Submitted by admin on 26 July, 2011 - 23:01
बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले? त्यासंबंधी आपल्या प्रतिक्रीया इथे लिहा.

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि याच संदर्भात मी काल,
आणि याच संदर्भात मी काल, 'सिनेटर स्वाती दांडेकर पिठलं भात खात नागपुरात वाढल्या असं ऐकलंय. मराठी न यायला काय झालं?' हे पोस्ट लिहिलं होतं. ते अॅडमिनांनी का गाळलं कळलं नाही. (दांडेकर स्वतः काही इथे वाचायला येणार नाहीत. आणि त्यांना वाचता आलंच तर लगेहाथ मरॉतीमधे उत्तरही देतील कुणी सांगावं?
)
मृ 'अधिवेशन कसे वाटले?' या
मृ
'अधिवेशन कसे वाटले?' या धाग्याच्या विषयाशी पोस्ट्चा काही संबंध नव्हता म्हणून गाळले असेल.
ज्याला 'मी मराठी आहे' याचा
ज्याला 'मी मराठी आहे' याचा अभिमान वाटतो तो मराठी.. नाही का?
लालूला दिलेल्या मुलाखतीत त्या इंग्रजीच बोलल्याचं स्मरतं. लालूने पुढे भाषांतर केलं.
(इथला मजकूर काढून टाकण्यात आलेला आहे)..
>>ते अॅडमिनांनी का गाळलं
>>ते अॅडमिनांनी का गाळलं कळलं नाही <<
अच्छा. त्या अमेरिकन सिनेटमध्ये भाषण करत होत्या, बृमम अधिवेशनात नाहि. मग ठिक आहे.
त्या 'अधिवेशनात' मराठी
त्या 'अधिवेशनात' मराठी बोलल्या नाहीत असं वाचल्याचं आठवलं. म्हणून लिहिलं.
मी सगळं भाषांतरही नाही केलं.
मी सगळं भाषांतरही नाही केलं. मिश्रण ठेवलंय.
असो.
>>जाऊन वर्षं लोटलं
अरे देवा!
जाऊन वर्षं लोटलं <<< मी भेटलो
जाऊन वर्षं लोटलं <<< मी भेटलो 'वो कौन थे?
घोटाळा झाला खरा.. नशीब मी त्या जीवंत गृहस्थाना काही उलटं सुलटं विचारलं नाही..
आमच हे पहिलच बृमम. इतक छान
आमच हे पहिलच बृमम. इतक छान असत ही कल्पनाच नव्हती. मला सगळ वातावरण आवडल. खुप छान CD मिळाल्या.
पाणी अणि गप्पा मस्तच होत.
बी एम एम म्हणजे काय रे
बी एम एम म्हणजे काय रे भाऊ.....
बी एम एम म्हणजे भरपूर मराठी माणसे ... बी एम एम म्हणजे बाहेरची मराठी माणसे .... किंवा बी एम एम म्हणजे जत्रा अशी ३ उत्तरे आज क्लोजिंग सेरिमोनीत ऐकली. २१ ते २४ जुलै २०११ शिकागो येथे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन संपन्न झाले. वरील तीनही व्याख्या खरे ठरवणारे हे संमेलन होते. संपन्न या शब्दाला साजेसा व्हेन्यू मॅकाॅरमिक प्लेस, संपन्नता दाखवणारे रोजचे मेन्यू आणि अभिरूचिपूर्ण असे कार्यक्रम इथे अनुभवायला मिळाले.
आमचा अधिवेशनाचा हा पहिलाच अनुभव. ३५००-४००० लोकांच्या उपस्थितित कार्यक्रम बघायला मजा आली. मला भारतातील कार्यक्रम बघण्यात जास्त इंटरेस्ट होता. नाटक व सारे गा मा वाल्यांना व्हिसा न मिळाल्याने ते लोक आले नाहीत. त्यामुळे जरा निराशा झाली. पण इतर कार्यक्रमही छान होते.
