बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले?

Submitted by admin on 26 July, 2011 - 23:01

बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले? त्यासंबंधी आपल्या प्रतिक्रीया इथे लिहा.

medium_BMM2011_logo3.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है, झक्की स्पॉट ऑन. आपली लोकं (स्वयंसेवक) सॉफ्ट स्किल्स मध्ये कमी पडतात. अट्लांटातहि असं थोड्याफार प्रमाणात झालं. बोस्टनकरांना याचा अनुभव असेलच (हापुस आंबे)... Happy

@ झक्की-तुमच म्हणण पटत मात्र ज्या अगत्याने डॉ. काकोडकरांच, शोभा डे, शंकर महादेवन, ओमी वैद्य यांचा पाहुणचार केला तेच अगत्य श्रेयसला दाखवल. ते बरे खूष झाले? माणूस गायबच झाला तर काय करणार? कस खोदुन विचारणार? मला अस वाटत की अपमाना पेक्षा हा अपेक्षाभंगाचा उद्रेक आहे. असो.
@रोम्या- जोरदार मार्केटींग होत नाही आहे हे बर्‍याच लोकांनी व्यक्त केल होत पण---. मराठी न लिहण हे तुला अक्षम्य. Happy

लिंबुभाऊ, मला लोकांनी सिनेटर दांडेकरांच्या मराठीतून न बोलण्याबद्दल विचारले असता मी म्हटले, "मी बोलते आहे न मराठी, सिनेटर बाई काय बोलतात ते त्यांना विचारलेले बरे".
मात्र मी सिनेटर बाईंशी छान जिव्हाळ्याच्या गप्पा मारल्या, मुलांची खुशाली वगैरे. माझी त्यांच्याशी ओळख तेवढीच आहे. त्यांना काही कार्यक्रम बघण्यात थोडाफार रस आहे असे वाटले. भारतातील पाहुण्यांच्या व्हिसासाठी त्यांनी मदत केल्याचे म्हणाल्या. त्यांच्या कामातून जेवढा वेळ मिळेल तेवढा तिथे थांबतील असे म्हणाल्या. श्री. दांडेकरही तिथे होते, ते माझ्याशी मराठीत एकदोन वाक्ये बोलले. नंतर माझ्या मुलाशी थोडावेळ बोलले.

@ झक्की <<< हे मुद्दाम बोलावलेले तर सोडाच, आपल्या एकेकाळी जवळच्या नात्यात असलेले लोक, न बोलावता सुद्धा इथे आले तरी ते असेच वागतात! नि मागून भारतात जाऊन आपल्याबद्दल वाईट बोलतात.

>>> हे अगदी पटलं. असं करू नये. सेलेब्रिटीज नी वेळच्या वेळेस काय पाहिजे ते सांगाव. नंतर भारतात जाऊन पेपर कडे टीका करण्यात काय फायदा? ( आमची पणजी म्हणायची तसं देवानी दिलयं ना तोंड मग त्याचा वापर फक्त योग्य वेळेस आणी योग्य ठिकाणीच करायला शिकावं)

हे वागणं होस्ट चा पुब्लिकली इन्सल्ट केल्या सारखं आहे, ज्याचा काही उपयोग पण नाही. म्हणजे होस्ट ना (जर खरचं चूक झाली असेल तर ) त्यांना काही त्यात सुधारणा करायला पण चांस नाही.

आणी कोणी मुद्दामून तर चूक नाही ना करतं. इतक्या मोठ्या कार्यक्रमात काही काही गोष्टी होउन जातात.
सगळे व्हॉलंटीयर्स, स्वताचे डे जॉब्स, शिक्षण , संसार सगळं सांभाळून करत असतात, म्हणून सेलेब्रिटीज नी पण हे आपलं घरचं कार्य असल्या साऱखं वागून तो प्रोग्रॅम सक्सेस्फुल व्ह्यायला मदत करावी.

नंतर च्या अश्या वागण्यानी उगाच सगळ्याला गाल बोट लागल्या सारखं होतं आणी मनं दुखावली जातात .

