Submitted by admin on 26 July, 2011 - 23:01
बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले? त्यासंबंधी आपल्या प्रतिक्रीया इथे लिहा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या वेळचं सम्मेलन उत्कॄष्ठ
या वेळचं सम्मेलन उत्कॄष्ठ जेवण आणि व्यवस्था, चांगले कार्यक्रम, राजकीय पुढार्यांची अनुपस्थिती, उत्तम चहापाण्याची सोय इत्यादी बर्याच कारणांमुळे खूपच छान झालं.
फेसबुकवर कुणीतरी, 'उभ्या उभ्या विनोद' हा दर अधिवेशनात स्थाई असावा अशी कॉमेंट टाकली आहे. चुकल्या बद्दल हळहळ व्यक्त करणारे बरेच लोक भेटलेही.
एकंदरीत एक उत्तम सम्मेलन पार पडले. शिकागोकरांचे खूप खूप आभारी आहोत..
मला वाटतं ३२०० लोकांची उपस्थिती अपेक्षीत होती, आणि शनिवारच्या दिवशी तेवढे लोक आलेही होते.
धन्यवाद विनय. उभ्या उभ्या
धन्यवाद विनय. उभ्या उभ्या साठी अजून मोठी जागा हवी होती पण मंडळ ती देऊ शकले नाही ह्या बद्दल मंडळाकडून प्रतिनिधी म्हणून दिलगीरी व्यक्त करतो. पण सर्वांनीच उभ्या उभ्या (जे पाहू शकले) आवडला व काहींनी आम्हाला परत कराल का? हे ही विचारले. पण आधीच सर्व हॉल बुक असल्यामुळे परत करता आले नाही.
साधारण दर दिवशी ३१०० ते ३२०० पण शनिवारी ही गर्दी ३५०० च्या आसपास होती. पूर्ण सभागृह (कॅपॅसिटी ४०००) बाल्कनीतल्या शेवटच्या चार-पाच रांगा सोडल्या तर भरलेले होते.
किमान १०० एक लोकांनी मला कार्यक्रम फारच उच्च रितिने आयोजित केला असे सांगीतले आणि नंतर बर्याच कार्यकर्त्यांनी त्यांनाही असाच अनुभव आल्याचे सांगीतले.
चांगले कार्यक्रम, राजकीय
चांगले कार्यक्रम, राजकीय पुढार्यांची अनुपस्थिती>>>>> हे फारच छान झाले. बृमममधे राजकिय पुढारी कशासाठी हवेत? अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे यावेळच्या भारतातल्या (महाराष्ट्रातल्या) वर्तमानपत्रात बृमम बद्दल फारसं काही नव्हतं. मागच्या बृममच्या वेळेस बरेच चमकोगिरी करणारे 'कमिटीवाले' वर्तमानपत्राच्या पेपर आणि 'इं' आवृत्तीत पहिल्या पानावर झळकत होते. तेव्हा त्यांच्याबद्दलची माहिती वाचून हे बृममचं काम करताहेत की स्वतःच्या कंपन्या प्रमोट करताहेत असा प्रश्न पडला होता.
केदार, तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन :). पुढच्या बृममला शुभेच्छा.
केदार, तुमच्या टीमचं अभिनंदन!
केदार, तुमच्या टीमचं अभिनंदन!
अभिनंदन. वृत्तांत लिहा. यंदा
अभिनंदन.
वृत्तांत लिहा.
यंदा जरा गाजावाजा, जाहिरात कमी झाली असं वाटलं.
>>वर्तमानपत्रात बृमम बद्दल फारसं काही नव्हतं
असं का? राजकीय नेते नव्हते म्हणून, की जाणूनबुजून?
असं का? राजकीय नेते नव्हते
असं का? राजकीय नेते नव्हते म्हणून, की जाणूनबुजून?>>> माझ्यामते राजकिय पुढारी नव्हते म्हणून आणि..... जाउ दे
केदार आणी टीम अभिनंदन यशस्वी
केदार आणी टीम अभिनंदन यशस्वी आयोजना बद्दल.गटग करांनो वृत्तांत टाका बघू बिगी बिगी अधिवेशनाचा.
