छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ४ : "फिर भी रहेगी निशानीयाँ"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:29

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया-गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय ४: "फिर भी रहेगी निशानीयाँ..."

thasa_0.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत ठसे, निशाणी, खुणा... मनुष्य, प्राणी, किटक, पक्षी इ. इ. यांचे पाय, हात, चोच, दात, नखं वगैरे चे ठसे/निशाणी/ओरखडे/चावल्याच्या खूणा ... उदा वाळूतून चलणारा खेकडा, गोगलगायीची चकचकीत वाटचाल...नखांचे ओरखडे, खारीने कुरतडलेला पावाचा तुकडा वगैरे...बाळाच्या गालावरच काजळाचं बोटं, जन्मखूण, तीळं, टॅटू.. इ इ देखिल चालू शकेल.

स्टँपचे (पोस्टाचे स्टँप नव्हे. लाखेचे किंवा साडी प्रिटिंग किंवा मेंदीचे स्टँप) ठसे, एखादी वस्तु खूप दिवसांनी हलवल्यावर भिंतीवर, जमिनीवर उमटलेले ठसे, तेलकट हाताचे ठसे, माणसाने पर्यावरणावर सोडलेला ठसा, कुठल्याही वस्तुने / प्राण्याने / मनुष्याने दुसर्‍या एखाद्या वस्तुवर कुठल्याही प्रकारे सोडलेली निशाणी

गाणे - कळीचे शब्द: ठसा, छाप, निशाणी, ओळख, मागे, पिछे, छोड, विसरणे, हरवणे इ इ उदा. "...छोड आये हम वो गलियाँ......"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले

आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?

हा देहाचा सुंभ राहिला
पीळ मनाचे जळून गेले!

-पुलस्ती (पुर्ण गझल इथे पहा : http://www.maayboli.com/node/6755)

दुसरा फोटो परत बघ अकु. खुणा व्यवस्थित कळतील.
पहिल्या फोटोत ते जे लेण्यांसारखं वाटतंय ती नेटिव्ह अमेरिकन लोकांची एकेकाळची वस्तीची जागा आहे.

अगं इथे गल्ल्यांचा घोटाळा होतोय माझा सारखा.... चुकीच्या बाफवर चुकीच्या पोस्टी पडताहेत! आणि त्यात तू चिडवते आहेस!! अशाने कैसा होगा मेरा? Proud

तुला कुठल्या गल्लीत पोस्ट टाकायची होती? कारण मी दोन फोटु (ज्यात पहिल्यात आभाळ आहे!) टाकलेली गल्ली हिच आहे पण पान मागचं आहे. Wink

प्रार्थना स्थळ, बापू कुटी, सेवाग्राम

नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा
मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे

Lol आता मी सार्‍या माबोच्या टॅब्ज बंद करून पुन्हा उघडते.... म्हणजे नव्या/जुन्या पोस्ट्सचा घोळ होणार नाही.

गजानन Proud
एकाच वेळी अनेक बाफ वाचायचा/ पाहायचा आणि त्याचवेळी प्रचि अपलोड करायचा मोह नडतो असा कधी कधी!! Lol

Picture 060.jpg

तरीही उरतो प्रश्न अनामिक
सरले कैसे माझे बालपण....

ललिता, चोखीढाणीतल्या काही भिंतींवर होती खरी वारली चित्रं. आज जुनी फोल्डरं चाळताना सहज आठवलं म्हणून हे पोस्ट! Happy
gajanan1.JPG

Pages