खानपान व्यवस्था अतिशय चांगली होती. फार वेळ थांबावे लागत नव्हते. पदार्थ भरपूर आणि व्हरायटीही खूप होती. जरा खाण्याचे जास्त लाड झाले म्हणायला हरकत नाही. स्वयंसेवकांचे कौतुक. चहा पुरवणारे थकले असतील इतका खप होता.
कार्यक्रम बरेच ओव्हरलँप होत होते. आणि उशीरामुळे काही भाग बुडत होते. सगळ्यात हाउसफुल झालेला कार्यक्रम म्हणजे मराठी बाणा..... सेट अप्रतिम. तो भारतातून आणणे हे मोठे काम होते. यातील कलाकारांची एनर्जी दाद देण्यायोग्य. आपण इथे जसे शो बघतो त्याची आठवण होते. लोकसंगीत आणि नृत्य याची मेजवानी ... या कार्यक्रमासाठी व्हाँल्यूम मात्र फार मोठा ठेवतात..भारतातही हाच अनुभव होता तो थोडा कमी ठेवला तर यातील लज्जत कमी होणार नाही हे नक्की. या कार्यक्रमासाठी बरेच लोक मदतीला पुढे आले ..काँसमाँस बँंकेने केलेली मदत कौतुकास्पद. डाँलरच्या हिशोबात मदत करणे नक्कीच सोपे नाही. हे चित्र मोठे करून जरूर पहा.
सा रे गा मा च्या जागी आयत्या वेळेस अमारिकेत आलेले कलाकार आणि वादक यांचा गाण्याचा कार्यक्रम छान झाला. शंकर महादेवन ने रसिकांची मने जिंकली. गणनायकाने सुरूवात करून मन उधाण ,बगळ्यांची माळ फुले, मेरी माँ, अशी गाणी पाठोपाठ गाउन लोकांना खूष केले. अभंग ही म्हटला आणि शेवटी हरीनामाच्या गजरात सर्व श्रोत्यांना सामील करून घेतले. राम कृष्ण हरी हा गजर त्याने निदान २५ वेगळ्या प्रकारे तरी लोकांकडून गाउन घेतला. त्याच्या मुलाने १८ व्या वर्षी एका मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. त्यानेही अमराठी असून मराठी गाणे म्हटले हे पाहून मजा वाटली. सर्वात शेवटी सध्याचे सिनोरिटा ही गायले. बच्चे कंपनीला स्टेजवर बोलावून नाचायचा चान्स दिल्याने ती खूष..आता यात मार्केटिंगचा भाग जरी असला तरी प्रेझेंटेशन मस्त. (त्याने आँनलाईन म्युझिक स्कूल चालू केले आहे. ). आयत्या वेळेस जुळवाजुळव करून हा कार्यक्रम मस्त झाला.
गाण्याचा अजून एक कार्यक्रम प्रेक्षकांनी उचलून धरला तो नमन नटवरा. शेवटी इतकी गर्दी झाली की मंडळी जमिनीवर बसून गाणी ऐकत होती. मंजु।ा पाटील यांची खड्या आवाजातील व आनंद भाटे यांची गोड गाणी दाद मिळवून गेली. शेवटचा जोहार जोरदार.
पु लं च्या लिखाणावर आधारित गोतावळा सुरूवातीला चांगला वाटला मग इतका लांबला की कंटाळवाणा झाला. शेवटचा क्लोजिंग सेरीमनी पण लांबला. त्यामुळे स्किट व नाच बघायचा पेशन्स कमा झाला व मंडळी हळूहळू बाहेर पडायला लागली. आता लावणी नको अशी परिस्थिती झाली अशामुळे कलाकारांच्या मेहनतीवर पाणी पडते हे नक्की. आमच्या गावातल्या ग्रुपचेही स्किट चांगले झाले पण थोडे लहान असते तर जास्त चांगले झाले असते. पुढच्या अधिवेशनात प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार होणे गरजेचे आहे.
