आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच...

Submitted by सेनापती... on 11 May, 2011 - 12:12

नमस्कार मित्रांनो...

काल सहजच एका इतिहासाच्या साईटवर गेलो असता तेथे माझे ४ लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने आढळून आले. शोध घेतला असता ते माझे लिखाण चोरून तिथे टाकल्याचे लक्ष्यात आले. साईटचा मालक माझ्या मित्राचा मित्र असल्याने हे प्रकरण २-३ तासात आटोपले गेले आणि तिथे लिखाणावर माझे नाव झळकू लागले. पण मनात आलेला संदेह दूर करण्यासाठी मी माझे इतर लिखाण गुगलवर शोधून पहिले असता धक्काच बसला..

इतिहासावरील माझे जवळ-जवळ सर्व लिखाण चोरीला गेलेले होते. ह्या-ना त्या अश्या असंख्य साईट्सवर ते विखुरलेले आहे. मराठीचा कैवार घेतलेल्या आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर मराठी साईट्स उघडलेल्या ह्या लोकांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे... अनेकांना कमेंट्स लिहिल्या. अनेकांना मेल्स सुद्धा पाठवली आहेत...

आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच आहे. मग ते ब्लॉग लिहा नाहीतर कुठल्याही साईटवर. इथूनही अनेक लोक लिखाण चोरून स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर टाकून पैसे कमावत असतील.. आपण हे कधी तपासून पहिले आहे का?

*************************************************************************************************************

ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल करण्यासाठी एक स्क्रिप्ट वापरली जाते तशी इथे वापरता येईल का? शिवाय ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट आहे. जे लोक हे वापरतात त्यांच्या ब्लॉगवरील लिखाण आता कॉपी होण्याच प्रमाण खुप कमी झालयं. असं काही इथे करता येईल का?
दोन्ही स्क्रिप्ट इथे दिलेल्या आहेत. ह्याने चोरी बंद होईल असा दावा नाहीये पण टक्केवारी नक्कीच कमी होईल की.

blog_script.txt (1.29 KB)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नमुद केलेल्या वेबसाईट वर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती अशी की ढापल्या गेलेल्या बहुतेक कविता ब्लॉग वरुन कॉपी पेस्ट केल्या नसुन माबोवरुन उचलल्याची शक्यता अधिक आहे (बहुतेक माबोकरांच्या कविता दिसल्या बालकविता विभागात)

वर्षा_म, स्मिता गद्रे, एम कर्णिकांच्या बनुताई आणि बंटीबाबाच्या कविता, सत्यजित ह्यांचीही एक कविता आणि माझ्या कविता तिथे दिसल्या

आडो, असं असु शकतं पण मग परवानगी घेऊन नावानिशी छापावना तिथे त्याने/तिने :रागः असच काय म्हणून छापावं?

>>परवानगीशिवाय भाषांतर प्रसिद्ध करता येत नाही. पैसे मिळवत आहात किंवा नाही, याला महत्त्व >>नाही, कारण तुमचा ब्लॉग अभ्यासाशी संबंधित नाही.
चिनूक्स, ब्लॉग अभ्यासाशी संबंधित नाही म्हणजे नक्की काय ते कळाले नाही.
जगप्रसिद्ध लोकांच्या चरित्राचे (कादंबरीचे नव्हे) भाषांतर केले तर त्यास हरकत का असावी ?

त्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधण्यात यश आलं शेवटी. त्याला जरा टेलिफोनिकली शब्दात घोळवला. त्याने सॉरी म्हणत कंटेंट डिलिट करायचं कबूल केल आणि त्याप्रमाणे आत्ता चेक केलं असता वेबसाईट डिस्प्ले न होता एरर येतोय Happy

स्पेशल धन्स रोहन तुला आणि कांचन कराई हिला तुम्हा दोघांमुळे ही प्रोसिजर सोपी झाली Happy

कविता.. पहिली लढाई जिंकल्याबद्दल शुभेच्छा... Happy पण अजून घोडा मैदान दूर आहे... Lol

गुगल मध्ये (e.g.http://kavyanil.blogspot.com/2011/04/blog-post_25.html) वरती report abuse असे आहे. ते ट्राय केले का? मी जाऊन पाहिले.. पण ज्याचा copyright असतो किंवा on behalf साठी परवानगी असते त्यानांच form submit करू देतात.

