आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच...

Submitted by सेनापती... on 11 May, 2011 - 12:12

नमस्कार मित्रांनो...

काल सहजच एका इतिहासाच्या साईटवर गेलो असता तेथे माझे ४ लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने आढळून आले. शोध घेतला असता ते माझे लिखाण चोरून तिथे टाकल्याचे लक्ष्यात आले. साईटचा मालक माझ्या मित्राचा मित्र असल्याने हे प्रकरण २-३ तासात आटोपले गेले आणि तिथे लिखाणावर माझे नाव झळकू लागले. पण मनात आलेला संदेह दूर करण्यासाठी मी माझे इतर लिखाण गुगलवर शोधून पहिले असता धक्काच बसला..

इतिहासावरील माझे जवळ-जवळ सर्व लिखाण चोरीला गेलेले होते. ह्या-ना त्या अश्या असंख्य साईट्सवर ते विखुरलेले आहे. मराठीचा कैवार घेतलेल्या आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर मराठी साईट्स उघडलेल्या ह्या लोकांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे... अनेकांना कमेंट्स लिहिल्या. अनेकांना मेल्स सुद्धा पाठवली आहेत...

आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच आहे. मग ते ब्लॉग लिहा नाहीतर कुठल्याही साईटवर. इथूनही अनेक लोक लिखाण चोरून स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर टाकून पैसे कमावत असतील.. आपण हे कधी तपासून पहिले आहे का?

*************************************************************************************************************

ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल करण्यासाठी एक स्क्रिप्ट वापरली जाते तशी इथे वापरता येईल का? शिवाय ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट आहे. जे लोक हे वापरतात त्यांच्या ब्लॉगवरील लिखाण आता कॉपी होण्याच प्रमाण खुप कमी झालयं. असं काही इथे करता येईल का?
दोन्ही स्क्रिप्ट इथे दिलेल्या आहेत. ह्याने चोरी बंद होईल असा दावा नाहीये पण टक्केवारी नक्कीच कमी होईल की.

blog_script.txt (1.29 KB)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण जी माहीति स्वतः जमा करतो ती माहीति आपण मायबोली किंवा स्वतःच्या ब्लॉगवर टाकतो ती माहिति आज सरळ सरळ कॉपी करुन फेसबुक वर स्वतःच्या पेज वर आणि कम्युनिटी वर सरळ सरळ पोस्ट करत आहेत...स्पेशली ट्रेकिंग चे लेख आणि ऐतिहसिक माहिति...एका फेसबुक पेज ने तर महिकावतिचि बखर जी आज फक्त आर्टीकल्स मध्ये मायबोलि वर उपलब्ध आहे ती बखर स्वतःच्या नावाने पोस्ट केली आहे...असे अनेक लेख मायबोली आणि इतर ब्लॉगवरुन चोरलेले आहेत अश्या उद्योगाना आळा घालणे गरजेचे आहे...!!!

आपल्यातलाच एक भटका. Happy

महिकावतिचि बखर जी आज फक्त आर्टीकल्स मध्ये मायबोलि वर उपलब्ध आहे ती बखर स्वतःच्या नावाने पोस्ट केली आहे...
>>> होय ठावुक आहे. Happy

महिकावतिचि बखर जी आज फक्त आर्टीकल्स मध्ये मायबोलि वर उपलब्ध आहे >> नाही नाही, सेनापती. महिकावतीची बखर पुस्तकरूपात उपलब्ध आहे. विद्यापीठीय ग्रंथालयांमधे

वरदा... त्याला आणि मला त्यावर इथे जे लिखाण केलय त्याबद्दल म्हणायचे आहे. Happy अर्थत मला ठावुक आहे की ती बखर पुस्तक रुपात उपलब्ध आहे ते. त्यावरुनच मी लिखाण केले आहे ना. Happy

सेना, इथलं वाचून मी आताच जरा सर्च मारला तर माझी "प्रिय सखी" ही कविता एका महाभागाने "mangyz sp@ce" नावाच्या स्वतःच्या ब्लॉगवर बिनधास्त स्वतःच्या नावाने टाकलिये.... तिथल्या इतरही बर्‍याच कविता उचललेल्याच दिसतायत......... यावर उपाय???? त्याला कमेंट टाकलिये तिथे....

आज सहज सर्च करत असताना
सोंग सजवण्याची कला हे सापडले.
इथे माझा लेख आला आहे हे मला माहितच नव्हते. कृषिवलकडून मला संपर्क साधला गेला नव्हता. लेखाखाली सौजन्य: मायबोली डॉट कॉम हे वाचून धक्का बसला. मायबोलीवरील लिखाणाचा हक्क हा लेखकाचाच असतो हे माबो प्रशासनाने मान्य केले असूनही असे झाले आहे.

माबो प्रशासनाने ही परवानगी दिली आहे असे अजिबात म्हणणे नाही किंबहुना माबो प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. माबो प्रशासनाकडून अशी परस्पर परवानगी कधीही दिली जाणार नाही याची खात्री आहे.

परंतु कृषिवल आणि मायबोली यांच्यामधील इंटरअ‍ॅक्शनचा कृषिवलकडून असा चुकीचा अर्थ घेतला जातोय असे वाटतेय. हे मायबोलीच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही.