खरं तर सेलेब्रिटीज च्या मागे पुढे करायला बरेच लोकं तयार असतात. प्रत्येका साठी दोन दोन व्हॉलंटीयर्स ठेवावेत. जे त्यांना काय हवं नको बघतील.

तो Hyatt मधे राहिला असेल असे धरून पुढचे लिहीलेले आहे. रुमसर्विसकडून पाण्याची बाटली मागवली असती तर साधारण १५-२० डॉ. ला मिळाली असती किंवा तिथे खाली एक स्टोर होते तिथे साधारन २.५० डॉ. ला मिळाली असती. इतकी तहान लागलेली असेल तर १-२ बाटल्या विकत घेऊ शकला असता ना तो? किंवा बी.एम.एम.चा प्रतिनिधी त्याच्या दिमतीला दिलेला असेल त्याला पाणी आणून देणार का असेही नक्की विचारू शकला असता. आणि तो स्वखर्चाने आला असे तो म्हणतो म्हणजे तेच सत्य असेल कशावरून? आणि जो माणून ३०००डॉ. घालून शिकागोपर्यंत येतो त्याला अजुन थोडे पैसे घालून पाणी घेता येऊ नये का?

लग्नघरात एखादा पाहुण्याला पाणी मिळाले नाही म्हणून तिथे मागून न घेता नंतर गावभर गाजावाजा करण्यासारखे झाले हे.

कुछ हजम नही हो रहा है!

मिनोती ३००० डॉ? हॉटेलचा खर्च ही त्यानेच केला की काय?

आजच मटात हे श्रेयस तळपदेचे आलेले आहे. त्याने त्या पाण्यापेक्षा त्याची खायची सोय नव्हती आणि त्याबद्दल विचारले तर "ती आमची जबाबदारी नाही" असे कोणीतरी त्याला सांगितले असे तो म्हणाला.
दुसरे म्हणजे परतीच्या वेळेस त्याची विमानतळावर जायची सोय नव्हती आणि त्याबद्दल विचारले तर त्याला स्वतःच जायला सांगितले टॅक्सी करून (पैसे आम्ही पाठवतो असे बृममं वाले म्हणाले) असे (पुन्हा) तो म्हणाला.
हे सर्व त्या लेखातून.
ती मुलाखत घेणार्‍याने एक चांगले केले की दुसरी बाजू म्हणून ममं च्या एक निमकर आहेत त्यांचीही त्यावर प्रतिक्रिया लिहीली आहे. पण त्यांनी हे स्पेसिफिक पॉईंट्स त्यांच्या बाजूने सांगितले नाहीत. खूप कर्ट आणि ढोबळ उत्तर वाटले त्यांचे. किंवा कदाचित पूर्ण छापले नसेल.

हे मी फक्त पेपर मधे आले आहे तेवढे लिहीले. प्रत्यक्षात काय झाले ते तेथीलच कोणीतरी सांगू शकतील.

फारऐण्ड, वर जी कल्पु आहे ना,तिच कल्पना निमकर Happy

तो स्वखर्चाने आला ? का फक्त प्रोग्रॅम करता पैसे घेतले नाहीत ? मला ते वाचून असं वाटलं कि त्याला ऐअर फेअर आणी हॉटेल चे दिले असतील पण त्यानी स्वताचे असे काही प्रोग्रॅम चे वेगळे लावले नाहीत.

श्रेयस तळपदे सारख्या फालतु नटाला कशाला बोलावले होते?

कदाचित ज्यांनी भरघोस देणग्या दिल्या, त्यांना हवे असतील. असे एकट्याच्या मते ते फालतू असतील म्हणून बोलवायचे नाही, तर एकट्याचे मत कुणाबद्दल चांगले आहे म्हणून त्यांना बोलवावे का?

खरे तर जिथे ३००० लोक येतात तिथे सर्वच लोकांच्या मनासारखे होणे अशक्य आहे.