ओपनिंग सेरीमनी तील काही भाषणे छोटी असती तर लोकांना जास्त आनंद घेता आला असता. द जर्नी हा कार्यक्रम प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. त्यातील शेवटचा नाच उल्लेखनीय.
मीना प्रभू यांची मी फँन आहे त्यामुळे त्यांचा कार्यक्रम पाहिला. भेटही घेतली. त्यांची पुस्तके वाचून नेहेमी मनात येते की त्यांनी भारतावरही लिहावे. एखाद्याला जर भारतावर असे प्रवासी पुस्तक द्यायचे झाले तर आपल्यकडे नाही. ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली, तेव्हा त्या म्हटल्या, पेपर मासिक यातून सतत लोक लिहित असतात, म्हटले ते वेगळे तुमचे लिखाण वेगळे, त्यावर बघू लिहूयात असे म्हटल्या ...बघूया वाट .... वाट तिबेटची हे त्यांचे नवे पुस्तक -- आपल्या आवडत्या लेखिकेच्या तोंडून पुस्तकाबद्दल ऐकणे...मजा आली आणि तिबेटला जावे असे वाटायलाही लागले. मीना ताईंनी ब्रेल मधून पुस्तक काढून ज्यांना कधी प्रवासाचे सुख मिळत नाही त्यांना पण तो आनंद दिला आहे.
दुसरीकडे शोभा डे यांचा नउवारी ते अरमानी हा कार्यक्रम ही छान झाला. त्यांच्यातल्या लेखिकेचा प्रवास यात दाखवला होता. या वयातही त्या अत्यंत ग्रेसफुल आहेत. उभ्या उभ्या विनोद हा प्रयोग ही हाउसफुल होता. लहान मुलांची सोय चांगली बघितली होती.
स्वरांगण ची स्पर्धा ही छान झाली. गाणारे छान होते त्यामुळे मजा आली. समीप रंगमंच चीएक एकांकिका पाहिली. वेळेअभावि बाकीच्या बघता आल्या नाहीत. अमेरिकातील लोकांचे उभ्या उभ्या विनोद व इतर अनेक कार्यक्रम न बघता मी भारतातल्या कार्यक्रमांवर भर दिला. बहुतेक सर्व कार्यक्रमांना उपस्थिती चांगली होती हे विशेष नमूद करण्यासारखे. आणि खरादीलाही वाव बराच होता. पुस्तके, दागिने, ज्युवेलरी व कपडे उपलब्ध होते. शेवटच्या दिवशी खरेदी केल्यास चांगला डिस्काउंट मिळतो याचा अनुभव घेतला .
आता काही खटकलेल्या गोष्टी..... यातील कुठलाही कार्यक्रम वेळेवर सुरू होत नव्हता कारण आधीचा वेळेवर संपत नव्हता. वाटेत चहा दिसला की तो सोडायचा कसा.....्प त्यामुळे उशीर....मग काही कलाकारांना कमी वेळ मिळाला. गाण्याच्या कार्यक्रमात कलाकार आल्यावर साउंड सेटिंग झाले ते आधी करून ठेवायला हवे होते. काही लोकांची भाषणे इतकी लांबली की बस.....यावर काहीतरी कंट्रोल हवा ..एकदा माईक हातात आला आणि समोर प्रेक्षक दिसले की मंडळी सुटतात....त्यामुळे इतरांवर अन्याय होतो हे लक्षात घेतले पाहिजे. पुढील अधिवेशनात या गोष्टींचा जरूर विचार व्हावा. सगळ्यांनाच सुखाचे होईल. आपण नेहेमी स्वयंपाक करताना सगळे पदार्थ भरपूर करतो तसेच इथे प्रत्येक कार्यक्रम भरगच्च होता मग भाषण असो की स्किट असो संयोजकांनी व कार्यक्रम बसवणारे यांनी जर थोडा हात राखून कार्यक्रम बसवले तर सगळ्यांनाच चांगले रूचतील व पचतील.कार्यक्रम रहित झाले तर ते - भारतातले अथवा लोकल तिकीट घेतलेल्यांशी शेअर करावे....शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवू नये. कार्यक्रमाचे वेळापत्रक वेळेत द्यायला हवे.
