मराठीमधली कोडी

Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54

लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका हॉटेल मधे तीन मित्र जातात...चहावगैरे घेण्यासाठी....नंतर बिल येते ३० रुपये......... ते तिघे १० रुपये प्रत्येकी काढुन वेटर ला देतात ३० रुपये......... ते गेल्यावर मॅनेजर ला बिला मधे चुक लक्षात येते...तो वेटर ला सांगतो की बिल २५ रुपये आहे...हे ५ रुपये घे आणि त्यांना परत देउन ये.......वेटर जातो... आणि त्यांना प्रत्येकी १ रुपया देउन २ रुपये स्वतः कडे ठेवतो....... आल्यावर हा प्रकार मॅनेजर ला सांगतो....... तर मॅनेजर त्याला म्हणतो की तु त्यांना १-१-१ रुपया प्रत्येकी दिलास याचा अर्थ त्यांनी आपल्याला ९-९-९ =२७ रुपये दिले ते २७ रुपये आणि तुझ्याकडे असनारे २ रुपये म्हणजे २७+२=२९ रुपये होतात........... तर १ रुपया गेला कुठे.....?????????

का हॉटेल मधे तीन मित्र जातात...चहावगैरे घेण्यासाठी....नंतर बिल येते ३० रुपये......... ते तिघे १० रुपये प्रत्येकी काढुन वेटर ला देतात ३० रुपये......... ते गेल्यावर मॅनेजर ला बिला मधे चुक लक्षात येते...तो वेटर ला सांगतो की बिल २५ रुपये आहे...हे ५ रुपये घे आणि त्यांना परत देउन ये.......वेटर जातो... आणि त्यांना प्रत्येकी १ रुपया देउन २ रुपये स्वतः कडे ठेवतो....... आल्यावर हा प्रकार मॅनेजर ला सांगतो....... तर मॅनेजर त्याला म्हणतो की तु त्यांना १-१-१ रुपया प्रत्येकी दिलास याचा अर्थ त्यांनी आपल्याला ९-९-९ =२७ रुपये दिले ते २७ रुपये आणि तुझ्याकडे असनारे २ रुपये म्हणजे २७+२=२९ रुपये होतात........... तर १ रुपया गेला कुठे.....?????????

=====

त्यांच्या ९ रुपयात त्या वेटर ने ठेवलेले २ रुपये पण इऩ्युडेड आहेत. म्हणजे त्यांनी एकूण २५+२ असे २७ रुपये बिल दिलं आणि ३ रुपये त्यांना परत मिळाले.

सापडला रुपया.

त्यांच्या ९ रुपयात त्या वेटर ने ठेवलेले २ रुपये पण इऩ्युडेड आहेत>>>>>>>>>>>>>>>> हेच उत्तर अपेक्षीत असते या कोड्यामधे........... Happy

आज एक नविन Happy

एक बस उभी आहे. (ड्रायव्हर कंडक्टर नाहियेत त्यात)
त्या बसमध्ये ७ बायका आहेत,
प्रत्येक बाईकडे ७ पर्स आहेत,
प्रत्येक पर्समध्ये ७ मांजरी आहेत,
प्रत्येक मांजरीला ७ पिल्लं आहेत,
तर.....

बसमध्ये एकूण पाय किती?

.

१४ आहेत.......................
फक्त

१४ कसे.
बायकांचेच मिळून चौदा पाय झाले.
मग प्रत्येक पर्समधील ७-७ मांजरी,
त्या ७ मांजरीची प्रत्येकी सात पिल्ले, त्यांचे पाय कुठे गेले.

अरे माझी मर्जी........... मला फक्त बायकांचेच पाय मोजायचे असेल तर.... जिवंत पाय मोजले फक्त मी..... Happy

बसमधे मुंग्या किती आहेत?
तसे काही नसेल तर २*७+४*७^३+४*७^४=१४*(१+९८+६८६)=~१०००० (=१०९९०)
ते मोजायला बशीत शिरलेल्या बागुलबुवाचे मोजले नाहीत.
रच्याकने बागुलबुवाला किती पाय असतात?
आणि हे मराठीमधील कोडे कसे? की मराठी बायकांना (किंवा त्यांच्या मांजरांना) कमीअधीक पाय असतात?)
हलके घेतल्यास पाय बशीत नाही असे म्हणता येईल का?

बसमध्ये सात बायका आहेत हेच नक्की आहे. बाकी सर्व बसमधे आहे असे खात्रीशीररीत्या म्हणता येत नाही. म्हणून पाय १४. बाकी बसमधे कोण आहे याप्रमाणे बदलेल.

(पण एक पाय म्हणजे ३.१४, म्हणून एकूण पाय ४.४६ राउंड करून असेही एक उत्तर येइल. तसेच पाय म्हणजे अ‍ॅपल पाय म्हणायचे असेल तर उत्तर माहीत नाही असे येइल Happy )

आशिष Lol

ज्य्र्ग्य्ग्न

ग्य्र
व्स्क्षेद्च्र्फ्व्त्ग्ब्य्ह्नुज्मिक्,ओल्,प.;[\]';/.,`१२
३४ए६७६य८९-०१०१ज्कि['=]-जुत्फ्११११अव ग्य उतु५र्८उएओइऑप-ऑई०९पृओउइ८रु

उत्तरः १५८२

१ मांजर + ७ पिल्ले = ८ मांजरी * ७ = ५६ मांजरी प्रति पर्स * ७ पर्स = ३९२ मांजरी * ४ पाय =१५६८ पाय

१५६८ + १४ पाय= १५८२

बागुलबुवा आणि आश्चिग उत्तर बरोबर आहे १०,९९० Happy

फारएण्ड Happy बायकांसकट सगळे बसमध्येच आहेत असे समजून मोजायचेय Happy

अजून एक..

एक माणूस रेल्वेमधून प्रवास करत आहे. त्याच्याकडे प्रत्येकी १०० नारळ भरलेली तीन पोती आहेत.
आणि त्याला १०० व्या स्टेशनापर्यंत जायचे आहे.

टीसी त्याला हटकतो आणि पोती न्यायला हरकत घेतो. पण त्या माणसाने गयावया केल्यावर तो तयार होतो पण माणसाला एक अट घालतो की,

त्याने प्रत्येक स्टेशनावर एका पोत्यामागे एक असे नारळ तो माणूस उतरोस्तोवर टीसीला द्यावेत.
तर..

१०० स्टेशनापर्यंत जाईस्तोवर त्या माणसाकडे काही नारळ उरतील का? किती?

गाडी किती स्टेशनवर थांबते................ एकच असेल तर तो फक्त तीन नारळ देनार.... Happy

**************** ब्रॉयलर ***********
३००-
(३४*३+
४९*२+
१७*१)
=८३

टीसी नारळ कुठे ठेवतो?

Pages