पण फिलाडेल्फियात जसे आधी पैसे भरून राखून ठेवलेल्या जागाच गायब, सौ. आशा भोसलेंचा कार्यक्रमाला झालेला प्रचंड उशीर असल्या गोष्टी तर झाल्या नाहीत ना? तो कार्यक्रम उशीरा सुरु होण्यामागे, लोक गप्पा मारत बसले होते हे कारण नाही.

आता कार्यक्रम वेळेवर सुरु न होणे हे गेल्या तीस वर्षातले दुखणे आहे. याचे कारण मुख्यतः असे की लोक हजारो मैल प्रवास करून एकमेकांना भेटतात, मग साहाजिकच त्यांना गप्पा माराव्याश्या वाटतात.

बरे कार्यक्रमहि कसे खच्चून ठेवलेले असतात, बरोबरच आहे. एव्हढे पैसे नि वेळ खर्च करून लोक येणार, त्यांना नुसते चहा पाण्यावर घालवणार? नि कार्यक्रम करणार्‍यांनाहि त्यांचे कार्यक्रम सर्व अमेरिकेतल्या लोकांसमोर दाखवायला संधि कशी मिळणार? बाग राज्यात आम्ही श्री. विनय देसाई, मीना नेरुरकर इ. चे कार्यक्रम बघू शकतो, कॅलिफोर्निया नि टेक्सास मधल्या लोकांना ती संधि कधी मिळणार? आणि कॅलिफोर्निया, टेक्सास, अ‍ॅटलांटा येथल्या गुणी लोकांचे गुण आम्हाला कसे बघायला मिळणार? आणि एका राज्यातल्या लोकांचे कार्यक्रम ठेवायचे तर इतर राज्यांचे का नाही?

थोडक्यात दोन्ही बाजू आहेत. त्यातून तुम्हाला काय हवे ते तुम्ही निवडा. तुम्हीहि तुमच्या अपेक्षा तपासून पहा. आणि मगच ठरवा. आम्ही बर्‍याच बृममं च्या संमेलनाला गेलो आहोत. आम्हाला काय होते नि काय नाही हे आता पूर्ण माहित आहे. तरी आम्ही फिलाडेल्फियाला गेलो. मला माबोकरांना भेटणे महत्वाचे, सौ. लाहि काही काही कार्यक्रम बघायचे होते, ते तिने पाहिले. त्यामुळे आमच्या काही तक्रारी नाहीत!

अहो झक्की मला असे म्हणायचे होते की. भारतातुनच बोलवायचे जर जरा चांगला अतुल कुलकर्णी सारख्यांना बोलवायचे उगाच दोन चार पांचट हिंदी सीनेमात काम केलेल्याला कशाला? असो......

झक्की.. चांगली पोस्ट...
'कुणाला बोलवावे' हे इतर बर्‍याच कारणांवर अवलंबून असतं. श्रेयसची मुलाखतही चांगली झाली.
पण विषय आलाच आहे, तर त्याच्या येण्यात बृममने काय दिलं (विमान खर्च, रहाण्याची जागा, जेवणाची व्यवस्था ई) की काहीच नाही, कळलं तर नीट संदर्भ लागेल. त्याबरोबर हे ही लक्षात घेतलं पाहिजे की मागे हिंदीतल्या दोन मराठी नट्यानी ५०,००० आणि १,००,०००$ ची मागणी केली होती, पाहूणे म्हणुन यायला.

अहो स्वखर्चाने कशाला येइल तो? दोन बिझिनेस क्लास ची तिकिट, राहण्याचा-खाण्याचा खर्च सर्व आपण केला. कुठल्याही आमंत्रित पाहुण्याना आपण मानधन दिल नाही. असो. भेटतात असे नग. त्याला इलाज नाही.

@ फारएन्डः मी सर्व काही सांगितल पण ते सगळ मटा ने नाही छापल. अहो पाहुणचार करायला पाहुणा उपलब्ध हवा ना? त्यान फोन उचलायला हवेत ना? दिमतीला दिलेली माणस वैतागली. बर त्याचा मॅनेजरचा त्रागा पण सोसला. त्याची चिड्चिड होती के त्याचा खर्च आम्ही उचलला नाही. संबध काय? आणि खर सांगू आता या क्षणी प्रत्येक पॉईंट खोडत बसायला कुठे वेळ आहे. जरा नोकरी आणि कुटुंबा कडे वेळ देते. बिचारे निमूट्पणे सपोर्ट करतात.