तरूण वर्गासाठी व मुलांसाठी ही वेगळे कार्यक्रम होते. त्यांना अजून मेन कार्यक्रमात भाग घ्यायला लावले तर ते जास्त इनव्हाँल्व्ह होतील.
पण एकंदरीत आमचा अनुभव चांगला होता. संयोजक आणि स्वयंसेवक यांचे श्रम कारणी लागले. त्यांचे अभिनंदन.
अनेक लोकांना कार्यक्रम बसवणे, ग्रुप संयोजन याचे शिक्षण ही मिळाले. पुढील अधिवेशनाला
दुसरीकडे शोभा डे यांचा नउवारी
दुसरीकडे शोभा डे यांचा नउवारी ते अरमानी हा कार्यक्रम ही छान झाला. त्यांच्यातल्या लेखिकेचा प्रवास यात दाखवला होता.
<<
य बद्दल डिटेल मधे लिहा थोडं, आवडेल वाचायला :).
ते बीएमएम म्हणजे जत्रा वाले
ते बीएमएम म्हणजे जत्रा वाले स्किट पण आमच्या धन्यांचे होते. स्वतः लिहून ३ भुमिका केल्या होत्या त्यांनी.
http://shobhaade.blogspot.com
http://shobhaade.blogspot.com/
शोभा ला पण आवडलं.:)
मत तुमच्या मताचे स्वागत
मत तुमच्या मताचे स्वागत
ओपनिंग सेरिमनी मधील कंटाळवानी भाषणे टाळता आली नसती कारण त्यांना वेळ दिल्यावर त्यांनी तेवढाच वेळ बोलायला हवे, पण ते माईक आणि जनता ह्यांचे समिकरण पाहून पब्लीक बोलत राहिले, ( मी ओपनिंग सेरिमनी बघितलाच नाही, फक्त दर दहा मिनिटाने मधील कार्यकर्ते बाहेर येऊन अपडेट देत होते त्यामुळे कळाले).
काही कार्यक्रम स्पेशली मतकर्यांचे भाषन किंवा अगदी क्लोझिंग वेळेत सुरू व्हायला व संपायला हवा होता, अगदी मिनिट टू मिनिट मॅनेजमेंट होते पण तिथे विलंब झाला. पण जनरली १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त उशीर इतर कार्यक्रमांना झाला नाही. बर्याचदा आम्ही कार्यकर्त्यांनी पब्लीकला बोलावून (चहा पिताना) आणले.
शोभा डे.
हा कार्यक्रम मलाही पाहायचा होता. शोभा डे मनमोकळ्या बोलल्या पण मला दोन तीन गोष्टी खटकल्या. (ज्या अर्थात फक्त शोभा डे व अपर्णा वेलनकरांच्या हातात होत्या). . अपर्णाबै ह्या मुलाखत घेणार्या, पण त्यांचे प्रश्न फारच दिर्घ असायचे. मुलाखत घेणारीने कमी बोलायला हवं हा संकेत त्यांच्याकडून पाळला नाही गेला.
नऊवारी का? ह्या प्रश्नावरचे उत्तर अजब होते व एका वाक्यात गुंडाळले. विषयाचा संबंध काहीही नसून ती मार्केटिंग टेक्नीक आहे असे वाटले.
