बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले?

Submitted by admin on 26 July, 2011 - 23:01

बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले? त्यासंबंधी आपल्या प्रतिक्रीया इथे लिहा.

medium_BMM2011_logo3.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ निधपः अहो मी नाही चिडले. मात्र वाईट वाटल की श्रेयस कार्यक्रमाचा आनंद लुटु नाही शकला. त्याने मोकळे पणाने सहभाग घेतला असता तर त्याला स्वतःलाच खूप मजा आली असती असो.

आम्हाला सर्व निमंत्रितांची खूप छान ई-मेल्स आली. गंमत म्हणून शोभा डे यांचा ई-मेल रिस्पॉन्स खाली शेअर करते आहे. त्यांनी आपल मराठीपण मनापासून एंजॉय केल. सगळ्यात मुख्य म्हणजे अमेरिकेच्या काना-कोपर्‍यातून आलेल्या मराठी लोकांना अधिवेशने खूप आवडल. हे आमच्याकरता सर्वात महत्वाच आहे कारण यामुळे कम्युनिटीला एकत्र यायला उत्साह येतो.

@अश्विनीमामी- नाही मनाला लावून घेतल. मेहनतीच खूप छान चीज झाल. पण विचार करतो की परत खुलासा करावा का? का इथेच थांबाव? जास्ती चर्विचरणाने पण गोष्टी विचित्र थराला जातात.
@परदेसाई-उभ्या उभ्या विनोदाचा आता सर्व मंडळात दौरा करा. कोजागिरीला येता का परत...शिकागोला Happy
------------------------------------------------------------------------------------

kalpana, it was one of the best experiences of my life. thank you all for inviting me. de

On Wed, Jul 27, 2011 at 6:20 AM, sandeep nimkar wrote:

Dear Shobha-tai,

It was such a pleasure meeting you. I will never forget how clearly and unambiguosly you presented your thoughts during the show. I also loved your attitude to enjoy the convention to the fullest. Our community was very appreciative that you attended programs, mingled with people and ate with us. Take care and stay in touch.

Love,

Kalpana

--
Shobhaa De
shobhaade.blogspot.com

परदेसाई, 'उभ्या उभ्या विनोद' बद्द्ल लिहा ना. वरच्या पोष्टींमध्ये त्या कार्यक्रमाचा उल्लेख वाचुन उत्सुकता निर्माण झालीये.

केदार, कल्पु आणि टीमचे अभिनंदन! अशा प्रकारचे कार्य्क्रम करण्यासाठी संयोजक काय आणि किती कष्ट घेतात हे जवळुन बघितले आहे/अनुभवले आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य्क्रम असला की थोड्याफार प्रमाणावर त्रुटी रहाणारच!

उपस्थित राहिलेल्यांच्या प्रतिक्रियांवरुन अस जाणवतंय की गेल्या वेळेपेक्षा खूप कमी प्रमाणात गाजावाजा होऊनही हे अधिवेशन झकास झालेले आहे...

अधिवेशन अप्रतिम झाले यात शंकाच नाही.

सर्व संयोजकांचे मनापासुन अभिनंदन !!

आपल्या पैकी ज्यांना एकानेक कारणाने 'चौफुला - २०११' प्रत्यक्ष पहाता आला नाही. त्याना तो अनुभवता यावा यासाठी त्याचा अहवाल माबो वर टाकला आहे.

तरी सर्वानी अवश्य भेट द्या आणि तुमचा अभिप्राय कळवा.

http://www.maayboli.com/node/27730

मी २७ जुलै ला १७.४९ ला जे पोस्ट केले ते कुठल्याहि पुरेशा माहितीशिवाय लिहीले होते. या बद्दल क्षमस्व.

आज दुपारी आम्ही काही कुटुंबे मिळून, शिकॅगो चे अधिवेशन उत्तम रीतीने पार पाडल्याबद्दल बी एमेम च्या अध्यक्षा सौ. माधुरी जोशी यांचे अभिनंदन करण्यासाठी एकत्र जमलो होतो. तिथे श्री. श्रेयस तळपदे यांच्याबद्दल तसेच तुलनेने श्री शंकर महादेव, आयोवाच्या सिनेटर सौ. स्वाती दांडेकर, श्रीमति शोभा डे व भारतातून आलेले अनेक कलाकार यांचे वर्तन याबद्दल बरीच मनोरंजक माहिती मिळाली. एकूण सर्व कार्यकर्ते श्री. श्रेयस तळपदे सोडून इतर सर्वांवर खूष. प्रसिद्ध व्यक्तीने समाजात कसे वागावे हे श्री. तळपदे सोडून बाकीच्या व्यक्तींकडून शिकावे.