अजून शोधू जाता रारने टाकलेला, तिच्या वडीलांनी म्हणजे रानडे काकांनी लिहिलेला
घाशीराम कोतवाल चा पहिला प्रयोग...सूत्रधाराच्या नजरेतून!
हा लेखही तिथे दिसला. तिथे तर रानडे काकांचं नाव पण द्यायच्या भानगडीत हे लोक पडलेले नाहीयेत.

त्यांनी घेतला तो घेतला पण नाव माबोचं जातंय त्यामुळे भविष्यात दुसरं कुणी लिहिणारं माबोला जबाबदार धरू शकतं.

वेबमास्तर, अ‍ॅडमिन, अ‍ॅडमिन टीम कुणीतरी यात लक्ष घालणे गरजेचे आहे.

कॉपी राइटला एक्सेप्शनही आहेत ना? लोकशिक्षण, प्रयोगात्मक , मुलाना शिकवणे , परिक्षेसाठी ...अशा अशा कारणांसाठी पैसे न मिळवता वापरला तर चालते ना? कॄशीवल त्या लेखावर पैसे मिळवत नसेल तर तुम्ही कितपत अ‍ॅक्शन घेऊ शकता ? शिवाय खाली तुमचे नावही आहे.

( आठवीच्या पोराना पिग्मॅलियन नाटकावर धडा आहे. आजच पिग्मॅलियन आणि ती फुलराणी नेटावरुन घेऊन त्यातल्या दोन्हीतल्या कॉमन क्लिपा काढून त्या जोडाजोडी करुन म्या नवीन फिलिम तयार केली आहे. Happy पोराना शिकवायला. )

माझे नाव आहे. म्हणजे माझी परवानगी नव्हे.
कृषिवल त्यांचा अंक विकतात. धर्मादाय वाटत नाहीत. म्हणजे व्यावसायिक उपयोग झाला.
माझा लेख माझ्या परवानगीशिवाय, मला कुठलेही मानधन न देता त्यांनी छापणे याला चोरणे म्हणतात.

कृषीवलचा छापील विकतचा अंक आणि नेटावरचा फुकट अंक एकच असेल तर तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. पण विकलेल्या अंकात तुमचा लेख आहेका हेही पहा.

माझे नाव आहे. म्हणजे माझी परवानगी नव्हे.
>>> मान्य. तुझ्या वरच्य पोस्ट मध्ये तसा उल्लेख नव्हता म्हणुन विचारले. मला वाटले आधी तिथे तुझे नाव नव्हतेच की काय.

ही चोरीच आहे.

अंक फुकट असो वा विकत, मायबोलीशी संलग्न वेबसाइट असली म्हणून इथलं लिखाण, मूळ लेखकाच्या परवानगीविना चिकटवता येणार नाही. मायबोलीवरच्या लिखाणाचा कॉपीराइट पूर्णतः लेखकाचा आहे!

दिवाळी अंक आणि संवाद सोडून इतर सर्व लेखनाचे प्रताधिकार लेखकाकडेच असतात. मायबोली प्रशासनाकडे कृषिवलने कसली परवानगी मागितलेली नाही आणि प्रशासनाने ती दिलेलीही नाही. कृषिवल फक्त मायबोलीच्या २०११ मधल्या रसग्रहण स्पर्धेचे स्पॉन्सर्स होते.

admin, MB prashasanakadun ase chukiche honar nahi yabaddal purn vishwas aahe. Tyabaddal khatri asavi.

हे असे होऊ नये म्हणून लेखात ठिकठिकाणी स्वतःचे नाव अथवा वैय्यक्तिक संदर्भ पेरावेत म्हणजे वाचकांच्या लक्शात मूळ लेखक येईल. पूर्वीचे संत नाही का तुका म्हणे,नामा म्हणे, दास रामाचा असे तखल्लुस टाकत? कवितेत हे शक्य आहे तर गद्यात बिलकुल शक्य आहे...

याचा विचार व्हावा..

इथुन सरसकट ड्रॅग - सिलेक्ट - राईट क्लिक - कॉपी करुन लिखाण इतरस्र डकवले जातयं...

ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल करण्यासाठी एक स्क्रिप्ट वापरली जाते तशी इथे वापरता येईल का? शिवाय ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट आहे. जे लोक हे वापरतात त्यांच्या ब्लॉगवरील लिखाण आता कॉपी होण्याच प्रमाण खुप कमी झालयं. असं काही इथे करता येईल का?

>>>राईट क्लिक डिसेबल
ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट

लोक स्क्रीन शॉट्स घेऊन चिकटवतील. Sad
थोडा द्राविडी प्राणायाम् असला तरी चोरायचंच म्हंटल्यावर प्रिंटआउट्स घेऊन, ते स्कॅन करून चिकटवणं कठीण नाही.

पण टक्केवारी नक्कीच कमी होईल की. सर्वच प्रिंटआउट्स घेऊन, ते स्कॅन करून डकवतील असे वाटत नाही. हे चोर आळशी असतात. त्यांना सहज काय हाताशी मिळते ते हवे असते. इतका त्रास ते घेतील असे वाटत नाही. Happy

Pages