायला हवा ही अपेक्षा चुकीची आहे...

आणि केला खून की बनला हॉर्क्रक्स असं नाहिये ना,>> हॉरक्रक्स बनवण्यासाठी खूनासोबत काही मंत्र म्हणायची पण गरज असते.

वोल्डी जेव्हा हॅरीला मारायला येतो तेव्हा तो हॅरीला मारू शकत नाही, कारण वोल्डीचा मृत्यू हॅरीच्या हातून होइल ही डेस्टिनी असते. (आठवा कंस आणि कृष्ण) त्यामुळे जर हॅरी मेला तर कसे चालेल? वोल्डीला वाटतं की लहान हॅरीला मारलं की तो कायम अमर होइल. (खरंतर वोल्डी स्वत: हॅरी हा आपला शत्रू हे निवडतो) वोल्डी हॅरीला मारू शकत नाही, मात्र स्वत:ची शक्ती गमावतो (खरंतर तो रूढार्थाने मरतोच). त्यावेळे;आ हॅरी हा एकमेव जिवंत व्यक्ती तिथे आसपास असल्याने वोल्डीच्या काही शक्ती हॅरीच्या शरीरात जातात. (उदा. पार्सेलमाऊथ)

जामोप्या, या सर्व गोष्टी खरंतर पुस्तक वाचताना अनुभवायच्या आहेत. तुम्ही काहीही प्रश्न विचारता आहात आणी इतर लोक उत्तर देत आहेत याचा तुम्ही गैरफायदा घेत आहात. कृपया सर्व पुस्तके (हि,न्दी इंग्रजी मराठी गुजराती काय भाषेत मिळतील ते वाचा आनी मग इथे प्रश्न विचारा) धन्यवाद.

वोल्डी जेव्हा हॅरीला मारायला येतो तेव्हा तो हॅरीला मारू शकत नाही, कारण वोल्डीचा मृत्यू हॅरीच्या हातून होइल ही डेस्टिनी असते.>>>>> तीच डेस्टिनी असती तर मग आधी पुस्तक आणि नंतर सिनेमा काढून काय उपयोग झाला? Light 1 अख्खी सिरीज वॉल्डमॉर्ट हॅरीला मारतो की काय ह्या भिती वर रचली आहे.

हॅरी ही मेला असता पण त्याच्या आईनी त्याच्या करता जीव देऊन अल्टिमेट सॅक्रिफाईस केला आणि त्यामुळे हॅरीला मारताना कर्स बॅकफायर होऊन वॉल्डमोर्टची वाट लागते आणि ह्या लफड्यात हॅरी हा हॉरक्रक्स होतो आणि म्हणून शेवटी त्याला वर जाऊन यावं लागतं आणि हेन्स डेथली हॅलोज मधला एक एलिमेंट उपयोगाला येतो. Happy

मला तरी प्रश्न काहीही नाही वाटले. नुसता सिनेमा बघून कधी कधी नाही कळत नेमकं काय झालं ते आणि वरुन उत्तर द्यायलाही मजा येते. Happy

ह्याउपर आपल्याला कळलं कळलं ह्या भ्रमात असताना इथे येऊन कोणीतरी वेगळीच माहिती सांगतं आणि मग संदर्भ लागतात असंही होतं.. कधी कधी. Proud

बुवा, नसता मेला कारण जर तो मेला असता तर वोल्डी अमर झाला असता. Happy आणि तेच वोल्डीला हवे होते. पण ट्रीलॉनीने ने केलेल्य प्रोफेसीनुसार वोल्डी स्वत: आपला शतू ठरवतो. (त्या प्रोफेसीनुसार नेविल आणि हॅरी दोघे वोल्डीला मारू शकत असतात पण वोल्डी मात्र हॅरीला मारायचे ठरवतो. आणि स्वत:च्या नकळत स्वत:ला मारण्यासाठी हॅरीला पॉवर देतो. Happy त्याचसोबत "तुला मरायची गररज नाही" असे त्याने लिलीला सांगूनदेखील लिली हॅरीला वाचवण्यासाठी मारते आणि हॅरीला स्वतःचे प्रोटक्शन मरताना देते. डम्बलडोअर हॅरीला हे सर्व सांगतो तो सीन अफलातून आहे. लव इज द मोस्ट पॉवरफुल मॅजिक!!!

