आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच...

Submitted by सेनापती... on 11 May, 2011 - 12:12

नमस्कार मित्रांनो...

काल सहजच एका इतिहासाच्या साईटवर गेलो असता तेथे माझे ४ लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने आढळून आले. शोध घेतला असता ते माझे लिखाण चोरून तिथे टाकल्याचे लक्ष्यात आले. साईटचा मालक माझ्या मित्राचा मित्र असल्याने हे प्रकरण २-३ तासात आटोपले गेले आणि तिथे लिखाणावर माझे नाव झळकू लागले. पण मनात आलेला संदेह दूर करण्यासाठी मी माझे इतर लिखाण गुगलवर शोधून पहिले असता धक्काच बसला..

इतिहासावरील माझे जवळ-जवळ सर्व लिखाण चोरीला गेलेले होते. ह्या-ना त्या अश्या असंख्य साईट्सवर ते विखुरलेले आहे. मराठीचा कैवार घेतलेल्या आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर मराठी साईट्स उघडलेल्या ह्या लोकांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे... अनेकांना कमेंट्स लिहिल्या. अनेकांना मेल्स सुद्धा पाठवली आहेत...

आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच आहे. मग ते ब्लॉग लिहा नाहीतर कुठल्याही साईटवर. इथूनही अनेक लोक लिखाण चोरून स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर टाकून पैसे कमावत असतील.. आपण हे कधी तपासून पहिले आहे का?

*************************************************************************************************************

ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल करण्यासाठी एक स्क्रिप्ट वापरली जाते तशी इथे वापरता येईल का? शिवाय ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट आहे. जे लोक हे वापरतात त्यांच्या ब्लॉगवरील लिखाण आता कॉपी होण्याच प्रमाण खुप कमी झालयं. असं काही इथे करता येईल का?
दोन्ही स्क्रिप्ट इथे दिलेल्या आहेत. ह्याने चोरी बंद होईल असा दावा नाहीये पण टक्केवारी नक्कीच कमी होईल की.

blog_script.txt (1.29 KB)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पक्का भटक्या,

अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही केल्याशिवाय मराठीचे हे स्वयंघोषित कैवारी सुधारणार नाहीत.
सायबर क्राइम सेलला फक्त एक ईमेल पाठवून आपण आपली तक्रार नोंदवू शकतो. सोबत त्या पानाचा दुवा आणि स्क्रीनशॉट पाठवायचा. मी मध्यंतरी पुण्याच्या सायबर क्राइम सेलच्या डॉ. तुंगारांशी बोललो होतो. प्रकाशक, लेखक यांपैकी कोणीही तक्रार केल्यास त्याची दखल घेऊन कार्यवाही करू, असं ते म्हणाले होते.
त्यांची सविस्तर मुलाखत मी लवकरच मायबोलीवर प्रकाशित करेन.

रोहन
मुद्रित साहीत्यात कॉपीराइटची सोय असते. तशी जालावर काय आहे रे ? आणि टंकनाचे कष्टही पडत नाहीत. कित्ती सोप्प ना ?
एखादं संस्थळ लेख / साहीत्य यांच्या नोंदणीसाठी असायला हवं असं वाटतं. इथे नोंदणी करून सर्व हक्क सुरक्षित केल्यावर मग कुठेही ते प्रकाशित करता यावं जेणेकरून साहीत्याच्या स्वामित्वाबद्दलचा वाद निर्माण झाल्यास या नोंदणीमुळे आपोआपच सर्व स्पष्ट होऊ शकेल.

मला माझेच दोन तीन लेख मेल मध्ये आले व काही लेख आणखी काही ब्लॉगवर सापडले, मिसळपाववर ह्या वर माझी खडाजंगी झाली, एका माणसाने लेख ब्लॉगवरून काढले पण ह्यावर काही करता येईल असे वाटत नाही.

भारतात पोलीसांना तक्रार केल्यावर (ह्या विषयावर) ते दखल घेतील असे मला वाटत नाही. अर्थात असेच राहावे ही इच्छा नाही पण सध्या तरी हीच वस्तुस्थिती आहे. काही वर्षांनी (म्हणजे देव जाणे) कदाचित परिस्थिती बदलेल. तो पर्यंत .. लेख सापडला तर मुळ लेखाचा दुवा, दिनांक मी पब्लीकला देऊन तो माझा लेख आहे हे सांगतो.