>>चांगले कार्यक्रम, राजकीय
>>चांगले कार्यक्रम, राजकीय पुढार्यांची अनुपस्थिती.
बरं वाटलं वाचून. राजकिय नेते आणी त्यांच्यापुढे हाजी हाजी करणारे लोक .
सरतेशेवटी फक्त एक दोन
सरतेशेवटी फक्त एक दोन पुढार्यांची नावे घेतली, तर विंगेत भारतातील एक मान्यवर कलाकार मला म्हणाले, अरे तुम्ही ही नाव सुद्धा कशाला घेता? त्यांनी काय योगदान दिले?
राजकीय पुढार्यांच्या भाषनापेक्षा श्री काकोडकरांचे व मतकर्यांचे भाषन कितीतरी जास्त चांगले होते, साधेच पण म्हणूनच भिडणारे. मतकरी मराठी भाषेबद्दल आणि मराठी साहित्यातील बदल (त्यांचा लहाणपणापासून ते पार २०११ पर्यंत) ह्याचा धावता आढावा घेतला तर काकोडकर संत साहित्य इंग्रजी भाषेचा भारतीयांवर (महाराष्ट्रीयांवर असणारा वाढता प्रभाव) व त्याची मुळ कारणे ते मॅक्समुलर ते मेकॉले असे बोलले. मला दोन्ही भाषणं आवडली.
प्रयोगात मायबोलीकरांचा जसा सहभाग होता तसाच एका अर्ध मायबोलीकराचा पण. संजय पाचपांडेने (मिनोतीचा नवरा) एक अफाट प्रयोग सादर केला त्याचे नाव पाणी. नर्मदा आंदोलना संबंधीत दोन कार्यकर्त्यांचा संवांद असे स्वरूप होते. संजयला दाढी मिशात अनेक लोकांनी नाना पाटेकरच असे संबोंधले. शिवाय पूर्णच प्रयोग अत्यंत चांगला होता. मिनोतीने आधी मला पकडून तू पाहा, सिरियस विषय आहे, तुला आवडणारच हे सांगीतल्यामुळे मी पाहिला आणि दंग झालो होतो. परिषदेच्या माझ्या दिवसांची मला आठवण आली इतके ते सर्व रिलेट करता आले. फक्त रियल लाईफ मध्ये मी वाडेकरांच्या भूमिकेत होतो.
अजून बरचं लिहायचे आहे.
पाणी एकांकीकेत २
पाणी एकांकीकेत २ अर्ध-मायबोलीकर होते. मनोज वाडेकर हे हेमांगी वाडेकर यांचे अर्धांग. या एकांकीकेचे दिग्दर्शक मुकुंद मराठे हे मायबोलीवर दिग्दर्शक या आयडीने असत. आता असतात की नाही कल्पना नाही.
केदार, थँक्यु फॉर काईंड वर्ड्स
वा! केदार, अभिनंदन तुमच्या
वा! केदार, अभिनंदन तुमच्या पूर्ण टीमचं!
सगळा वृत्तांत वाचायला आवडेल. कार्यक्रम पाहिलेल्यांनी खरंच सविस्तर लिहा ना वृत्तांत..
वाट बघतेय मी.
केदार आणि टीम, देसाई, आणि
केदार आणि टीम, देसाई, आणि सर्व सादरकर्ते माबोकर, अर्धमाबोकर यांचे अभिनंदन!!
या ना त्या कारणाने मला एकदाही अधिवेशनाला जाणे जमलेले नाही, वृत्तांत वाचायला आवडेल.
खरेतर कल्पू इथे आहे. तिचा
खरेतर कल्पू इथे आहे. तिचा ह्या सर्वात सिंहाचा वाटा आहे. ती भारत प्रोग्रॅम कमिटीची चेअर होती.
शिकागो टीम चे अभिनंदन!
शिकागो टीम चे अभिनंदन!