@ झक्की- अहो तो एंटेरटेनर आहे म्हणून बोलावल. देणगिदारांचा काडीमत्र संबध नाही. तुम्ही अधिवेशनात होतात की नाही हे माहीत नाही पण त्यान मुलाखत झकास दिली. अतुल कुलकर्णी अति वैचारीक होइल (म्हणजे होतो) अशी भिती आम्हाला वाटली.

कल्पना,

अहो स्वखर्चाने कशाला येइल तो? दोन बिझिनेस क्लास ची तिकिट, राहण्याचा-खाण्याचा खर्च सर्व आपण केला. कुठल्याही आमंत्रित पाहुण्याना आपण मानधन दिल नाही.>>> हे सांगितलंत ते चांगलं केलत. महाराष्ट्रटाईम्सच्या 'पैलतीर' मधे पाठवू शकतो का आपण आपले पाईंटस? कुणाला स्पष्टीकरण म्हणून नाही पण एवढं छान आयोजन केलंत तरी लोक चुकीचे 'आरोप' करत असतील तर बाकीच्यांना खरं काय ते कळायला हवं म्हणून.

अंजलीला अनुमोदन. आज मटामध्ये ही बातमी आलेली आहे श्रेयसच्या मोठ्या फोटोसकट वगैरे, आणि तुमचं स्पष्टीकरण एका छोट्या चौकटीत छापलेलं आहे, तेह्वा तुमची योग्य बाजू मांडायला हवी.

.

विमानात जेवण यायच्या वेळेला झोप लागली असेल तर परत जेवण मिळत नाही >>>

अहो शुगोल जितना चाहे उतना खाओ, उतना पिओ असे बिझनेस क्लास मध्ये असते हो!!

ह्या अगदी साध्या बाबी आहेत. आणि जेवण मिळाले नाही म्हणजे काय? त्याला दिमतीला दिलेल्या माणसाला त्याचे प्रश्न - मला भजी हवेत. आता मला सांग असे अचानक भजी / भजे कुठून आणनार? कोक द्या म्हणाला तर कोक वगैरे सोयी (ज्या सहज होण्यासारख्याअ) त्या केल्या होत्या. स्वंयसेवक दिमतीला होते आणि ते जे होईल ते सर्व करत होते. बाकी सर्व माणसांची सोय देखील मकॉर्मिक प्लेसला होती, तिथेही कोणी मला पिठलं भाकरी हवी असे कोणी म्हणाले असते तर कोणी आणून दिलं असतं का? हव्या त्या सोयी झाल्याच पाहिजे अशी त्याची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही. शिवाय मॅनेजरचा खर्च पण मंडळाने करावा का? असो हा कल्पनाने आधी लिहिल्यासारखे हा अवास्तव अपेक्षाभंगांचा उद्रेक आहे.

श्रेयस तळपदे फालतु आणि फुकट तर त्याची मुलाखत घ्यायला सुधीर गाडगीळांना पैसे देऊन बोलवायचे काय कारण ? मंडळाला फुकटात आलेल्या तळपदे यांचा पाणी आणि एखाद्या वेळचा खाण्याचा खर्च परवडत नाही , पण त्यांची मुलाखत घेण्यासाठी गाडगीळांना पैसे देऊन बोलावणे परवडते ? हा मोठ्ठा जोक आहे. >>>>>>

श्रेयस फालतू आहे असे मंडळ म्हणत नाही, म्हणालेले नाही. उलट मुलाखत चांगलीच झाली असे मी आणि कल्पनाने वर लिहिले आहे. ही कॉमेंट मंडळावर आहे म्हणून ऊतर देण्याचे प्रयोजन.