नंदिनी, तू दिलेलं बरोबर लिहील्य पण ज्या ऑर्डर नी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात ती ही लक्षात घ्यायला हवं. पुस्तकाच्या सुरवातीला बरीचशी कोडी त्यातल्या पात्रांना सुद्धा माहित नसतात.
ट्रेलॉनीचं प्रेडिकशनच घे. एक तर तीच्या प्रेडिकशनांवर बराच अविश्वास दाखवलाय (स्वतः मगॉनगल आणि डंबलडोअर सुद्धा अविश्वास दाखवतात)आणि नेविल किंवा हॅरी मारेल हे प्रिडिकश्न खुप उशिरा येतं मालिकेतत्यामुळे वाचकाला सतत हॅरी मरतो की काय ही भिती असतेच. थोडक्यात म्हणजे हॅरीच वॉल्डमॉर्टला मारणार असा ठाम समज कोणाचाच नसतो अगदी शेवट पर्यंत.

प्रोफेसी. (आकाशवाणी? भविष्यवाणी?)
ट्रेलाव्नी ची प्रोफेसी २ वेळा होते. पहिली ऐकून डंबलडोअर तिला नोकरी देतो. कारण त्याला माहीती असतं की ती खरी प्रोफेसी आहे.
पण, डंबलडोअर चा विश्वास नसतो प्रोफेसीज् वर. तो सांगतो, की जर व्हॉल्डेमॉर्टने विश्वास ठेवला नसता, तर ती प्रोफेसी खरी होऊच शकली नसती. आता ७वा महिना अस्ताला जातांना जन्माला आलेले २. हॅरी अन नेविल. व्हॉल्डेमॉर्ट यापैकी हाफ ब्लड असलेल्या हॅरी ची निवड करतो. अन त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. हे जर त्याने केलं नसतं, तर कुणीच 'चोसन वन' झाला नसता. किंवा नेविल झाला असता.
प्रोफेसी 'फुलफिल' करण्यासाठी, व्हॉल्डेमॉर्टने एका बाळाला निवडून 'मार्क' करणं गरजेचं होतं. हे निवडताच, ते बाळ व्हॉल्डेमॉर्टचा 'ईक्वल' बनणार होतं. डंबलडोअर हे पण सांगतो, की हॅरी, व्हॉल्डेमॉर्टने अर्धीच प्रोफेसी ऐकली आहे. उरलेली तुला अन मला ठाऊक आहे. जर तू प्रोफेसीवर विश्वास ठेवलास, तरच एक असतांना दुसरा जिवंत राहू शकत नाही, हा भाग खरा होईल. हॅरी उरलेला भाग 'फुलफिल' करतो, कारण त्याच्या प्रेमाच्या माणसांना व्हॉल्डेमॉर्टने हिरावून नेलेले असते.

अशी सगळी गम्मत आहे.

शेवटी, पहिल्या भागात जे तत्वज्ञान सांगते, तेच प्रत्येक वेळी सांगितलं आहे. Your choice matters. जगतांना तुम्ही काय ठरवता/निवडता तेच महत्वाचे. तुम्ही स्वतःला घडवा. अन दुसरं, The ancient magic of LOVE. ~wink~

मी एकही हिंदी/मराठी पुस्तक वाचलेले नाही. सिनेमे पण नीट पाहिलेले नाहीत. पण सगळी पुस्तकं मुळातून वाचली आहेत.

