हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मी पण अझ्काबान बघितला. मला पिक्चर कधीच फारसे आवडले नाहीत. उगाच कुठले तरी सीन लांबच्यालांब शॉटमधे घेऊन महत्त्वचे प्रसंग संपवतात ते बिल्कुल आवडले नाही. आणि पिक्चरमधे कायम सगळेच लोक मगल कपड्यामधे वावरताना दिसतात (अपवाद पहिला आणि दुसरा पिक्चर)

ज्या लोकांनी पुस्तकं वाचली नाहीयेत, त्यांना चित्रपट नीट कळत असेल का असा प्रश्न पडला मला. >>> नक्कीच कळत नाही. आणि मग भर टॉकिजमधे "हा कोण आहे?" "याला कसं माहित?" "असं का झालं?" "हे इथले लोक कुठे गेले?" असे प्रश्न विचारत विचारत वैताग आणतात.

त्याला त्या पूर्ण चित्रपटात सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर डेमाँटर. >>>>>>>>> अरे बापरे... कदाचीत आपण त्याबद्दल वाचलं असल्याने आपल्यालाच भिती वातत असेल... बघताना भिती वाटत नाही म्हणा.. जे पुस्तक न वाचता सिनेमा बघतात त्यांना सिनेमा कळतो पण वळत नाही.. हे असं का ते तसं का हे त्यांना कधीच कळत नाही.. पुस्तक वाचताना आपण जे इमॅजिन करतो ना तोच खरा सिनेमा... Happy

पिक्चरमध्ये फक्त भडक दृष्ये घेण्यावर भर आहे.. त्यामुळे फक्त तसेच प्रसंग घेऊन त्यांची सिरीज केली आहे.. त्यात कथानकही पूर्ण उतरु शकलेले नाही.. पुस्तक वाचताना लक्षात येते. पण त्याला इलाज नाही... सगळे पुस्तक जसेच्या तसे करायचे झाले तर एकेका पुस्तकावरच आठ भाग येतील.

नमस्कार!

हॅरी पॉटरवर सिनेमा काढण्यापेक्षा मालिका काढायला पाहिजे होती. तर जरा कुठेतरी सूर्याची काजव्याने आरती.. वगैरे वगैरे... म्हणता आले असते.

ऑर्डर ऑफ फिनिक्स मध्ये ल्युनाचे सगळे सामान कुणीतरी चोरत असतो.. ते का? कोण करत असतो? पिक्चरमध्ये ती हॅरीला शेवटी सगळे सामान हरवत असल्याचे सांगते आणि त्यांच्या डोकीवर छताला तिचे बूट टांगलेले तिला दिसतात, इतकेच दाखवले आहे.

हाफ ब्लड प्रिन्स मध्ये ड्रॅको मालफॉय एका जुन्या कपाटासमोर उभे राहून काहीतरी करत असतो. त्या कपाटाचे रहस्य काय असते? पिक्चरमध्ये नीट दाखवले नाही.

मॅलफॉय वॅनिशींग कॅबिनेटच्या जोडीतली एक बिघडलेली कॅबिनेट दुरुस्त करायचा प्रयत्न करत असतो. शेवटी तो यशस्वी होतो आणि त्या दोन कॅबिनेटच्या मदतीने डेथ ईटर्स हॉगवर्ड्स मध्ये घुसतात..

ऑर्डर ऑफ फिनिक्स मध्ये ल्युनाचे सगळे सामान कुणीतरी चोरत असतो.. ते का? कोण करत असतो? ?>>> पुस्तकात आहे शेवटी. वाचा म्हणजे समजेल.

हिंदी किंवा मराठी मधे सगळे पुस्तकांचे पार्ट नाही आहे का पी डी एफ स्वरुपात.......... ?????>>>>>>>>> माझ्याकडे तरी नाहियेत

टॉम रिडल लहानपणी ( हाफ ब्लड मध्ये) आणि तरुणपणी ( चेंबर ऑफ..) किती देखणा दिसत असतो.. मग मोठेपणी वॉल्डेमॉर्ट झाल्यावर असला टकलया आणि चपट्या नाकाचा का होतो?

wa.JPG

Harry Poter whisperd sumthng in Voldemorts ears & voldemrt died on d spot…

wat do u thnk he said..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

RaJnIkAnTh is coming….!!!

चेंबर... मध्ये सगळे कोळी किडे कुठेतरी जात असतात.. गुहेत.. ते असे का जात असतात?

ड्रॅकोचे २ मित्र असतात.. क्रॅब आणि गॉयल... त्यापैकी शेवटी हॉगवर्टला आग लावणारा गॉयल तोच का? ( पुस्तकात क्रेब आग लावतो.. पिक्चरमध्ये बहुदा गोयल आहे.. )

जामोप्या, परिक्षेची तयारी सुरु असल्यासारखे प्रश्न विचारताय.. मस्त! Happy
पण पुस्तके वाचा म्हणजे सगळी उत्तरे मिळतील. तुर्तास हे वाचा.

सगळे कोळी किडे कुठेतरी जात असतात.. गुहेत.. ते असे का जात असतात?
>> साप हा कोळ्यांचा नैसर्गिक शत्रु आहे, त्यामुळे त्यांना बासिलिस्कची(चेंबरमध्ये असणारा मोठा सर्प) चाहुल सर्वात आधी लागते म्हणुन ते त्याच्यापास्न दुर जाउन अ‍ॅरगॉगच्या आश्रयाला जात असतात.

