हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमात आणि पुस्तकात फार फरक आहेत. गॉब्लेट ऑफ फायरमध्ये शेवटी स्मशानात हॅरी आणि वॉल्डेमॉर्ट्मध्ये मोठे संवाद आहेत, ज्यात अनेक गोष्टी स्पष्ट होतात. पिक्चरमध्ये हे सगळे कट केले आहे. सगळ्याच पुस्तकांबाबत बहुदा हाच अनुभव आहे.. शेवटच्या भागतही हॅरी पुन्हा जिवंत झाल्यावर इन्विजिबल क्लोक वापरतो, पिक्चरमध्ये असे काही नाही. डेथली हॅलोबाबतही हॅरी, ह्र्मायनी आणि रॉनमध्ये मोठे डिस्कशन होते.. हॉर्क्रक्स का हॅलो यावर.. तोही भाग शिणेमात नाही.

नंदिनी Happy

ऋयाम अगदी खरं... प्रचंड evil आहे ती.. शेवटपर्यंत तिचा स्वभाव तसाच राहिला आहे... त्या लिंक्स मात्र बघितल्या नाहीत.. त्यातलं नक्की काय सांगायचं आहे ते इथे मराठीत लिहिलं तर बरं होइल Happy

हॅरी पॉटर ची audio books पण आहेत. ती पण फार छान आहेत. झोप येत नसेल तर ऐकत बसायला छान वाटत.

मला नेटवर फ्री पी डी एफ कॉपी मिळाल्या. गॉब्लेट आणि हॅलो. बाकी अजुन शोधल्या नाहीत.

चीनमध्ये हॅरी पॉटरच्या डुप्लिकेट कॉपी मिळाल्या म्हणे. म्हणजे दुसरीच स्टोरी असलेली पुस्तके. हॅरी पॉटर अँड चायनीज डॉल वगैरे वगैरे... भारतात असे कोण केले नाही का?

जागोमोहनप्यारे | 8 September, 2011 - 08:07
मला नेटवर फ्री पी डी एफ कॉपी मिळाल्या. गॉब्लेट आणि हॅलो. बाकी अजुन शोधल्या नाहीत.

चीनमध्ये हॅरी पॉटरच्या डुप्लिकेट कॉपी मिळाल्या म्हणे. म्हणजे दुसरीच स्टोरी असलेली पुस्तके. हॅरी पॉटर अँड चायनीज डॉल वगैरे वगैरे... भारतात असे कोण केले नाही का?
>>

भारतात हरी पुत्तर वर काही गोष्टी अशाच आलेल्या असे ऐकुन आहे.

पिटर पेटेग्र्यु म्हणजे वर्म्टेल ना? त्याला तर हॅरीने 'अझकबान का कैदी मध्ये पाहिलेले असते. मग त्यानंतर गॉब्लेटमध्ये स्मशानात वर्मटेलला बघून त्याला ओळखत नाही का? ( पुस्तकात वर्मटेल असा सारखा उल्लेख आहे..)

हॅपॉ च्या बर्‍याच फेक व्हर्जन्स नेटवर आहेत.>>>>>>> अगदी.. त्याच्या मुलाच्या जेम्स पॉटरवर ३ पुस्तके आली आहेत, फॅन फिक्शन..

पिटर पेटेग्र्यु म्हणजे वर्म्टेल ना? त्याला तर हॅरीने 'अझकबान का कैदी मध्ये पाहिलेले असते. मग त्यानंतर गॉब्लेटमध्ये स्मशानात वर्मटेलला बघून त्याला ओळखत नाही का? ( पुस्तकात वर्मटेल असा सारखा उल्लेख आहे..)>>>>>>> कोण म्हणालं ओळखत नाही म्हणुन??????????? पुस्तकात सरळ सरळ लिहिलं आहे की हॅरी त्याला ओळखतो म्हणुन..

