घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी

Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24

परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.

काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.

बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात असाल तर टास्क बॉब. कॉम वर सर्व प्रकारची साफ सफाई करून देतात. पहि ले रेट सांगून एस्टीमेट देतात व अपाइंट्मेंट देउन घरी येतात. दोन तीन तासात साफ सफाई करतात ह्यांच्याकडे सर्व प्रकारची स्पेशलाइज्ड व हर्बल सोलुशन्स आहेत. रेट रीझनेबल आहेत. मी फ्रिज व सोफा क्लीन करून घेतले. हर प्रकारचे डिस्काउंट पण असतात. चांगली सर्विस आहे.

https://www.taskbob.com/

डिस्क्लेमरः ही जाहिरात नव्हे.

डब्याला नाही पण वरच्या झाकणाला आतून आमरस लागल्याने त्याचे डाग पडलेत, ते काही केल्या जात नाहियेत. काय करू? >>>>>> दक्षे, टिफीन प्लॅस्टिकचा असेल तर बाजारात क्लोरोमिक्स मिळत ते डायलुट करुन त्याने स्वच्छ कर झाकण. चकाचक होईल एकदम. माझा एक प्लॅस्टिकचा टिफीन आईने तसा स्वच्छ करुन दिला होता.

बाथरुम मधल्या बाथटब आणि फरशी वर हार्ड वॉटर ने काळपट डाग पडले आहेत(जिथे पाणी अगदी थोडावेळ पण साठतं तिथे हे डाग येतात.)पांढर्‍या दंडगोलाकृती लायझॉल ब्लीच ने जायचे डाग, पण हे आता सुपर मार्केटांमध्ये सहज मिळत नाही.सगळीकडे सौम्य लायझॉल फ्लोर क्लिनर आणि थोडं कडक लायझॉल बाथरुम क्लिनर मिळतं, जिद्दी डागांवर त्याचा उपयोग होत नाही.
काय वापरावं ज्याने टाकून ठेवून आणि थोडं घासून डाग जातील.
हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाकलं होतं.पण ते जरा जास्त झालं आणि ते सर्व धुवून टाकेपर्यंत क्लोरिन नाकात जाऊन ब्रेन डेड व्हायची पाळी आली होती.

ताई अ‍ॅसीड टाकू नका डायरेक त्याचेच डाग पडतील. हैद्राबादेत मी रंगकंपनीत काम करत होते तेव्हा एका हॉटेल कस्टमरच्या बाबतीत असे घडले होते. मार्बल जमिनीवर अ‍ॅसिड टाकले क्लीनिन्ग स्टाफने व त्याचे डाग पडले. शिवाय तुम्हाला त्रास होईल. अ‍ॅसिड फ्यूम्स नाकात घशात जातील.

आमची साधीय हो अमा जमिन, मार्बल बिर्बल नाही. पण एच सी एल चा ही उपयोग झाला नाही.आणि फ्युम्स मुळे परत न वापरायचे ठरवले.

ओफिचे प्लास्टिकचे डबे आहेत, त्याना भाजीचा वास येत राहातो, कसे साफ करणार ??>> ओफिचे प्लास्टिकचे डबे माहीती नाहीत पण मी टपरवेयरचे डबे साफ करुन फ्रिजमध्ये ठेवते त्याने वास जातो..

पन्तश्री, डबे घासून झाल्यावर कोरडे करून उघडेच ठेवायचे, शक्यतो किचन कट्ट्यावर/ कपाटात वगैरे नाही.
दुसरा उपाय, डबे घासून, कोरडे करून टिश्यूपेपर घालून ठेवायचे. भाजीचा/ लोणच्याचा दर्प राहात नाही.

अगदी गरम पदार्थही प्लॅस्टिकच्या डब्यात भरला तरी वास लागतो डब्यांना.

मलाही जरा मदत हवी आहे. सध्या घरात सगळीकडे वापरायचं पाणी बोअर + महापालिका असं आहे. पण ते हार्ड-वॉटर नाहीये. त्यात बरेच क्षार आहेत. स्टीलचे नळ, वॉशबेसीन्स, किचन सिंक्स यावर त्याचे सारखे डाग पडत राहातात. अगदी दर आठवड्याला घासूनही ते जात नाहीयेत, यावर काय उपाय करता येईल?
स्टीलच्या नळाच्या तोट्याही स्वच्छ तर राहायला हव्यात आणि कुठल्या केमिकलचे डाग पडून खराबही व्हायला नकोयत...

कापसाच्या गाद्या , उशा (बाहेर ऊन द्यायची सोय नाहीये) कशा स्वच्छ ठेवाव्यात. कव्हर्स , बेडशीट ही वरवरची स्वच्छता होतेच. पण तरीही ती पुरेशी नाही वाटत.

कापसाच्या गाद्या , उशा (बाहेर ऊन द्यायची सोय नाहीये) कशा स्वच्छ ठेवाव्यात. >>> व्हॅक्युम क्लिनर असल्यास त्याला मॅट्रेस साफ करायचा एक ब्रश असतो त्याने खूप प्रमाणात साफ होतात गाद्या.

खूप खराब झाल्या असतील तर त्या कापसातून नविन गाद्या करून घेता येतील. पण ते करायच्या आधी कापसाचे वजन करून घ्या. नाहीतर गादीवाला खूप कापूस लंपास करतो.

नमस्कार, मी सध्याच ग्वाल्हेर येथे शिफ्ट झाले आहे, महिन्याभरापूर्वी एअरफोर्स कॉलनी मध्ये तळमजल्यावर क्वार्टर मिळाले आहे.
बाकी तस सगळं छान आणि स्वच्छ आहे, पण घरात माश्या आणि मुंगळे यांचा खूपच त्रास आहे. रोज व्यवस्थित केर काढून डेटॉलच्या पाण्याने लादी पुसतो आम्ही पण तरीही हा त्रास कमी होण्यासाठी अजून काही उपाय आहेत का? माझी मुलगी एक वर्षाची असल्याने माश्यांमुळे जास्त काळजी वाटते. कोणी उपाय सांगू शकेल का ?

खिडक्यांना बारीक जाळ्या बसवा,जेणेकरून माशांना प्रतिबंध होईल.मुंगळ्यांसाठी,स्वातींनी सांगितल्याप्रमाणे करा.

Pages