आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच...

Submitted by सेनापती... on 11 May, 2011 - 12:12

नमस्कार मित्रांनो...

काल सहजच एका इतिहासाच्या साईटवर गेलो असता तेथे माझे ४ लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने आढळून आले. शोध घेतला असता ते माझे लिखाण चोरून तिथे टाकल्याचे लक्ष्यात आले. साईटचा मालक माझ्या मित्राचा मित्र असल्याने हे प्रकरण २-३ तासात आटोपले गेले आणि तिथे लिखाणावर माझे नाव झळकू लागले. पण मनात आलेला संदेह दूर करण्यासाठी मी माझे इतर लिखाण गुगलवर शोधून पहिले असता धक्काच बसला..

इतिहासावरील माझे जवळ-जवळ सर्व लिखाण चोरीला गेलेले होते. ह्या-ना त्या अश्या असंख्य साईट्सवर ते विखुरलेले आहे. मराठीचा कैवार घेतलेल्या आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर मराठी साईट्स उघडलेल्या ह्या लोकांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे... अनेकांना कमेंट्स लिहिल्या. अनेकांना मेल्स सुद्धा पाठवली आहेत...

आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच आहे. मग ते ब्लॉग लिहा नाहीतर कुठल्याही साईटवर. इथूनही अनेक लोक लिखाण चोरून स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर टाकून पैसे कमावत असतील.. आपण हे कधी तपासून पहिले आहे का?

*************************************************************************************************************

ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल करण्यासाठी एक स्क्रिप्ट वापरली जाते तशी इथे वापरता येईल का? शिवाय ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट आहे. जे लोक हे वापरतात त्यांच्या ब्लॉगवरील लिखाण आता कॉपी होण्याच प्रमाण खुप कमी झालयं. असं काही इथे करता येईल का?
दोन्ही स्क्रिप्ट इथे दिलेल्या आहेत. ह्याने चोरी बंद होईल असा दावा नाहीये पण टक्केवारी नक्कीच कमी होईल की.

blog_script.txt (1.29 KB)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर काळाच्या आघाताला सुरूवात झाली. सईबाईंच्या पश्र्चात राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. संभाजीराजांना कोणकोणते शिक्षण दिले गेले हे सभासद व चिटणीसांच्या बखरीतून मोठ्या प्रमाणावर स्पष्ट होते.

‘‘संभाजीराजांनी विद्याभ्यास करावा, त्याला सुशिक्षित करावे म्हणून त्याला घोड्यावर बसविणे, शास्त्रविद्या, तालीम यांचे शिक्षण देवविले. अष्टप्रधान यात राजपुत्राची गणना आहे. सर्व आमात्य राजाचा वामभुज; युवराज, राजपुत्र हा सत्यभुज असे आहे. त्याअर्थी तो सुशिक्षित असावा म्हणून लेखनादि अभ्यास करविला. दंडनिती, राजधर्म हे सांगविले. राजपुत्र धर्म, पितृसेवा कायावाचामने करावी. पित्याने संतुष्ट होऊन युवराजपद कारभार सांगितला असा गर्वारुढ उत्पन्न होऊ नये. राजाचे कुळी अनीतिमान पुत्र निर्माण झाला म्हणजे ते राज्य व कुल शीघ्र क्षयास जाते. म्हणुन बहुत नीतिने रक्षिणे तसे रक्षिले. आणि मातबर सरकारकून प्रौढ यांच्यापाशी बसावे, दरबारात बसावे म्हणजे कारभार माहित होत जाईल.’’ अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रांत आढळते. अशा प्रकारे संभाजीराजांचे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण झाले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची अतिशय काटेकोर पद्धतीने जडणघडण होत गेली.
____________________________________________________

हायला, मला बी जमलं .. सोप्पाय ... ल्यापरोस्कोपिक सर्जरी केली. Proud सेनापतींच्या बुरुजाला भगदाड पाडलं

ctrl+a->ctrl+c->
हे करुन वरचा ब्लॉग कॉपी होत नाहीये. तुम्ही स्क्रिप्ट डीसेबल करुन करताय का?
अशक्य नाही हे मान्यच आहे.
हि चर्चा इथेच केली तरी चालेल असे वाटतेय, म्हणजे अजुन काही गोष्टी कळतील.