माझा एक प्रश्नः
पाचव्या भागात ऑर्डर ओफ फिनिक्स मधे, जेव्हा हॅरी ला स्वप्न पडतं की आर्थर वीझलींना साप चावला आहे तेव्हा डंबलडोरच्या ऑफिसमधे डंबलडोर काचेच्या गोलात बघतात, तिथे त्यांना धुरकट अशी प्रतिमा दिसते की एक साप आहे आणि नंतर त्याचे २ साप होतात किंवा दोन तोंडं तयार होतात.. तिथे हॅरी वाटतं की डंबलडोर त्याची स्टोरी व्हेरिफाय करत आहेत म्हणुन.. याचं नंतर कुठेच स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.. मला वाटतं की डंबलडोरना संशय येतो की हॅरी मधे वोल्डेमॉर्टचा सोलचा एक भाग आहे आणि हीच गोष्ट ते त्या काचेच्या गोलात वेरिफाय करतात... तुमची यावरची मतं जाणुन घ्यायची आहेत..

नगिनी हा शब्द नागिन्/ नगिना या शब्दावरुन घेतला आहे म्हणे. अझकबान हा शब्दही अंदमान वरुन घेतला असेल काय? Proud

चिमुरी,
हायला हे काही मला सुचले नव्हते.

माझाही एक प्रश्न
त्या बॅगमन चे काय होते पुढे चवथ्या भागातल्या. चवथ्या भागात अ‍ॅबरफोर्थचाही उल्लेख सापडला परवा. मनोमन रॉलिंगकाकुंना साष्टांग नमस्कार घातला.

चवथ्या भागात अ‍ॅबरफोर्थचाही उल्लेख सापडला परवा>>>>>> पाचव्या भागतही आहे त्याचा उल्लेख.. डीए स्थापन करायची मीटिंग हॉग'स हेड मधेच झालेली असते. तिथे असं म्हटलं आहे की हॉग्स हेड चा मालक हॅरीला खूप ओळखीचा वाटतो आणि तिथे शेळ्यांचा वास पण येत असतो... Happy

बॅगमनचे काय होते त्याचा उल्लेख आठवत नाहिये.. पण तो काय मिनिस्ट्रीमधेच असेल..

बॅगमन एक्साइलमध्ये गेला असेल गॉब्लिनशी पंगा घेतल्यामुळे.

<<जेव्हा हॅरी ला स्वप्न पडतं की आर्थर वीझलींना साप चावला आहे तेव्हा डंबलडोरच्या ऑफिसमधे डंबलडोर काचेच्या गोलात बघतात, तिथे त्यांना धुरकट अशी प्रतिमा दिसते की एक साप आहे आणि नंतर त्याचे २ साप होतात किंवा दोन तोंडं तयार होत>> असं कुठे आहे?
ऑर्डर ऑफ फिनिक्स मध्ये सगळा काळ डंबलडोर हॅरीशी आय काँटॅक्ट टाळतो. हॅरी त्याच्या स्वप्नाबद्दल सांगत असतानाही तो हॅरीकडे बघत नाही. ते स्वप्न तू कुठून पाहिलेस असे विचारतो तेव्हा हॅरी म्हणतो की स्वप्नात मीच तो साप होतो.
मग डंबलडोर पोर्टकी बनवून हॅरी आणि वीझलेजना सिरियसच्या घरी पाठवत असतात तेव्हा एक क्षणभर हॅरी आणि डंबलडोरची नजरानजर होते तेव्हा हॅरीला डंबलडोरवर हल्ला करायची तीव्र इच्छा होते.
या भागाच्या शेवटी डंबलडोर हॅरीला सांगतो की हॅरीला व्हॉल्डेमर्टच्या मनातलं कळतंय, हे त्याला (व्हॉल्डेमार्टला) कळलं की तो या गोष्टीचा फायदा उठवेल असा त्याला संशय होता. व्हॅल्डेमार्टने हॅरीचा वापर डंबलडोरच्या विरुद्ध कऊ नये म्हणूनच आपण स्वतः हॅरीला ऑक्लुमेंसे शिकवण्याऐवजी स्नेपला ते काम सोपवतो. हॅरीमध्ये व्हॉल्डेमर्टचा भाग आहे हे त्यांना कळलेलं नसावं , कारण हॉर्क्रुक्स काय काय आहेत, ते डंबलडोरही शोधतच असतात.