आवडलेल्या गोष्टी म्हणजे त्या मनमोकळ्या बोलल्या. पण बरेचदा मिळमिळीत बोलल्या. मराठी विषयावर मात्र राज ठाकरे ह्यांच्याबद्दल त्यांचे खूप चांगले मत आहे हे मला माहिते नव्हते. तसेच ते कधी त्यांनी पेपर मध्ये मांडलेही नव्हते. ते जे काही बोलल्या ( I will put my money on him वगैरे) हे ऐकुन मला आश्चर्य वाटले होते हे मान्य करावे लागेल. मी त्यांनाही टिपीकल शिव्या देणार्या बाई असतील असे समजलो होतो पण त्या ह्या विषयात राजच्या बरोबरीने होत्या. बाळासाहेंबांबद्दल बोललेले देखील आवडले. पण एक नक्की खटकले की इथे (अमेरिकेत येऊन) तेथील राजकारण्यांबद्दल (विलासराव इ इ) वाईट बोलाच्याऐवजी सरळ पेपर मधून त्या हल्ला का करत नाहीत? की तो केवळ टाळ्या घेण्यासाठीचा प्रकार होता?
त्यांनी मिडियालाही थोडा दोष वगैरे दिला तेंव्हा मी मध्येच तुम्ही पेपरवाले नक्की काय काम करता हा प्रश्न विचारायचे ठरविले होते.
त्यांच्यातील लेखिकेचा प्रवास थोडासाच दिसला, रादर त्यावर अपर्णाने प्रश्न विचारले (बदलणारा भारत, बदलती पिढी आणि प्रश्न) त्यावर त्या बोलल्या पण ते टचप सारखे. पूर्ण खोलात जायला तेवढे उद्युक्त अपर्णाने केले नाही असे मला वाटले. ह्या उलट श्रेयस तळपदेला सुधीर गाडगिळांनी मस्त बोलते केले होते.
एकंदरीत तो कार्यक्रम चांगला होता पण अजून नक्कीच चांगला झाला असता.
केदार, उत्कृष्ट संयोजनाबद्दल
केदार,
उत्कृष्ट संयोजनाबद्दल तुझं आणि तुमच्या चमूचं अभिनंदन
<मराठी विषयावर मात्र राज ठाकरे ह्यांच्याबद्दल त्यांचे खूप चांगले मत आहे हे मला माहिते नव्हते. तसेच ते कधी त्यांनी पेपर मध्ये मांडलेही नव्हते. ते जे काही बोलल्या ( I will put my money on him वगैरे) हे ऐकुन मला आश्चर्य वाटले होते हे मान्य करावे लागेल. मी त्यांनाही टिपीकल शिव्या देणार्या बाई असतील असे समजलो होतो पण त्या ह्या विषयात राजच्या बरोबरीने होत्या. बाळासाहेंबांबद्दल बोललेले देखील आवडले. पण एक नक्की खटकले की इथे (अमेरिकेत येऊन) तेथील राजकारण्यांबद्दल (विलासराव इ इ) वाईट बोलाच्याऐवजी सरळ पेपर मधून त्या हल्ला का करत नाहीत? की तो केवळ टाळ्या घेण्यासाठीचा प्रकार होता?>
याबद्दल त्यांनी टाइम्स ऑफ इंडियातून असंख्य वेळा लिहिलं आहे, आणि राज ठाकर्यांची बाजू घेतली म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली आहे. बरखा दत्तच्या 'वुइ द पीपल'मध्येही त्यांनी मनसेच्या बाजूनं वक्तव्यं केली होती. 'आदर्श', 'विलासराव, 'अशोकराव' यांवरही त्यांनी सविस्तर लिहिलं आहे.
धन्यवाद चिन्मय. मी गेल्या
धन्यवाद चिन्मय. मी गेल्या दोन चार वर्षात त्यांचे कॉलम वाचायचे बंद केले होते. आता वाचेल.