चिनुक्स.. गेल्या वर्षी स्टार माझा वर ह्या संदर्भात एक चर्चा देखील घडवून आणली होती... 'बोक्या सातबंडे' नावाच्या माणसावर सायबर केसही केली होती... पोलीस ह्या बाबतीत पूर्ण सहकार्य देतातच.
मुद्रण साहित्याचे जसे नियम आणि कायदे आहेत तसे कायदे आंतर जालावरील लिखाणाला देखील लागू होतात.

हे एक बघा... under/sec.13 of Indian copyright act, copyright shall subsist in original literary, dramatic, musical and artistic works; i.e. each author or artist has a copyright of his original work by default http://copyright.gov.in/Documents/CopyrightRules1957.pdf

बरोबर. आंतरजालावरील साहित्याला वेगळे नियम नाहीत. छापील साहित्य लेखकाच्या आणि प्रकाशकाच्या परवानगीशिवाय आंतरजालावर प्रकाशित करणे बेकायदेशीर आहे. तसंच आंतरजालावरील लेखही परवानगीशिवाय इतरत्र प्रकाशित करता येत नाहीत.

लेखन जर स्वतंत्र असेल (म्हणजे मध्यवर्ती कल्पना व शैली स्वतंत्र असतील) तर स्वामित्वहक्क आपोआप लागू होतो. नोंदणी केली नसली तरी फरक पडत नाही.

लेख सापडला तर मुळ लेखाचा दुवा, दिनांक मी पब्लीकला देऊन तो माझा लेख आहे हे सांगतो.
केदार..
हे खूपच महत्वाचे आहेच... मूळ लेख कोणी लिहिला.. त्याची कॉपी कोणी केली मग अजून कॉप्या कोणी काढल्या... ह्यासाठी टाईम tag महत्वाचे ठरतात.तू म्हणतोस तसेच... हे प्रकार थांबवणे अशक्य आहे...

मी जेंव्हा ह्या व्यक्तीला माझ्या लेखाबद्दल मेल केला तेंव्हा त्याने दिलेले उत्तर वाचा... ते सुद्धा इंग्रजी मध्ये...

me ti orkut varun majhya frnd list madhlya eka frnd ne takleli tithun link milali...ani tithun vachli me..avdli ani ekach thikani sarv yave yasathi majhya blog madhe include keli.. ata ithe lekhak kon yas duyyam sthan ahe..maharajani agryavarun palayan kase kele yala mahatva ahe.. tula tujhi post me majhya blog madhe include keli or tujhya bhashet chorli or crime kela den tyas duyyam mahatava dile ahe me...mahatva me post la dile ani ti include keli majhya mhannyapeksha shivrayanchya blog madhe..

ह्यांच्या मते माहिती महत्वाची आणि म्हणे लेखक दुय्यम??? काही अर्थ आहे का? मूर्खाचा कारभार...

सर्वात महत्वाचे म्हणजे हे चोर लोक आपले लेख त्यांच्या साईटवर लावून पैसे कमवतात ... आता आम्हाला असे पैसे कमवायचे असते तर आम्हीच नसती का एखादी फालतू साईट सुरू केली..

मराठी अभिमान काय, कट्टा काय, अड्डा काय.. अन अजून काय काय... ही पिलावळ अजून वाढत जाणार आहे हे नक्की...

पक्का भटक्या,

Information Technology (Intermediaries guidelines) Rules, 2011 हे नियम भारतात लागू होण्याची शक्यता आहे. आंतरजालावर या कायद्याची कलमं आहेत. हा कायदा लागू झाल्यास परवानगीशिवाय साहित्य प्रकाशित करणार्‍यांना तर शिक्षा होईलच, पण ते प्रकाशित करणार्‍या संस्थळावरही कार्यवाही होऊ शकते.

लवकर नियम आले तर बरे आहे नाहीतर आपण आपले चर्चा करत बसणार आणि ज्यांना हे असले उद्योग करायचे आहेत ते तेच करणार...

चिनूक्स माहीती साठी आभार.
अशाच प्रकारचे धागे आधीही एक दोन वेळा इथे बघितले आहेत. तेव्हा बहुधा लिहिले होते पण इथे काही नविन माहितीसह लिहिते.

