घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी

Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24

परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.

काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.

बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दोन products सगळ्या प्रकारच्या स्वच्छते करता उपयोगी पडतात ते म्हण्जे लायसोल चे
disinfectant wipes आणी क्लोरोक्स चा ब्लीच स्प्रे. रोज स्वैपाकानंतर जर एकदा गॅस नीट वाईप्स नी पुसुन
घेतला तर ग्रीसी होत नाही व चिकट पणा पण रहात नाही. बरेच जण सिल्वर फॉईल पण लाऊन ठेवतात
व दर आठवड्याला बदलतात पण त्यानी गॅस चा लूक खराब होतो असं वाटतं.

घरात किती प्रकारची फडकी असावीत याचा एक प्रॉटोकॉल बनविला पाहिजे.
१) ओटा पुसायचे
२) डायनिन्ग टेबला साठी
३) कोलीन घेउन वेट वाइप करनया साठी
४) जमीन पुसायचे.
५) एक अगदीच खराब चीजे साफ करण्यासाठी. जे फेकूनच द्यायचे ते.

हे सर्व वेगळे ठेऊन आठवड्यातून एकदा सर्व उकळत्या पाण्यात घालून साफ करून कड्क वाळवावे.
म्हणजे जर्मस होणार नाहीत. नाहीतर सर्वात जास्त जर्मस ह्या वाइप्स मध्येच जमून अस्तात.

अजून अ‍ॅड करता येइल.

स्वयंपाक झाला की ओटा व गॅस पुसावा, गॅस आधी टीशुने पुसुन घ्यावा म्हणजे तेलकटपणा जाइल व मग लिक्विड स्प्रे (मी जिफ वापरते) करुन ओल्या फडक्याने पुसुन घ्यावा. ते फडके तसेच न ठेवता हातासरशी सिन्कमधे धुवुन घ्यावे व वाळत घालावे. सिन्कमध्ये भांडी जमवुन न ठेवता वेळेत घासली कि झुरळे होत नाहीत. भांडी घासुन झाली कि लगेच सिन्कही घासावे. दर १५ दिवसांनी सिन्क, बेसिन व बाथटबमधे पाइप स्वछ्च करायची पाऊडर टाकावी ( मी डॅकची वापरते.) म्हणजे पाइपमधे जमलेला/चिकटलेली घाण निघुन जाते व दुर्गन्धी /झुरळे येत नाहीत. सन्ध्याकाळी रोज धुप/कापुर जाळावे म्हणजे मन प्रसन्न रहाते व चिलटे वैगरे येत नाहीत. बेडशिट्स, पान्घरुणे, उश्यांचे अभ्रे दर आठवड्याला बदलुन धुवावेत. पाहुण्यांना दिलेले तॉवेल्स, बेडशिट्स, पान्घरुणे, उश्यांचे अभ्रे ही लगेच धुवावेत, तसेच स्तोरेजमधे ठेवु नयेत.. (मला एका घरी पाण्घरुण दिले होते त्याला अम्रुतांजनचा वास येत होता Sad रात्रभर सोप नव्हती ) एकदा अंगावर घातलेला कपडा धुवावाच. कमी वापरलाय म्हणुन तसाच हॅन्गरला लावु नये. तुर्तास एवढे पुरे..

पूर्वी घराबाहेर रांजण असायचा पाय धुवायला. गावाकडे असतो. मला खूप आवडते ही कन्सेप्ट. अपार्टमेंट / सोसायट्यात कार पार्किंग विकत घेतात लोक. तसच तिथच शूज रॅक केलं आणि एक पायताणाचा जोड बाहेरच्या कामासाठी डेडिकेट केला तर जोडे बाहेर राहतील. दाराबाहेर येऊन चप्पल अडकवायची, खाली यायचं शूज घालायचे..

बाहेरून आल्यावर शूज काढायचे. सोसायटीत नळाची व्यवस्था केल्यास तिहं पाय धुवायचे. चप्पल काढायची आणि मगच वर जायचं..