होरक्रक्स.
हॅरी, हा मुद्दाम केलेला होरक्रक्स नाही.
खून केल्याने, (खून ही माणसाची अती नीच- अमानवी वागणूक) the soul shatters. आत्म्याचे तुकडे होतात. त्यातला एक तुकडा, या जादूगाराने पोपटाच्या पोटात ठेवायचा असतो. हॅरीला मारण्याचा कर्स (शाप) रिबाऊंड झाल्यावर व्हॉल्डेमॉर्ट अर्धमेला (की सप्तांश-मेला?) होतो, मग हॅरी होरक्रक्स कसा होईल? आत्म्याचा तुकडा मुद्दाम लपवावा लागतो होरक्रक्स मधे. पुन्हा तो उरलेला सगळा आत्मा जातो क्विरल कडे.
टेंपररी होरक्रक्स = क्विरल.
कारण तो एक सप्तमांश आत्मा, जो हॅरीला मारताना शरीरविहिन झाला, तो त्या क्विरलच्या शरीराला 'पझेस' करतो. पण परत हे होरक्रक्स नाही. इथे दोन आत्मे जिवंत आहेत. अन व्हॉल्डी चा तुकडा नाही, तर अक्खा उरलेला व्हॉल्डी तिथे को-एक्झिस्ट करतो.

Ancient magic of LOVE...

अगदी स्नेप सुद्धा याच जादूने बांधला गेलेला आहे. प्रेम. त्याने 'जेम्स' च्या पोराचा कितीही द्वेष केला तरीही तो 'लिली'च्या पोराचं कधीच काहीही वाईट -खर्‍या अर्थाने- करू शकत नाही. कसलं खतरनाक पात्र बनवलं आहे त्या स्नेपचं.. काय मानसिक त्रास सहन केला असेल त्या हाफ ब्लड प्रिन्स ने.. सिवरस स्नेप.. लई झक्कास.. अजिबात आश्चर्य वाटत नाही हॅरीच्या पोराचं नाव सिवरस अल्बस असण्याचं..

बुवा, बरोबर आहे तुमचं. पण आता सातही पुस्तकं चोवीसवेळा वाचल्यावर मग हे लक्षात येत नाही. पहिल्यान्दा वाचताना मात्र "अब क्या होगा?" येत राहतं मनात.

पहिली ऐकून डंबलडोअर तिला नोकरी देतो. कारण त्याला माहीती असतं की ती खरी प्रोफेसी आहे.
>> इब्लिस गंमत आहे इथे. डम्बीला जरी भविष्य या विषयावरती विश्वास नसला आणी हा विषय हॉगवर्ट्समधे शिकवू नये असं मत असलं तरी या प्रोफेसीमुळे तिच्या जीवाला धोका आहे म्हणून ते तिला कॅसलमधे रहायची परवानगी देतात. सहाव्या भागात आहे ना हे?

व्हॉल्डेमॉर्ट यापैकी हाफ ब्लड असलेल्या हॅरी ची निवड करतो. अन त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. हे जर त्याने केलं नसतं, तर कुणीच 'चोसन वन' झाला नसता.>> हीच मेख आहे. वोल्डी स्वत: आपला शत्रू तयार करतो. आणि तिथे पण तो स्वत:सारख्या हाफ ब्लडची निवड करतो. पूर्ण सीरीजभर हॅरी आणि वोल्डीच्या आयुष्यातले समान धागे बघितले तर मजा येते (वँड, पार्सेलमाऊथ, अनाथ आणि मगल्समधे लहानाचेमोठे होणे इत्यादि) त्याचबरोबर हॅरीच्या प्रत्येक प्रसंगामधे रॉन आणि हर्मायनी नावाचे अँकर सतत आहेत. जिथे कुठे हॅरी चुकेल तिथे त्याला वाट दाखवायला, मदत् करायला कोण तरी आहे, वोल्डी मात्र कायम एकटाच राहतो. त्याचा कुणावरही विश्वास नाही आणि तो कुणावर प्रेम पण करत नाही (प्रेम म्हणजे रोमँटिक दृष्टीनेच नव्हे)

आस्चिग, कंस आणि कृष्ण याची कथा आठवा असं म्ह्टलं मी तिथे. मला स्वतःला तो भाग वाचताना तीच कथा आठवलेली.