कल्पू, धन्यवाद उत्तराबद्दल. मटाने नक्कीच एकतर्फी छापले आहे मग. तुमचा खुलासा अगदीच त्रोटक लिहीलाय. दोन्ही बाजू सविस्तर लिहीण्यापेक्षा वाचणार्‍याचा समज अपमान झालाय असा व्हावा असेच छापले आहे. आजची पुरवणी उघडली की "हा अपमान विसरणे अशक्य" ठळकपणे दिसते.

अशा आमंत्रितांना जेवण वगैरे साठी दररोज अमुक च्या हिशेबाने ममं काही देते का? ते दिले असेल तर मग हा अपमान वगैरे तक्रार उगाच आहे. आणि तसे नसेल पण त्याला त्याची कल्पना दिलेली असेल, तरीही. माझा अंदाज आहे की ते सगळे कोणत्यातरी पत्रात सविस्तर दिलेले असणार, ते वाचले नसावे.

परतीच्या प्रवासासाठी टॅक्सीचे नक्की काय झाले याचे आता उगाचच कुतूहल आहे Happy जाब वगैरे विचारल्याच्या थाटात विचारत नाहीये :), तुम्हाला कळाले आणि वेळ मिळाला तर सांगा.

पण मुळात विमान प्रवास (तो ही बिझीनेस क्लास) व हॉटेलखर्च ममं ने केला असेल तर हे फारच फुटकळ गोष्टीं मोठ्या करून लिहील्या आहेत असे दिसते.

अशा कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांच्या अपेक्षा काय असतात हे मीही पाहिले आहे, त्यामुले जनरल कल्पना आहे Happy

वरच्या अंजली आणि शैलजाच्या पोस्टशी सहमत. मटामधे हे इतक्या ठळकपणाने आलेले आहे की त्याची दुसरी बाजू यायला हवी.

जर मटा मंडळाकडे आलेले प्रतिसाद चाळणी लाऊन छापत असेल तर त्यांच्या वेबसाईट ऑनलाईन प्रतिसाद देणे योग्य ठरेल का?

हॉटेलमधे असताना पाहुण्यांनी काही विकत घेतलं तर मंडळाची जबाबदारी रहात नाही यामागे देखिल कारण आहे. मी यात पाण्याच्या बाटल्या वगैरे फुटकळ गोष्टी धरत नाहीये. पण हॉटेलमधे असताना तिथल्या बार मधून ड्रिंक्स खरेदी केली, केबलवरचे कार्यक्रम खरेदी करून पाहिले (कुठले कार्यक्रम हे मी सूज्ञांना न सांगणे लगे), पाहुणे बोलावून त्यांच्या जेवणाचा खर्च हॉटेलच्या बिलात टाकला तर तो खर्च मंडळाने का उचलावा? अशा घटना घडल्या आहेत त्यामुळे कुठलेही मंडळ हॉटेलमधल्या खर्चाची जबाबदारी घेत नाही.

.

शुगॉलः कैच्या काय पोस्ट. काय लिहिता आहात तुमच तुम्हालाच कळत नाही.

श्रेयसची मुलाखत एका फ्रेश आणि तरुण चेहर्‍याने घ्यावी अस आमच्या मनात होत. त्याला तसे तीन पर्याय ही दिले होते. त्यान ठाम पणे आम्हाला सांगितल की तो फक्त सुधीर गाडगिळांनाच मुलाखत देईल. हे तुम्हाला माहीत आहे का?

<<तळपदे यांना पहाटे एअर पोर्टवरुन हॉटेलात सोडले. कमीत कमी २० तासांचा प्रवास. प्रवासात जेवण झालेच असेल याची खात्री नाही. >> What makes you think that we did not invite him for dinner? His manager told us several times that Shreyas will not mingle with people. आम्ही सांगून पाहिल की आमंत्रित पाहुण्यानी अधिवेशनात सहभागी व्हाव अशी आमची अपेक्षा असते. बाकी सर्व आमंत्रितांनी अधिवेशनात खूप मजा केली. त्या ओमी वैद्यने तर मीना प्रभूंच्या जड बॅगा ढ्कलत (१५ मि हायट ते मकॉर्मिक प्लेस) आणायला आमच्या स्वयंसेविकेला मदत केली. आजच्या घडीला त्याच्या चेहर्‍याला श्रेयस पेक्षा जास्ती ओळख आहे. अधिवेशनात हेच दिसल. कौतुक वाटल आम्हाला त्याच्या संस्कारांच.