किचन ट्रॉल्यांचं प्रस्थ खूप वाढलय. बसवा. पण बंदिस्त असतील तर झुरळांचं नंदनवन बनेल. चाक असलेल्या आणि उघड्या ट्रॉल्यांमुळं हवा खेळती राहते आणि स्वच्छताही करता येते.

पूर्वी गाद्या उन्हात वाळवल्या जायच्या. आज इतक्या अजस्त्र गाद्या कोण गच्चीवर नेणार ? जर एक इंचाच्या पातळ गाद्या बनवल्या आणि एकावर एक अंथरल्या तर मऊपणा पण राहतो आणि सुट्टीच्या दिवशी उन्हात वाळवता येतात.

बाळाने पराक्रम केला तर तेव्हढिच गादी सुकवायला वरं पडतं..

शेक्सची १००% सहमत..
मी तर आयकियातुन २ स्टिल शेल्व्स आणुन ओट्याचा वरच्या भागात मारल्यात. त्यावर सगळे ग्रोसरीचे डबे, बाटल्या
उघड्यावर ठेवल्यात. आणी जी बन्द कपाटे आहेत त्यात रिकामे डबे, क्रोकरी, जास्त व नको असलेली भान्दी ठेवलीत. म्हणजे झुरळांना वावच नाही Wink . अर्थात घरात दोनच माणसे असल्याने मला हे शक्य झाले असावे.

मी रोज कार मधे व घरात सुद्धा एसी वेंट वर लॅवेंडर (एका स्प्रे बॉटल मधे पाणी घेऊन त्यात एक थेंब
लॅवेंडर ऑईल) स्प्रे केलेला छोटा wash cloth ठेवते. खुप गार आणी मन्द सुगन्ध सगळी कडे पसरतो आणी एकदम प्रसन्न वाटतं. सगळा थकवा लगेच निघून जातो.

U.S. Postal service sent out a message to all letter carriers to

put a sheet of Bounce in their uniform pockets to keep yellow-jackets
away.

Use them all the time when playing baseball and soccer. I use it when I am working outside. It really works. The insects just veer around you.

All this time you've just been putting Bounce in the dryer!

1. It will chase ants away when you lay a sheet
near them. It also repels mice.

2. Spread sheets around foundation areas, or in
trailers, or cars that are sitting and it keeps mice
from entering your vehicle.

3. It takes the odor out of books and photo albums
that don't get opened too often.

4.It repels mosquitoes. Tie a sheet of Bounce
through a belt loop when outdoors during mosquito
season.

5.Eliminate static electricity from your television
(or computer) screen.

6. Since Bounce is designed to help eliminate
static cling, wipe your television screen with a used
sheet of Bounce to keep dust from resettling..

7. Dissolve soap scum from shower doors. Clean
with a sheet of Bounce.

8. To freshen the air in your home - Place an
individual sheet of Bounce in a drawer or hang in
the closet.

9. Put Bounce sheet in vacuum cleaner.

10. Prevent thread from tangling. Run a threaded
needle through a sheet of Bounce before beginning
to sew.

11. Prevent musty suitcases. Place an individual
sheet of Bounce inside empty luggage before storing.

12.To freshen the air in your car - Place a sheet
of Bounce under the front seat.

13. Clean baked-on foods from a cooking pan.
Put a sheet in a pan, fill with water, let sit overnight,
and sponge clean. The anti-static agent apparently
weakens the bond between the food and the pan..

14. Eliminate odors in wastebaskets. Place a
sheet of Bounce at the bottom of the wastebasket.

15.Collect cat hair. Rubbing the area with a sheet
of Bounce will magnetically attract all the loose hairs.

16. Eliminate static electricity from Venetian blinds..
Wipe the blinds with a sheet of Bounce to prevent
dust from resettling.

17.Wipe up sawdust from drilling or sand
papering. A used sheet of Bounce will collect
sawdust like a tack cloth.

18. Eliminate odors in dirty laundry. Place an
individual sheet of Bounce at the bottom of a laundry
bag or hamper.

19. Deodorize shoes or sneakers. Place a sheet
of Bounce in your shoes or sneakers overnight.

20.Golfers put a Bounce sheet in their back
pocket to keep the bees away.