आणि हो,
मी हॅरी पॉटरच्या पुस्तकांकडे तत्वज्ञानाची पुस्तकं म्हणून पहातो.
लहान मुलांना समजेल अशा भाषेत, सोपं अन सरळ तत्वज्ञान त्या बाईंनी सांगितलं, हे अन हेच त्या पुस्तकांच्या लोकप्रियतेचं कारण आहे. नाहीतर अशी बरीच पुस्तकं आलीत अन गेलीत. जगभर वेड लावेल अशी फार कमी..

ओके.
टाइपिंग पुरे करा..
रिप्लाय फार झाला!

(प्रेम म्हणजे रोमँटिक दृष्टीनेच नव्हे)

>>
सहमत @ नंदिनी.
व्हॉल्डेमॉर्ट हा प्रेमाच्या विरोधी आहे. एकटा आहे. कुणावरच कसलंच प्रेम तो करत नाही. एका दॄष्टीने तो हिटलर सारखाही आहे. 'प्युअर ब्लड' वाला. त्याच वेळी त्याचं पण बरोबर आहे.. त्याच्या आईने प्रेमच केलेलं.. अन त्या प्रेमाची ताकत आता भरपूर आहे, असा विचार करून तिने मॅजिक सोडून दिलेलं. त्याचा परिणाम काय झाला? टॉम निघून गेला हिला प्रेग्नंट असताना सोडून.. मग का नाही हा असा होणार? प्रेम द्वेष्टा?

आता ते राऊलिंग बाईंना सांग आस्चिग तू. Happy

इब्लिस, नंदिनी, मी आताशा चौथ्या पुस्तकावर आहे (सिनेमे सगळे पाहिलेत). पुढे वाचायला मजा येणार असं दिसतय.

'कंस आणि आठवा कृष्ण' असे हवे ना?>>> Happy

ह्याउपर आपल्याला कळलं कळलं ह्या भ्रमात असताना इथे येऊन कोणीतरी वेगळीच माहिती सांगतं आणि मग संदर्भ लागतात असंही होतं.. कधी कधी. >>>>>>>>>> हे मात्र अगदी खरं... असं शक्यतो पुस्तकं वाचल्यावर आणि मूव्ही बघुन थिअटरच्या बहेर आल्यावर जास्त घडायचं.. अक्षरशः दिवस दिवस चर्चा चालायच्या असं कसं म्हणुन.. मग परत पुस्तकं मिळवुन वाचावी लागायची...

लव इज द मोस्ट पॉवरफुल मॅजिक!!!>>>>>> Happy

हॅरी, हा मुद्दाम केलेला होरक्रक्स नाही.>>>>>> हो, तो चुकुन झालेला होरक्रक्स आहे... आणि ते वोल्डीलादेखील माहित नसतं... त्यामुळेच जेव्हा हॅरी शेवटी वोल्डीकडे जातो, आणि मरायला काहीच विरोध करत नाही तेव्हा त्याच्याकरता लढणार्‍यांनादेखील एक प्रकारचं प्रोटेक्शन मिलतं, जसं हॅरीला त्याच्या आईकडुन मिळालेलं असतं.. हेच हॅरी वोल्डीला शेवटच्या ड्युएल मधे सांगतो...

इब्लिस बाकीच्या पोस्टींनाही अनुमोदन... आवडल्या सगळ्या पोस्ट्स... वोल्डीची शेवटी शेवटी खूप कीव येते... आणि स्नेपच सगळ्यात जास्त वाईट वाटतं... सहाव्या भागापर्यंत नकळत का होईना त्याच्यावर विश्वास बसायला लागलेला असतो, आणि अचानक तो डम्बीला मारतो, त्यावेळेस खूप रडायला आलतं पहिल्यांदा वाचताना...

आणि लव 'अ‍ॅन्शंट' मॅजीक का?
आजही तर असते (मला तरी वाटते).>>>>>>>> अ‍ॅन्शंट म्हणजे खूप जुनं मॅजीक, म्हणजे ते आता नाहिये असं होत नाही, पण त्यानंतर बर्‍याच प्रकारचे मॅजीक डेव्हलप झाले पण लव्ह मॅजीक खूप आधीपासुन असल्याने त्याला अ‍ॅन्शंट म्हतलं असावं..