ड्रॅकोचे २ मित्र असतात.. क्रॅब आणि गॉयल... त्यापैकी शेवटी हॉगवर्टला आग लावणारा गॉयल तोच का? ( पुस्तकात क्रेब आग लावतो.. पिक्चरमध्ये बहुदा गोयल आहे.. )
>>होय. तो हॉगवर्डस ला नाही तर रुम ऑफ रीक्वायरमेंटमध्ये आग लावतो. पुस्तकात ते तिघेही (ड्रॅको, क्रॅब, गोयल) तिथे असतात. हॅरी आणि कंपनी फक्त दोघांनाच वाचवु शकतात. क्रॅबी तिकडेच मरतो.

चेंबर.. मध्ये टॉम हैग्रीडच्या कोळी किड्याला का मारतो? ( ५० वर्षापूर्वी डायरीचा सीन.)
>> टॉम त्या किड्याला मारत नाही. त्या किड्याला हॅग्रिड जंगलात सोडुन परत येताना बहुतेक तो हॅग्रिड्ला पकडवुन देतो. किडा म्हणजेच अ‍ॅरगॉग.

टॉम रिडल लहानपणी ( हाफ ब्लड मध्ये) आणि तरुणपणी ( चेंबर ऑफ..) किती देखणा दिसत असतो.. मग मोठेपणी वॉल्डेमॉर्ट झाल्यावर असला टकलया आणि चपट्या नाकाचा का होतो?
>> चौथ्या भागाचा शेवट वाचाच. Happy

********स्पॉयलर वॉर्निंग************* (खाली चेंबर ऑफ सिक्रेट्स बद्दल माहिती आहे, पुस्तक सिनेमा अजून पाहिला नसेल तर कृपया वाचू नये)

चेंबर मधले कोळी बहुतेक हॉगवर्ट्स सोडून फॉर्बिडन फॉरेस्ट मध्ये अ‍ॅरॅगॉग च्या गुहेत जात असतात कारण हॉगवर्ट्स मध्ये बॅसिलिस्क असतो आणि बॅसिलिस्क ला कोळी घाबरतात. (पण बॅसिलिस्क कोंबड्याच्या आरवण्याला घाबरतो आणि म्हणूनच जिनी कोंबड्यांना मारत असते Proud )

मध्ये टॉम हैग्रीडच्या कोळी किड्याला का मारतो? ( ५० वर्षापूर्वी डायरीचा सीन.)>>>> मारत नाही तोच अ‍ॅरॅगोग (गुहेतला). तेव्हा पण कोणीतरी चेंबर उघडतं आणि त्यामुळे एक मुलगी मरते (मोनिंग मर्टल) पण हॅग्रिड कडे अ‍ॅरॅगॉग असल्यामुळे, अ‍ॅरॅगॉगच चेंबर मध्ये होता आणी हॅग्रिडनीच चेंबर उघडलं आणि तोच हेर ऑफ स्लिदरिन आहे ...हुश्श.. असा त्याचावर आळ येतो. Happy

चिंगी, काय टायमिंग आहे. जाऊ द्या.. मी आता पोस्ट काढत नाही. शेवटी वि ऑल आर पंखाज. Proud

जामोप्या,

या धाग्यावर येऊन फक्त पिच्चर पाहून शंका काढणं थांबवलं नाही, तर मी मानगुटीवर बसून सगळी पुस्तकं वाचून घेईन तुमच्याकडून. :संताप:

मी आधी सिनेमे पाहिले आणि आता पुस्तकं घेतलीयेत वाचायला. पुरवून पुरवून वाचतो (लवकर संपायला नको म्हणून). Happy

वैद्यबुवा,
ती जादूची पुस्तकं आहेत. प्रत्येकवेळी वाचतांना नवीन माहिती मिळते.
बघा दुसर्‍यांदा वाचून अन मग सांगा.

सध्यातरी मी ३र्‍या म्हणजे प्रिजनर ऑफ अझकबान वर आहे. नंतरची पुस्तकं आणखिन मोठी आहेत त्यामुळे सगळे डिटेल्स वाचायला मजा येणार आहे. आता पहिल्या दोन मधलेच डिटेल्स हळू हळू विसरायला लागलोय त्यामुळे एकदा सगळं वाचून झालं की परत काही वेळानी पहिलं पुस्तक उचलायला काही हरकत नाही.

सिनेमांमध्ये डिटेल्स कळत नाहीत हे मान्य आहे पण तरी सगळ्याच सिनेमांनी खुप मेहनत घेतलीये वातावरण निर्मिती वर आणि त्यामुळे मस्त वाटतात बघायला. डेथली हॅलोज च्या पहिल्या भागात लूनाचे वडिल डेथली हॅलोज म्हणजे काय ते सांगतात तेव्हाचे अ‍ॅनिमेशन काय भन्नाट घेतलेय!

सिनेमांमध्ये डिटेल्स कळत नाहीत हे मान्य आहे पण तरी सगळ्याच सिनेमांनी खुप मेहनत घेतलीये वातावरण निर्मिती वर आणि त्यामुळे मस्त वाटतात बघायला>> अनुमोदन.
पुस्तकं वाचलेल्यांनी पण शक्य असेल तर शेवटचा थ्रिडी भाग बघा. सगळे डिटेल्स नसले तरी खरोखरच मस्त वाटतो.

मी ही पिच्चर बघितलेत आणि आता पुस्तकं घेतली. सध्या चेम्बर ऑफ सिक्रेट्स Happy

रोलिंग बाईला शिसान एकदम. काय डोकं चालवलंय...

थ्रीडी पिक्चर बघताना लयलय भारी वाटलं ~

Pages