आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच...

Submitted by सेनापती... on 11 May, 2011 - 12:12

नमस्कार मित्रांनो...

काल सहजच एका इतिहासाच्या साईटवर गेलो असता तेथे माझे ४ लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने आढळून आले. शोध घेतला असता ते माझे लिखाण चोरून तिथे टाकल्याचे लक्ष्यात आले. साईटचा मालक माझ्या मित्राचा मित्र असल्याने हे प्रकरण २-३ तासात आटोपले गेले आणि तिथे लिखाणावर माझे नाव झळकू लागले. पण मनात आलेला संदेह दूर करण्यासाठी मी माझे इतर लिखाण गुगलवर शोधून पहिले असता धक्काच बसला..

इतिहासावरील माझे जवळ-जवळ सर्व लिखाण चोरीला गेलेले होते. ह्या-ना त्या अश्या असंख्य साईट्सवर ते विखुरलेले आहे. मराठीचा कैवार घेतलेल्या आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर मराठी साईट्स उघडलेल्या ह्या लोकांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे... अनेकांना कमेंट्स लिहिल्या. अनेकांना मेल्स सुद्धा पाठवली आहेत...

आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच आहे. मग ते ब्लॉग लिहा नाहीतर कुठल्याही साईटवर. इथूनही अनेक लोक लिखाण चोरून स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर टाकून पैसे कमावत असतील.. आपण हे कधी तपासून पहिले आहे का?

*************************************************************************************************************

ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल करण्यासाठी एक स्क्रिप्ट वापरली जाते तशी इथे वापरता येईल का? शिवाय ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट आहे. जे लोक हे वापरतात त्यांच्या ब्लॉगवरील लिखाण आता कॉपी होण्याच प्रमाण खुप कमी झालयं. असं काही इथे करता येईल का?
दोन्ही स्क्रिप्ट इथे दिलेल्या आहेत. ह्याने चोरी बंद होईल असा दावा नाहीये पण टक्केवारी नक्कीच कमी होईल की.

blog_script.txt (1.29 KB)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे स्क्रिप्ट बद्दल माहिती दिली आहे.
http://www.beinggeeks.com/2009/02/how-to-disable-right-click-in-blogger-...

पण मुळात ब्लॉगपेक्षा मायबोलीवरुनच लेख उचलले असण्याची शक्यता आहे. मायबोलीवर असे स्क्रिप्ट किंवा तत्सम टाकता येणार नाही का?

मुळात ब्लॉगपेक्षा मायबोलीवरुनच लेख उचलले असण्याची शक्यता आहे. मायबोलीवर असे स्क्रिप्ट किंवा तत्सम टाकता येणार नाही का?
>>> अनुमोदन सावली. मी वर तेच म्हणालो आहे. Happy

Go to your blog setting ---> Layout ---> Add new gadget & paste following 2 scripts in 2 different new gadgets. 1st script should disable dragging & select on your blog, where as 2nd should disabled right click on your blog.

function disableSelection(target){
if (typeof target.onselectstart!="undefined") //For IE
target.onselectstart=function(){return false}
else if (typeof target.style.MozUserSelect!="undefined") //For Firefox
target.style.MozUserSelect="none"
else //All other route (For Opera)
target.onmousedown=function(){return false}
target.style.cursor = "default"
}

disableSelection(document.body)

*************************************************************************

दुसरी स्क्रिप्ट इथे टाकता येत नाहिये Sad कोणाला हवी असेल तर मला इथे सांगा मी मेल करतो.

नी आणि भुंगा तुम्हाला मेल करतोय.. Happy

@सेनापती
त्या दोन्ही स्क्रिप्ट Notepad टाकून सेव्ह करा, मग "खाजगी जागा" ह्या विभागात upload करुन सेव्ह करा व त्याची लिंक इथे द्या म्हणजे त्या इतरांना (ज्यांना हवेय त्यांना) उतरवून घेता येतील. smile.gif

नीधप, सेनापती,
तुमची तळमळ मला समजू शकते. स्वतः केलेले लेखन लोकांनी चोरून इतरत्र फिरवणे हे वाईटच.

परंतू दुर्दैवाने तुमच्या या दोन्ही स्क्रिप्ट्स फारशा उपयोगी नाहीत Sad थोडे प्रयत्न केले तर चोप्य पस्ते करता येतेच.. (कीबोर्ड वापरता आला की.. ctrl+a->ctrl+c->notepad->ctrl+v... इ.).