जामोप्यांना जमलंय बघा वर.

लोकहो, मी तुम्हाला डिसकरेज करीत नाहीये. मला या पेक्षा अधिक सशक्त स्क्रिप्ट सापडलं तर नक्की देईन. पण मी हौशी कॉम्प्युटर यूजर आहे. माबोवर बरेच दिग्गज आयटी प्रोफेशनल्स आहेत. त्यांच्यापैकी कुणी मदत करावी असे आवाहन करतो.

मी तुम्हाला डिसकरेज करीत नाहीये.
>>> मी/आम्ही होणारही नाही. कारण माझ्यासारखे ह्या स्क्रिप्टमधले काहीही न कळणारे असंख्य लोक असतात. Happy १०० पैकी ४ जणांना तुमच्यासारखी ट्रिक येत असेल.. चला १० जण पकडुया. तरी ९० टक्के यश आलेच की. Happy ह्यापेक्षा अजुन भारी स्क्रिप्ट देखील असतीलच.

सेनापती, मीही याबबतीत हौशी कलाकारच आहे. . वेब पेज आपल्या डेस्क टॉपवर सेव अ‍ॅज करुन कॉपी करुन घ्यायचे . मग ते एडिटच्या ऑप्शनने ओपन करायचे. हवा तो म्याटर कॉपी पेस्ट करता येतो. इंटरनेट एक्स्प्लोरर असेल तर डायरेक्ट ओपन इन फ्रंटपेज असाही एक ऑप्शन कुठेतरी असतो. तसेही होईल असे वाटते

इब्लिस, तुम्ही कसे केलेत?

तरी ९० टक्के यश आलेच की.<<

हे मान्य!
तितक्यानेही बरेच प्रश्न कमी होतात. हेही नसे थोडके.

या जेवायला Wink

इथुन सरसकट ड्रॅग - सिलेक्ट - राईट क्लिक - कॉपी करुन लिखाण इतरस्र डकवले जातयं... >>>>माझा "मन का बोलाविते....." जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून ईमेल मध्ये फिरायला लागला आहे. Happy मित्रमैत्रीणींने, मायबोलीकरांनी फोनवर/ईमेल करून कळवले. काहि ईमेलमध्ये माझे नाव आहे आणि काही ईमेल मध्ये नाही.

.एका फेसबुक पेज ने तर महिकावतिचि बखर जी आज फक्त आर्टीकल्स मध्ये मायबोलि वर उपलब्ध आहे ती बखर स्वतःच्या नावाने पोस्ट केली आहे...असे अनेक लेख मायबोली आणि इतर ब्लॉगवरुन चोरलेले आहेत अश्या उद्योगाना आळा घालणे गरजेचे आहे...!!!
>>> परवा त्याला वठणीवर आणला आहे. आता तिथे तुम्हाला माझे नाव दिसेल. Happy

त्याच पेजवर अभिजित (बित्तंबुंगा) यांचा एक फोटो कव्हर फोटो म्हणून डकवला गेला होता. तिथेही आता त्यांचे नाव दिले गेले आहे.

केवळ आंतरजालावरचे काय घेऊन बसलात. पुस्तके देखील छापली जातात स्वस्तात गुपचुप लेखक आणि प्रकाशकांना माहित देखील नसते आणि परस्पर विकून गब्बर पण होतात लोक, अर्थात मी हे केवळ ऐकले आहे माझ्या एका ओळखीच्या माणसाकडून, तो बिचारा पुस्तक लिहायचे म्हणत होता आणि त्यासाठी अनेक प्रकारची माहिती (छपाई, प्रकाशक, इ.) गोळा करत होता, त्यात त्याला ही पण मौलिक माहिती मिळाली.