केदार तु कार्यकारी मंड्ळात
केदार तु कार्यकारी मंड्ळात होतास का? तुझी काय जवाबदारी होती? किति आधी पासून आपल्याला जर व्हॉलंटीयर व्ह्यायच असेल तर सांगायला लागतं? तुला साधारण "Behind the scenes" बद्दल लिहिता येईल का? कि इन्व्हिटेशन अॅक्सेप्ट केल्या पासून काय काय होतं? कसं सगळ्या गोष्टींच प्लॅनिंग केलं जातं?
(ते नाही लिहिलं तरी चालेल ) ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी वाचायला आवड्तील.
किति कष्ट असतात, कशी जवाबदारी वाटली जाते, रुसवे फुगवे पण असतात का?
मी फायनान्स (वित्त समीती)
मी फायनान्स (वित्त समीती) मध्ये होतो. बजेटस, बँक, सर्व वित्तीय व्यवहार, अकाउंट्स असे आमचे काम होते. शिवाय हॉटेलींग मध्ये लिंक म्हणून लुडबूड आणि शेवटी खुद्द संमेलनाच्या दिवसांत फायनान्सला जास्त काम नसते म्हणून रजिष्ट्रेशन मध्ये मदत आणि कार्यक्रम पाहणे.
तसे इतर लोकांनी जेवढे जास्त काम केले तेवढ्या व्हॉल्युमवर (उदा फॅसिलिटीज टीम) मी केले नाही कारण मी आठवड्यात शिकागोला नसतो. असलेल्या सप्ताहांतात मग कधी फोन वर, कधी प्रत्यक्ष तर कधी टाळणे, टंगळमंगळ पण
ह्या सर्वात २ वर्षे निघून गेली. शिवाय आमच्या समितीचे काम अजून संपले नाही. ऑडिट होईपर्यंत काम आहेच.
किति आधी पासून आपल्याला जर व्हॉलंटीयर व्ह्यायच असेल तर सांगायला लागतं >>. गेले दोन वर्षे. २००९ मध्ये मी महा मंडळाचा उपाध्यक्ष होतो तेंव्हा आमच्या समितीने २०११ चे संमेलन करायची जबाबदारी घेतली. साधारण २००९ च्या मार्चपासून हे सुरू झाले. पण तेंव्हा खरी जबाबदारी केवळ EC वरच होती. (मंडळाची समिती). मग एकदा का अधिवेशन शिकागोला होईल असे डिक्लेअर झाले की पुढील दोन वर्षे ह्याचा कामासाठी जातात. साधारण जुलै नंतर मंडळ एक मोठी मिटिंग घेते व तिथे सर्व जण कार्यकर्ता म्हणून नाव नोंदवतात.
इन्व्हिटेशन अॅक्सेप्ट केल्या पासून काय काय होतं? कसं सगळ्या गोष्टींच प्लॅनिंग केलं जातं? >> हो लिहिल ह्यावर पण. रुसवे फुगवे थोडे फार असतातच, पण ते चालायचंच. आमच्या मुख्य समितीत अजिबात रुसवे फुगवे नव्हते हे सांगायला आनंद वाटतो.
केदार, उत्कृष्ट संयोजनाबद्दल
केदार, उत्कृष्ट संयोजनाबद्दल तुझं आणि तुमच्या चमूचं अभिनंदन रे ! २०१३ बद्दल बोलूच
असामी, तू आहेस का २०१३ च्या
असामी, तू आहेस का २०१३ च्या कमिटीवर? आणि अजय-भावनापण आहेत का? आमच्याकडून काही मदत लागली तर जरूर कळवा.
त्यांच्यातील लेखिकेचा प्रवास
त्यांच्यातील लेखिकेचा प्रवास थोडासाच दिसला, रादर त्यावर अपर्णाने प्रश्न विचारले (बदलणारा भारत, बदलती पिढी आणि प्रश्न)
)
<< hmm.. मला 'नौवारी ते अरमानी' या टायटल वरून शोभा डे लेखिका पेक्षा शोभा डे आणि त्यांचा फेमस फॅशन आयकॉन इमेज या बद्दलच असावं अस वाटलं होतं !