मी हॅरी पॉटरच्या पुस्तकांकडे तत्वज्ञानाची पुस्तकं म्हणून पहातो.

अगदी.. म्हणूनच ही पुस्तकं वेगळी वाटतात.. नाही तर जादू, पोपटात राक्षासाचा जीव, जादूची छडी अशा कथा कमी नाहीत.. जे के रोलिंगबाईकडे एके काळी एक कप कॉफी प्यायला पैसे नसायचे.. पण या पुस्तकानी रोलिंगबाईंचं भविष्य बदलून गेलं... त्या दृष्टीने मला रोलिंगबाई देखील स्फूर्तीदायक व्यक्तीमत्व वाटते..

<<अगदी स्नेप सुद्धा याच जादूने बांधला गेलेला आहे. प्रेम. त्याने 'जेम्स' च्या पोराचा कितीही द्वेष केला तरीही तो 'लिली'च्या पोराचं कधीच काहीही वाईट -खर्‍या अर्थाने- करू शकत नाही. कसलं खतरनाक पात्र बनवलं आहे त्या स्नेपचं.. .>>
+ १ Happy

सातव्या भागात स्नेपचे खरे रूप वाचल्यावर पुन्हा एकदा पहिली सहाही पुस्तके वाचली की काय काय अफलातून संबंध मिळतात. उदा. पेट्युनिया "दॅट ऑफुल बॉय" म्हणते तेव्हा हॅरीला (आणि आपल्याला) पण वाटतं की जेम्सबद्दल बोलतायत. Happy प्रत्यक्षात ते स्नेपबद्दल असतं.

बुवा, वाचा लवकर उरलेले भाग आणी अशाच काही गमती मिळाल्या तर लिहा इथे. Happy

पहिली ऐकून डंबलडोअर तिला नोकरी देतो. कारण त्याला माहीती असतं की ती खरी प्रोफेसी आहे.
>> इब्लिस गंमत आहे इथे. डम्बीला जरी भविष्य या विषयावरती विश्वास नसला आणी हा विषय हॉगवर्ट्समधे शिकवू नये असं मत असलं तरी या प्रोफेसीमुळे तिच्या जीवाला धोका आहे म्हणून ते तिला कॅसलमधे रहायची परवानगी देतात. सहाव्या भागात आहे ना हे?
<<
उम्म.. तिला नोकरी प्रोफेसी साठीच मिळते. कारण तो एक विषय असतो. टीचर हवीच असते. अन ही थोडं तरी प्रूव्ह करते.. मला तिच्या जिवाला धोका वगैरे काही आठवत नाहीये. असल्यास रेफरन्स देणे.

प्रेमाला प्राचिन जादू म्हटलं आहे. Ancient and not Eternal.

..कारण हे असावं की बहुधा जितकं आपण पुढे शिकतो तितक्यांदा बेसिक पासून दूर जातो. बर्‍यांचदा बेसिक्स विसरायला होतात. व्हॉल्डेमॉर्ट बेसिक्स विसरतो. विसरला नसता तर त्याने पहिला आव्हडा केडाव्हरा लिलीला दिल्यावर परत हॅरीवर वार केलाच नसता. त्याला ती प्रेमाची जादू दिसली असती हॅरीभोवती. ज्या प्रेमाखातर ती आई त्या बाळाला पोटात वाढवते - अगदी स्वत:च्या शरीरातून अन्न अन सगळं काही देऊन, अन ते बाळ शरीरा बाहेर गेल्यानंतरही तिला पान्हा फुटतो.. बेसिक्स विसरला, म्हणून त्याची गोची झाली. (परत हे तत्वज्ञान. never forget basics. never forget roots.)

<<कसलं खतरनाक पात्र बनवलं आहे त्या स्नेपचं.. .>>
+१. चित्रपटांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये स्नेप एकदाही हसल्याचे आठवत नाही. साधं स्मित देखील नाही.

Pages