छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ४ : "फिर भी रहेगी निशानीयाँ"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:29

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया-गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय ४: "फिर भी रहेगी निशानीयाँ..."

thasa_0.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत ठसे, निशाणी, खुणा... मनुष्य, प्राणी, किटक, पक्षी इ. इ. यांचे पाय, हात, चोच, दात, नखं वगैरे चे ठसे/निशाणी/ओरखडे/चावल्याच्या खूणा ... उदा वाळूतून चलणारा खेकडा, गोगलगायीची चकचकीत वाटचाल...नखांचे ओरखडे, खारीने कुरतडलेला पावाचा तुकडा वगैरे...बाळाच्या गालावरच काजळाचं बोटं, जन्मखूण, तीळं, टॅटू.. इ इ देखिल चालू शकेल.

स्टँपचे (पोस्टाचे स्टँप नव्हे. लाखेचे किंवा साडी प्रिटिंग किंवा मेंदीचे स्टँप) ठसे, एखादी वस्तु खूप दिवसांनी हलवल्यावर भिंतीवर, जमिनीवर उमटलेले ठसे, तेलकट हाताचे ठसे, माणसाने पर्यावरणावर सोडलेला ठसा, कुठल्याही वस्तुने / प्राण्याने / मनुष्याने दुसर्‍या एखाद्या वस्तुवर कुठल्याही प्रकारे सोडलेली निशाणी

गाणे - कळीचे शब्द: ठसा, छाप, निशाणी, ओळख, मागे, पिछे, छोड, विसरणे, हरवणे इ इ उदा. "...छोड आये हम वो गलियाँ......"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्वानीच्या आगीची मशाल हाती, आले मी अवसंच्या भयाण राती
काजवा उडं, किर्किर किडं, रानात सुरात गाती
दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग
कुठं दिसंना मला, ग बाई बाई, कुठं दिसंना मला
कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना
शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं ?
khuna1.jpg

जागू, अप्रतिम फोटो.

वाळूवर लहरी दिसताहेत त्या उन्हात पाण्याच्या लाटांची सावली आहे की वाळूवरच्याच वळ्या आहेत?

सदर्‍यावर रेंगाळणारा लांब केसही चालायला हरकत नसावी.>>>>>>>>>>>>. मग तर फारच गोष्टी येतील...... परीघ वाढेल आवका वाढेल....... Happy

जागुच्या, फोटोतले टु व्हीलरच्या टायरचे ठसे वाटत आहे.
फुलपाखरू मस्स्त! Happy

जिप्सी, श्रीगणेशा मस्त झालाय.

सगळेच झब्बू मस्त आहेत.

हे ठसे चालतील का?

thasa.jpg

ठसे लेवून अंगावरी, सजलो मी कंगणापरी
सौंदर्य लाभले मला, तुझ्याच मनगटावरी

@ नलिनी .. चालेल Happy

प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत ठसे, निशाणी, खुणा... मनुष्य, प्राणी, किटक, पक्षी इ. इ. यांचे पाय, हात, चोच, दात, नखं वगैरे चे ठसे/निशाणी/ओरखडे/चावल्याच्या खूणा ... उदा वाळूतून चलणारा खेकडा, गोगलगायीची चकचकीत वाटचाल...नखांचे ओरखडे, खारीने कुरतडलेला पावाचा तुकडा वगैरे...बाळाच्या गालावरच काजळाचं बोटं, जन्मखूण, तीळं, टॅटू.. इ इ देखिल चालू शकेल.

स्टँपचे (पोस्टाचे स्टँप नव्हे. लाखेचे किंवा साडी प्रिटिंग किंवा मेंदीचे स्टँप) ठसे, एखादी वस्तु खूप दिवसांनी हलवल्यावर भिंतीवर, जमिनीवर उमटलेले ठसे, तेलकट हाताचे ठसे, माणसाने पर्यावरणावर सोडलेला ठसा, कुठल्याही वस्तुने / प्राण्याने / मनुष्याने दुसर्‍या एखाद्या वस्तुवर कुठल्याही प्रकारे सोडलेली निशाणी

078.JPG

"Generations to come will scarce believe that such a one as this walked the earth in flesh and blood"

-Albert Einstein

साबरमती आश्रम, अहमदाबाद.

आज सकाळी हा विषय मला जरा संकुचित वाटला होता.
मग मला दोन दिवसांपुर्वी बघितलेल्या One Hour Photo (Robin Williams)
या चित्रपटाची आठवण झाली.
त्यात अशा अर्थाचा एक संवाद आहे. समजा घर सोडावे लागले, घराला आग लागली
तर माणूस आधी काय सोबत घेतो वा काय वाचवायला बघतो, तर प्रियजनांचे फोटो.
एक क्षण गोठवलेला असतो. त्या क्षणाचा तो ठसा, म्हणजे पाऊलखूणच कि.

माझा जीवनातला हा १७ वर्षांपुर्वीचा एक क्षण...

दिन जो पखेरु होते, पिंजरेमें मै रख लेता
पालता उनको जतनसे, मोती के दाने देता
सीनेसे रहता लगाये...

नेहेमीप्रमाणे, जिप्सी ने मस्त सुरुवात केली.
जागु तुझ्या फोटो चा चुलत भाऊ टाकते खाली Happy ..

न्यु मेक्सिको मधील व्हाईट सँड नॅशनल पार्क. विंचु, साप, खेकडे, सुरवंट असे बरेच प्रकार आहेत(असावेत). Happy

आम्ही जातो अमुच्या गावा
DSC05854.JPG

गिला है शौक को दिल में भी तंगी-ए-जा का
गुहर में महव हुआ इज्तिराब दरिया का
- गालिब

pearl.JPG

मोती ही शिंपल्याच्या किड्याची निशाणी म्हणता येईल ना?

सुनिधी चुलत भाऊ मस्तच.

स्वातीताई मस्तच फोटो क्लियर असता तर अजुन मजा आली असती.

रहे ना रहे हम ...

Mammoth Hot Springs.JPG

Yelloestone National Park मधील Mammoth Hot springs परिसरातले हे काही मृत झालेले हॉट स्प्रिंग्स .. जरी मृत असले तरी त्यांच्या खुणा अजुन बाकी आहेत

सगळ्यांनी दिलय तेच गाणं इथे पण देतेय पण वेगळ्या शब्दात Proud

kabab.jpg
रहे ना रहे हम
महका करेंगे
बनके करी, बनके कबाब
आपके किचन मे..

Pages