- आपला ब्लॉग http://myfreecopyright.com इथे किंवा अशा दुसर्‍या साईट असतील तिथे रजिस्टर करावा. आपण ब्लॉग वर पोस्ट टाकल्यावर थोड्या वेळात इथुन आपल्या पोस्टच्या तारिख वेळेचे इमेल येते. ते उपयोगी ठरू शकते/
- ब्लॉग वर myfreecopyright च्या लोगो/ लिंक सकट ब्लॉग कॉपिराईट प्रोटेक्टेड आहे हे लिहावे.
खरतर कुठल्याही कला /लिखाणासाठी तीच्या जन्माच्या क्षणीच निर्मात्याला कॉपिराईट अधिकार प्राप्त झालेला असतो. पण बर्‍याच लोकांना याची जाणीव करुन द्यावी लागते. तेव्हा हि नोटि ब्लॉगवर ठेवलेली चांगली.
- http://www.copyscape.com/ या वेबसाईट वर आपल्या पोस्टची लिंक देऊन तो लेख कुठे कुठे कॉपी झाला आहे ते शोधता येते. ते शोधुन संबंधीतांना इमेल करता येईल. त्याआधी पुराव्यासाठी एक स्क्रिन शॉट काढून ठेवावा.
- ब्लॉग वरच्या पोस्ट कॉपी करता येणार नाहीत अशी स्क्रिप्ट वापरणे. यामुळे सरळ राईट क्लिक करून कॉपी करणे शक्य होणार नाही आणि बरेचसे अति उत्साही कॉपी बहाद्दर टळतील. अर्थात ज्यांना टेक्नीकल माहीती आहे ते इतर प्रकारांनी कॉपी करू शकतीलच . पण प्रमाण कमी होईल.
- मायबोलीवरही लिखाण कॉपी करता येऊ नये अशी सुविधा हवी असे मी मागेही म्हणाले होते. जर मायबोली प्रशासकांपर्यंत हि मागणी पोचवता आली तर खरच फार छान होईल.

aschig, हे प्रत्येकाचे प्रत्येकावर अवलंबुन आहे. (म्हणजे काय चालवून घ्यायचे ते)
पण कॉपिराईट नुसार साहित्य/ कला मुळ मालकच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारे वापरणे, पार्टली किंवा पुर्ण दुसरीकडे प्रकाशित करणे/ वापरणे हे कॉपिराईट नियमांचे उल्लंघन आहे.

यामधे एक उदाहरण देते -
समजा मी एक फोटो काढला आणि तो एका एजन्सीला ऑनलाईन विकला. त्या एजन्सी सोबत माझे कॉन्ट्रॅक्ट फक्त युरोप रिजन मधे आहे. आणि हा फोटो युरोप शिवाय कुठेही प्रकाशित करायचा नाही अशी त्यांची अट आहे.
आता कुणीतरी तो कॉपी करुन माझ्या नावानिशी परवानगी शिवायच भारतात वापरला तर हे ब्रीच इन कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं. तिथे मलाही प्रुव्ह करावे लागेल की मी हा फोटो वापरण्यासाठी कुठलीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे परवानगी शिवाय काहीही वापरण अगदी नावानिशी असेल तरी ते चुकच आहे.
(हे नुसते उदा. आहे)

सावली, चांगली माहिती दिलीयेस आणि तुझा मुद्दाही पटला.

मला वाटतं, हल्ली हे ब्लॉग्ज उघडायचं पेव फुटलंय. दोन ओळी कुठेतरी खरडायच्या, दोन-चार लोकांची वाहवा मिळवायची आणि लगेच ब्लॉग उघडायचा. सामान्य टॅलेंट असलेल्यांना हे कुठवर जमणार? म्हणजे सतत ब्लॉगवर नव-नवीन लिहीत राहाणं. मग असा हात मारत राहायचं इथे-तिथे. ह्यात नुसते लेखच नाहीत तर बाकी बरंच येतं.

अ‍ॅडमिन, असं खरंच काही करता येईल कां? म्हणजे माबोवरचं ही कुठे कोणाला चोरता येणार नाही आणि इतर ठिकाणंच चोरलेलंही इथे टाकता येणार नाही.

