बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले?

Submitted by admin on 26 July, 2011 - 23:01

बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले? त्यासंबंधी आपल्या प्रतिक्रीया इथे लिहा.

medium_BMM2011_logo3.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकर मित्र मैत्रिणिनो, सिनेटर् बाईंना मराठी येत नाही याचा बाऊ करू नका! त्यांची व्हिसा प्रोसेस मधे अमूल्य मद्त झाली. जशी सुधीर गाडगिळांची स्पॉन्सरशिप मिळवण्याकरता होते आणि यावेळी सुद्धा झाली.

मंडळी, आमच्या ग्रुपने सादर केलेल्या पाणी एकांकीकेच्या शेवटच्या ६-७ मिनीटांचे रेकॉर्डींग युट्युबवर टाकले आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा ही विनंती.
http://www.youtube.com/watch?v=jIh-RBxI6s8&hd=1

कल्पु,
तुम्ही सध्या खूप रागावलेल्या दिसता. एवढ्या श्रमानंतर असं काही ऐकू येणं त्यामुळे ते साहजिकच आहे. पण सध्या तुम्ही जे बोललायत वरती त्यात खूप जास्त चरफडच दिसतेय.
नक्की काय घडलं हे मला माहित असण्याची शक्यता नाही पण श्रेयसला वैयक्तिकरित्या ओळखत असल्याने त्याच्याबद्दल असं वातावरण निर्माण झालं हे मला आश्चर्याचं वाटतंय. इतर अनेक स्टार्सपेक्षा खूपच डाउन टू अर्थ म्हणून मला तो माहितीये. हिंदी इंडस्ट्रीमधली स्टार ट्रीटमेंट आणि सिस्टीम असते ती बघता अनेक गोष्टींची सवय होणं, गृहित असणं हे ओघाने येतंच. त्यामुळे अनेक पातळ्यांवर हा समजुतीचा घोटाळा आणि थोड्या दोन्ही बाजूनी चुका असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सगळ्या श्रमांच्यातून रिलॅक्स झाल्यावर तटस्थपणे विचार करून बघा. त्यावेळेला तुम्हाला इंटरेस्ट असेल तर माझं म्हणणं तपशीलात तुमच्याशी शेअर करेन. आत्ता इथे लिहित राह्यले तर भारत अमेरिका वाद, फाटे फुटणे आणि उगाचचा खेळखंडोबा होईल त्यामुळे लिहित नाही.

खर तर ज्याला सार्वजनिक कार्यक्रमाचा थोडाफार अनुभव आहे त्याला तळपद्यांची तक्रार किती क्षुल्लक आहे हे सहज लक्षात येईल. स्पष्टीकरणाचीही गरज नाहि.

शुगोल, सिरियस्ली, असं कसं ग विचारतेस Sad
(अनलेस श्रेयस तुझ्या नात्यातला किंवा ओळखीचा असेल ) जर सगळेच लोकं मटा ची बातमी वाचून त्यावर विश्वास ठेवायला लागले तर खरचं खूप वाईट वाटेल मला.

इथे अमेरिका भारत करायचे नाहीये, पण आप्ल्या कडे बरेच वेळा (निदान पुण्यात तरी) असे होतं कि गणपती वगेरे ला वर्गणी गोळा करणारे लोकं बरेच वेळा थोडे पैसे खिशात टाकतात.

तसं अमेरिकेत होत नाही, किती तरी वेळा लोकं स्वताचे पैसे घालुन , सगळे व्याप संभाळून सगळं करत असतात. भारतातून बोलवलेल्या लोकांबद्द्ल अतिशय प्रेम, कौतुक आणी आदर असतो. ( जो आत श्रेयस बद्द्ल कमी झाला तर आश्चर्य वाट्णार नाही ) त्यांची जितकी जास्त चांगली व्यवस्था ठेवता येइल आणी ते आनंदी होउन परत जावेत ह्या कडे कल असतो. आपण एरवी सुध्दा किती पोलायटली आणी लविंगली बोलतो तर त्याच्याशी कोण कशाला रूड वागेल.

बरेच वेळा मुख्य नटा पेक्शा मॅनेजर चे नखरे जास्ती असतात. ते संभाळणे कट कट होउन बसते.

कल्पू तु त्याला (thanks for coming, we appreciate etc etc ) कार्ड पाठवणार असशील मंडळा तर्फे तर त्याला विचार ना ऑर फोन करून कि मटा मधल असं वाचून विश्वास बसला नाही आणी वाईट पण वाटलं तर खरच असं तुझं मत झालं का?

