उरलेल्या भाताचे वडे

Submitted by प्रज्ञा९ on 27 October, 2010 - 12:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उरलेला भात हलक्या हाताने मळून घेऊन-२ वाट्या
धने-जिरे पूड १ १/२ टीस्पून, तिखट पूड १ १/२ टीस्पून, मीठ चवीनुसार, आवडत असल्यास साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी, चाट मसाला/ आमचूर पावडर १ टीस्पून, तेल.

क्रमवार पाककृती: 

१. मसाल्याचे पदार्थ घालून भात चांगला मळून घ्यावा. कोथिंबीर घालून सारखा करून घ्यावा.
२. मध्यम आकाराचे वडे थापावेत व डीप फ्राय करावेत.

वाढणी/प्रमाण: 
८ ते १० वडे.
अधिक टिपा: 

तळण्याऐवजी शॅलो फ्राय करून चालतात, पण मी नाही करून पहिलेयत अजून.
टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणीबरोबर चांगले लागतात.

उरलेल्या भाताचा नेहेमी फो भा करायचा कंटाळा आला होता, त्या वेळी अचानक आठवलेली पा़क्रु. माबो वर पहिल्यांदाच पाक्रु लिहितेय, तीही अपघाताने जमलेली. सांभाळून घ्या ही विनंती. वडे केल्यावर लगेच खाताना इतके सुंदर लागत होते म्हणून शेअर करायचा मोह आवरला नाही. आणि हे वडे गरम गरम खाल्ले तर जास्त छान लागतात. गार झाल्यावर मऊ होतात.

माहितीचा स्रोत: 
सुगरणीचा सल्ला हे पुस्तक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शॅलो फ्राय करून पाहीन.

सुचना:
बारीक रलेली कोथिंबीर>>> 'चि' शब्द राहीला.

मी हे वडे करायच्या विचारात आहे आत्ता. भात थोडा मळून बघितला पण अजिबात मिळून येत नाही. उलट सगळी ढेकळे जाऊन एकदम मोकळा झाला आहे. काय करावे?

पाण्याच्या हाताने मळून घे. किंवा भात पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून मायक्रोवेव्हमधे गरम करून घे आणि मग मळ.

मृदुला, मी नेहमी ह्या वड्यांमध्ये थोडं तांदळाचं पीठ घालते. आणि कांदा पण घालते यात. बारीक चिरलेला कांदा घातल्यावर साधारण १० मिनीटं तसच ठेव म्हणजे जरा ओलसरपणा येईल आणि मळायला सोप्पं जाईल.

मृदुला, थोडं कॉर्न फ्लोर/ तांदूळ पीठ/ आरारूट लावून करून बघणार का? थोड्याशा भातात घालून नीट मळला जातोय का बघून मग बाकीच्या भातामधे घालता येईल. असेल तर उकडून किसलेला बटाटाही चालेल.

वा! पटकन उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद स्वाती, सावनी आणि प्रज्ञा. Happy

मावे नाहीये.
उकडून किसलेला बटाटा चांगला पर्याय आहे.
तांदळाचे पीठ आहे का बघते. इन फॅक्ट कोणकोणती पिठे आहेत ते बघून इथे लिहिते ५/ १० मिनिटात.

उपलब्ध पिठे - तांदूळ, कॉर्न, भाजणी, डाळ (बेसन) आणि अर्थातच कणीक.
शिवाय जाड व बारीक रवा.

काय वापरावे?

बटाटे आहेत ते गेल्या रविवारी बागेतून काढलेले आहेत. त्यामुळे चिकटपणा कमी असेल.

तांदूळ पीठं घाल ,मृदुला. मी तरी नेहमी तेच घालते. मळता येईल इतपत घाल. आणि पाणी नको घालू त्यात मळताना.

थोडंसं तांदूळ पीठ घालून आणि बारीक रव्यात घोळवून मस्त क्रिस्पी होतील. कटलेट्स सारखे शॅलोफ्राय करायचे. भात शिजलेलाच असल्यामुळे कच्चं लागणार नाही काही. तांदूळ पीठ आणि रवा मंद आंचेवर छान खरपूस होतो.

अगं हो, मृदुला. पाणी नाही लागत जास्त. नुसतं पाण्याच्या हाताने मळायचं. कारण भाताचा ओलसरपणा असतो ग. किंवा दही असेल घरात तर चमचाभर दही घाल.

यात ब्रेडच्या (अगदी ताजा नको) स्लाईस कुस्करुन किंवा पाण्यात भिजवून आणि मग पिळून घातल्या तरी छान मिळून येतात हे वडे. मात्र मी शॅलो फ्रायच करते. खूप तेल पितात हे वडे तळले तर.

मी दही घालुन एकदा केले होते. पण नीट होईनात (आणि तांदूळ पिठी नव्हती) म्हणून थोडे बेसन घातले होते. सुरेख लागत होते.

उरलेल्या भाताचे खमंग त्रिकोणी कटलेट्स पण करता येते
मी धने-जिरे पूड + चाट मसाला + आल-लसुन + १ मिरची+ कोथंबीर मीक्सर मध्ये वाटुन मग मळते..
[ short cut Happy ]

तांदूळ पीठ आणि रवा मंद आंचेवर छान खरपूस होतो.

IMG0213A.jpgIMG0214A.jpg

एकदा कुणातरी हे मागे इथे लिहिले होते, तेंव्हा मी केले होते.. मी शॅलो फ्राय केले होते.

.

जागोरे, वडे छान दिसतायत... ते दुसर्‍या फोटोत वड्याच्या खाली काही चटणी आहे की बोल चे डिझाईन आहे?? काही कळेना? चटणी असेल तर कुठली???