21. Put a Bounce sheet in your sleeping bag
and tent before folding and storing them. It will keep
them smelling fresh.

22. Wet a Bounce sheet, hose down your car,
and wipe love bugs off easily with the wet Bounce.

Quick, bounce this on within the next 5 minutes!
Nothing will happen if you don't, but your friends
will be glad to hear these hints!

हे मला मेल मधून आलं. भाषांतर करणं शक्य नाही म्हणून आहे तसं च टाकत आहे.

भारतात कमी मेहनतीत, रगडारगडी न करताबाथारूम टाईल्स धुवण्याचे एखादं ट्राईड न टेस्टेड असे नावं सांगा ना कोणी वापरलेल.

इथले वाचून ' मसल मेन' आणले पण आमच्या बाईने नळांवर मारून डाग पाडले व स्प्रे बॉटल वापरून सुद्धा हात
जळलेच व तुमचे बाथरूम आता मी धुवणार नाही सांगून गेली. Sad

तेव्हा हे काम माझे झालेय. Proud

कमी श्रम करून चकचकीत बाथरूम बनवा! असे काहीतरी सांगा.

सगळ्यांच्य टीप्स मस्त आहेत,

कीचन ओटा सफेद मार्बलचा आहे कुणी सांगु शकाल का त्याला साफ कसे करनार, कारण त्याला कशाचाच डाग सहन होत नाही. आणी काळपट वाटतो

निराली, धन्यवाद. ब्लीचला खूप वास येतो तो मला अ‍ॅलर्जीक आहे.

म्हणून दुसरे काही आहे का ज्यात घासावेलागत नाही?

पलक, मार्बल पोरस मटेरियल असल्यामुळे, त्यावर जे काही पडेल ते, ते शोषून घेते आणि म्हणून डाग जात नाहीत. ( हळद वैगरे, अशक्य आहे ). पण ईथून पुढे पडू नयेत म्हणून कट्टा कंडीशन करून घ्या. दर ६ महिन्यांतून एकदा तरी कंडीशनींग करावे. शक्यतो अ‍ॅसिडीक गोष्टी कट्ट्यावर डायरेक्ट पडणार नाहीत ( लिंबू, टोमॅटो चा रस ) असे पहावे, किंवा ताबडतोब पुसून टाकावे. ( हे ग्रॅनाईट चा कट्टा असलेल्यांनी पण करावे)

ब्लीच directly वापरू नये. ते साधारण अर्धी बादली पाण्यात, अर्धा कप घालून किंवा आपल्याला जे प्रमाण योग्य वाटेल ते घेऊन त्यानी साफ करावे.

अमेरिकेत washer and dryer असे वेगळे वेगळे असतात. जर कपडे soft हवे असतील तर washer madhe fabric softner टाकायची पद्धत आहे जे liquid form मधे मिळतं. आणी dryer madhe hey bounce che sheets टाकायचे, त्यानी कपड्यांचे static निघुन जाऊन वास पण छान येतो.
http://www.google.com/products/catalog?q=bounce+dryer+sheets&hl=en&rls=c...

मधुरा ,निराली,खुप खुप धन्यवाद. कट्टा कंडीशन करून घेण्यच बघते. पण दुसरा घरगुती उपाय असेल तर बर होइल.

स्लाईडिंग विंडोजच्या ट्रॅक्समध्ये जमलेली धूळ, कचरा वगैरे साफ करणे एकदम कठिण काम आहे. झाडूने झटकले तरी पुरते स्वच्छ होत नाही आणि पाणी ओतले तर खालच्या भिंतीवर ओघळ येतो. सध्या तरी मी घरात रंगारी वापरतात तसला छोट्या साईज चा ब्रश आणून ठेवला आहे. त्याने ट्रॅक्स मधला कचरा बर्‍यापैकी साफ होतो. पण खूप वेळखाऊ काम आहे. Sad यापेक्षा सोपा उपाय आहे का?
(माझ्याकडे वॅक्यूम क्लीनर नाही. पूर्वी जेव्हा होता तेव्हाही वॅक्यूम क्लीनर ने असला ट्रॅक्समध्ये जमलेला कचरा नीट स्वच्छ होत नाहीच असा अनुभव आहे.)