<<असं अगत्य ( ????? ) लाभल्यावर कार्यक्रमाच्या वेळेला गायब होऊन त्यांनी आपला निषेध नोंदवला असेल तर त्यांच काय चुकलं ?>> अहो तुम्ही अधिवेशनात होतात का?. तो स्वतःच्या कार्यक्रमाला बरोब्बर आला. स्वतःच्या पब्लिसिटीचा फोकस घालवण्याइतका मूर्ख नाही तो. उत्तम मुलाखत दिली. खूप आभारी आहोत त्याचे.

कल्पना आणि केदार, तुमचे, मंडळाचे म्हणणे मांडल्याबद्दल धन्यवाद.

मटाने एकतर्फी छापलेय हे कालच लक्षात आलेले होते. इथे मंडळाचे कार्यकर्ते स्वपैशाने तिथे राबत असतात. बीएमेमची तिकीटे स्वखर्चाने विकत घेऊन एकही कार्यक्रम पहाता येत नाही हे माहीती असुनही अफाट राबतात. हे देखील २+ वर्षे त्यांच्या नोकर्‍या, घरं बाकीची व्यवधानं वगैरे सांभाळून. मग त्यांनी भारतातून येणार्‍या कलाकारांकडून थोडी सहकार्याची अपेक्षा ठेवणे लोकांना का चुकीचे वाटते? आणि कलाकार आहेत म्हणून अवास्तव अपेक्षा मंडळाने तरी का मान्य कराव्यात? आणि हा माणूस थोडादेखील मोठेपणा दाखवू नाही शकत? गम्मत आहे सगळी.

कल्पना, केदार - संपूर्ण कार्यक्रम तुम्ही अत्यंत सुंदर मॅनेज केला होता. हॅट्स ऑफ तो यू ऑल!

बरं स्जुन एक गम्मत - श्रेयस तळपदे हा मराठी नट, मराठी नाटकांमधून कामे केली आहेत असे त्यानेच मुलाखतीत सांगितले. पण मुलाखत ७०% इंग्रजीतून दिली. माधूरी दिक्षीतने १० वर्षापूर्वी याच व्यासपीठावर अस्खलीत मराठीतून मुलाखत दिली होती जिने एकही मराठी नाटक किंवा एकही मराठी सिनेमामधे काम केलेले नव्हते. २ वर्षापूर्वी नाना पाटेकरने देखील Happy अर्थात नानाची गोष्टच वेगळी Happy

कल्पु, तुम्ही प्लिज तुमची (म्हणजे बृममंची) बाजू मटा मध्ये सविस्तर मांडाच. फारेण्डाने म्हणल्याप्रमाणे मटाने फारच नेगाटिव्ह रंगवलेय चित्र!

कल्पू,

मी फक्त पहाटे त्याला हॉटेलात सोडलं एअरपोर्ट्वरुन, त्या वेळेच्या खानपानासंबधी म्हणतीय. दिवसभराच्या नाही.
तो कुठेतरी गायबला होता, त्याला शोधावे लागले असा वर उल्लेख आहे, त्यावरुन वाटलं की हे कार्यक्रमाच्या वेळेलाच की काय ?
रच्याकने, सगळं अधिवेशन चांगल्याप्रकारे पार पाडलत या बद्दल अभिनंदन.
जमलेल्या सर्व ३००० लोकांच समाधान करणं शक्य नाही हे मला पटतय. पण वृत्तपत्रात बातमी जाहीर होते तेव्हा दुसरी बाजू सविस्तर पणे पुढे यावी असं वाटतं.
धन्यवाद.
हे. मा. शे.पो.

Pages