त्यांची सुप्रसिध्द फॅशन आयकॉन इमेज,मॉडेलिंग चा प्रवास, त्यांनी सुरु केलेला स्वतःचा डिझायनर साडी ब्रँड,. हे सगळं बघता त्या विषयी असतं तर जास्तं आवडलं असतं, टायटल ला अॅप्रोप्रिएट वाटलं असतं :).
बाकी राज-बाळासाहेबां बद्दल चांगलं बोलल्या हे थोडं सरप्रायजिंग कारण मागे त्यांच्या ब्लॉग वर त्यांनी 'झेंडा' च परिक्षण लिहिलं होतं, मुव्हीची स्तुति केलीच होती पण 'मराठी आग्रही' नेत्यांना प्रश्न टाकला होता , (मल्टिप्लेक्स आणि मराठी सिनेमा वादावरून), कि मि. ठाकरे, तुमचा मुद्दा मान्य आहे , सो सुरवत तुम्ही नेतेच का नाही करत ( बाय प्रमोटिंग झेंडा इन मल्टिप्लेक्सेस ?'
असामी, तू आहेस का २०१३ च्या
असामी, तू आहेस का २०१३ च्या कमिटीवर? >> आहे पण कशात हे नक्की नाहि आहे. पण काहि विचारयचे असेल तर नक्की विचारेन.
आमच्या मुख्य समितीत अजिबात
आमच्या मुख्य समितीत अजिबात रुसवे फुगवे नव्हते हे सांगायला आनंद वाटतो.>>> याबद्दल दुप्पट अभिनंदन :).
It is getting easy for me to
It is getting easy for me to type in English (in tablet) so please excuse me for writing in English.
Let me first say that the convention was well organized and kudos go to all the people involved in planning. My comments are for the Boston Team.
- From my past experience in planning the convention, Chicago should have been sold out. There are many reasons for the lower turn out; main factor being it was not marketed well. BMM Newsletter had provided the space from the day one which was not effectively used. Same way, considering geographical location of Boston, it should sell out as well.
My future comments will be based on how the readers like it so far. Thanks.
श्रेयस ला नाही आवडल!!
श्रेयस ला नाही आवडल!!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9388674.cms
Let me save the best for last
Let me save the best for last - it was Ashok Hande's incredible dance show, which deserves to be on Broadway. Yup, it's that outstanding as a production, with the most energetic dancing and music, that leaves viewers breathless! And to think, his day job is that of a fruit vendor!! What an astonishing success story! As for his star Lavni dancer, she sizzles more than Munni, Jalebi, Sheila and the lot put together! Would love to know her name. She is a major phataka.... a real theekhi mirchi. Who wouldn't want to play Holi with this lady in that sexy blue choli???
<< शोभा डे च्या लास्ट पॅरेग्राफ ला जोरदार अनुमोदन :). !
'मराठी बाणा' रॉक्स .. काय शो आहे !!!
या विषयावर अनेक शोज आले असतील पण प्रेझेंटेशन अशक्य सुंदर, टु गुड !
'मला तिथे कुणी साधं पाणीही
'मला तिथे कुणी साधं पाणीही विचारलं नाही. यापुढे अशा कार्यक्रमांना जायचं की नाही याचा शंभरदा विचार करावा लागेल,' अशी प्रतिक्रिया श्रेयसने 'मुंबई टाइम्स'कडे व्यक्त केली >>>> आँ??
हर्षदाला सांगतो, बिचारी नखर्यामुळे परेषान होती.
आमच्या परीने आम्ही श्रेयसचा उत्तम पाहुणचार करायचा प्रयत्न केला. त्याला ते समजलं नसेल तर आम्ही काय करणार? >>> गो निमकरबाई !! अगदी बरोबर बोललीस.