आता श्री. श्रेयस तळपदे यांनी मुलाखत छान दिली. ते कुणि साधे सुधे मराठी माणूस नसून आघाडीचे हीरो आहेत असे त्यांनी येण्यापूर्वीच इ-मेल द्वारे बीएमेम ला कळवले होते. तरी त्यांना बोलावण्याची अक्षम्य चूक घडली. त्यांच्या वर्तणुकीच्या सुरस व चमत्कारिक कथा व त्यांची काही मुक्ताफळे ऐकून बरीच करमणूक झाली. लाथ मारीन तिथे पाणी काढीन म्हणणारे शूरवीर मराठी लोक. श्री. तळपदे यांना मात्र भर शिकॅगो च्या हॉटेलात बसून प्यायला पाणी नाही मिळवता आले!!! धन्य, धन्य!

एकूण ते मोठे नट आहेत, आणि फक्त स्टेजवर नि इतर नाटक सिनेमा मंडळींबरोबर अगदी 'डाऊन टू अर्थ' वागत असतील, तरी बाकी समाजात रहाण्याच्या लायकीचे नाहीत हे कळले. अगदी जगभर हिंडून आलेल्या लोकांनी पण सांगितले की ही व्यक्ति विरळाच!

यंदा भारतात या समारंभाचा गाजावाजा झाला नाही, राजकारणी लोकांना बोलावले नाही. पुढल्या वेळेपासून भारतातून आणखी कमी लोकांना आमंत्रण द्यायचे असे ठरते आहे.

हो, इथे बाकीचे म्हणजे साधेसुधे लोक, त्यात एव्हढे थोर लोक कशाला? अमेरिकेतले सिनेटर, कलाकार, गायक खूप आहेत. स्वस्तातहि होईल काम!!

खरे तर मायबोलीवर पण आपल्याला अनुभव आलेलेच आहेत, 'आबुदोस, गेलात तेल लावत, समजण्याची कुवत नाही तुमची' असे म्हणणारे लोक आहेत इथे!

लाथ मारीन तिथे पाणी काढीन म्हणणारे शूरवीर मराठी लोक श्री. तळपदे यांना मात्र भर शिकॅगो च्या हॉटेलात बसून प्यायला पाणी नाही मिळवता आले!!! धन्य, धन्य! >>> Rofl तळपदे एपीसोड जाउदे बाजूला पण हे वाक्य आणि शुद्ध मराठीत कॉन्टेक्स्टला धरून ज ब री आहे.

@झक्की-<<आज दुपारी आम्ही काही कुटुंबे मिळून, शिकॅगो चे अधिवेशन उत्तम रीतीने पार पाडल्याबद्दल बी एमेम च्या अध्यक्षा सौ. माधुरी जोशी यांचे अभिनंदन करण्यासाठी एकत्र जमलो होतो.>>
हे उत्तम केलत. आमच्या यशात सिंहाचा वाटा माधुरीचा आहे. आमच्या अधिवेशनाच्या संयोजनात तिचा सहभाग होता पण ढवळाढ्वळ नव्हती. आम्हाला कामाची, निर्णयाची पूर्ण मोकळीक होती आणि मदतीला ती नेहमीच असायची. कुठलाही वैयक्तिक अजेंडा आणि चमकोगिरीची हाव नसल्यामुळे तिचे आमच्या कमिटीशी छान संबध होते. कामाशी मतलब असलेली अध्यक्षा होती ती.
खरतर शिकागोच्या अधिवेशनाच एक सर्वात मोठ वैशिष्ठ्य सांगते Not only our community came together, worked together but emerged as even a stronger community. समाजबांधणीच उद्दिष्ठ आम्ही नक्कीच गाठल. नफा-तोटा आता बघू. हजारो डॉ. मिळवायचे, लोकांचे शिव्या-शाप खायचे, आणि पुन्हा मित्रांच्यातच एकमेकांची तोंड बघणार नाही अश्या गर्जना करायच्या--असल्या अधिवेशनांना काहीच अर्थ नसतो.
अधिवेशनानंतर भरलेल्या डोळ्यांनी आणि दाटलेल्या गळ्यानी एकमेकांचा निरोप घेतला. मी स्वतः शिकागोत खूप नवीन आहे पण अस मला कधी जाणवल नाही किंबहुना नवीन मित्र्-मैत्रिणिंनी कधी जाणवू दिल नाही. असो. माधुरीला पार्टी दिलित हे छान केलत. पण तुम्ही का आला नाहीत आमच्या अधिवेशनाला?

कल्पना, केदार, माधुरी

तुमचे आणि तुमच्या सर्व सहकारी मंडळींचे मनःपूर्वक अभिनंदन.

येऊ न शकल्याचे शल्य आहे!

