घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी

Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24

परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.

काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.

बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

८-९ वर्षांपूर्वी रंग दिलेल्या घराच्या भिंतींचा रंग अगदीच केविलवाणा वाटायला लागल्यावर नविन रंग लावणे भाग होते. पण गेल्या काही वर्षांपासून मला धुळीच्या अ‍ॅलर्जीचा अगदी टोकाचा त्रास सुरु झाल्यामुळे व अजुनही तो होत असल्यामुळे नविन रंग लावण्याची प्रक्रीया व त्या प्रक्रियेची प्रत्येक पायरी माझ्या ह्या अ‍ॅलर्जीच्या त्रासामुळे माझ्यासाठी धोकादायक ठरणार होती. त्यामुळे घरातल्या सर्व सदस्यांनी एकमताने भिंतींना रंग लावण्याऐवजी एका दिवसात लावुन होणारे, प्रक्रियेदरम्यान कुठल्याही धुळीचा, वासाचा समावेश नसणारे वॉलपेपर लावायचे ठरवले.

वॉलपेपर लावणारी आमच्या माहितीतली आम्ही पहिलीवहिली पार्टी असल्यामुळे वॉलपेपर लावणार्‍या कंपनीच्या जाहिराती शोधण्याचा सपाटा लावल्यावर एका मार्शल नावाच्या कंपनीशी संपर्क साधला. त्यांनी दाखविलेल्या वॉलपेपरचे एकापेक्षा एक सुंदर नमुने, त्यांच्या रंगसंगती आणि त्यांच्या डिझाईन्स बघून आम्हां सगळ्यांचे डोळे विस्फारले. पण वॉलपेपर लावण्याचे बजेट ऐकून थोड्याच वेळात ते पांढरे व्हायची वेळ आली........ सगळ्यात कमी किंमतीचा वॉलपेपर ७५/- रु. प्रति फूट होता. आम्ही आपलं आपल्या ऐपतीचे भान ठेऊन तेवढ्याच किंमतीच्या वॉलपेपराला किती खर्च येईल असे भीत भीत विचारले. त्याने आमच्या १० x १४ हॉलच्या फक्त एका भिंतीला ५०००/- ते ६०००/- खर्च येईल असे सांगितले. आम्ही घराच्या सर्व भिंती मनातल्या मनात मोजून संपूर्ण घरासाठी एकूण किती खर्च येईल याचा गुणाकार भागाकार केला आणि आलेल्या संख्येच्या नुसत्या विचारानेच आम्ही धास्तावून गेलो.

काय करावे काही कळेना. शेवटी अशाच आणखी एका वॉलपेपरच्या दुकानात चौकशी केल्यावर कमीत कमी
३०/ - रू. प्र.फू. पासून सुरु होणार्‍या वॉलपेपराची किंमत ऐकल्यावर त्याच्याकडूनच वॉलपेपर लावून घ्यायचा निर्णय घेतला. आणि त्यातल्या त्यात खोलीनुसार कमी जास्त किंमतीचा वॉलपेपर एका दिवसात लावून घेतला. घर आता अगदीच गोडुले दिसायला लागले. येणारे जाणारे कौतुक करायला लागले.

दोन महिने छान गेले. पावसाळा सुरु झाला. ऐन पावसाळ्यात सोसायटीने (कोणते लॉजिक वापरले कुणास ठाऊक) इमारतीचे प्लॅस्टरींगचे काम काढले. बाहेरुन तोडफोड सुरु झाली. आणि आता माझ्या घरातल्या नविन कोर्‍या वॉलपेपरवर जागोजागी बुरशीचे थर आणि काळ्या रंगाचे डाग दिसायला लागले आहेत. झाडूने झाडून ते जात नाहीत. व्हॅ. क्लि. ने पण साफ होत नाहीत. पेपर फाटायच्या भितीने खरवडताही येत नाहीत. ओल्या
कपड्याने पुसले तर तात्पुरते फिकट होतात पण पुन्हा पुन्हा ते येत रहातात. विचित्र दिसणार्‍या ह्या डागांनी माझ्या सुंदर घराचं चित्र डागाळुन गेलंय.............. Sad