त्या मासिक वाल्यांना लीगल नोटिस पाठवता येइल का? ओळखीच्या वकीला कडून एक नोटीस तयार करून पाठवून द्या. किमान पुढच्यावेळी ठिकाणावर रहातील.

पण मुळात ब्लॉगपेक्षा मायबोलीवरुनच लेख उचलले असण्याची शक्यता आहे. मायबोलीवर असे स्क्रिप्ट किंवा तत्सम टाकता येणार नाही का?>>>>>सावली +१.

हि सुचना आधीही अ‍ॅडमिन यांना केली होती.

कुठलाही ब्लॉग घ्या.. त्यावर कार्य करा आणि ते इथे दाखवा. Happy

रच्याकने.. मी कुठल्याही प्रकारे माझ्या ब्लॉगची रिक्षा माबोवर फिरवत नाही. Proud

8-|
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व ‘‘संभाजीराजांनी विद्याभ्यास करावा, त्याला सुशिक्षित करावे म्हणून त्याला घोड्यावर बसविणे, शास्त्रविद्या, तालीम यांचे शिक्षण देवविले. अष्टप्रधान यात राजपुत्राची गणना

अरेच्चा हे कसे काय केले, मीही प्रयत्न करुन पाहीला कॉपी-पेस्टचा पण नाही करता आला. काम कठीण दिसतय..!!
पण काही नसण्यापेक्षा थोडाफार उपाय तरी ठीक आहे....

धन्यवाद..

श्री वेताळ-२५, सेनापती

सेनापती यांनी दिलेले च्यालेंज व श्री वेताळ यांनी म्हटल्याप्रमाणे 'अशक्य' यामुळे मी सांगितलेल्या प्रकाराने काम करून दाखविलेले आहे.

जुजबी काँम्प्युटर ज्ञान असलेला कुणीही हे करू शकतो, इतकेच दाखवून द्यायचे होते.

लेखन चौर्य होवू नये, हेच माझेही म्हणणे आहे.

फक्त, ते स्क्रिप्ट अत्यंत बालीश आहे हे दाखवून देणे इतकाच हेतू होता. इतर काही मार्ग काढता आला तर बरे होईल असे वाटते..

नाही, वेताळजी, तिथून नाही केले. तशा प्रकारचा कोणताही ब्लॉग मला द्या, मी तुम्हाला कॉपी करून दाखवितो..

हे बघा :
३९ दिवस यमयातनांचा सहर्ष स्वीकार करून देव, धर्म, राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान करून शंभूछत्रपतींनी ज्वलंत आदर्श उभा केला. संभाजीराजे मृत्युंजय धर्मवीर बनले! छत्रपतींच्या या निग्रही बलिदानामुळे सारा महाराष्ट्र पेटून उठला! गावागावातली तरणीबांड मराठी पोरे हाती मिळेल ते शस्त्र घेऊन संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या पराक्रमी सेनापतींच्या नेतृत्वाखाली मोगली मुलखात अक्षरश: तांडव घालू लागली! शंभूराजांच्या पश्चा त १८ वर्षे स्वातंत्र्याचा वणवा महाराष्ट्रात धगधगत राहिला आणि याच वणव्यात हिंदुस्थानवर हिरवा बावटा फडकवण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसह औरंग्याही जळून खाक झाला.
पुणे जिल्ह्यातील वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,
कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.

-------------------------------------------------------------------------------------------------------------
मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशीत

द्वारा पोस्ट केलेले Mangesh M. Thore येथे 11-54 am कोणत्याही टिप्पण्याम नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर सामायिक कराFacebook वर सामायिक करा
या पोस्टचे दुवे
बुधवार 1 फेब्रुवारी 2012
मायबोली - शीर्षकगीत : प्रकाशन

ओके... पण हे नुसते कॉपी करुन नोटपॅड मध्ये पेस्ट करणे नाही आहे. तुम्हाला अधिक काहीतरी ट्रिक येत असावी.

Wink नोटपॅड ऐवजी वर्ड वापरून पहा. फक्त मेमरी भरपूर हवी कॉम्प्युटरला..
स्क्रीप्ट्स ही डिसेबल करता येतात.. पण ते असो. आपण धाग्याचा विपू करीत आहोत. इतर चर्चा व्यनि/विपूने होऊ शकते.

स्क्रीप्ट्स ही डिसेबल करता येतात.. >> होय पण ते १०० पैकी २-४ जणांना जमेल. ईतर लोकांना ते कळणार नाही. Happy

वर्ड वापरुन बघतो.

Pages