हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उम्म.. तिला नोकरी प्रोफेसी साठीच मिळते. कारण तो एक विषय असतो. टीचर हवीच असते. अन ही थोडं तरी प्रूव्ह करते.. मला तिच्या जिवाला धोका वगैरे काही आठवत नाहीये. असल्यास रेफरन्स देणे.>>>>>>>>>> डम्बलडोरला खरं तर हॉगवर्ट्स मधे तो विषय चालुच करायचा नसतो, पण सिबिल एका ख्यातनाम भविष्य सांगणारणीची नात असते म्हणुन ते तिला किमान भेटण्याचं ठरवतात... मुलाखत संपता संपता ती प्रोफेसी सांगते आणि मधेच स्नेपने ती ऐकली आहे असं कळतं.. स्नेप हा डेथ इटर आहे हे माहित असतं त्यामुळे वोल्डेमॉर्टपर्यंत ही बातमी जाणार आणि त्यातुन स्य्बिल जीवाला धोका उद्भवनात म्हणुन मग मनात नसतानाही डम्बलडोर ते विषय शाळेत चालु करतात... म्हणुन तर जेव्हा अम्ब्रिज तिला टर्मिनेट करते तेव्हा पण डम्बलडोर सिबिलला शाळेबाहेर जावुन देत नाहीत...

असल्यास रेफरन्स देणे.>>>>>>>>> कोणत्या पुस्तकात आहे हे आठवत नाहिये पण कदाचीत पाचव्या भागात डम्बलडोर हॅरीला प्रोफेसी सांगताना याचा उल्लेख असावा...

अर्र अम्म.. आयम् फिलीन् लाईका पिटी मगल यु न्नो.. इन फ्रंटॉफ आशिषज् () अकेला... वेल इस्पेशिअली व्हेन आय ट्राईड टू प्रोनाऊन्स दॅट h हॅविंग इट्स लेग ब्रोकन.. Biggrin

इब्लिस. वर चिमुरीने लिहिलेच आहे पण मला सध्या पुस्तक सापडत नाहिये. खोक्यात खाली गेलय काढते आणी एक्झॅक्ट वाक्य टाकते. Happy

यु नो हू, Proud

The prophecy's smashed,' Harry said blankly. 'I was pulling Neville up those benches
in the - the room where the archway was, and I ripped his robes and it fell . . .'
The thing that smashed was merely the record of the prophecy kept by the
Department of Mysteries. But the prophecy was made to somebody, and that person has
the means of recalling it perfectly.'
'Who heard it?' asked Harry, though he thought he knew the answer already.
'I did,' said Dumbledore. 'On a cold, wet night sixteen years ago, in a room above the
bar at the Hog's Head inn. I had gone there to see an applicant for the post of Divination
teacher, though it was against my inclination to allow the subject of Divination to continue
at all. The applicant, however, was the great-great-granddaughter of a very famous, very
gifted Seer and I thought it common politeness to meet her.
I was disappointed. It seemed
to me that she had not a trace of the gift herself. I told her, courteously I hope, that I did not
think she would be suitable for the post. I turned to leave.'

मी मागचा १-दिड महिना माबोवर फिरकलेच नाही. कारण इथे वाचून हॅपॉ वाचायला सुरुवात केली तर एकापाठोपाठ एक वाचतच गेले. Happy
आता गॉब्लेट ऑफ फायर वाचतेय. संपतच आलंय.
या धाग्याला अन इथे लिहिणार्‍या लोकांना शतशः धन्यवाद! हॅरी पॉटर रॉक्स!!

आणि हो, जामोप्या यांच्या प्रश्नांमुळे भारीच करमणुक होतेय Proud Light 1

Proud

it was against my inclination to allow the subject of Divination to continue

अरे बाबा, तो विषय होताच. अन त्यासाठी मुलाखती घेणंही सुरु होतं. ट्रेलाव्निला हाकलल्यानंतर फिअरेंझ ला का घेऊन येतो डंबलडोर? त्याला बाकी सेंटॉर्स मारहाण करतात नोकरीला लागला म्हणून...

it was against my inclination to allow the subject of Divination to continue>>>>>> ओके इब्लिस... Happy तुम्ही खरच मराठीत भाषांतर करा इथे टाकण्यासाठी Happy

अरे बाबा, तो विषय होताच. अन त्यासाठी मुलाखती घेणंही सुरु होतं. ट्रेलाव्निला हाकलल्यानंतर फिअरेंझ ला का घेऊन येतो डंबलडोर? त्याला बाकी सेंटॉर्स मारहाण करतात नोकरीला लागला म्हणून...>>>>>> फिअरेंझला डम्बलडोर घेवुन येतात म्हणुन त्याला बाकीचे सेंटॉर्स त्यांच्या कळपाच्या बाहेर काढतात.... आणि त्यांनी फिरेंझला आणलं नसतं तर अंब्रिजने एखाद्या दुष्ट माणसाला सिबिलच्या जागी शिक्षक म्हणुन नेमलं असतं... decree number????

