छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ४ : "फिर भी रहेगी निशानीयाँ"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:29

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया-गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय ४: "फिर भी रहेगी निशानीयाँ..."

thasa_0.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत ठसे, निशाणी, खुणा... मनुष्य, प्राणी, किटक, पक्षी इ. इ. यांचे पाय, हात, चोच, दात, नखं वगैरे चे ठसे/निशाणी/ओरखडे/चावल्याच्या खूणा ... उदा वाळूतून चलणारा खेकडा, गोगलगायीची चकचकीत वाटचाल...नखांचे ओरखडे, खारीने कुरतडलेला पावाचा तुकडा वगैरे...बाळाच्या गालावरच काजळाचं बोटं, जन्मखूण, तीळं, टॅटू.. इ इ देखिल चालू शकेल.

स्टँपचे (पोस्टाचे स्टँप नव्हे. लाखेचे किंवा साडी प्रिटिंग किंवा मेंदीचे स्टँप) ठसे, एखादी वस्तु खूप दिवसांनी हलवल्यावर भिंतीवर, जमिनीवर उमटलेले ठसे, तेलकट हाताचे ठसे, माणसाने पर्यावरणावर सोडलेला ठसा, कुठल्याही वस्तुने / प्राण्याने / मनुष्याने दुसर्‍या एखाद्या वस्तुवर कुठल्याही प्रकारे सोडलेली निशाणी

गाणे - कळीचे शब्द: ठसा, छाप, निशाणी, ओळख, मागे, पिछे, छोड, विसरणे, हरवणे इ इ उदा. "...छोड आये हम वो गलियाँ......"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री, ती निशाणीचा फोटो स्वत:चाच हवा असं कुठे लिहिलंय संयोजकांनी? दुसर्‍या कोणाचा काढलेला असेल तरी चालेल त्यांना. Proud

DSCN1151.JPG

तुलुम, रिव्हिएरा माया या मेक्सिकोमधल्या मायन रुइन्स मधला एक भाग. काही भिंतींवर तत्कालिन मिथ्स ची चित्र रंगवली आहेत व ते बांधणार्‍या कलाकारांनी सिनाबार या पार्‍याचा बेस असलेल्या रंगात हात बुडवून आपल्या हातांचे ठसे तिथे उमटवले आहेत. त्या रंगात पार्‍याचं प्रमाण इतकं जास्ती असतं की त्यात हात बुडवल्यानंतर १२-२४ तासात तो कलाकार मरण पावला असणार . पण त्या काळात आपल्या हातनं अजरामर कलाकृती निर्माण झाली असं वाटलं की ते अशी 'एक्झिट ' घेत असत.

इक फूल में तेरा रूप बसा, इक फूल में मेरी जवानी है
इक चेहरा तेरी निशानी है, इक चेहरा मेरी निशानी है
मैं हर एक पल का शायर हूं , हर एक पल मेरी जवानी है...

आडो , लाजो ती दुधारी तलवार आहे , आपला टाकला तरी पंचाईत आणि दुसर्‍याचा (?) टाकला तर मग विचारुचं नका . Lol
त्या काळात आपल्या हातनं अजरामर कलाकृती निर्माण झाली असं वाटलं की ते अशी 'एक्झिट ' घेत असत. >>> Hats Off अशा कलाकारांना !

त्या काळात आपल्या हातनं अजरामर कलाकृती निर्माण झाली असं वाटलं की ते अशी 'एक्झिट ' घेत असत. >>> Hats Off अशा कलाकारांना !
<< + १

ताजमहाल चा फोटो टाका कुणीतरी... अजरामर प्रेमाची निशाणी अन कलाकारीची निशाणी.

माँ ओ माँ... ओ माँ
....
पास बुलाती है कितना रुलाती है
याद तुम्हारी जब जब मुझको आती है आती है....

IMG_3994 (1).jpgIMG_3995 (1).jpg

"आई" म्युझियम - जाधवगड, पुणे

IMG_0005_skw.JPG

तस्वीर बनाता हूं तस्वीर नही बनती...... म्हणत आदिमानवाने काढलेली चित्रे (भीमबेटिका,भोपाळ )
खखो आदिमानवच जाणे Happy

ताजमहाल चा फोटो टाका कुणीतरी... अजरामर प्रेमाची निशाणी अन कलाकारीची निशाणी.>>>>लाजो, हा घे ताजमहाल Happy

बादशहाच्या अमर प्रीतिचे, मंदिर एक विशाल
यमुनाकाठी ताजमहाल

मूर्तिमंत झोपली प्रीत अन्‌ मृत्यूचे ओढून पांघरुण
जीवन कसले महाकाव्य ते गाईल जग चिरकाल

नि:शब्द शांती अवतीभवती, हिरे जडविले थडग्यावरती
एकच पणती पावित्र्याची,जळते येथ खुशाल

संदीप खरे/सलील कुलकर्णी यांची क्षमा मागून त्यांच "मी पप्पाचा ढापून फोन" गाण बदलते जरा. Happy
मी आजीचा चोरून (पावडरचा) डब्बा, गोरी झाले धबा धबा!!

IMG_2055.JPG
मनसोक्त पावडरीत खेळताना पकडलेली चोर. Happy

अकु, भारीच!

ललिता, हो का? मला बघितल्यासारखे वाटतेय. फोटू बघायला पाहिजेत. पण ही भिंत बघितल्यावर मला तेच आठवले.

त्याच Puye Ruins मधील क्लीफ ड्वेलिंग्ज मधली काही चित्रे..

puyeruinss.jpg

जरी या पुसून गेल्या सार्‍या जुना खुणा....

जिप्स्या, नाणेघाटातल्या गुहेमधल्या शिलालेखाचा आहे का फोटो ?
लोणारच्या सरोवराचा पण हवा होता. (उल्केची निशाणी )

Pages