प्रत्येक वेबपेज ची गुगल द्वारे एक प्रत बनविली जाते...उद्देश हाच कि जर एखादेवेळी ती वेबसाईट बंद असेल तरीही त्याचा टेक्स्ट कंटेंट उपलब्ध व्हावा,त्यामुळे अशी पेजेस गुगलच तयार करत असल्याने आणि त्याचा टेक्स्ट ओन्ली वर्जन बघता येत असल्याने इथे मूळ वेबसाईट ला कोणतीही स्क्रिप्ट लावली तरी उपयोग होत नाही.
भारतात याबद्दल सक्षम कायदा नाही DMCA सारख्या संस्था कंटेंट प्रोटेक्शन करतात आणि जर कोणी कंटेंट ढापला असेल तर त्याला नोटीस देऊन कारवाई करतात किंवा त्याची वेबसाईट बंद पडतात,पण यांचे कार्यक्षेत्र अमेरिकेपुरतेच मर्यादित आहे.

आज फेसबुक वर राहुल फाटक चा मॅक्डोनाल्ड्स आणि पुणेरी पाट्या हा लेख "पुणेरी दणका " या ग्रुप वर पोस्ट झालाय अन तिथून सगळीकडे शेअर होते आहे- लेखकाच्या नावाशिवाय (पुणेरी दणका= राहुल फाटक असेल तर मग ठीक Happy )
http://www.facebook.com/#!/puneridanaka
मी तिथे एक कमेन्ट टाकली आहे .

अमानवीय धाग्यावरच्या पोस्ट वाचून सहज माझ्याच एका लेखाची अधलीमधली वाक्य गूगल करून पाहिली. तर हे असे नमुने मिळाले. वर शहाजोगपणे "मायबोली.कॉमच्या सौजन्याने" हे लिहिलेले आहे.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=426218417438509&id=176...

http://vithalrukmini.blogspot.in/2010/07/blog-post.html

काय बोलावे????

>>>काय बोलावे????>>>
"निर्लज्ज चोर आहात" असं सरळ त्या त्या ब्लॉग वर जाऊन आपण सर्वांनी लिहायचे. Angry

मायबोलीवरच्या सर्व लेखनाचा प्रताधिकार मूळ लेखकाकडे असतो. तुमचे लेखन चोरून blogspot वर प्रकाशित झाले असेल तर इथे तक्रार करता येईल.

https://support.google.com/legal/contact/lr_dmca?contact_type=lr_dmca&pr...

वेबमास्तर धन्यवाद. वरील ब्लॉगस्पॉटची तिथे तक्रार केली आहे.

कृपया अशीच फेसबूकसाठी तक्रार कशी करावी याबद्दल देखील मार्गदर्शन करा.

फेसबुकवरच्या ग्रुपवर परवा येथील एक लेख पाहिला . विचारले असता माबोवरच तो चोरुन टाकलाय असे सांगितले

हे लेखनाबद्दल नाही, आर्टवर्क बद्दल आहे तेंव्हा आउट ऑफ टॉपिक असेल माझ्या बिजनेस ची advertisement वाटली तर सांगा, डिलिट करते.

तर , एक फेमस कोट आहे " If you want to be original , be ready to get copied"- Coco Chanel
आजकालच्या काळात हा कोट नव्यानेलिहावा लागेल, If you want to be original , be ready to get stolen !