मुळात ही बौद्धिक संपदा आपली आहे हे "सिद्ध" करावं तर लगेल ना ? म्हणजेच अशी काळजी घेतली गेली नसेल तर आपल क्लेम टिकणार नाही.

उदा. ऑर्कूटवर एकदा मी गिरण्यांच्या प्रश्नावर " बघ तुला राजसाहेबांची आठवण येते का " ही कविता लिहीली होती. अर्थातच त्या कवितेचा रोख एका मराठी नेत्याकडे आहे असं वाटल्याने शिवसेनेच्या कित्येक कम्युनिटीजवर ती तिथल्या सदस्यांनी स्वतःच्या नावासहीत खपवली. अर्थातच ही कविता सौमित्रच्या कवितेवर बेतलेली असल्याने फारसं लक्ष दिलं नाही. पण उदाहरण म्हणून पहायचं झाल्यास आता मी ऑर्कूट अकाउंट डिलीट केलेलं आहे. माझ्याकडे कुठलाही बॅक अप नाही ( असता तरी फरक पडला नसता म्हणा).

आताच्या परिस्थितीत ही कविता ज्याच्या नावावर आधीपासून आहे त्याचीच ती समजली जाईल ना ?

निर्जंतुक जंतू... एकदम बरोबर...
माझे बरेच लिखाण देखील ओर्कुटवरूनच ढापले गेले आहे.. मी सुद्धा आता तिथे नाही... अर्थात असल्याने काही फारसा फरक पडला नसता... कॉपी-पेस्ट करून इथे - तिथे टाकणाऱ्या लोकांना ती चोरी वाटत नाही.. आम्हाला आवडले, शेअर करावेसे वाटते... असे सांगून ते मोकळे होतात.. अनवधनाने ती चोरी असते ह्यावर त्यांचा विश्वास बसतच नाही...

आडो.. पेव म्हणजे काय.. विचारायलाच नको... Happy
पण होतंय काय... प्रामाणिकपणे विविध विषयावर लिखाण करणारा ब्लॉग-लेखक आपोआप मागे सरकेल.. राहील ती फक्त उष्टावळ... मग जोपासा माय मराठी कॉपी पेस्ट करून..
उगाच नाही हे पप्पू-टप्पू १ महिन्यात १५०-२०० पोस्ट टाकत..

पक्का भटक्या रोहन आणि इतर मित्रांनो पुढे कमितकमी १०० (अधीक) वर्षे तरी ऑनलाईन चोरी प्रतिबंधीत करणारा असा सॉफ्टवेअर/यंत्रणा निघणे अशक्य. कारण ही संगण प्रणालीच अशी आहे की ती जितकी सोप्पी होउ शकते तितकी आहे आणि भविष्यात यातच सुधारणा केली जात राहणार. त्यामुळे चोरी ही सहज करता येउ शकेल अशीच शक्यता सतत राहील.
अगदी पीडीएफ फाईल्सही चोरल्या जातात. Lol
एकुण ईलेक्ट्रॉनिक अक्षरांवर नियंत्रण करणे सोप्पे आहे पण माणसाची चोरवृत्ति नियंत्रित करणे अशक्य.

अनेक लोक लिखाण चोरून स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर टाकून पैसे कमावत असतील.. Light 1
ब्लॉगवर पैसे कसे काय ? Uhoh

ऑन्लाईनच नाही, प्रिंट मिडियातही हे चाल्लंय. माझा 'आर्ट ऑफ लिव्हिंग' चा लेख दै.लोकमत ने १५ मेच्या त्यांच्या पुरवणीत छापला. मला कळवण्याची तसदी तर घेतली नाहीच, पण माझ्या लेखातला अधला मधला काही भाग गाळून तिकडे छापलाय. खाली माझ्या ब्लॉगची लिंक दिलीय. तरीही, काही मजकूर गाळायचा त्यांना काय अधिकार??
ही लोकमतची लिंक - http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/ManthanEdi...

विदेश - मोगरा फुलला - साहीत्यचोर वाचल - माझ तर डोक गरगरायला लागलय.
साहीत्यचोराचा निषेध... Angry

तू सरळ संपादकांना खुलासा विचार... लोकमतचे हे काही नवीन नाही... आधीही इतर काही ब्लॉगर लोकांचे लेख त्यांनी चोरून छापलेले आहेत...

Pages