घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी

Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24

परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.

काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.

बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

. दिवसभर घर बंद जरी असले तरी संध्याकाळी घरभर धुळ साचलेली असते. घरात येणारी धुळ कमी करण्याचे काही उपाय आहेत का?>>>> मला पण याच्यावर उपाय हवा आहे..

माझ्याकडेही तोच प्रश्न आहे. त्यात कुत्र्यांच्या पायाने व बेल्ट्ने फार धूळ येते. पायाला लागत राहते. मी सकाळी हपिसला यायच्या आधी एकदा झाडू पोछा करते व मेड दुपारी एकदा करते. इथे बिल्डिंग मध्ये एक बाई आहेत ज्यांच्या कडे रोज साबणाने फरशी धूतात व पुसून घेतात. आमची मेड तक्रार करत असते.

>> धुळीचा प्रतिबंध कसा करावा?
करू नये. इट्स अ लॉस्ट बॅटल. Happy
'आमची धूळ बघा कशी दमदार! तुमच्याकडे येते का अशी?!' असा अभिमान बाळगायला लागावं. Proud

>> धुळीचा प्रतिबंध कसा करावा?
करू नये. इट्स अ लॉस्ट बॅटल>>+१.
साधना तुझं घर बैठं किंवा पहिल्या ३-४ मजल्यापर्यंत आहे का? मग धुळिला काहीच पर्याय नाही.>>>> मुंबैत त्यानेही फरक पडत नाही.. माझं घर ५ व्या मजल्यावर आहे.. घराच्या ५०० मि च्या परिघात बांधकामं सुरु नाहीयेत, दिवसभर दारं-खिडक्या बंद ठेवल्यातरी धुळ येतेच. Sad

बाप रे, माझं घर १० व्या मजल्यावर आहे. धूळ अतिशय कमी येते. बाल्कनी सकाळी धुतली तरी संध्याकाळी सुद्धा पायाला गुळगुळित लागते एकदम. फर्निचर वगैरे सुद्धा आठवड्यातून एकदाच पुसावे लागते. पण कबुतरांचा भारी त्रास आहे. झाडाला आलेली कोवळी पानं, कळ्या टोच्या मारून तोडून टाकतात. कुंडीत घातलेलं पाणी चोचीने प्यायचं असलं की मातीत त्यांचे पाय जातात, त्या पायाने नाचतात बाल्कनीभर.. आणि सगळीकडे रांगोळ्या... त्या निराळ्याच. Sad
तात्पर्य काय? तर कुठेही रहा, कोणत्याही मजल्यावर रहा.. धूळ नाहीतर कबुतरं आहेतच त्रास द्यायला. Proud

पहिल्या मजल्यावर आहे गं... Sad

करू नये. इट्स अ लॉस्ट बॅटल

हे स्विकारायला तर जड जातेय... घराचे इंटेरिअर करुन घ्यायचे मनात आहे, पण मग त्या सगळ्यावर रोज धूळ बसणार आणि मला ती साफ करत बसावी लागणार या कल्पनेनेच "चाल्लय ते ठिकाय, नको ते इंटेरिअर" असे वाटतेय..

नेटवरच्या घरांमधल्या सजवलेल्या खोल्या, त्यातले सगळीकडे पसरुन ठेवलेले साहित्य, जमिनीवर जाडजाड कार्पेट्स वगैरे बघितले की मला ते धूळीने भरल्यावर कसे दिसतील हाच विचार सुचतो. Happy

एक करडा पडदा कायम टांगलेला आहे ह्या शहरावर.. पावसाळ्यात थोडी सुटका असते धूळीपासुन, बाकीचे १० महिने धूळच धूळ. आपली श्वासनलिका कधी उघडली तर त्याच्यातुन किती धूळ निघेल ??

मुंबईच्या म्युनिसिपालिटीने शहरातल्या वाढत्या धूळीवर काहीतरी ठोस उपाय करण्याचे मनात आणलेय असे मागे कुठेतरी वाचलेले Happy त्यांचे उपाय अमलात येईपर्यंत मी मुंबई सोडलेली असेन बहुतेक..