पण इतका चांगला कार्यक्रम अरेंज करून सुध्दा आपल्याच असं डिफेन्सिव एक्स्प्लेनेशन द्यावं लागावं ह्याचं फार वाईट वाटतं.
कल्पू तु शोभा चा ब्लॉग पोस्ट वाच. एकदम छान वाटेल.

श्रेयस तळपदे एक अ‍ॅक्टर म्हणून मला आवडतो. त्याची सिनेमातून निर्माण झालेली इमेज बघता आजची बातमी वाचून फार आश्चर्य वाटले. सिनेमा इमेज आणि व्यक्ती या संबंध नसला तरी.

मला पण श्रेयस खूप डाऊन तू अर्थ वाटतो, त्यामुळे तो अस खरच बोलला का? का हे त्याच्या मॅनेजर नी सांगितल?

कल्पु, केदार आणि इ. स्वयंसेवकांना एक विनंतीवजा सल्ला. तुम्हा सगळ्यांचे कष्ट वादातीत आहेतच परंतु या प्रकरणाच्या मागच्या-पुढच्या बाजुची चर्चा इथे करण्यापेक्षा अधिवेशनाच्या कार्यकारीणीत करुन काय तो निर्णय घ्या आणि तो वर्तमानपत्रात प्रसिद्धीला पाठवा (आवश्यक असेल तर). "अतिथी देवो भव" या उक्तीनुसार यजमानांनी राग पोटात टाकुन प्रकरणावर पडदा टाकावा.

त्याच्या एखाद्या साध्याश्या कमेन्टला मटाने 'बातमी' व्हावी म्हणून तिखटमीठ लावले असण्याची कितपत शक्यता आहे?

नीधप, तु त्याला ओळखतेस ? मग तूच आता खरं काय झाले हे सांगु शकशील.<<<
कशी काय आणि कशासाठी? not interested in playing referee
मी इथे त्याला जस्टिफाय केलं नाहीये. करतही नाहीये. मी प्रत्यक्ष तिथे नव्हते त्यामुळे या कुठल्या वादात मी पडणारही नाहीये. कल्पु यांची जी चिडचिड होतेय ती जरी रास्त असली तरी केवळ अश्याही अनेक शक्यता असू शकतात इतकेच त्यांना सांगायचे होते मला. तेही आत्ता, इथे नाही.

स्वाती म्हणते ती शक्यता कोणीच विचारात घेत नाही कशी काय? मटा हा एकेकाळी बरा पेपर होता. मी स्वतः मटाच्या सवंगपणाला वैतागून तो बंद करून बरीच वर्ष झाली. मटाच्या बातमीवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

इथले हे मा शे पो.

स्वातीचं म्हणणं पटतंय.. क्षुल्लक गोष्टीची 'बातमी' केल्याची शक्यता जास्त आहे.. Happy

त्या अगदी लहानपणी जरी नागपूरात राहिल्या तरी जास्त करुन हैद्राबाद्-मंचेरिअल वगैरे ला वाढल्या<<< हे मी पण केलंय (पंजाब, बंगाल, मध्यप्रदेश, दिल्ली) तरी मालवणी पण बोलतो.
बाकी व्हिसावगैरेला मदत केल्याबद्दल धन्यवाद..

बिझनेस क्लासची तिकिटे म्हणजे भरपूर रक्कम दिलीच आहे.

मी लिहू का?
मी तो लेख वाचला. अगदी एकांगी लिहीले आहे. व तुमच्या आणि स्वयंसेवकांच्या मेहनतीवर शंका घेतल्यासारखे झाले आहे. तुम्ही सभेत निर्णय घेऊन खुलासा छापायला लावाच त्यांना. एक तर विमानात व हॉटेल मध्ये काँप्लिमेन्टरी पाणी बाटल्या सर्वत्र असतात. ह्याने अशी कमेंट करताना जरा मॅच्युरिटी दाखवायला हवी होती. हे मा वै म. हजार ठिकाणी हिंड्ताना कितीतरी असे अनुभव येतात पण त्यावर उपायही असतात. इतके बिग डील करण्यासारखे काहीच नाही.

केदार कल्पू व तुमच्या टीमचे अभिनंदन. आप दिल छोटा मत करो.