जामोप्या,
तिकडचा ३रा फोटू पण पाहिला :))
मला वाटतं, हिटलरनेच वोल्डीची कॉपी मारलिये. बेसिकली स्लिदरिन ची. वॉल्डी फक्त त्याचा वंशज.

***************** इशारा : रहस्यभेद *****************

.
.
.
टर्नर क्लॉकमध्ये दोन घटनाक्रम समांतर चालतात. बरोबर ना? त्यातला एक घटनाक्रम म्हणजे दुसर्‍या घटनाक्रमाच्याच भूतकाळातला एक तुकडा असतो. अझ्काबानच्या भागात हर्मायनी आणि हॅरी ब्लॅकला वाचवण्यासाठी टर्नर क्लॉक वापरते. त्यात शेवटी वेळ संपत आल्यावर ती आणि हॅरी घाबरलेले असतात की ते पोहचायच्या आधीच डंबलडोर त्यांचा कक्ष कुलुपबंद करतील. म्हणजे या दोघांना परत पोहचलेले बघायच्या आधीच डंबलडोरांनी टाळे ठोकण्याची शक्यता होती का? कशी? त्या तीन तासांच्या काळात वर्तमानातल्या घटनाक्रमात डंबलडोर त्या कक्षातच या दोघांच्या रिकाम्या कक्षात बसलेले असतात का? दुसरे, हॅग्रीडच्या बकबीकला आधीच मिनीस्ट्रीने मारलेले असते. मग 'त्या' तीन तासांत हर्मायनी आणि हॅरी त्याला आणि ब्लॅकला मुक्त करतात. पण त्याला आधीच मारलेले आहे हे सगळ्यांच्या स्मृतीतून गायब होते का टर्नरक्लॉकमुळे? पण हॅरी आणि हर्मायनीला तर या तीन तासांत आधी काय घडले होते, त्यांनी काय काय केले होते हे आठवत असते. मग इतरांना का नाही आठवत? हॅग्रीड गोंधळत कसा नाही - आधी बकबीकला मारले होते, आता तो जिवंत आणि मुक्त आहे, हे माहीत पडल्यावर?

Please do copy the first line of this post in your reply.

त्या तीन तासांच्या काळात वर्तमानातल्या घटनाक्रमात डंबलडोर त्या कक्षातच या दोघांच्या रिकाम्या कक्षात

डंबल्डोर त्याना तीन तास मागे पाठवतात.. म्हणजे डंबल्डोर त्या दारापाशी असतात, हाच खर्‍या वर्तमानातला क्षण असतो आणि ३ तासानी हॅरी हर्मायनी पुन्हा स्थळकाळातल्या त्याच पॉइंटला परत येतात.. डंबल्डोर कुठे जायचा प्रश्न येत नाही.

***************** इशारा : रहस्यभेद *****************

म्हणजे या दोघांना परत पोहचलेले बघायच्या आधीच डंबलडोरांनी टाळे ठोकण्याची शक्यता होती का? कशी? त्या तीन तासांच्या काळात वर्तमानातल्या घटनाक्रमात डंबलडोर त्या कक्षातच या दोघांच्या रिकाम्या कक्षात बसलेले असतात का?>>>>>>>>>>>>> जेव्हा हॅरी आणि हर्मायनी टाइम टर्नर वापरुन भुतकाळात जातात आणि परत ३ तासाने येतात तेव्हा हॉस्पिटलमधे फक्त काही क्षणच उलटलेले असतात (जेव्हडा वेळ डम्बलडोरला कक्षातुन बाहेर यायला आणि दार बंद करायला लागतो तितकेच क्षण).. हॅरी आणि हर्ममायनीने टाईम टर्नर वापरल्याने त्यांना जास्तीचे ३ तास मिळतात भूतकाळात जायला.. पण डम्बलडोरने टाईम टर्नर वापरला नसल्याने त्यांना वर्तमान काळात जास्तीचे ३ तास मिळत नाहीत म्हणुन त्यांना रिकाम्या कक्षात बसुन राहण्याची गरज नसते...

टर्नर क्लॉकमध्ये दोन घटनाक्रम समांतर चालतात.>>>>> नाही... इथे भुतकाळात जाता येतं.. त्यामुळे वर्तमानात घटना समांतर चालत नाहीत...