आणि ही पायाला धूळ लागणे मला खुप इरीटेटींग होते. संध्याकाळी घरात पाय टाकल्याबरोबर आधी हातात झाडू घेते. आणि ती घेण्याचा कंटाळा आला तर मग स्लिपर्स घालुन फिरते पण ही धूळ सहन होत नाही मला... Angry

पण ते मांजर बाल्कनीत ठेवावं लागेल का? आणि घरून निघताना मग ती लॉक नाही करता येणार. सगळाच गोंधळ आहे शी Sad

खरंतर पाणि टंचाईकडे पाहता मला बाल्कनी धुणे वगैरे सारखे फाजिल लाड आवडत नाहीत. पण आठवड्यातून एकदा १-२ बादल्या पाणी वाया घालवावेच लागते. Sad नो इलाज.

घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी >>>> नवर्‍याला घराबाहेर ठेवावे कि घर स्वच्छ रहाते. मी हेच करते, तुम्ही पण हेच करा. Wink बघा घर कसं स्वच्छ रहातं. माझी मेड म्हणते पण कि साहेब नसले कि घर किती स्वच्छ असतं ना. मी साहेबांना हा निरोप दिला तर ते फार खुन्नस ठेवुन आहेत तिच्यावर. Proud

घराच्या धुळीचा वैताग मलाही आला आहे. दिवसभर घरी कोणी नसल्यामुळे मला खिडक्या बंद ठेवता येतात. शिवाय जाड कॉटनचे कर्टन्स ओढुन घेतले कि स्लाइडिंग विंडोजच्या फटीमधुन येणारी धुळ पण अडवली जाते. दिवसभर घर उघडं असेल तर मात्र महान वैताग धुळ येते. ( घरासमोरे प्रचंड मोठं मिलिटरी ग्राउंड आहे. ते पावसाळ्यात जेवढं सुंदर दिसतं तेवढंच उन्हाळ्यात वैताग देतं. )

माझी १०९ दिवसानंतरची पहिली पोस्ट Happy माबोला लॉग इन केल्यावर पहिल्याच पानावर हा जिव्हाळ्याचा विषय दिसला. Happy

घराचे इंटेरिअर करुन घ्यायचे मनात आहे, पण मग त्या सगळ्यावर रोज धूळ बसणार आणि मला ती साफ करत बसावी लागणार या कल्पनेनेच "चाल्लय ते ठिकाय, नको ते इंटेरिअर" असे वाटतेय..

नेटवरच्या घरांमधल्या सजवलेल्या खोल्या, त्यातले सगळीकडे पसरुन ठेवलेले साहित्य, जमिनीवर जाडजाड कार्पेट्स वगैरे बघितले की मला ते धूळीने भरल्यावर कसे दिसतील हाच विचार सुचतो

>>>

साधना, अगदी अगदी !! Lol

पण ते मांजर बाल्कनीत ठेवावं लागेल का? आणि घरून निघताना मग ती लॉक नाही करता येणार. सगळाच गोंधळ आहे शी

मांजराला बाल्कनीत ठेव आणि बाल्कनी आरामात लॉक करुन जा. बाल्कनीतुन ते खाली पडणार नाही ना एवढे मात्र बघ. कारण उगीच जिथे तिथे नाक खुपसुन आपला जीव धोक्यात घालणे ती त्या जातीची खासीयत आहे. घरातल्या एखाद्या खोलीत ठेवलंस तरी ते दिवसभर आरामात झोपुन घालवेल तिथे. मांजराला खायला काहीतरी ठेवलं की त्याची काहीच कटकट नसते.

आज सकाळीच् मी माझ्या मांजराकडुन घरात घुसलेली एक पाल मारुन घेतली. फक्त त्याला उचलुन उचलुन ती पाल दाखवावी लागली एवढेच. एकदा त्याला दिसल्यावर पुढचे काम त्याने अती चपळाईने केले.

बेबे माझं घर आहे १०व्या मजल्यावर, कुठे गं रिस्क घेऊ? आणि बाल्कनीत त्याने ओरडून इतरांना हैराण केलं तर?