ते जाऊद्या! एकुण ह्या बाफमुळे मायबोलीवर चार दोन नवीन मेंबरं आलेले दिसत आहेत. शिवाय कविताही करतात. Happy

सदा तुम्हाला नाव पाठ झाली आहेत. की स्मरणिका? Happy

नवीन मेंब्रांच मायबोलीवर स्वागत.

कल्पु, केदार, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या आयोजनाबद्दलचा, सविस्तर वृत्तांत वाचायला आवडेल.

बाकी तळपदेंनी असं बोलावं ? Sad

केदार,
एक विचारू का?
तू आणि इतर काही लोकांनी इथे खुलासे करणे योग्य आहे का रे? लोकं काय दोन्ही बाजूने काड्या टाकतील टाईमपास म्हणून. पण पुढील सर्व वर्षे तुम्हालाच काम करायचे आहे ना.
तुम्ही आपले चांगल्या हेतूने लिहाल आणि काहीच्या काही होऊन बसेल. वर मराठीच लोकं म्हणल्यावर कार्यकारिणीचे सदस्यही तुम्हालाच म्हणायला कमी करणार नाहीत की तिकडे मायबोलीवर लिहीत बसायला कोणी सांगीतले म्हणून.

आयोजक म्हणल्यावर काटेरी मुकुट असतोच तो नाहीतरी. घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजा आणि वरून वैताग.

आयडू,
अरे आयोजकांचे 'खरे' आयोजनाचे अनुभव प्रकाशित व्हायला लागले ना असे तर कोणीही शहाणी व्यक्ति या भानगडीत पडणार नाही. ती गुपितं पडद्याआडच बरी असतात रे बाबा.

रैनाच्या पोस्टला +१.

केदार कल्पु, तुमच्या टीमचे आणि तुमचे कौतुक आहे.
तळपदेंच्या किश्श्याला इथे उगाचच फूटेज मिळते आहे.

रैना ला अनुमोदन ..

तसंच मिडीया आजोजक मंडळ, श्रेयस तळपदे ह्या दोन्ही बाजूंपैकी एक तरी बाजू पूर्णपणे कधीतरी प्रकाशित करेल का ह्यात शंकाच आहे ..

इथे चर्चा करण्याऐवजी हा वाद ह्या दोन पक्षांनीं आपापल्यात सोडवणे जास्त योग्य असं वाटतं ..

>>अरे आयोजकांचे 'खरे' आयोजनाचे अनुभव प्रकाशित व्हायला लागले ना असे तर कोणीही शहाणी व्यक्ति या भानगडीत पडणार नाही. ती गुपितं पडद्याआडच बरी असतात रे बाबा.

रैनाच्या पोस्टला जोरदार अनुमोदन!!!
(फिली अधिवेशनात काम केले असल्याने अनुभवाचे बोल :))

एकूण शिकागो अधिवेशन मस्तच झालं.
आमच्या 'उभ्या उभ्या विनोद'ला मिळालेला प्रतिसाद म्हणजे a performer's dream coming true असा होता.

'मराठी बाणा' अक्षरशः अप्रतिम! रजिस्ट्रेशनचे सगळे पैसे फक्त तो एक कार्यक्रम पाहूनच वस्सूल !!
'गप्पा' ह्या समीप रंगमंचांतर्गत सादर झालेल्या कार्यक्रमाचा 'तू नळी'दुवा आहे का?
तो बघायचा मिसलो !

रैना ला शंभर टक्के अनुमोदन
आयोजक म्हणल्यावर काटेरी मुकुट असतोच असतो
बाकी केदार कल्पु, तुमच्या टीमचे आणि तुमचे कौतुक आहे.
ऑफिस आणि घरच्या लोकांना सांभाळून हे सगळं करण खूप मेहनतीच आहे.
आणि कौतुक करणारे असतात तसे नाव ठेवणारे ही असतात.
आपण सगळ्यांनाच संपूर्णपणे खुश नाही ठेऊ शकत.

शिकागो अधिवेशन फारच छान झालं. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. पुढचं अधिवेशन अगदी या अधिवेशनासारखं जर करायचं असलं तरी बॉस्टनकरांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. गुरुवारचं माहित नाही, पण शुक्रवारी सकाळी McCormick Place ला जाताना एक्झिटवरच दीड दोन मैल आधी एका साईन बोर्ड वर चमचमत्या दिव्यांनी उमटलेलं BMM Chicago 2011 वाचलं तेव्हा उर भरून येणं म्हणजे काय ते कळलं.