हे असे का झाले? बजेटचा विचार करुन स्वस्तातला पेपर लावला म्हणून असे झाले का ? कि ऐन पावसाळ्यात सोसायटीने इमारतीचे प्लॅस्टरींगचे काम काढले म्हणुन भिंतीतून लिकेज होतेय ? पण आता ह्या प्रॉब्लेमसाठी काय उपाय करता येईल, कृपया आपले माबोकर मला याबाबत मार्गदर्शन करतील का ? Uhoh

निराली, नीधप, अश्विनीमामी, अवनी, शर्मिला, वर्षा_म, प्लीज माझ्या समस्येवर पण काहीतरी तोडगा काढा ना. खुप दिवस झाले मी वाट पहातेय................ Uhoh

वनराई, भिंतीवरच्या वॉलपेपरवर जर बुरशी, काळे डाग असतील तर खराब झालेला वॉलपेपर काढून टाकणेच श्रेयस्कर वाटते. वृत्तपत्रात भिंतीला आलेली ओल ड्राय करणार्‍यांच्या जाहिराती येतात. (सकाळ, छोट्या जाहिराती) त्यांचा सल्ला घेऊन बघा.

आपल्या घराच्या स्वच्छतेसाठी म्हणजे ते कमी श्रमात होण्यासाठी अतिशय चांगले प्रॉडक्टस मला माहिती आहेत. मी स्वतः वापरते. मोदीकेअर कंपनीचे जवळजवळ (२४५ प्रोडक्टसपैकी) असे फक्त १०ते१२ प्रॉडक्टस नुसते क्लिनींगसाठी आहेत. अतिशय मस्त आणि वापरण्यास सोपे आहेत.

बाथरुम क्लीनर,फ्लोअर क्लीनर,टॉयलेट क्लीनर, ऑल परपझ डझ ऑल, आणि बरेच बरेच आहेत.
हाताला जळजळ न होता आपल्या त्वचेसाठी एक्दम सेफ!
इको फ्रेंडली आहेत! येवढे करुन किंमतही रिझनेबल आहे.

वनराई, त्यातले स्टेरी क्लीन नावाचे (disinfectant) म्हणून आहे ते बुरशी काढायला मदत करते. वापरुन पहा .काळ्या डागांसाठी डझ ऑल कदाचित उपयोगी पडेल.

के अंजली, तुम्ही सुचविलेले स्टेरी क्लीन आणि डझ ऑल वापरुन बघते.

अरुंधती, अंजलीने सुचविलेली उपाय योजना करुनही फायदा झाला नाही तर तुम्ही सुचविल्याप्रमाणे खराब झालेला वॉलपेपर काढून टाकते आणि भिंत ड्राय करुन घेते. आणि परत दुसरा पेपर लावते.

माझ्या समस्येकडे कुणीच लक्ष देत नाही, असे वाटत होते. वाट बघुन बघुन अखेर निराशेपोटी माझी पोस्ट मी डिलिट करायचाही प्रयत्नही केला. Sad पण पोस्ट डिलिटही होत नव्हती.

अरुंधती, के अंजली, तुम्ही आज माझ्या समस्येवर प्रतिसाद दिलेले बघुन खुप बरं वाटलं ! तुम्हां दोघींनाही खुप खुप धन्यवाद ! Happy

खिड्क्यांना बाहेर उघडणारी दारं आहेत. ती फ्रेमसकट काढून त्या जागी स्लायडींग दारं बसवायचं ठरवतेय.
त्यात दोन चॅनेल्स मधे काचेची दारं आणि एक चॅनेल जाळीच दार ..डासांना प्रतिबंध म्हणून ....असा विचार करतेय.
डासांसाठी फायदा होईल का खरंच ......की उलट जाळी स्वच्छ करायचं काम वाढेल?........तुमचा काय अनुभव ?