व्हॅल्डेमार्टने हॅरीचा वापर डंबलडोरच्या विरुद्ध कऊ नये म्हणूनच आपण स्वतः हॅरीला ऑक्लुमेंसे शिकवण्याऐवजी स्नेपला ते काम सोपवतो.>> त्याचबरोबर स्नेप हा अत्यंत पोचलेला ऑक्युमेंसेवाला असतो, साक्षात वोल्डमार्टला तो कितीतरी वर्षं याच्याच बळावर फसवत असतो.

हॅरीमध्ये व्हॉल्डेमर्टचा भाग आहे हे त्यांना कळलेलं नसावं , कारण हॉर्क्रुक्स काय काय आहेत, ते डंबलडोरही शोधतच असतात... >>> हा अंदाज त्याना पहिल्याच भागात आलेला आहे. हॉरक्रक्स म्हणून नाही पण हॅरी आणि डार्क लॉर्डमधे काहीतरी संबंध आहे हे त्याना माहित असतं/

<<जेव्हा हॅरी ला स्वप्न पडतं की आर्थर वीझलींना साप चावला आहे तेव्हा डंबलडोरच्या ऑफिसमधे डंबलडोर काचेच्या गोलात बघतात, तिथे त्यांना धुरकट अशी प्रतिमा दिसते की एक साप आहे आणि नंतर त्याचे २ साप होतात किंवा दोन तोंडं तयार होत>> असं कुठे आहे?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> पुस्तकात आहे..

'We will need,' Dumbledore said very quietly to the bird, 'a warning.'
There was a flash of fire and the phoenix had gone.
Dumbledore now swooped down upon one of the fragile silver instruments whose
function Harry had never known, carried it over to his desk, sat down facing them again
and tapped it gently with the tip of his wand.
The instrument tinkled into life at once with rhythmic clinking noises. Tiny puffs of pale
green smoke issued from the minuscule silver tube at the top. Dumbledore watched the
smoke closely, his brow furrowed. After a few seconds, the tiny puffs became a steady
stream of smoke that thickened and coiled in the air . . . a serpent's head grew out of the
end of it, opening its mouth wide. Harry wondered whether the instrument was confirming
his story: he looked eagerly at Dumbledore for a sign that he was right, but Dumbledore
did not look up.
'Naturally, naturally,' murmured Dumbledore apparently to himself, still observing the
stream of smoke without the slightest sign of surprise. 'But in essence divided?'
Harry could make neither head nor tail of this question. The smoke serpent, however,
split itself instantly into two snakes, both coiling and undulating in the dark air. With a look
of grim satisfaction, Dumbledore gave the instrument another gentle tap with h.s wand:
the clinking noise slowed and died and the smoke serpents grew faint, became a formless
haze and vanished.

हॉरक्रक्स म्हणून नाही पण हॅरी आणि डार्क लॉर्डमधे काहीतरी संबंध आहे हे त्याना माहित असतं/>>>>>>>>>> मला वाटतं टॉम रिडलची डायरी बघितल्यावर आणि हॅरीने त्यातुन टॉम बाहेर आल्यावर तो कसा दिसतो याचं वर्णन केल्यावर डंबलडोरला संशय आलेला असतो हॉर्क्रसचा

मला इथले "i think this means that nagini and voldy are two separate beings. one is possessing the other rather than transforming into the other." हे स्पष्टीकरण पटले.
सहावा आणि सातवा भाग परत वाचायला हवा. डंबलडोरला हॅरीमध्ये व्हॉल्डेमर्टच्या सोलचा पार्ट आहे याचा संशय आला होता का हे बघायला. मुळात व्हॉल्डेमर्टने आपल्या सोलचे भाग करून दडवले आहेत, याची शंका त्याला केव्हा आली ते बघायला हवं.