(माझ्याकडे वॅक्यूम क्लीनर नाही) >> सायकलच्या चाकात हवा माराचचा पंप आहे का? हल्ली छोटा फुटपंप पण मिळतो. त्याने हवा मारत सगळी घाण एका कडेला जमा करायची. मग जरा मागे एक मोठा कपडा ट्रॅक्सवर आंथरायचा.मग कडेला जमा केलेली घाण हवेने उडवायची. कपडा टाकायचे कारण की उडालेली घाण परत ट्रॅक्समध्ये पडत नाही.

पलक, When in doubt go to the source, मारबल विकणार्‍या लोकांकडे जाऊन विचार कि कसे डाग घालवायचे. बेकिंग सोड्च्याची जर थोडं पाणी घालून पेस्ट तयार केली तरी त्यानी बर्याच गोष्टी स्वच्छ होतात. टूथपेस्ट नी घासून जातयं का बघ. त्यानी पण बरेच काही डाग जातातं.

निंबूडा, हेयर ड्रायर वापरून बघ. किंवा स्ट्रा नी फुंकुन जाण्या साऱखी आहे का?
अमेरिकेत एक कॅन मिळतो. (liquid air ka/liquid nitrogen asa kahitari naav aahe) त्याला असाच एक coffee stirrer सारखा स्ट्रा असतो. कीबोर्ड साफ करायला वापरतात. त्यातून फक्त हवा बाहेर येते. पण gloves घालून करायला लागतं कारण काही वेळानी तो कॅन प्रचंड थंड पडतो.

नाही तर मगं टिश्यू पेपर ओला करून पुसुन घ्यायचं

व्हॅक्यूम क्लीनरच्या ब्लोअर साइड्ला पाइप लावायचा, मग त्याला एक नॅरो अ‍ॅटेच मेंट असते ती लावायची.
जशी हेअर ड्रायरला असते तशी. मग स्लाइडिंग चॅनेल पाशी धरून हाय स्पीड ने ब्लो करायचे. सर्व धूळ बाहेर उड्ते. मशीन जोरात असल्यास ती नॅरो अ‍ॅटेचमेंट पण बर्‍याच वेळा उडते. हा ब्लो केलेला धुरळा आजू बाजूस पड्तो तो छोट्या झाडू ने एकत्र करायचा मग व्हॅ. क्लीनरची सकर साइडला पाइप लावून धूळ आत शोषून घ्यायची. व्याप आहे पण काम होते. दमा असणार्‍या व्यक्तीस ह्यावेळी बाजूला उभे राहू देऊ नये नक्की त्रास होईल.

अश्विनी पण तिच्या कडे व्हॅक्यूम क्लीनर नाही असं ती म्हणतिये.

इथे कोणी शार्क चा स्टीम मॉप वापरून पाहिलाय का?
व्हॅक्यूम क्लीनर कोणता चांगला (ज्याची सक्शन पॉवर खूप दिवस चांगली राहील )

माझ्याकडे डायसन चा व्हॅक्यूम क्लीनर आहे. गेली ३-४ वर्षं वापरतेय. सक्शन अजिबात कमी झालेलं नाही. अर्थात त्याचं कॅनिस्टर वेळोवेळी साफ करणे. फिल्टर धुणे, खाली जमिनी लगत जो ब्रश असतो त्यात अडकलेले केस धागे ईत्यादी वेळोवेळी साफ केले तर कुठल्याही व्हॅक्यूम क्लीनरचं सक्शन शक्यतो कमी होत नाही.

@प्रॅडी, अगं मी एकदा असं सगळं केलं बिसेल व्हॅक्यूम ला आणी त्याचं सक्शन गेले, त्यामुळे मी आता जरा भीत भीतच साफ करते. डायसन बघायला पाहिजे. किंवा रूंबा(तोच सगळं करतो त्यामुळे खरचं आपण नुस्तं सोफ्या बसुन त्याच्या कडे कौतुकाने बघायचं ) Happy

Pages