आता काय करायचं?>>>>तोच विचार करतोय Sad
धन्स आनंद माहितीबद्दल. मी चेक करतो.

असलेला वॉटरमार्क पण काढलाय>>>> Sad

आज माझीच एक 'मुली' नावाची कविता मलाच समस मधुन आली. या आधीही ही कविता मला मेल मधुन आलेली. गुगल करुन पाहीले तर खुप ठिकाणी कॉपी-पेस्ट केलीय. फेसबुक वरही खुप ठिकाणी आहे. Sad

http://jokes-adda.blogspot.com/2010/11/marathi-poem-on-girls-kavita-muli...

http://www.facebook.com/topic.php?uid=197992062566&topic=18835

अजुन खुप ठिकाणी आहे. Sad

दै.लोकमतने मे महिन्यात त्यांच्या रविवार पुरवणीत माझ्या ब्लॉगवरून ढापून जो लेख छापला होता त्याचा मी इथे झालेल्या चर्चेनुसार जोरदार पाठपुरावा केला होता. त्यांना सौम्य शब्दांत पण जाब विचारला होता. आणि कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आज अखेर त्यांनी त्या लेखाचं मानधन मला पाठवलं आहे. (आणि उशीरा असलं तरी अपेक्षेपेक्षा जास्त पाठवलं आहे :फिदी:)
तेव्हा, अश्या प्रकारे गांजलेले लोकहो, संबंधित लोकांचे ई-मेल आयडी मिळवून पाठपुरावा करा. त्यांना असे मोकाट सोडू नका.

(संदर्भ : याच बाफवरची माझी ही पोस्ट -
ललिता-प्रीति | 28 May, 2011 - 17:17
ऑन्लाईनच नाही, प्रिंट मिडियातही हे चाल्लंय. माझा 'आर्ट ऑफ लिव्हिंग' चा लेख दै.लोकमत ने १५ मेच्या त्यांच्या पुरवणीत छापला. मला कळवण्याची तसदी तर घेतली नाहीच, पण माझ्या लेखातला अधला मधला काही भाग गाळून तिकडे छापलाय. खाली माझ्या ब्लॉगची लिंक दिलीय. तरीही, काही मजकूर गाळायचा त्यांना काय अधिकार??
ही लोकमतची लिंक - http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/ManthanEdi...
)

रोहनचे त्यासाठी विशेष आभार. Happy
त्याने लोकमतच्या एका पत्रकाराचा ई-मेल आयडी मला दिला. त्यांचा त्या पुरवणीशी प्रत्यक्ष काहीच संबंध नव्हता. पण त्यांच्यामार्फत मी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचू शकले.
(हे वर लिहायचं राहिलं.)

ललिता, अभिनंदन.
अभिनंदन तुला तुझं क्रेडिट मिळाल्याबद्दल केलंय. मानधनाबद्दल नाही (पुणेरी मराठीत दुसर्‍याला मिळालेले पैसे...... Proud )

ह्म्म...काही दिवसांपूर्वीपर्यंत तर मी दिलेली लिंक दिसत होती.
मी आत्ता बघितलं तर त्यांच्या साईटवर १५ जुलैपूर्वीचे अर्काईव्हजच उपलब्ध नाहीयेत. Sad

अभिनंदन लले... Happy अश्या लोकांना सोडायचेच नसते... आपण काही बोलत नाही ह्याचा फायदा घेतात हे लोक आणि आपले लिखाण चोरत असतात.

http://mymarathi-blog.blogspot.com/view/flipcard?z#!/2010/02/blog-post_5...
इथे रामेश्वरबावाजीनं माझं, दुसर्‍या एका पानावर धुंद रवी यांचं (आणि पुढे कुणाचं असेल तर माहिती नाही) लिखाण चिकटवलंय. याबद्दल कुठे बोम्ब मारायची? कुठेही संपर्काची, कमेंटची सोय दिसत नाहीये.

Pages