बरेच दिवसांत धाग्यावर एकही पोस्ट नाही.

“Dementors are among the foulest creatures that walk this earth. They infest the darkest, filthiest places, they glory in decay and despair, they drain peace, hope, and happiness out of the air around them. Even Muggles feel their presence, though they can't see them. Get too near a dementor and every good feeling, every happy memory will be sucked out of you. If it can, the dementor will feed on you long enough to reduce you to something like itself... soul-less and evil. You'll be left with nothing but the worst experiences of your life. And the worst that happened to you, Harry, is enough to make anyone fall off their broom. You have nothing to feel ashamed of.”

डिप्रेशन का येतं? ते काय असतं? लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही समजेल असे मॅजिकल स्पष्टीकरण. अन त्याच्याशी कसे फाईट करावे? तर आपल्या सर्वात आनंदी स्मृतीवर लक्ष केंद्रीत करून. क्या बात है.

मागच्या आठवड्यात शेवटचा भाग पाहिला. त्यातील खास करुन शेवटच्या भागाचा कचरा केलेला आहे. हॅरी व लॉ.वॉ. चा शेवटचा डायलॉग पण निट उतरला नाही. आणि फिजीकल कचरा एक स्क्वीब झाडुने साफ करतांना दाखवला आहे - बाकी मॅजीशीयन्स थकुन भागुन बसलेले ...
थोडक्यात, बुक्स रुल.

अवांतरः टोलकीन जिथे प्यायचा (सि एस लुईस बरोबर) त्या पबच्या बाजुने आज गेलो. उशीर झाला असल्याने आत शिरलो नाही.

त्यातील खास करुन शेवटच्या भागाचा कचरा केलेला आहे.>>>>>>>>>>>> अगदी...........

थोडक्यात, बुक्स रुल.>>>>>>>> येस्स्स्स्स्स्स्स

अवांतरः >>>>>>>>> हे झेपलं नाही

काल टीव्हीवर तिसर्‍या भागाचा सिनेमा सुरु होता.
अतिशय अतिशय अतिशय फाल्तू, बकवास, टुकार. तो ल्युपिन काय .....
यक यक यक. निषेध. रॉलिंगचा पण निषेध- स्वतःच्या पुस्तकाची वाट लावायला परवानगी दिल्याबद्दल. सगळ्या जगाचा निषेध.

सिनेमे पाहु नका.

पुस्तकातला ल्युपिन काय आहे महाराजा.
____
(सि एस लुईस बरोबर)- अ‍ॅलिसवाला का हो?

रैना, अनुमोदन............. Happy

सिनेमातला ड्म्बलडोरसुद्धा मला आवडत नाही.. पुस्तकात कसे एकदम कूल दाखवले आहेत, सिनेमात त्यांचा कूलनेस, twinkling eyes कुठेच दिसत नाहीत

हो हो, रैना, मी पण बघितला तिसरा भाग. नंतर का बघितला असं झालं. एक सीन दाखवायचा मग डायरेक्ट महिनाभरानंतरचा एखादा सीन. दोन दृश्यांमध्ये काहीही संबंध नाही असं वाटत होतं. ज्या लोकांनी पुस्तकं वाचली नाहीयेत, त्यांना चित्रपट नीट कळत असेल का असा प्रश्न पडला मला. त्या लिकी कॉल्ड्रन मधला तो टॉम पण कायच्या काय दाखवला होता. एकही व्यक्ती पुस्तकातल्या सारखी उतरलीये असं वाटत नव्हतं. आणि त्या वेअरवुल्फ पेक्षा कुत्रारुपातला सिरिअस जास्त डेंजरस वाटत होता. Proud

रच्याकने, आयाम पण माझ्याबरोबर बघत बसला होता हॅपॉ. त्याला त्या पूर्ण चित्रपटात सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर डेमाँटर. :अआ: रात्री झोपताना माँतल की गोष्टी सांग अशी फर्माइश झाली. Happy

Pages