हो.. खरं तर या कार्यक्रमाचं
हो.. खरं तर या कार्यक्रमाचं बरंच श्रेय 'कल्पू' या आयडिला आहे.. (मला संशय होताच)
अभिनंदन कल्पू..
वॄत्तांत लिहिणं खूप कठिण आहे.. ४००० लोकांनी काय केलं कसं लिहिणार..
अरे वा छानच झालेला दिसतोय
अरे वा छानच झालेला दिसतोय कार्यक्रम. कोणी पुढारी न्हवते ते बरं झालं.
शोभा डे आली होती का? तिचा ब्लॉग मी फॉलो करते त्यामुळे ती कशी बोलते ह्या बद्दल फार उत्सुकता होती.
बृमम अधिवेशन यशस्वीपणे पार
बृमम अधिवेशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शिकागो मंडळ व इतर कार्यकर्त्यांचे अभिनंदन!
मायबोलीच्या मित्रमंडळींना भेटून फार आनंद झाला. लहानपणापासून एकत्र राहिलेले मकरंद सहनिवासातले अनेकजण, शाळेतले, कॉलेजमधले मित्रमैत्रिणी, जवळचे, लांबचे नातेवाईक, सद्ध्याचे अनेक मित्रमैत्रिणी भेटले. जिवाभावाच्या गप्पा केल्या. अनेक नविन ओळखी झाल्या. दर दहा पावलावर कोणी न कोणीतरी भेटत होते. पहिल्या दिवशी मायबोलीकर जेवणाच्या वेळेस भेटले नाहीत म्हणून जरा हळहळ वाटली, सिनेटर स्वाती दांडेकरांशी बोलत असताना विनय देसाई दिसले, पण आमचे फोटो सेशन होईपर्यंत गायब झाले. मी म्हटले शनिवारी पाहू. पण संध्याकाळी भावना आणि कन्यका भेटल्या. माझ्या मुलाला आभाला भेटून वाटले, आपल्यासारखे कुणीतरी आहे. मात्र शनिवारी जेवणाच्या वेळेत मायबोलीकरांबरोबर बसले आणि भावना आणि मी ओमीलाही बघून आलो. पुस्तके खरेदी केली. सिडी, डिव्हिडी मी जाईपर्यंत संपल्या. कपडे आणि दागिन्यांचे दृष्टीसुख घेतले.
नाच, गाण्याचे बरेचसे कार्यक्रम आवडले. नाट्यसंगीत उत्तम होते, शंकर महादेवनचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा छान होता. मला वाटले होते, ती फक्त जाहिरातबाजी असेल. उभ्याउभ्या विनोद चुकला, पण मी तो कार्यक्रम एकदोन वेळा बघितला आहे. माझ्या मुलाला आवडला. एकांकिका, एकपात्री आणि भाषणे चांगली झाली. मराठी बाणा छानच होता, पण जास्तच लांबला. काकोडकरांचे भाषण चांगले होते, पण फार वेळ चालले. मुख्य म्हणजे, ते स्वच्छ मराठीतून बोलले ते फार छान वाटले. त्यापूर्वी सिनेटर स्वाती दांडेकर एकही वाक्य मराठीत बोलल्या नाहीत म्हणून आजुबाजूच्या लोकांची बरीच कुरकुर ऐकू आली. रत्नाकर मतकरींचे भाषण आवडले. योग आयुर्वेद विषयक कार्यक्रम आवडले.
शनिवारी स्वरांगणच्या गर्दीत माझे मामा भेटले तसेच एकताच्या स्टॉलवर माझ्या वहिनीचे. माझा भाऊ शिकागो रहिवासी असल्याने मुलांनाही त्यांचा मामा भेटला. हे अधिवेशन मामा मिलाप म्हणायला हरकत नाही.
iowa senator swati dandekar
iowa senator swati dandekar ka?
ती मी नव्हेच. पण नाव एकच.
ती मी नव्हेच. पण नाव एकच. त्यामुळेच की काय, जवळपास बसलेल्या माणसांनी सिनेटर स्वाती दांडेकरांच्या भाषणावरच्या प्रतिक्रिया मला सांगितल्या. ह्याला म्हणतात मराठी बाणा!