अवनी, आमच्याकडे तशी दारं आहेत खिडक्यांना...काही अडचण वाटली नाही अजूनपर्यंततरी. काचेची दारं तर कागदाच्या बोळ्यानं किंवा कापडानं साफ होतात. जाळीचं दार केरसुणी, छोटा झाडू, छोटा ब्रश यानं साफ करता येतं. केवळ डासांसाठी नाही, पालीपण येत नाहीत. (पाली किडे खातात आणि निसर्गचक्रातला भाग आहेत हे मान्य करूनही त्यांना घरचा मेंबर बनवणं शक्य झालं नाहीये.)

सखूबाई, मिस्टर क्लिनचा वाइप आणून पाहिला का...

एक सोपा आणि स्वस्त उपाय सापडलाय. बेकिंग सोडा. ९०% डाग निघाले. सगळे महागडे products जे करु शकले नाहीत, ते साध्या उपायाने झाले. More suggestions are welcome Happy

भारतात टॉयलेट क्लीनर, क्लिनॉल नावाने एक कड्क अ‍ॅसिड मिळते. ते टाइल क्लीनिन्ग साठी चांगले असते. पण फारच स्ट्राँग आहे. प्लास्टिक च्या बाटलीत येते. मुख्य म्हणजे ते किचन मध्ये ठेवू नका. कोणीतरी अजाणते पणे तोंडाला लावू शकते.

दुसरे म्हणजे परवा मी ते पूर्ण बाथरूम मध्ये घातले व पाच मिनिटाने साफ करू असे ठरविले. त्या पाच मिनिटासाठी बाथरूमचे दार बंद होते. मग उघडल्यावर आत गेल्यास प्रचंड फ्यूम्स
(त्या अ‍ॅसिडच्या) भरलेल्या होत्या. डोळे, घसा, यांना त्रास होउ लागला व तिथे उभे देखिल राहवेना. एक्स्जौस्ट फॅन लावला व पाणी ओतले तरी जवळ जवळ अर्धा तास त्या फ्यूम्स जायला लागला.

तरी अस्ले अ‍ॅसिड अगदी संभाळून वापरावे. व शक्यतो हार्पिक ला स्विचओवर करावे. ते माइल्ड आहे. घरातील म्हातारी माणसे व लहान मुले ह्यांना त्या अ‍ॅसिड फ्यूम्स चा त्रास होण्याची शक्यता आहे.

अमा ह्या फ्यूम्सचा त्रास मी अनुभवलेला आहे. प्रेग्नंट बायकांनी चुकुनही वापरुन नये. आणी बकीच्यांनीही वापरताना नाकाला रुमाल लावुनच हे काम करावे.

लाकडी डायनिंग टेबल व खुर्च्याना कोलिन लावून पुसता येते का? साबणपाणी वापरलेले चालेल का? की दुसरे कुठले प्रॉडक्ट आणावे? कामवाल्या बाईसाहेबाना वापरायला सोपे असेल असे सांगा. Happy

मुलाने घराच्या भिंती crayons रंगाने रंगवल्या आहेत, आता apartment सोडायच आहे...काही उपाय आहे का?
washable colors म्हट्लय,पण डाग पडताहेत.

बीन बॅग ला भोके पडून त्यातून थर्माकोलचे अनंत गोळे बाहेर आल्यास त्यांना झाडूने भरत बसू नये. सरळ व्हॅक्यूमच करावे. आमच्याकडे कुत्रे नेहमी बसून फाडून ठेवतात. आजच सकाळी सहा वाजता हा उद्योग केला आहे. डस्टबिन मध्ये गोळे टाकल्यास कचरा गोळा करणार्‍यांना त्रास होतो कारण हा डिग्रेडेबल कचरा नाही.

माझ्या कडे किचनमध्ये खूपच मुंग्या झाल्या आहेत. रोज किचन २ दा फिनेलने पुसते, लक्षण रेषा मारून पाहिली. या मुंग्या फारच विचित्र आहेत पाण्यालाही लागतात.. आणि आता चिलटं ही खूप झाली आहेत. हे ही किचनमध्येच!!
काय करू?