पण हॉटेलमध्ये रुमवर प्यायचं
पण हॉटेलमध्ये रुमवर प्यायचं पाणीदेखील उपलब्ध नव्हतं. >>> नसतच इथल्या हॉटेलांमध्ये. असलं तरी त्याचे पैसे बिलात द्यावे लागतात.
एव्हढ्या मोठ्या स्केलवर
एव्हढ्या मोठ्या स्केलवर कार्यक्रम पार पाडताना काहि चुका राहुन जातात. मोठ्या मनाने दिलगीरी व्यक्त करुन पुढे जावे. निमकरबाईंची प्रतिक्रिया उद्धट वाटतेय. अमेरिकेत ४-५ स्टार हॉटेलातहि पाण्याची बाटली फुकट नसते (विशिष्ट स्टेटस असल्याशिवाय). २० तासांच्या प्रवासानंतर आलेला हा अनुभव श्रेयसला जिव्हारी लागणं साहजीक आहे.
पाण्याची बाटली? <<<< विषय
पाण्याची बाटली? <<<< विषय क्षुल्लक आहे. श्रेयसने Counter ला फोन करून घ्यायला काहीच हरकत नव्हती.. मोठया मोठया हॉटेलात रहाणार्यांना हे सांगावे लागत नाही. आणि वाटलंच तर स्वयंसेवकाला तसे तिथेच सांगता आले असते. त्याचा कार्यक्रम मात्र मस्त झाला...
पण बातमी क्षुल्लक वाटली..
(दुपारी बरेच वेळ त्याच्यासाठी शोधाशोधही चालली होती, हे दिसत होतं)..
माझे मत असे की, भारतातले लोक
माझे मत असे की, भारतातले लोक हे मुद्दामून बोलावलेले पाहुणे असतात, त्यामुळे त्यांचे जास्त अगत्याने स्वागत करावे अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. त्यातून पूर्वी अमेरिकेत येऊन गेलेले नसतील, तर त्यांना अगदी बारीक सारीक बाबतीत सुद्धा जास्त मदत लागते. हे आपल्या लक्षात येत नाही.
मात्र आपली अपेक्षा अशी की आपण स्वयंसेवक, पैसे न घेता खूप मेहेनत घेतो, तर त्यांनी समजून घ्यावे, अशी असते.
शिवाय बर्याच लोकांना स्वतःच्या अपेक्षा स्वतःच्याच तोंडाने सांगण्याची सवय नसते. जर काही खटकले तर लगेचच्या लगेच संबंधितांना सांगणे, हे प्रकार ते करत नाहीत! संस्कृतीतला फरक!
हे मुद्दाम बोलावलेले तर सोडाच, आपल्या एकेकाळी जवळच्या नात्यात असलेले लोक, न बोलावता सुद्धा इथे आले तरी ते असेच वागतात! नि मागून भारतात जाऊन आपल्याबद्दल वाईट बोलतात.
त्यातून श्रेयस यांनी खरेच काही पैसे न घेता कार्यक्रम दिला असेल तर जरा त्यांच्यावर चार दोन पैसे जास्त खर्च करायला हरकत नव्हती. पैसे वाचवायचे, तर जरा जेवण, चहा, उपहार या कार्यक्रमात किती लोक आधाशासारखे खूप वाढून घेतात नि मग फेकून देतात, किंवा बांधून घेऊन जातात, साखरेच्या पुड्या खिशात घालतात, सांडासांडी करतात, त्यावर लक्ष ठेवावे!
तर आता पुढल्या बृमंम मधे काम करणार्यांनी याची जरा नोंद घ्यावी! ते बोलत नसतील, तर आपण खोदून खोदून, वारंवार विचारावे!!
मुद्दामून जर बोलावून आणले, तर ते खूष रहातील, ही आपली जबाबदारी होते.
Pages