केदार , विनय , मिनोती आणी
केदार , विनय , मिनोती आणी सगळ्या BMM टीमचं अभिनंदन!
पुढचं BMM कुठे आहे? स्थळ आणी
पुढचं BMM कुठे आहे? स्थळ आणी तारी़ख declare केली का?
पुढच्या बीएमएमसाठी अजय
पुढच्या बीएमएमसाठी अजय भावनाला खो दिला.
बॉस्टन मध्ये आहे. २०१३ च्या जुलै महिन्यात. अजयराव तारखा सांगीतलच.
अरे वा बॉस्टन मधे का? कसं
अरे वा बॉस्टन मधे का? कसं झालं ह्या वेळचं? भरपूर गर्दी होती का?
>>>> ती मी नव्हेच. पण नाव
>>>> ती मी नव्हेच. पण नाव एकच. त्यामुळेच की काय, जवळपास बसलेल्या माणसांनी सिनेटर स्वाती दांडेकरांच्या भाषणावरच्या प्रतिक्रिया मला सांगितल्या. ह्याला म्हणतात मराठी बाणा! <<<<
पण मग तू काय केलस? ऐकताना कशी प्रतिक्रिया देत होतीस?
सर्व टीमचे
सर्व टीमचे अभिनंदन!
मतकरींच्या भाषणाचा गोषवारा येथे आला होता. जरा विस्कळीत वाटले, परदेशी असणार्या मराठी माणसापुढे फार रिलेव्हंट वाटले नाहीत मुद्दे.
सही.. केदार आणि सगळ्या बृममं
सही.. केदार आणि सगळ्या बृममं टीमचं अभिनंदन...
वर्तमानपत्रात बृमम बद्दल फारसं काही नव्हतं>> केदार, यामागचं कारण सांगू शकशील?
जवळपास बसलेल्या माणसांनी
जवळपास बसलेल्या माणसांनी सिनेटर स्वाती दांडेकरांच्या भाषणावरच्या प्रतिक्रिया मला सांगितल्या. ह्याला म्हणतात मराठी बाणा! >>
पण त्या मराठीत का नाही बोलल्या? येत नाही का त्यांना मराठी? खरंच विचारते आहे.
केदार- हार्दिक अभिनंदन.

मिनोती- अभिनंदन. छान वाटले वाचून. एखादी क्लीप टाक ना त्यांची युट्युबवर. :.-)
देसाई- अभिनंदन.
माझे जावई अॅटलांटाहून
माझे जावई अॅटलांटाहून कार्येक्रमाला गेले होते.त्यांनीही खूप तारीफ केली.सर्व शिकागो मराठी मंडळींचे अभिनंदन.
केदार आणि टीम- हार्दिक
केदार आणि टीम- हार्दिक अभिनंदन.

कार्यक्रमातले- उउविवाले परदेसाई आणि इतर सर्व अर्धमायबोलीकरांचेही मनःपूर्वक अभिनंदन. पुढे तुम्हा सर्वांचे हजारो कार्यक्रम व्हावेत- यासाठी शुभेच्छा.
उभ्याउभ्या विनोद चुकला, पण मी
उभ्याउभ्या विनोद चुकला, पण मी तो कार्यक्रम एकदोन वेळा बघितला आहे <<<<<
स्वाती एक गैरसमज दूर करतो. .उभ्या उभ्याचा एक कार्यक्रम हा दुसर्या सारखा नसतो. दर अधिवेशनाला आणि खरं तर दर सार्वजनिक कार्यक्रमाला सादर करणारे तेच असले तरी Script वेगळेच असते.
त्यामुळे आजचा 'उभ्या उभ्या... ' आणि कालचा यात काहीही साम्य नसते.
मराठीत का नाही बोलल्या? <<< लालूने घेतलेल्या मुलाखती प्रमाणे त्याना 'मआठिई येट नाई'
ये केव्हाच कळलेले आहे. इतरांना माहीत नसल्याने त्यांचा विरस झाला.
Pages