मी खरं तर नेहेमी वॉटरमार्क टाकते माझ्या आर्टवर्क वर फक्त एकदा एक्साइटमेन्ट मधे ऑन सेट सेलिब्रिटी बरोबर काम करत होते म्ह्णून वॉटरमार्क टाकायचा आळस केला आणि एक मेंदीचा फोटो तसाच इन्स्टाग्रॅम वर टाकला.
ते डिझाइन अक्षर्शः व्हायरल गेलं! अख्या जगभर अनेक ठिकाणी विदाउट क्रेडीट लोकांनी रिपोस्ट केला, काहींनी स्वतःच्या नावावर खपवला ! ऑफ कॉर्स इट वॉ माय मिस्टेक अँड लेसन लर्न्ड वन्स अगेन !
दिलासा एवढाच कि जितकी चोरी झाली त्या पेक्षा जास्तं जेन्युइन फॅन्स मिळाले मला या डिझाइनमुळे , नंतर हे डिझाइन अनेक फॅशन मॅगझिन्स मधे विथ क्रेडीट पब्लिश झाल्यावर लोकांना अर्टीस्ट बिहाइंड इट नाव समजले आणि मला नवीन ओळख मिळाली.
मला अजिबात ओळखत नसलेल्या हजारो लोकांनी जिथे चोरी दिसेल तिथे फोटो चोरांना समज दिली/ अजुनही देतात , मला टॅग करतात जिथे ढापुगिरी दिसेल तिथे !
चूक माझी अशासाठी कि काही लोकांना ओरिजनल काम कोणायचय माहित नसतं वॉटरमार्क नसल्याने त्यामुळे ते तसाच रिपोस्ट करतात आवडला म्हणून, जे समजु शकते पण या चोरी मधे मिलियन्स फॉलोअर्स असलेले अनेक मोठे ब्लॉग्जही होते, अगदी जगातल्या टॉप २० कमर्शिअल फॅशन ब्लॉग्ज मधे येणार्यांनी विदाउट क्रेडीट फोटो स्वतः च्या ब्लॉगवर टाकले, ज्यांना पक्कं माहित होतं हे आर्टवर्क माझं आहे , मी मोठ्या नावांची पर्वा न करता समज दिली त्या ब्लॉगर्स् ना , मग टॅग केलं काहींनी , ' लिहायला विसरलो' अशी केअरलेस कारणं देउन.
हा तो फोटो , कुठे चोरी दिसली तर मला माझ्या इन्स्टग्रॅम ( @gloryofhenna) वर टॅग करून जरुर कळवा :).
http://instagram.com/p/qHpzP-Sx2g/

प्लिज फोटोज / artworks टाकताना कधीही विदाउट वॉटरमार्क टाकु नका !, जर तुम्ही एखादी inspiration घेउन काही रिक्रिएट करत असाल तर ओरिजनल इन्स्पिरेशन जरुर लिहा :).

आउट ऑफ टॉपिक नाहिये. कूठलीही कला असो तिची चोरी ही चोरीच.

' लिहायला विसरलो' अशी केअरलेस कारणं देउन.
>>> ही तर नेहमीची पळवाट आहे लोकांची. छान वाटले म्हणून शेअर केले, आमचा तसा काही उद्देश नाही हे डायलॉग देखील ठरलेले आहेत.

अजुन एक म्हण्जे, जेंव्हा आर्टवर्क तुमचं आहे पण फोटो तुम्ही काढला नसेल तर तुम्ही स्वतःचा वॉटरमार्क लाऊ शकत नाही !
अशा वेळी एक गोष्ट करता येते चोरीला आळा घालण्यासाठी, जेंव्हा तुम्ही टिम बरोबर काम करत असता, सगळ्या टिम मधल्या लोकांनी त्या फोटो वर काम केलं असेल तर पूर्ण टिमचा उल्लेख जरुर करा जेणे करून सगळ्या टिम ऑफ अर्टीस्ट्स ना योग्य ते क्रेडीट मिळेल.
उदा : या व्हिडीओ क्लिप मधे डिरेक्टर नी उजव्या बाजुला या शुटवर कम केलेल्या पूर्ण टिम चा उल्लेख केला आहे, दॅट्स राइट थिंग टु डु, व्हेरी प्रोफेश्॑न्॑ल.
http://instagram.com/p/wiSUmCvq46/

मायबोलीवरील सुप्रसिद्ध लेखक, साहीत्यिक, कवी, गझलकार बेफिकीर यांची मायबोलीवरील गाजलेली कादंबरी २०३, डिस्को बुधवार पेठ, पुणे २ ही चोरीला गेली आहे. प्रतिलिपी या वेबसाईटवर ती आहे.

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A4%A1...

Pages