मग जाऊदे तर.. कबुतरं चालतील पण मांजरामुळे तुझ्यावर ओरडणारे शेजारी आवरा असे म्हणायची वेळ येईल तुझ्यावर Happy

पर्वा सावंतवाडीत ज्या हाटेलात उतरलो होतो तिथे ढेकूण होते. वापरलेल्या कपड्यात एक आलेला आहे सप्रेम भेट म्हणून.
पावसाचे दिवस असल्याने ८-१० दिवसांचे कपडे एकदम धुवायला टाकू शकत नाहीये. कपडे धुतले तरी बॅग वगैरे आहेच.
सर्व जीवजंतूंना भूतदया दाखवणारी अशी हॉटेल्स आणि असे प्रवास हे टाळता येण्यासारखं नाही.
अश्या 'इम्पोर्टेड' जीवजंतूंचा घरात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय करावे?

wall skirting वरील धुळ माती कशी साफ करावी , [ओल्या कापडा ने केले तर डाग पडण्याची शक्यता आसते]

नी, कंपल्सरी उकळत्या पाण्यात टाका सगळे कपडे. बॅग नीट चेक करा. ती ढेकणीण असली अन तिने घरात अंडी घातलीत तर संपलंच मग!
पुण्यात ससून अन होस्टेलला ढेकूण फार होते. होस्टेलवरून घरी आल्यावर सगळे कपडे परस्पर उकळत्या पाण्यात जात असत. प्लस बॅगचे मायक्रोस्कोपिक निरिक्षण.

जुणे कारपेट काढल्यावर फरशीवर काही कारपेटचे तुकडे आणि बहुदा चिटकवण्यासाठी वापरलेल्या पदार्थाचा थर राहिला आहे. तो कसा काढता येइल?

HI,
IN THE MONTH OF RAINY SEASON ,IN MY HOUSE DUE TO WATER LEAKAGE FROM TERRACE, GREEN ALGEE ( BURASHI) IS GROWING ON WALL,SO PLEASE SUGGEST WHAT CAN I DO TO CLEAN THE GREEN ALGEE ( BURASHI),WHICH GROW ON WALL DURING THE RAINY SEASONN.

@ जयु : सेम प्रॉब्लेम झाला आहे ..

१.
व्हिनेगर आणि अल्युमिनियम फॉइल घ्या ..

एका डिश मधे व्हिनेगर घ्या..त्या मधे अल्युमिनियम चा एक तुकडा घ्या त्याला फोल्ड करा ..मुठीत घेउन घासता येईल ..नंतर फॉईल व्हिनेगर मधे बुडवून त्याने डाग घासा !

या मुळे बराच फरक पडतो ..

२. क्रोम पॉलीश मिळते .. हार्ड्वेअरच्या किंवा अ‍ॅटोमोबाईलच्या दुकानात ..ते लावून घासले असता डाग जातात ( हे अजून केले नाहिये )

ध्न्यवाद शाहिर. मि उशीरा प्रतिसाद पाहिला.

मी पण खायचा सोडा,व्हिनेगर वापरुन स्वच्छ केले सिंक. ९०% डाग गेलेत.

बेकिंग सोड्याचे उपयोग शोधताना, डीशवॉशरसाठी हे सापडले व तिथे अजुनही अनेक घरगुती cleaners च्या कृत्या सापडतील.

http://frugalliving.about.com/od/cleaningtipsandrecipes/qt/Dish_Detergen...

जयु +१ मी पण अमेरीकेत बेकिंग सोडा व व्हिनेगर वापरते. किचन , बाथरुम, खिडक्या, लादी, कार्पेट, ओवन, मायक्रोवेव्ह सगळ स्वच्छ होते.
व्हिनेगरने हळ्दीचे डाग पण स्वच्छ होतात.
सुनिधी मस्त... बनवायला पण सोपे आहे..

लेदरसाठी लेदर वाइप्स/स्प्रे मिळतो तो वापरू शकता. रोज कोरड्या फडक्याने पुसले आणि आठवड्यातून एकदा किंवा त्या प्रॉडक्टवर लिहिले असेल तेवढ्या दिवसांनी एकदा पुसले तर चांगले रहाते लेदर.

Pages