अभिनंदन केदार आणि कल्पना..
बी एम एम चं स्वरूप आणि आवाका बघता त्याचं आयोजन आणि संयोजन ही निश्चितच मोठी गोष्ट आहे.. त्यामुळे नुसती समितीच नव्हे तर त्यांची कुटुंबे सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत..

आजच्या टाईम्स मध्ये शोभा डेंचा लेख आला आहे. २०५० मध्ये मराठी प्रेसिडेंट होणार असा त्यांना विश्वास वाट्तो. आयोजनाचे व जेवण खाणाचे कौतुक केले आहे. वाचून खूप मस्त वाटले.

२०५० मध्ये मराठी प्रेसिडेंट होणार>>> अ.मा. लेख वाचला नाही अजून पण तो प्रेसिडेंट अमेरिकेचा ना? भारताचा (ची) आत्ताच आहे Happy

सुधीर गाडगीळांच्या लेखावरची पहिली प्रतिक्रिया खास मुक्तपीठ स्टाईल आहे Happy

@योग आणि अमा (अश्विनी), शोभाताईंचा लेख दिल्याबद्दल धन्यवाद. पाठ्वते आता कार्यकर्त्यांना.

शोभा डे यांचा लेख खरोखरच अतिशय छान आहे. अतिशय थोडक्या शब्दात अमेरिकन मराठी माणसाची (खर म्हणजे सगळ्याच अनिवासी मराठी माणसांची ) नस पकडली आहे असे वाटते.
मायबोलीवर सुद्धा इतक्या सोप्या (:)) भाषेत व दोन तीन पिढ्यातील अमेरिकन मराठी माणसांच्या भावना वाचल्या नाहीत.
हे वर वरच आहे, की खरच, की किती जणांचे प्रतिनिधीत्व हे तुम्हीच अमेरिकन मायबोलीकर जाणो.

बोस्टन अधिवेशनाला शुभेच्छा.

वत्सला...
'उउवि' हा कार्यक्रम इथल्या Tv वर Standup Comedy म्हणुन जे कार्यक्रम होतात त्याप्रकारचा असतो. आम्ही ५/६ कलाकार मिळून आपापले Script सादर करतो. Standup Comedy ची मुळ कल्पना ही 'लोकाना सतत हसवणे' हीच असते. त्यावर विषयाचे किंवा Continuity चे बंधन नसते.
अर्थात मराठीत कार्यक्रम सादर करताना शिव्या, कमरेखालचे विनोद, जातीय विनोद हे लांब ठेवणं आलंच. तयारी करताना विषय किंवा विनोद हे Overlap होणार नाहीत एवढंच बघितलं जातं, पण बाकी काही बंधनं नसतात.

'उउवि' संघाबद्दल: या चमुत आम्ही ६ कायमचे कलाकार आहोत, आणि मधून मधून इतर कलाकार आमच्या बरोबर यात सहभागी होतात. यापूर्वी बॄमम अटलांटा आणि सियाट्ल इथे हा कार्यक्रम सगळीकडचे कलाकार घेऊन केला गेला होता. त्यानंतर आमचा चमू तयार झाला आणि आता त्याचे बरेच कार्यक्रम होतात. एकादे आमंत्रण आल्यावर Available time, Distance, Availability बघून टीम ठरते. आतापर्यंत NY, NJ, DC, CT, NC, Kansas, Albany आणि BMM फिली आणि शिकागो असे बरेच कार्यक्रम झाले आहेत.

लहान मंडळांना कार्यक्रम करणं फार सोपं जातं कारण एक Microphone/स्पिकर आणि प्रेक्षक याव्यतिरिक्त काहीच लागत नाही.

बर्‍याच लोकांचा एक छोटासा गैरसमज आहे की कार्यक्रम एकदा बघितला की झालं. (म्हणजे नाटकासारखं). त्यामुळे, 'आम्ही पाहिलाय फिलिला तुमचा कार्यक्रम' असे अभिप्राय कधी कधी मिळतात. पण एका BMM चे विषय दुसर्‍या BMM ला नसतात. तसंच प्रेक्षक Repeat होणार असं वाटलं की नवीन Script करतोच. मी आत्तापर्यंत १०/१२ कार्यक्रमाना ५/६ वेगवेगळी Script केली आहेत (स्वतः लिहीलेली. सुरुवातीला केलेलं एक Script 'दाद' च्या एका कथेवर बेतलेलं होतं).

मायबोलीकरांमधून मी, संदीप चित्रे, आणि Prashant_the_one हे चमुचे कायम सभासद आहेत.

यापुढचा कार्यक्रम १० सप्टेंबरला न्यूजर्सीत ठरला आहे.

Pages