बिन ब्याग फोटून त्यातून थ.अ.गो. बाहेर येणे ही रेअरेस्ट ऑफ द रेअर घटना आहे>>> तुमच्याकडे कुत्रेबाळे त्यावर धपाककन बसत नाहीत वाट्ते. मी दर महिन्यात ती बीन बॅग शिवत असते. व डोंट मेस विथ द झोहान सारखे हातात व्हॅ. क्ली. घेऊन सफाइस सज्ज असते. आज ब्यागेला टीप मारलीच पाहिजे.

आणि आता चिलटं ही खूप झाली आहेत. हे ही किचनमध्येच!!
काय करू?
>>
लादी पुसायच्या पाण्यात थोडंसं खडे मीठ टाकुन लादी पुसुन बघ एकदा.

स्वप्ना, हो गं. माझ्याकडे पण काळ्या मुंग्या दिसताहेत. पण नेहमीच्या मुंग्यांसारख्या नाहीत या. किंचित वेगळ्या दिसतात आणि यांना कसलातरी वास येतो. पहिल्यांदाच माझ्या घरात मुंग्या आल्यात त्यामुळे यावर उपाय काय ते ही माहित नाही. थँक गॉड, चिलटं तरी नाहीत. फार घाण वाट्ते मला.

रीमा, घर सोड. बदलुन टाक लगेच. खरंच सांगते आहे. तीन तीन पाली? मी तर मेलेच असते भीतीने.

कुत्तु, व्हॅक्यूम, शिवणकाम??
बापरे! इतक सहन करायचं? मी बीनबॅग ग्यारेज सेल ला लावून टाकीन Wink

स्वप्ना, मनिमाऊ, नेहमीच्या मुंग्या जाण्यासाठी मी लवंगा टाकते त्या जागेवर. जरा जास्तच टाकाव्या लागतात पण मुंग्या पळतात. या विचित्र Happy मुंग्यांसाठी उपयोग होईल का ते माहीत नाही.

चिलटं म्हणजे फ्रूट फ्लाईज का? केळी, द्राक्षे इ. भोवती छोटे किडे असतात ते? त्यासाठी हमखास उपाय म्हणजे एका शक्य तितक्या लहान तोंडाच्या बाटलीत अ‍ॅपल सायडर व्हिनेगार घालून उघडीच ओट्यावर ठेवायची. त्याकडे चिलटं आकर्षित होतात नि बुडून मरतात. इंटरनेटवर यात थोडे डिश सोप पण घालायला सांगितलेय पण ते न घालताही नुसत्या व्हिनेगारनेही दोन दिवसात हे किडे गायब होतात.

पाली येत आहेत म्हणजे त्यांना लागणारे खाद्य घरात मिळात असेल. पालींना पळवून लावण्यापेक्षा त्या ज्यांना खातात त्या कीटकांचा - झुरळे, कोळी इ.चा बंदोबस्त करायला हवा.
(याचा अर्थ पाली कीटकनियंत्रण करून मदतच करतात.(?))

रीमा, घर सोड. बदलुन टाक लगेच. खरंच सांगते आहे. तीन तीन पाली? मी तर मेलेच असते भीतीने.>>
आरे बापरे. स्वतः च घर आहे ग. मुंबइत परडण्यासारख नाही ते.

हम्म भरत. तुम्हि म्हटलात ते बरोबर आहे. जॉइंट फ्यामेली असल्याने कठीण जात हे करण. संडेला लावायला हव सगळ्यांना कामाला.

पालीमुळे घर सोडायला हा काय पुलंचा काळ आहे का?' त्यावेळी मुंबईत शेजार्‍यांयांचा पोपट आवडला नाही एवढ्या कारणासाठी जागा बदलता येत.' (वाचा : पाळीव प्राणी) Happy
पेस्ट कंट्रोल करून घेतलं तर कीटकांचा त्रास होत नाही. झुरळांच्या बंदोबस्तासाठी एक लक्ष्मणारेषा ब्रँडचा खडू घेऊन ठेवलाय. वापरायची वेळ अजून आलेली नाही.

Pages