काय सांगता चित्रे?!
लिहाच मग तुम्ही. तरी करणारे करतीलच. कारण तिथे "शहाणे" लोक चालतच नाहीत! दर दोन वर्षांनी हा सगळा उपद्व्याप लोक वेड लागलंय म्हणूनच करतात. Happy

छे..माझे पोष्ट डिलिट करायचे काही कारण होते का? चांगल्या विचाराना हल्ली जागाच शिल्लक राहिलेली नाही.

स्वागताबद्दल धन्यवाद केदार. नावाबद्द्ल आपण नंतर बोलु.
पण उपरनिर्दिष्ट नावे हा निव्वळ योगायोग समजावा. नावांचा आणि रोगांचा देखिल काहिहि संबंध नाही. :प

आणि आता परत असली भिकार जनता बोलावुच नका अधिवेशनाला.

ज्यांच्या जवळ स्वतःचे पाणी घेण्यास पैसे नाहीत, त्यानी अमेरिकेची स्वप्ने बघावीत कशाला?

आणि आता हे पोष्ट ठेवा थोडा वेळ. हवे तर उद्या डिलिट करा. :ड

पुढील सर्व वर्षे तुम्हालाच काम करायचे आहे ना <<< रैना... पुढच्या वर्षी बॉस्टनची माणसे.. नवीन कार्यकर्ते, नवीन पाहूणे, नवी सगळे... Wink

(आम्ही मात्र जुनेच असणार.. लक्षात ठेवा.. )

>> तू आणि इतर काही लोकांनी इथे खुलासे करणे योग्य आहे का रे? लोकं काय दोन्ही बाजूने काड्या टाकतील टाईमपास म्हणून.

रैना, इथे केदार आणि कल्पू 'आपले' मायबोलीकर म्हणून चर्चा चालली आहे. या दोघांना एक आऊटलेट मिळतंय आणि मटाला उत्तर पाठवायची उपस्थित मायबोलीकरांनी तयारी दाखवली आहे. निरनिराळ्या राज्यांतले मायबोलीकर दर दोन वर्षांनी संयोजकांत/प्रेक्षकांत असतात. त्यांच्यापर्यंत हे पोचतंय ही चांगली गोष्ट नाही का? काड्यांकडे दुर्लक्ष करता येतंच की.

अपना अपना नजरिया असतो स्वाती.
कुठलीही कार्यकारिणी हा प्रकार केवळ 'महान' असतो की. आणि दुसरे, जितका चिखल उडवला तो सगळीकडेच उडतो. Silence is dignified a lot of times.

काही झाले तरी हे पब्लिक डोमेन आहे. जसे वेगळ्या राज्यातील संयोजक वाचू शकतील तसेच कुठले कुठले कलाकार आणि मॅनेजर्स/ मध्यस्थही/प्रेक्षकही वाचू शकतीलच ना. त्यातल्या अनेकांचे काही ना काहीतरी हितसंबंध असणार. जितका मोठा कार्यक्रम तितके जास्त शत्रु, तितक्या जास्त त्रुटी, तितके जास्त रुसवेफुगवे/मानापमान. सगळे उकरून काढण्यात काहीच हशील नाही. थोडक्यातच गोडी असते.

असो. एनीवे. त्यांनाच ठरवू दे काय ते.

थोडक्यातच गोडी असते - अगदी बरोबर. मा.टा वरच्या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रीया वाचल्या. श्रेयस सिनेतारक आहे, त्याच वागन त्याच्या ठिकाणी. पण अध्यक्षाबाईंच उत्तर पण फार काही matured वाटल नाही. जरी मा. टा ने काटछाट करून दिल असल तरी. अध्यक्षाबाईंच्या दोनच ओळीने "आमच्या परीने आम्ही श्रेयसचा उत्तम पाहुणचार करायचा प्रयत्न केला, तरिही त्यात काही कमतरता भासली असल्यास आम्ही दिलगीर आहोत" निंमत्रितां पेक्शा आयोजनकर्ते किती समंजस आहे ते दिसून आल असत. पण "त्याला ते समजलं नसेल तर आम्ही काय करणार? " अस बोलून जी गोष्ट गोडी ने संपली असती, तिला उगाच भांडनाच रूप आल!

@रसमलाई- दिलगिरी व्यक्त केली पण छापली नाही. आता अधिकृत उत्तर पाठ्वू त्यात नक्कीच वाचायला मिळेल तुम्हाला.

Pages