***************** इशारा : रहस्यभेद *****************

.
.
.
.
अण्णा, चिमुरी, धन्यवाद!
पण हॅग्रीड गोंधळत कसा नाही - आधी बकबीकला मारले होते, आता तो जिवंत आणि मुक्त आहे, हे माहीत पडल्यावर? (त्याला या तीन तासांसंबंधी काही माहिती नसते हे पुढे आलेले आहे. त्यामुळे त्याला बाजूला घेऊन हे सगळे सांगायला लागेल नाहीतर त्याच्या गोंधळामुळे कोणाला शंका येईल असे मला वाटत होते.)

इथे भुतकाळात जाता येतं.. त्यामुळे वर्तमानात घटना समांतर चालत नाहीत...>> बरोबर. पण घटना ओव्हर लॅप होतात. नंतर हॅरी जेव्हा पॅट्रोनसचार्म वापरतो तेव्हा वर्तमानातल्या हॅरीला भूतकाळातला हॅरी दिसतो. (म्हणजे दिसल्यासारखा वाटतो)

खरंतर आश्चिगने उत्तर द्यायला हवय. तो नीट समजवेल.

पण हॅग्रीड गोंधळत कसा नाही - आधी बकबीकला मारले होते, आता तो जिवंत आणि मुक्त आहे, हे माहीत पडल्यावर? (त्याला या तीन तासांसंबंधी काही माहिती नसते हे पुढे आलेले आहे. त्यामुळे त्याला बाजूला घेऊन हे सगळे सांगायला लागेल नाहीतर त्याच्या गोंधळामुळे कोणाला शंका येईल असे मला वाटत होते.)>>>>>>>>>> घडुन गेलेल्या घटना बदलता येत नाहीत, पण त्या घडायच्या आधीच त्यात काही बदल करता येतात... बकबीकला मारणार आहेत हे माहित असतं, म्हणुन हॅरी, हर्मी भुतकाळात जावुन बकबीकला मारायच्या आधीच त्याला पळवतात... त्यामुळे तो मरतच नाही आणि हॅग्रिडचा गोंधळ होत नाही

आधी बकबीकला मारले होते, आता तो जिवंत आणि मुक्त आहे, हे माहीत पडल्यावर? >>> बकबीक मरतच नाही. हॅग्रीड आणि इतर लोक जेव्हा बाहेर येतात तेव्हा भूतकाळातल्या हॅरीने वर्तमानकाळामधल्या बकबीकला मुक्त केलेले असते. बकबीक मेलाय असं कुठेच लिहिलेले नाही.

***************** इशारा : रहस्यभेद *****************

बकबीक मरतच नाही. <<< अं? असं कसं? ह्या काही ओळी बघा. (चॅप्टर - १७ : कॅट, रॅट अँड डॉग. तिरक्या अक्षरातली वाक्ये बकबीकला मारलं असंच दाखवतायत ना?)
...
The rat was squealing wildly, but not loudly enough to cover up the sounds drifting from Hagrid's garden. There was a jumble of indistinct male voices, a silence, and then, without warning, the unmistakable swish and thud of an axe.

Hermione swayed on the spot.

'They did it!' she whispered to Harry. 'I'd -- don't believe it -- they did it!'
Harry's mind had gone blank with shock. The three of them stood transfixed with horror under the Invisibility Cloak. The very last rays of the setting sun were casting a bloody light over the long-shadowed grounds. Then, behind them, they heard a wild howling.

'Hagrid,' Harry muttered. Without thinking about what he was doing, he made to turn back, but both Ron and Hermione seized his arms.

'We can't,' said Ron, who was paper-white. 'He'll be in worse trouble if they know we've been to see him....'

Hermione's breathing was shallow and uneven.

'How - could - they?' she choked. 'How could they?'

'Come on,' said Ron, whose teeth seemed to be chattering.
...

नाही, बकबीक मरत नाही.. पिक्चरमध्ये त्या माणसाचा कोयता वरुन खाली येतो, इथे कट केले आहे.. ते तीघे दु:खाने एकमेकाकडे बघतात, एवढेच दाखवले आहे... टाइम टर्नर्नंतर , त्या कोयत्याचा शॉट कंटीन्यु होतो, तेंव्हा खाली भोपळा दाखवला आहे.. भोपळ्याचा फट्ट असा आवाज होतो आणि पक्षी उडून जातात.. पण त्याआधीच त्यानी बकबीकला पळवलेले असते.

पुस्तकातही बकबीक मेलेल्याचा उल्लेख नाहिये... तिथे असं म्हटलं आहे की हॅरी, हर्मी ला हॅग्रिडच्या किंचाळण्याचा आवाज येतो (जो की तो आनंदाने ओरडलेला असतो).. जेव्हा हॅग्रिड हॅरीला शेवटी तळ्याजवळ भेटतो तेव्हा तो सांगतो, की बकबीक पळुन गेला म्हणुन.. म्हणजे बकबीक मेलेलाच नसतो

Pages